निशिगंधा भाग 39

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ३९

क्रमश: भाग ३८

स्वराज " हा गैर समज आहे तुझा… आणि म्हणजे तू मी सांगेल ते नाही करणार हे नक्की ना "
निशी " असेच काही नाही .. ठीक आहे बघू तिकडे आल्यावर तिकडचे तिकडे .. “
स्वराज " ऐसा नहीं चलेगा मॅडम .. इकडे आल्यावर सगळे वेस्टर्न च कपडे घालायचेस .. आधीच सांगतोय .. मला साडीचा काही प्रॉब्लेम नाहीये ग पण बाहेर फिरताना जास्त कंफर्ट वेस्टर्न मध्ये मिळेल इकडे तुला म्हणून म्हणतोय मी "
निशी " ठीक आहे .. पण जास्त शॉर्ट नाही घालणार मी "
स्वराज " कमी जास्त काही नसते ग .. पॅटर्न असतात "
निशी " स्वरू .. फक्त तू असताना घालेन हा पण मी "
स्वराज " याला काय अर्थ आहे .. फिरताना मी बरोबर असलो तरी बाहेर बाकीचे लोक पण असतीलच ना "
निशी " डॅड ला काय वाटेल ? त्यांची सुनबाई .. असं विचार कर ना "
स्वराज " डॅड ची काय भीती दाखवतेस मला ? इकडे मॉम आहेच कि तुझ्या जोडीला .. आणि जस्ट चिल यार .. काय तू आधी पासून टेन्शन घेतेस .. आणि हि दोन वर्ष सोडली तर अख्खी लाईफ इकडे घालवायचीय तुला .. हे विसरू नकोस ?"
निशी " स्वरू .. मी तिकडे पण जॉब केला तर चालेल ना तुला ? मी तिकडे पण शाळेत जॉब करेल "
स्वराज " अरे तू तर माझि असिस्टंट बनणार होतीस ना "
निशी " नको .. तुला बोअर होईल माझ्या सारखी असिस्टंट .. आणि शिवाय माझे काही चुकले तर ओरडता पण येणार नाही तुला .. त्या पेक्षा मी मुलांना शिकवेन .. मला आवडते ते काम "
स्वराज " ठीक आहे .. मी चौकशी करून ठेवतो .. काय क्वालिफिकेशन लागतं ते ?"
निशी " आणि वेळ पडली तर एखादा कोर्स करेल मी "
स्वराज " हो ते माहितेय मला .. म्हणूनच बोललो .. मी चेक करतो म्हणून "
नुसता पासपोर्ट आला तर ह्या दोघांच्या कसल्या प्लॅनिंग सुरु झाल्यात बघा .. त्याला वाटतंय ती आलीच आणि हिला वाटतंय कि हि पोह्चलीच .. पुढे रात्रभर ती तिकडे आल्यावर काय काय करायचं यावर ते डिस्कस करत होते .. तिला तिकडे ड्रायविंग लायसन्स काढावे लागेल .. नोकरी साठी एखादा कोर्स करावा लागेल .. वगैरे वगैरे
स्वराज " बर .. चल .. झोपतो आता .. ते NGO वाले कधी येणार आहेत? "
निशी " त्यांचा कॉल नाही आला अजून .. पण पुढल्या आठवड्यात येतील बहुदा "
स्वराज " ओके .. मी विचारतोय कारण .. तू इकडे येशील तेव्हा फ्री माईंडेड पाहिजेस .. तरच हनिमून प्लॅन करता येईल ना "
निशी पुन्हा गप्प
स्वराज " निशू .. बोल ना .. तू बोलत पण नाहीस .. मग कसे समजणार मी "
निशी लाजतच " गुड नाईट .. झोप तू आता .. आणि लवकर ये मला घ्यायला .. मी वाट बघतेय "
स्वराज " हमम .. गुड नाईट "
स्वराज ला तिच्याशी खूप काही बोलायचं असायचं .. पण आपली शिक्षिका तिला रोमान्स माहीतच नव्हता .. तो वेगळे काही बोलायला लागला कि तिला असे वाटायचं कि मी एक शिक्षिका आहे .. मी असे वागले .. बोलले नाही पाहिजे .. आणि ती सरळ सरळ विषय टाळायची .. एकंदरीत पाहता हाल मात्र स्वराज चे च जास्त होते .. तो खूपच हौशी होता आणि त्यांच्या नात्या बद्दल खूप काही त्याच्या मनात होते .. बोलावं तर ती टाळते .. आणि नाही बोलावं तर सगळंच राहून जाते .. .
------------------------------------------------
आज NGO ची लोक येणार होती .. आहेत त्या मुलांना तिने प्रश्न उत्तरासाठी तयार केले होते .. ती स्वतः शाळेचे सर्व डॉक्युमेंट्स हातात घेऊन बसली होती .. आज मनातून थोडी घाबरली होती.. इतके दिवस जी शाळा तिने चालवली होती त्याचे भवित्यव्य आज कळणार होते एक प्रकारे .. सुरुवातच नकाराने नको असे मनोमन तिला वाटत होते ..
