निशिगंधा भाग 40

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ४०
क्रमश: भाग ३९

निशी ने धावतच जाऊन आनंदात फोन उचलला डोळ्यांत अश्रू होते तिच्या
निशी " स्वरू .. स्वरू .. "
स्वराज " अग हो .. झाले ना काम .. तुझा चेहराच सांगतोय कि काम झालंय .. आणि रडते कशाला ?\"
निशी " स्वरू हे आनंदाश्रू आहेत .. अजून सत्य साकारायला अवकाश आहे पण सत्य सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत .. एकदा का गावाने तो हॉस्पिटल च्या शेजारचा प्लॉट शाळेच्या नावावर केला कि काम खूप पुढे जाणार आहे "
स्वराज "निशी .. मी जरा गडबडीत आहे .. ठेवू का फोन .. मी रात्री कॉल करतो तुला .. "
निशी " हो ठीक आहे .. आपण निवांत बोलू .. काळजी घे "
स्वराज ने फोन घाई घाईतच कट केला
निशी ने आज मुलांना आनंदात सुट्टी देऊन टाकली
तेवढ्यात हरिभाऊ आलेच त्या NGO च्या माणसांना सोडून
हरिभाऊ " चला .. चांगल्या कामाला काही अडचणी येत नाही असे म्हणतात न तेच खरं.. निशी .. होईल हो आता बांधून शाळा "
निशी " काका .. नुसती बांधून उपयोगाची नाहीये .. आपल्याला ती पुढे चालू पण ठेवता आली पाहिजे .. अजून गावातल्या लोकांना शिक्षणाचे महत्व नाहीये .. बघ किती तरी मूल शाळेत येत नाहीत .. मी किती तरी वेळा घरी जाऊन सांगितलंय तरी हो हो म्हणतात पण मुलांना शाळेत पाठवत नाहीत .. मुलांचे नुकसान होतय .. यावर काहीतरी करायला पाहिजे "
हरिभाऊ " पोरी जरा या पुढ्यात असलेल्या आनंदाचा श्वास तरी घे .. या माणसाने आपले काम जवळ जवळ केलेच आहे .. शाळा बांधली कि त्याला सरकारी अनुदान मिळवून देणार आहे तो .. शिवाय बांधायला मदत करेल ते वेगळच .. फक्त जागा शाळेच्या नावावर रजिस्टर करायचे हे महत्वाचे काम आहे "
निशी " आता तशी ती जागा खरतर मुलांसाठी लांबच आहे .. आपण ह्या माझ्या राहत्या घराला पाडून शाळा बांधायला सुरुवात करायची का ? काय वाटत तुम्हाला ?"
हरिभाऊ " नको ग निशी .. हि जागा तुझ्या वडिलांची आहे .. "
निशी " हो ना .. पण मुलाना हि जागा जवळ आहे .. आणि आता मी UK ला जाणार आहे माझी पण काळजी नाहीये .. बाबांनी शाळा जिथे सुरु केली तिथे च शाळा बांधून झाली तर चांगलेच आहे ना "
हरीभाऊ " मला वाटतं तू एकदा स्वराज आणि सुधीर शी बोल या विषयवार मग काय तो निर्णय घे "
निशी " हो ते तर आहेच .. कारण घर अजूनही स्वराज च्या नावावर आहे .. पण मला नाही वाटत तो नाही म्हणेल या गोष्टीला .. "
हरिभाऊ "पण इथे मुलांना ग्राऊंड नाही मिळणार .. तू म्हणतेस तशी मोठी नाही होणार शाळा .. शहरा सारखी एका वर एक चढवता पण नाही येणार .. तेवढा FSI (FSI is also used to calculate the built-up area of the plot and to calculate the number of floors that can be constructed. ) नाही मिळणार
निशी " हो आता असल्या टेकनिकल गोष्टी पण पाहाव्या लागतील .. लॉन्ग टर्म चा विचार करून निर्णय झाला पाहिजे "
हरिभाऊ " आता बरोबर बोललीस .. बरं ते जाऊ दे .. तु स्वराज ला सांगितलेस का तुझा पासपोर्ट आला ते "
निशी " हो सांगितले .. स्वराज आता विझा ची प्रोसिजर करायला सांगत आहे .. ते झाले कि मग मला घ्यायला येईल .. कारण या वेळी जास्त दिवस थांबता नाही येणार "
हरिभाऊ " मग आता गेलीस कि किती दिवस जाशील "
निशी "आपल्या शाळेच्या सुट्ट्या ठरवाव्या लागतील .. बहुदा दिवाळीची सुट्टी मला कामी पडेल .. आणि पुढे थोडे दिवस नंदा आणि रणजित ला शाळा चालू ठेवायला सांगायचा विचार आहे माझा "
