निशिगंधा भाग 43

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ४३
क्रमश: भाग ४२
स्वराज " निशी…. कॅमेरा नीट सेट कर ना .. मला फक्त चेहरा दिसतोय .. आय वॉन्ट टू सी यु इन दयाट ड्रेस "
निशी " नाही .. आता नको ..नंतर .. "
स्वराज " निशी .. प्लिज ना .. आय एम लिटरली डेस्परेट टू सी यु .. प्लिज ना .. डोन्ट बी सो हार्ड "
निशी ने चक्क चेहऱ्यावर हात घेतला " स्वरू .. काय रे .. असला का ड्रेस पाठवलास ?"
स्वराज " तुला नाही आवडला का ?"
निशी " म्हणजे .. आता कसे सांगू .. मी कधीच नाही घातला ना असला ड्रेस या आधी "
स्वराज " म्हणून तर पाठवला ना ... माय डिअर वाईफ .. इट्स नॉट बिग डील .. इट्स व्हेरी कॉमन ड्रेस हिअर इन UK ... एकदा सवय झाली ना कि मग तुझी तू जाऊन सगळे असलेच ड्रेस घेऊन येशील .... दाखव ना यार .. इतका काय भाव खाते .. "
निशी ने कॅमेरा असा सेट केला कि ती त्याला पूर्ण दिसेल
स्वराज तिला डोक्या पासून खाल पर्यंत पाहून एकदम गार च पडला .. मनातच " कोण म्हणेल हिला कि गावात लहानांची मोठी झालीय .. इकडे आली कि आग लावणार आहे हि . शी इज रिअली बर्निंग फायर "
स्वराज ने पटकन स्क्रीन शॉट घेतला फुल इमेज चा
निशी " हॅलो .. नाही ना छान दिसत .. बघ मी म्हटले होते .. माझी पर्सनॅलिटी अशा ड्रेस साठी नाहीये "
स्वराज " अरे .. वेडी आहेस का तू ? कसली सुंदर दिसतेय तू .. गॉर्जस .. ब्युटीफुल . एकदम हॉट दिसतेय .. यु नो व्हॉट ब्लॅक रिअली सूट्स यु .. "
निशी " स्वरू .. तुला एक सांगू का .. आज ना तू पण एकदम राजबिंडा दिसतोय .. मला जर शिटी वाजवता येत असती ना तर मी एक शिटी च वाजवली असती "
स्वराज " aww ... माझी शोनु .. किती मस्त बोलतेय आज .. चक्क माझ्या लुक्स वर बोलतेय .. चला म्हणजे आज नक्कीच माझी बायको आहे माझ्या समोर .. "
निशी " म्हणजे काय ? बायको आहे म्हणून या ड्रेस मध्ये आहे .. नाहीतर हे अश्यकच आहे .. स्वरू .. खरंच छान दिसतंय का हे ?"
स्वराज ने तिला तिचाच व्हाट्स ऍप ला फोटो पाठवला " जस्ट ह्याव अ लूक .. "
निशी ने तो फोटो बघितला तेव्हा तिला पण वाटले कि आज आपण काहींच्या काहि दिसतोय .. तिच्या डोळ्यांच्या कडाच ओलावल्या ..
स्वराज " काय झाले .. व्हाय आर यु क्राईन्ग ?प्लिज डोन्ट ना शोना "
निशी " मी .. तुला खूप मिस करतेय .. तू पाहिजे होतास आज जवळ .. एकदा तुझ्या मिठीत यावेसे वाटतंय मला .. तुझ्या खांद्यावर डोके ठेवायचंय "
स्वराज " ए .. ए .. होल्ड इट .. आज नो रोना धोना.. अजून तर आज भरपूर मज्जा करायचीय .. ऑन लाईन रोमान्स करायचाय आपल्याला "
निशी ने पण लगेच डोळे पुसले .. निशी चे गाल लाजून लाल लाल होत होते..
स्वराज त्या टेबल वर बसला .. तीला पण बसायला सांगितले ..
त्याने त्याच्या ग्लास मध्ये वाईन ओतून घेतली स्वतःला .. निशी ने तिला पाणी ओतून घेतले ग्लास मध्ये .. दोघांनी एकमेकांना चिअर्स केले .. आणि ड्रिंक्स घेतले ..
मग .. एकमेकांना डिनर सर्व्ह केले .. एकमेकांना दाखवत .. गप्पा मारत जेवले .. मध्ये मध्ये स्क्रीन वर एकमेकांना घास भरवला .. आणि खळखळून हसले ..
डिनर नंतर हात हात घेऊन इमॅजिन करत कपल डान्स पण केला दोघांनी..
एक दिन, एक दिन तेरी राहों में
बाहों में, पनाहों में आऊँगा
खो जाऊँगा, एक दिन तेरा हो जाऊँगा
ये दिल तो ना कह सका ये बातें
दिल तो ना कह सका

तू जाने ना तू, चाहत मेरी कितनी बेताब है
वो जो बरसों मेरी पलकों में था, तू वही ख्वाब है
हर घड़ी, हर घड़ी तेरी यादों में
वादों में, इरादों में, आऊँगा, खो जाऊँगा
एक दिन तेरा हो जाऊँगा...