नेहमी प्रमाणे स्वराज ने तिला सकाळी प्रार्थनेच्या वेळी कॉल केला ..
सर्व मुलं " गुड मॉर्निंग स्वराज काका "
स्वराज " गुड मॉर्निंग स्टुडंट्स "
सर्व मूलं आज युनिफॉर्म मध्ये होती .. मुलांनी पांढरे शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती आणि मुलींनी पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि त्यावर आकाशी रंगाचा फ्रॉक घातला होता .. सर्व मुलींनीं छान वेण्या घातल्या होत्या .. त्याला रिबिन्स बांधल्या होत्या .. मुलांचे केस नीट कापले होते .. टापटीप मुलं दिसत होती .. छान एक रांगेत बसली होती
स्वराज " मुलांना युनिफॉर्म छान दिसतोय "
निशी " हो .. तू छान आयडिया दिलीस स्वराज .. ते .. २००००/- डोनेशन मिळाले होते ना त्यात सर्व मुला मुलींना युनिफॉर्म आणि पायात शूज घेऊन दिले मी "
स्वराज " थँक यु .. आज अजून एका कडून डोनेशन अमाऊंट येणार आहे .. ती आली कि आपण मुलांना बेंचेस घेऊ .. म्हणजे खाली बसावे लागणार नाही त्यांना "
निशी " हो चालेल "
स्वराज " NGO वाले आले तर घाबरू नकोस .. बिनधास्त बोल .. होईल नीट सगळे .. आणि आधीच सांगतो त्याने पैसे नाही दिले म्हणून शाळा थांबणार नाहीये .. उलट आपण नक्की कुठे कमी पडतोय ते आपल्याला कळेल .. सो थिंक पॉझिटिव्ह "
निशी " होय ..ठीक आहे चल बाय ठेवते आता "
स्वराज " जरा आत मध्ये जा .. "
निशी चालत चालत आत मध्ये रूम मध्ये गेली
निशी " हा बोल "
स्वराज " स्पीकर ऑफ कर "
निशी ने स्पीकर ऑफ केला
स्वराज ने मोबाईल स्क्रीन वर तिला किस केले .. " ऑल द बेस्ट .. "
निशी " स्वरू .. माझि शाळा चालू आहे ना " लाज तर वाटत होती पण उगाच लटका रागात ती बोलली
स्वराज " मग काय…म्हणून तर आत बोलावली ना तुला .. जा आता .. तुझे स्टुडंट्स वाट बघतायत " आणि हसत फोन ठेवला त्याने
-----------------------
निशी ने मुलांना शिकवायला सुरुवात केली तर हरी भाऊ त्या NGO च्या माणसांना घेऊन आले ..
निशी ने नमस्कार करून त्यांना आत घेतले .. तिच्याच शाळेतल्या एका मुलाला त्या माणसांना रेड रोज देऊन त्यांचे स्वागत केले .. त्यांना बसायला खुर्च्या मांडल्या होत्या त्या मध्ये त्यांना बसायला सांगितले ..
राधाक्का आत मध्ये मदतीला होतीच .. घरात छान चहा पाण्याची सोय केली .. मग निशी ने एकेक डॉक्युमेंट्स दाखवायला सुरुवात केली .. तोंडाने सांगू लागली साधारण २० वर्षां पूर्वी पासून या घरात इथे शाळा चालू आहे .. गावात शाळा नाही .. बेसिक शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे आणि तो आमच्या गावातल्या मुलांना पण मिळाला पाहिजे ..
करमरकर साहेब (NGO वाले ) " इथे एकच वर्ग आहे पण ? " मग वेगवेगळ्या वयाच्या मुलांना कसे शिकवता "
निशी " तेच तर प्रॉब्लेम आहे .. जागा कमी आहे .. त्यामुळे सर्वांना एकत्र बसवावे लागते .. हि बघा ह्या दोन रांगा आहेत ना त्या ८ वी च्या मुलांच्या आहेत .. मधली रांग सातवी आणि सहावीच्या मिळून आहेत .. पहिल्या दोन आहेत त्या रांगा पाचवी आणि सहावीच्या आहेत "
करमरकर साहेब " पण शिकवताना कसे करता ?"
निशी " प्रार्थना .. भाषा , व्याकरण सर्वाना एकत्रच बसवते .. मोठ्या मुलांना अभ्यासाला बसवून पाचवी वाल्यांना शिकवते .. त्यांना अभ्यासाला बसवून सहावी वाल्यांना शिकवते असे करता करता शिकवते .. शिवाय नंदा मॅडम आणि रणजित सर असले तर त्या पडवीत मुलांना शिफ्ट करते आणि त्यांना एकेक वर्ग देते .. "
