निशिगंधा भाग 41

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ४१
क्रमश: भाग ४०

निशी आणि हरी भाऊ एकदम हडबडलेच
हरिभाऊ " तसे नाहीये पाटील .. हिच्या नवऱ्याने हिला टाकून दिलेले नाहीये .. शाळा बांधून सुरु व्हावी अशी दोघा नवरा बायकोची ईच्छा आहे .. हीचा नवरा या कामात तिला मदत करत आहे .. .. उगाच काही पण बोलू नका "
पाटील " बरं बर .. मला एक गावात मिटिंग आहे .. आपण बोलू निवांत .. तुमची शाळा सुरु झाली कि सांगा .. बघतो .. कोण कोण येईल ते "
पाटील जरा नाराजीतच बोलू लागले
निशी " काका .. मी तुम्हांला दोष देत नाहीये .. एक आजोबा म्हणून तुम्ही नक्कीच योग्य निर्णय घ्याल .. काळ बदललाय .. मुलगा आणि मुलगी असा भेद राहिला नाही आता जगात .. देशांत मुली अंतराळात जाऊ लागल्यात .. आपल्या देशात हि मुली प्रगती करत आहेत .. तुम्ही तर स्वतः अख्या गावाचे पाटील आहेत .. तुमचा आदर्श अख्खा गाव घेईल .. नात हुशार आहे तुमची.. तर तिला तिच्या पायावर उभे करा आणि मग लग्न करा .. हि माझि कळकळीची विनंती आहे तुम्हांला .. बाकी मी तर पासपोर्ट आणि विझा आला कि माझ्या सासरी म्हणजे परदेशात जाणार आहे .. हे हि कळलेच तुम्हांला लवकर "
हरिभाऊ " शाळा सुरु करणे हे एकच ध्येय आहे निशिगंधा चे .. बाकीच्या गोष्टीकडे बघून ती हटणार नाही .. आपण चांगल्या कामात तिला मदत कशी करता येईल ते बघू .. गावचे सरपंच म्हणून गावाचे भले करण्याचे काम आणि जवाबदारी आपली आहे .. "
हात जोडून नमस्कार करून दोघे आपल्या घरी निघाले
परतीचा पूर्ण रस्ता निशी जरा गप गप होती .. आपल्या मागे लोकं आपल्याला नावे ठेवतात या विचाराने मन दुखावले होते तिचे .. हरी भाऊंच्या लक्षात ते आले होते पण त्यांनी सध्या गप्प बसणे रास्त समजले .. कारण पर गावातल्या कोणा कोणाची तोंड धरणार .. शेवटी एक स्त्री लग्न होऊनही नवऱ्या बरोबर रहात नाही हि गोष्ट खूप मोठी होती त्यांच्यासाठी
निशी घरी येऊन अंघोळ करून दिवा बत्ती करून देवा समोर शान्त चित्ताने बसली होती .. कितीही झाले तरी आई बाबांचे आणि आता स्वराज चे सुद्धा नाव खराब नाही झाले पाहिजे .. हे ती नेहमी च बघत आली होती.. या लोकांना पटवून द्यायचे कि सरळ असल्या लोकांकडे दुर्लक्ष करावे .. काहीच कळेना तिला .. तेवढ्यात स्वराज चा फोन आला … जनरली या वेळेत त्याचा फोन येत नाही .. आज कसा काय आता आला म्हणतच तिने फोन उचलला
स्वराज " हॅलो डार्लिंग .. कशी आहेस ?\"
निशी " ठीक आहे मी .. तू कसा आहेस ?"
स्वराज " काय म्हणतेय शाळा ?
निशी " शाळेत आता ८० मुलं झालीत .. दसऱ्याला नवीन मुलांचे ऍडमिशन करून टाकायचेय .. सर्व नवीन मुलांना दप्तर द्यायचंय .. यूनिफार्म द्यायचाय .. बरीच कामं आहेत .. NGO च्या लोकांना माझे काम आवडलंय .. खूप ऍप्रिशिएट केलं त्यांनी .. जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ते बघत आहेत .. न्यू ऍडमिशन झाले कि सर्वांना पुस्तके आणि वह्या देणार आहेत ते लोक .. घरात दसऱ्याला एखादा प्रोग्रॅम होण्याची शक्यता आहे "\"
स्वराज " अरे वाह !!.. आणि रजिस्ट्रेशन च कुठं पर्यंत आलंय ?
\"निशी " हो ते मी गेले होते काल ऑफिस ला .. चौकशी करून आलेय .. कोणत्याही जागेवर सध्या रजिस्टेशन करू शकतो .. पत्ता नंतर बदलता येतो .. शाळा सुरु झाली कि सरकारी लोक इन्स्पेक्शन करून जातात आणि मग सरकारी परमिशन आणि अनुदान मिळेल .. त्यामुळे शाळा काढायला थांबायची गरज नाही"
स्वराज " अरे वाह !! महिना भरात भरपूर च कामं केलीस ग तू "
निशी " हमम .. मला तुझ्या कडे यायचंय लवकर .. म्हणून हल्ली खूप काम करतेय "
स्वराज " आणि विझा ऑफिस ला चक्कर टाकून येणार होतीस त्याचे काय झालं ?"
निशी " नाही ना रे .. त्या दिवशी मी जाई पर्यंत ते ऑफिस बंद झाले .. आता उद्या मी खास विझा ऑफिस ला जाणार आहे "
स्वराज " ठीक आहे .. एक काम कर .. उद्या आराम कर .. परवा जा .. आज खूप दमल्या सारखी वाटतेय "