हरी भाऊ " अरे वाह .. म्हणजे तुझी जाण्याची तयारी झालीय म्हणायचं "
तशी निशी लाजली
निशी " खरं सांगू काका ? मला त्या UK मध्ये इंटरेस्ट अजिबात नाहीये .. मला स्वराज कधी भेटेल असे झालेय .. "
हरिभाऊ " हमम .. फार मोठ्या धीराची निघालीस तू .. एखादी असती तर नवऱ्या बरोबर निघून गेलि असती "
निशी " मला हि आवडलं असते .. पण स्वराज ने मला समजून घेतलं .. माझी शाळेची तळमळ त्याला कळली .. आणि त्यानेच हे मला सुचवलं .. मी किती भाग्यवान आहे असे वाटतं मला "
हरिभाऊ " नक्कीच .. आहेसच तू भाग्यवान ... साक्षात सरस्वती चे रूप आहेस "
निशी " काही पण काका .. पण आता मला बाबांचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा तर दिसू लागलीय "
हरिभाऊ "स्वराज ला पण मानलं पाहिजे .. एवढा मोठा त्याग कोणी करत नाही .. त्याने तुला खूपच समजून घेऊन सपोर्ट करतोय .. त्याचा सत्कार करताना मला आधी वाटलं नव्हतं ..उलट तो चुकतोय असे वाटत होते पण आज मला कळतंय त्याने तुझे स्वप्न उघड्या डोळ्यानं पाहिलं "
निशी मनातच " खरं आहे काका , माझ्या सारख्या गावातल्या मुलीच्या स्वप्नाला एवढं महत्व त्याने दिल.. हे कोणीही नाही करू शकत .. "
हरिभाऊ " बरं .. मग ते विझा च काम मागे ठेवू नकोस बरं .. ते आधी कर .. आणि काय पण मदत लागली तर सांगशील मला "
निशी " हो नक्कीच सांगेन काका "
हरिभाऊ " त्या रणजित च्या गावात कधी जायचं ठरतंय ?"
निशी " हो ना .. ते पण त्या गावच्या सरपंचांना भेटून ठरवावे लागेल "
हरिभाऊ " मी काय म्हणत होतो .. आता दसरा आला ना कि नवीन मुलांचे ऍडमिशन करून टाकू .. आपल्या गावतली आणि रणजित च्या गावातली मुलं मिळून ३ वर्ग तरी सुरु करू "
निशी " हो चालेल .. मी नंदा बरोबर रणजित साठी निरोप पाठवते "
हरिभाऊ " नको .. त्या पेक्षा .. तुला वेळ असेल तेव्हा आपण दोघे जाऊ आणि त्या सरपंचाला भेटून येऊ "
निशी " ठीक आहे .. मी आता आज शाळा सोडून दिलीय .. तशीही आता शहरात जाऊन येणं होणार नाही .. तर आता पाहिजे तर आता जाऊ .. आणि कधी गावातल्या लोकांना बोलावून सांगता येईल असा कार्यक्रम ठेवू "
हरी भाऊ " ठीक आहे .. मग ३ वाजता तयार राहा .. मी माझे काम उरकून घेतो .. मग जाऊ आपण "
निशी म्हणजे एक ध्येय वेडीच होती .. डोक्यात फक्त एकच शाळा बांधून नीट चालू झाली पाहिजे .. कसे काय करता येईल .. मुलांना , पालकांना कसे शिक्षणाशी बांधून ठेवता येईल याकडेच तिच लक्ष होते .. कल करे सो आज कर .. आज करें सो अभि कर .. असे म्हणून लगेच कामाला तत्पर असायची
मग ठरल्या प्रमाणे निशी आणि हरिभाऊ रणजित च्या गावात गेले .. तिथल्या पाटील सरपंचांना भेटले ..
पाटील “ नमस्कार हरिभाऊ .. या या बसा .. "
हरिभाऊ " नमस्कार .. काय म्हणताय कसे चाललंय ?\"
पाटील " काही नाही .. नातीच्या लग्नाची तयारी .. आमचाच एक कार्यकर्ता आहे त्याच्या जवळ माझ्या नातीच लग्न ठरवतोय .. सध्या त्याच धावपळीत आहे "
हरिभाऊ " बरं .. म्हणजे तुम्ही खरे बिझी आहेत म्हणायचं .. तर आत जास्त वेळ घेत नाही तुमचा .. सरळ मुद्यावर येतो "
पाटील " नाही हो .. बोला निवांत .. घरातली गडबड चालूच राहते . "
हरिभाऊ " हि निशिगंधा .. मला माझ्या लेकी सारखीच आहे .. माझ्या गावात ती शाळा चालवते .. "
पाटील " हो .. माहितेय कि .. हीचा बाबा प्रकाश ना .. त्यो पण शिकावायचा नाही का ?"