करमरकर " परीक्षा कश्या घेता ?"
निशी " मी स्वतः पेपर सेट करते आणि चेक करते .. परीक्षे च्या वेळी सर्वांना वेग वगेळ्या वेळेत बोलावते "
करमरकर " मोठ्या मुलांना प्रॅक्टिकल .. सायन्स ला प्रोजेक्ट कसे करवून घेता ..”
निशी “मी घरातच प्रयोग करून दाखवते .. लिटमस पेपर वगैरे घरात आणून ठेवलेले आहेत .. “तिने एका रूम मधून ते सर्व सामान आणून दाखवले .. त्या रूम मध्ये भारताचा मोठा नकाशा .. जगाचा मोठा नकाशा .. मोज माप .. प्रयोगाचे सामान असे होते ..
निशी " सर .. कधी कधी मुलांना फिल्ल्ड ट्रिप म्हणून शेतात पेरणीला .. गावात कापणी ला पण नेते .. कधी कधी डोंगर चढायला नेते .. तिथे वेगवगेळ्या झाडांची माहिती देते .. प्रॅक्टिकल नॉलेज ला महत्व देते .. खेळ खेळायला सांगते "
करमरकर " ठीक आहे .. तरी पण आम्ही तुम्हाला मदत केली तर त्याचा उपयोग तुम्ही कशा साठी करणार आहात "
निशी " सर .. सध्या शाळेला जागा घेण्या पासून सुरुवात आहे .. गावात हॉस्पिटल च्या बाजूच्या प्लॉट चा विचार चालू आहे .. तिथे शाळा बांधायची आहे .. त्यात सायन्स लॅब , कॉम्पुटर लॅब .. लायब्ररी .. डिजिटल क्लासरूम .. बेंचेस .. हे सर्व असले पाहिजे अशी माझि इच्छा आहे "
करमरकर " एक लाख रूपयांत तुमचे काहीच होणार नाही .. बाकीचा फंड तुम्ही कुणाकडून आणणार .. कारण आम्ही पैसे देऊ हो पण त्याने काही शाळा तुम्ही म्हणता तशी बांधून होणार नाही .. "
निशी " मी आणि माझे मिस्टर आम्ही मोठं मोठ्या इंडस्त्री ला भेटून डोनेशन गोळा करतोय सर .. काम चालू आहे .. माझे मिस्टर CSR फंडातून पैसे इकडे वळवत आहेत .. गेल्याच महि न्यात एका कंपनीने २००००/- रुपये डोनेशन दिले त्यातून आम्ही मुलांना गणवेश आणि बुट घेतले .. "
करमरकर " अरे वाह .. त्यांनी लगोलग युनिफॉर्म चे बिल पण पाहून घेतले .. "
करमरकर " मी १ लाख रुपये सॅंक्शन करतो पण ... त्या आधी शाळेच्या नावावर जागा असणे गरजेचे आहे . म्हणजे मी हे पैसे देऊ शकतो .. तर तुम्ही आधी जागा फिक्स करा .. बाकी काम तुम्ही उत्तम करत आहेत .. हॅट्स ऑफ टू यु .. माझ्या ओळखीचे एक शिक्षण अधिकारी आहेत मी त्यांना पण विझिट करायला सांगेल .. त्यांनी पाहिल्यावर सरकार कडून अनुदान पण मिळेल अशी काही व्यवस्था करतो "
हरी भाऊ " धन्यवाद !! आपले आभार कसे मानू कळत नाहीये साहेब .. माझि लेक .. जीवाचे रान करून शाळा चालवतेय .. तिला मदत करून तुम्ही चांगलेच काम करत आहेत "
करमरकर " हो नक्कीच .. काम तर त्या खूपच चांगले करत आहे आणि इतके वर्ष विना अनुदान .. विना पगार त्या कसे काय करू शकल्या हेच मला कळत नाही .. खरंच आताच्या जमान्यात इतके कोणी करत नाही "
हरिभाऊ " खरं आहे सर .. तिच्या वडीलां पासून हा ज्ञानदानाचा वारसा चालू आहे .. "
करमरकर सरांनी सर्व मुलांना त्यांचे नाव विचारले .. एक दोन प्रश्न विचारले .. सर्वांना चॉकलेट्स वाटले .. मोठ्या मुलांना वह्या वाटल्या .. आणि पेपर वर सह्या करून ते निघून गेले ..
हरिभाऊ त्यांना गावाच्या वेशीवर सोडायला गेले ..
निशी ने देवा समोर साखर ठेवली .. आनंदाश्रू डोळ्यांतून ओघळलाच .. निशी च्या प्रयत्नांना यश येत होते .. म्हणजे येताना दिसत तर होते .. देवाचे मनोमन ती आभार मानत होती
तेवढ्यात तिकडून स्वराज चा फोन आलाच

🎭 Series Post

View all