निशी " स्वराज .. उलट माझी खूप कामं कमी झालीत .. पण आता ना मनाला थकायला होतंय … का ते कळत नाही .. "
स्वराज " काय झालंय ? कोणी काही बोललं का माझ्या झाशीच्या राणी ला "
निशी ने आज काय घडले ते सगळे त्याला सांगितले
स्वराज " डोन्ट वरी जान !! मी आलो ना कि आपण त्यांना जोडी ने नमस्कार करायला जाऊ .. "
निशी तशी खुद्कन हसली
स्वराज " आता कसे बरं वाटले .. अशीच हसत रहा ग .. आणि एक वेळेला सांगू का … लोक काय म्हणतात त्याचा विचार करायचा नाही .. "
निशी " नाही ना .. माझ्या मुळे तुझे .. बाबांचे नाव खराब नाही ना होत अशी भीती लागून राहते मला .. सरळ सरळ नवऱ्याने टाकलेली असा आरोप केला रे त्यांनी " आणि तिला हुंदकाच भरला
स्वराज " निशी .. काय बावळट.. या असल्या गोष्टी साठी रडतेस तू .. "
निशी " स्वराज .. मला यायचंय आता तुझ्याकडे .. मला नाही रहायचं इकडे .. "
स्वराज " हे बघ .. आताशा दिड महिना झालाय आपल्या लग्नाला .. तू तर इतक्यातच असे बोलायला लागलीस "
निशी " नाही.. तू ये ना लवकर .. आपण जाऊ लवकर त्या पाटीलांकडे "
स्वराज " तूला ना मी आलो कि फटके देणार आहे ?\"
निशी "का ?"
स्वराज " नालायक ... आज दीड महिन्या नंतर तू मला असे बोललीस तेही कोण ते पाटील त्याला दाखवायला .. माझि खरी आठवण येतेय म्हणून नाही "
निशी " असे नाही रे स्वरू .. तुला काय वाटतं ? मला तुझी आठवण येत नाही का ? "
स्वराज " नुसती आठवण येऊन काय उपयोग ? तू कधीच बोलून पण दाखवत नाहीस ?\"
निशी " म्हणजे माझे प्रेम नाहीये असे आहे का ?"
स्वराज " असे कुठे मी म्हटलंय ?"
निशी " तुझा रोख तसाच आहे पण ?"
स्वराज " एकदम भांडखोर आहेस .. ?
निशी " अरे आता यात काय भांडखोर ... मी माझे मत मांडले "
स्वराज " ठीक आहे .. ठेवतो .. मला मिटिंग आहे आता "
निशी " सॉरी .. मी .. कमी पडतेय ना .. सॉरी .. शेवटी तुला पण दुखवलेच मी "
स्वराज " असे नाहीये काही .. मी असेच मुद्दामून म्हणत होतो "
निशी " सॉरी .. तुझी मिटिंग आहे ना .. जमलं तर रात्री नेहमीच्या वेळी कॉल कर "
स्वराज " ए .. शोना .. अशी अपसेट नको ना होऊ .. माझे पण मन लागत नाही मग कामात .. "
निशी " हमम .. "
स्वराज " आणि एक खरं सांगू .. तुझ्यामुळे माझे नाव खराब होतंय असे काही नाही ग .. उलट तू माझे नाव नाही नाही आमच्या घराण्याचे नाव मोठे करतेय .. तुला सांगू का ? इकडे लोक मला विचारतात बायको काय करते तर ती एक टीचर आहे आणि रनिंग फ्री स्कूल म्हटल्यावर लोक हडबडतात .. अरे सॉलिड रिस्पेक्ट देतात ते मला त्यावरून .. पर्वा मी शाळेच्या नावावर एक फंडस् ट्रान्सफर केले ना ते त्या कम्पनी ची CEO तर म्हणाली कि आय विल सजेस्ट हर नेम फॉर अवॉर्ड "
निशी " काहीही काय ? बरं ते असू दे .. तुझि मिटिंग आहे ना .. उगाच माझ्यामुळे उशीर होयचा नाहीतर "
स्वराज " मी मालक आहे कंपनीचा .. आणि तू बायको आहेस माझी .. बायको शी बोलायला मला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये ..आय कॅन कॅन्सल दयाट "
निशी " नको ना .. काम महत्वाचे .. एका मिटिंग साठी कोणी कोणी किती तयारी केलेली असते .. आपण बोलू नंतर .."
स्वराज " तू ठीक आहेस का ? नाहीतर मी आता तिकिट्स बुक करतो .. कोण तो पाटील त्याला भेटूनच घेतो ... हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला काय पण बोलायची त्याची ?"
निशी " स्वरू .. त्याच्यासाठी नाही पण माझ्यासाठी नक्की ये .. मला खूप आठवण येतेय तुझी "
ओ…..
पावसाच्या सरी परी
येणे जाने तुझे
ओल्या चिंब ओठांवरी
ओले गाणे तुझे
मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कविताचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले
असे तुझे मन
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण ……..
जेव्हा जेव्हा येतो तुझ्या
दिशातून वारा
अनावर लाटांवर
डोलतो किनारा