हरिभाऊ " हो बरोबर ओळखलीत "
पाटील " ते रणजित बोलला मला .. पण बघा ..आता शेतीवाडी ला पोरा सोरांची मदत लागते .. आता पोरांना शाळेत पाठवून कसे व्हायचं तुंम्हीच सांगा ?\"
निशिगंधा " काका .. मी जरा बोलू का ?"
पाटील " हो बोल कि पोरी .. "
निशी " काका .. मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे .. शिक्षण हा त्यांचा अधिकार आहे .. शेतात काम करायला ते काही मजूर नाहीत "
पाटील " अग पण .. आपल्या शेतात काम केल्याने कोण मजूर होतोय ग .. "
निशी " काका .. अहो जग फार पुढे चाललंय .. थोडे शिक्षण गाठीशी असलं तर मुलं चंद्रावर पण शेती करतील .. पण शिक्षण नाही राहील तर फक्त मजूरा\" सारखी शेतीच करत राहतील .. त्यानी केलेल्या शेतीत किती पोती धान्य आलंय आणि किती बाजार भावाने त्याला विकायच हे तरी कळलं पाहिजे कि नको ? सांगा बरं तुम्ही .. शिक्षण फार महत्वाचे आहे .. स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद येते .. आपले म्हणणे दुसऱ्याला समजावण्याची शक्ती येते .. निर्णय घ्यायला मदत होते .. कोणी पण येऊन फसवू शकत नाही .. शिकायला तर पाहिजे कि नाही सांगा बर "
पाटील " पण हे कसे जमायचं .. एवढ्या लांब पोरांना पाठवायचं .. "
निशी " काका .. एका वेळेची गाडी तुमच्या कडून येऊ द्या .. एका वेळेची गाडी आमच्या कडून येईल .. नाहीतर बैलगाडीत बसून येतील पोरं .. मुलांना ड्रेस , वह्या पुस्तक .. शूज .. सगळे शाळा देईल .. त्यांनी फक्त डबा आणायचा आणि अभ्यास करायचा .. सरकारी अनुदान मिळालं तर मुलांना जेवण पण मिळेल शाळेत .. सरकारी अनुदान मिळे पर्यंत थोडी कसरत होईल .. कारण पैसे कमी आहेत आपल्या कडे "
हरी भाऊ " दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन मुलांचे ऍडमिशन शाळेत घेऊन टाकू .. आणि वर्ग सुरु करू .. त्या दृष्टीने पाउल उचलू .. "
पाटील " ठीक आहे
तेवढ्यात एक साधारण चौदा वर्षांची मुलगी समोर चहा पाणी घेऊन आली
पाटील " हि बघा .. माझी नातं .. मनीषा .. कामात एक नंबर हुशार आहे .. सगळे जेवण बनवता येते . अगदी पुराणां चा स्वयंपाक बनवते .. एकटीने .. "
निशी तिच्याकडे बघून हसली
हरी भाऊ " वाह !! झकास कि .. गोड आहे नातं तुमची "
पाटील " होय .. होय .. आता हिचंच लग्न ठरवतोय ?"
निशी " काय ? “जरा मोठयाने च बोलली ती
पाटील " होय कि .. मोठ्या पोराला एका पाठोपाठ ३ पोरी झाल्यात .. त्याच्यावर पोरगा झालाय .. आता एकी एकीला उजवून टाकायला हवी नाही का ?"
निशी " काका ? अहो काका .. किती लहान आहे ती .. आता शाळेत शिकायचं वय आहे तीच .. "
पाटील " काय करायचीय शाळा .. ती कोणती साहेबीण बनणार आहे .. पोरीच्या जातीला जेवण बनवता आले पाहिजे .. होय कि नाही हरी भाऊ ?"
हरी भाऊ " नाही म्हणेज आता मला लेक असती तर मी तिला निशी च्या शाळेत नक्की पाठवली असती .. आता आपला काळ गेला .. पोरींना बी स्वतःच्या पायावर उभे करायला पाहिजे .. तेव्हा त्या नवर्याच्या मागे खंबीर उभ्या राहतील "
निशी " काका .. इतक्या लवकर लग्न लावून देणे कायद्याने गुन्हा आहे ..तिला तुम्ही शाळेत पाठवा .. मी घेते तिच्या शिक्षणाची जवाबदारी .. उदया आपल्या गावचे नाव रोशन करेल ती .. आपण हिला माझ्या सारखी शिक्षिका बनवू ..काय ग मनीषा .. चालेल का तुला ?\"
पाटील जरा वैतागला
पाटील " हरिभाऊ .. माझ्या खाजगी गोष्टीत नाक खुपसू नका .. पोरीच्या डोक्यात काय बी खुळ घालून देऊ नका .. शिकून काय करणार .. ह्या तुमच्या निशी सारखा तीचा नवरा पण सोडून गेला मग "

🎭 Series Post

View all