ये झुकती नज़र जान-ए-जिगर होश ले जाती है
मैं कैसे कहूँ इक अजनबी दर्द दे जाती है
चुपके से, चुपके से, तेरी नींदों में
ख्वाबों में, ख्यालों में, छाऊँगा, खो जाऊँगा
एक दिन तेरा हो जाऊँगा...

https://www.youtube.com/watch?v=8Fz2GXx9Qsw&ab_channel=TipsOfficial

निशी स्वराजमय झाली होती .. त्याचा न होत असलेला स्पर्श तिला जाणवत होता .. आणि तो तिचा सहवास अनुभवत होता .. अशी हि आगळी वेगळी रोमँटिक डेट त्यांनी खूप छान सेलेब्रेट केली.
स्वराज " निशू .. आय एम मिसिंग यु बॅडली .. पण हि डेट खरंच मला तुझ्या एकदम जवळ घेऊन आली .. लवकर लवकर विझा चे काम कर .. मला यायचंय तुला घ्यायला .. "
निशी " स्वरू .. आय लव्ह यु .. तुझ्या डोळ्यांत माझ्या साठी इतके प्रेम बघून मी खरंच भारावून गेलेय .. खरंच तू .. तू ग्रेट आहेस .. मी आतुर झालेय .. प्लिज लवकर ये "
स्वराज " ऐक ना .. मी उद्या दुपारी जर्मनी ला जातोय .. एक महिन्यासाठी .. कदाचित माझ्या कॉल करायच्या वेळा बदलतील .. टाइम डिफरन्स मुळे .. आणि पहिले ४ दिवस तर कॉल उचलायला नाही जमणार .. मी महत्वाच्या मिटिंग मध्ये असेल .. प्लिज तेवढं मॅनेज कर "
निशी " म्हणजे !! आता तु मला कॉल पण नाही करणार का ? “आणि रडायलाच बसली
स्वराज " रडू नकोस ना जान ... काय करू आता?? .. मी ट्राय करेन ना कॉल करायचा .. टाईम डिफरेन्स बघ ना इंडिया UK .. UK जर्मनी .. जर्मनी इंडिया .. थोड मला तिकडे सेट होईला वेळ जाईलच ना आणि मेसेज वर अपडेट देईल तुला .. ठीक आहे "
निशी " ठीक आहे .. आणि खाणार काय तू तिकडे ?"
स्वराज " अरे मी काय लहान आहे का आता ? आय ह्याव हॅबिट ऑफ इटिंग कॉन्टिनेन्टल फूड .. डोन्ट वरी ऍट ऑल डिअर .. चल एक किस देऊन टाक पटकन .. इट्स टू लेट फॉर यु .. बारा वाजून गेले ना तिकडे .. पुन्हा सकाळी लवकर उठावे लागते तुला "
निशी ने त्याला मोबाईल स्क्रीन वर ओठ टेकवून किस दिला .. आणि साहेब इकडे प्रोजेक्टर च्या मोठ्या स्क्रीन वर स्पर्श करून किस करत होते .. टेकनॉलॉजि चा कोण काय उपयोग करेल सांगू शकत नाही .. अश्या प्रकारे रोमँटिक डेट साठी उपयोग होईल असे तर नक्कीच कोणीच केला नसेल
दोघे एकमेकांना गुड नाईट बोलून झोपून गेले…
-----------------
रोज रात्री नंदा निशी कडे झोपायला यायला लागली होती .. नंदा तिच्या कडून शिकून घ्यायची .. कधी शाळेच्या भवितव्याच्या गप्पा .. कधी स्वराज विषयी गप्पा .. कधी रणजित आणि नंदा चे नाते जे कि अजून फुलले नव्हते .. रणजित ला ती आवडते का नाही याचा काहीच अंदाज तिला येत नव्हता पण ती मात्र त्याच्या कडे .. त्याच्या हुशारी कडे ओढली जात होती हे निशी ला जाणवत होते .. एकदा वेळ काढून रणजित शी या विषयावर बोलावे असे वाटायचे तिला पण .. योग्य वेळ येण्याची ती वाट बघत होती
रणजित ने आणि गावच्या पाटलांनी मिळून त्यांच्या गावात निशी आणि हरिभाऊ ला बोलावून घेतले होते .. आज त्यांच्या गावात शिक्षणाचे महत्व आणि शिक्षणाची संधी जी कि मुलांना उपलब्ध आहे आणि ती मुलांना नक्क्की द्यावी या विषयी निशी सर्व गावकर्यां समोर बोलणार होती .. एक प्रकारे समाज प्रबोधना चे च काम निशी करत होती .. एकदा सर्व मुलं शाळेत यावी आणि खूप मोठी व्हावी असेच तिला वाटायचे .. ज्ञानाचे महत्व खूप आहे हेच ती पटवून देणार होती