पुन्हा माझ्या वाळूवर
नाव तुझे
पावलांचे ठसे भर
धाव तुझे
परतीच्या वाटेलाही
तुझे च वळण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण ………
अचानक गर्दीतही
वाटते एकटे
भरलेले शहर हे
होते रिते रिते
ओळखीची अनोळखी
खूण ही तू
खूण ही तू माझी
चाहूल ही तू
जागोजागी विखुरलेले
माझे मी पण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण ……..
https://www.youtube.com/watch?v=HHLC-P0LY8g&ab_channel=ZeeMusicMarathi
(मिस यु मिस्टर या सिनेमा मधील हे गाणे एकदा ऐकाच)
स्वराज " हो रे शोना .. मला पण खूप आठवण येतेय .. पण आलो कि दोन दिवसात इकडे निघू .. म्हणजे इकडे जास्त वेळ मिळेल स्पेंड करायला .. इकडे पण पूजा .. रिसेप्शन करायचय .. आणि मुख्य म्हणजे हनिमून "
निशी " चल चल . जा आता तुझी मिटिंग आहे .. " आणि लाजू लागली
स्वराज " निशी .. एक किशी दे ना "
निशी ने त्याला पटकन मोबाईल स्क्रीन वर किस देऊन टाकला
स्वराज " आज इतक्या लगेच .. रोज ५ वेळा सांगितल्यावर मिळतो .. कंजूस कुठली .. "
निशी " आज तुझी खूप आठवण येत होती आणि तुझाच विचार देवासमोर बसून करत होते तर तुझा लगेच कॉल आला म्हणून लगेच दिली .. "
स्वराज " अरे म्हणजे काय .. माझ मन तुझ्या अवती भवती भिरभिरतंय .. तुला कळलेच असेल आता "
निशी " हो .. कळलं पण आणि पटलं पण .. आणि एक सांगू .. माझ्या पेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस . थँक यु .. तू जवळ नसलास तरी माझ्यात आहेस असा फील येतो मला "
स्वराज " अरे आज .. किती छान आणि मोकळी बोलतेय तू .. खूप छान वाटलं "
निशी " मला ना स्वराज ... माझ्या शी बोलायला पण कोणी नव्हते .. मला घडा घडा बोलता पण येत नाही .. आणि त्यात असे होते कि तू तिकडे कामात असशील .. उगाच तुला डिस्टरब तर नाही ना होणार .. तुला माझी काळजी तर नाही वाटणार असे वाटून मी कमी बोलते "
स्वराज " पण मी रात्री जेव्हा पूर्ण रिकामा असतो तेव्हा कॉल करतो .. मला खूप बोलावसं वाटतं पण तू मन मोकळी बोलत नाहीस "
निशी " हो ना .. सॉरी .. मला ना लाज वाटते .. कधी कधी तू एकदम रोमँटिक होतोस ना तेव्हा काय आणि कसे बोलू असे होत ते मला "
स्वराज "आई शपथ !! यार म्हणजे प्रॉब्लेम काय आहे हे तुला माहितेय तर "
निशी " हो ना .. मला कळत .. जाणवत पण .. पण बोलायला नाही होत "
स्वराज " ठीक आहे .. मग आता पण .. चॅट करत जाऊ .. "
नाही नको मी बोलायचा प्रयत्न करेन.. तुझ्याशी नाही बोलणार तर मग कोणाशी बोलेन .. ते काय होते माहितेय का ? शिक्षिका अंगात मुरली आहे माझ्या "
स्वराज " हो ना .. जाणवते मला पण ते कधी कधी .. पण मी समोर असलो कि तू छान मोकळी वागतेस असे मला जाणवलं .. "
निशी " ये ना आता तू लवकर… मला तुला एकदा मन भरून पहायचंय.. या व्हिडीओ कॉल चा कंटाळा आलाय मला "
स्वराज "तरी पण आज या व्हिडीओ कॉल मुळे आपण एकमेकांना निदान पाहू तरी शकतोय .. हा पण नसता तर मग तर कबुतरालाच पाठवायला लागले असते मला "
तशी निशी हसली.

🎭 Series Post

View all