निशी ने मुद्दामुन आज नंदा ला पण बरोबर घेतले होते .. नंदा आधी तयारच नव्हती पण "निशी चल ग, मला सोबत होईल असे म्हणून तिने तिला घेतले होते .. आणि नंदा मस्त साडी घालून कदाचित होणाऱ्या सासुरवाडीला निघाली .. आज निशी पहिल्यांदा रणजित च्या घरी चहा पाण्याला जाणार होती .. आणि त्याला माहित नव्हते कि नंदा पण येणार आहे .. त्याची घरात खूपच धावपळ चालू होती.. एका छोट्याश्या पण टुमदार घरा समोर हरी भाऊंची गाडी उभी राहिली ..
रणजित आणि रणजित ची विधवा आई बाहेर आली स्वागताला .. निशी ने स्वतः रणजित ला हात जोडून आणि त्याच्या आई ला खाली वाकून नमस्कार केला .. मग नंदा ने पण केला .. नंदा ची नजर जी खाली होती ती आज वर मान करून बघायलाच तयार नव्हती .. उगाच आपण कोणाच्या मागे लागलोय असे वाटू नये म्हणून ती रणजित कडे बघत पण नव्हती .. आणि रणजित हि चक्क दुर्लक्ष करत होता .. जशी कि ती आहे कि नाही आपल्यात असेच चालले होते त्याचे आणि या कारणाने नंदा मात्र मनातून आधी थोडेसे अपमानित आणि नंतर नाराज नक्कीच होत होती ..
घर एकदम लहान होते .. परिस्थिती बेताचीच असेल असे लगेच दिसत होते .. आई विधवा म्हणजे वडील नाहीयेत हे नक्की आणि मुलगा अजून शिकतोय म्हणजे परिस्तिथी एकदम बेताची होती .. नंदा ची फॅमिली त्या मनाने आर्थिक दृष्टया सबळ असावे असे लगेच तिच्या राहणी मानावरून कळत होते ..
रणजित ची आई आत मध्ये गेल्या नि चहा चे बघू लागल्या
निशी आणि हरी भाऊ आणि रणजित शाळे विषयी बोलू लागले .. पण नंदा मात्र अस्वथ होती .. ना तिचे त्यांच्या गप्पांकडे लक्ष होते ना बाकी कुणीकडे .. इतक्यात रणजित ची आई चहा घेऊन समोर उभी राहिली तिच्या तरी हि चे लक्ष नव्हते .. कुठेतरी विचारांची तंद्री लागली होती तिला .. आणि कसा काय तो चहा च्या कपाला धक्का लागला आणि चहा खाली सांडला ..
रणजित ची आई " अग .. पोरी .. भाजेल ना .. लक्ष कुठे आहे तुझे ?"
नंदा " आह्ह .. " डोळ्यांत भरून आलं होतं तिला .. एवढे दुर्लक्ष का करत असेल हा .. एवढी पण मी त्याच्या ओळखीची नाहीये का ? आणि तो असा वागतोय तर मला इतका त्रास का होतोय .. याच विचारात होती ती ..
रणजित पटकन उठला .. आणि नंतर काय वाटले परत त्याच्या जागेवर बसला .. काळजी तर दिसत होती त्याच्या डोळ्यांत तिच्यासाठी पण तरी तो काही दाखवत नव्हता ..
निशी ने पटकन हातावर गार पाणी टाकले " अग .. काय ग ? कसला विचार करतेय ?"
नंदा " काही नाही .. माफ करा हा काकू .. माझा हात लागला चुकून "
रणजित ची आई " हे घे बर्नोल लाव .. म्हणजे डाग नाही पडणार हाताला .. चहा सांडला तर सांडू दे .. "
नंदा " माफ करा मला .. “आणि तिला ए एक हुंदकाच भरला
निशी " . अग .. रडू नकोस .. बरं .. इतकं काही नाही झालंय .. होतं असे कधी कधी "
हरी भाऊ " बरं .. ठीक आहे .. चला जाऊ आपण कार्यक्रमाच्या इथे उशीर होईल "
सगळे उठून एका मंडपात गेले .. बरेच गावातली लोक आली होती .. गावातले पाटील स्वतः हजर होते .. त्यांनी आधी हरी भाऊंचा सत्कार केला आणि मग निशी आणि नंदा चा पण केला .. हे चौघे आणि पाटील आणि रणजित वरती खुर्चीत बसले होते ..
निशी ने पुढे येऊन बोलायला सुरुवात केली

🎭 Series Post

View all