निशिगंधा भाग 38

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ३८
क्रमश: भाग ३७

रणजित " मी आमच्या गावच्या सरपंचांशी बोलतो .. एकदा निशी ताई तुम्ही स्वतः सांगायला या आमच्या गावात "
हरिभाऊ " चालेल कि .. "
रणजित " ताई .. मी आज आलोय तर मी पण शिकवून बघू का मुलांना .. मला जमतंय का ते पण कळेल .. आणि माझे काही चुकलं तर तू सांगशील " रणजित हौशीने बोलला ..
निशी " नेकी और पुछ पूछ .. नंदा चे लेक्चर संपले कि विद्यार्थी तुमचेच .. मी तोपर्यंत सर्वांना नाश्ता बनवते
हरी भाऊ " निशी .. मी निघतो ग .. ते मला एक पंचायत मिटिंग आहे "
निशी " काका .. पोहे खाऊन जा ना "
हरी भाऊ " नको ग .. मला उशीर होईल "
निशी " ठीक आहे .. काका पंचायतीत पण शाळे विषयी बोला ... जागा एकदा शाळेच्या नावावर रजिस्टर करून घेऊ "
हरिभाऊ " हो .. नक्कीच मी पण कामाला लागतो "
हरिभाऊ रणजित शी बोलून निघून गेले .. नंदा च लेक्चर संपले आणि नंदा शिकवायची थांबली .. तशी निशी बाहेर आली आणि मुलांना म्हणाली
निशी " मुलांनो .. आज नंदा टीचर नि शिकवलेलं कळलं का ? काही शंका असेल तर तुम्ही तिला विचारू शकता .. किंवा मलाही विचारू शकता ?"
एका मुलाने प्रश्न विचारला "भागाकार करताना बाकी उरते म्हणजे नक्की काय होते ?"
नंदा ला थोडे टेन्शनच आले होते .. एकतर समोर रणजित बसलेला .. आणि मुलांनी विचारलेली शंका समाधान नीट करता आले नाही तर उगाच पोपट होयचा .. इम्प्रेशन पाडता पाडता तोंडावर पडायला होयच नाहीतर
नंदा " बाकी राहते म्हणजे त्या नंबर ला पूर्ण भागाकार जात नाही .. मग त्यातील काही नंबर शिल्लक राहतात कळलं का ?"
मुलं " नाही कळत आहे ?"
निशी काही बोलणार तर
रणजित उठला " मी प्रयत्न करू का सांगायचा "
निशी " मुलांनो .. हे रणजित सर .. हे पण आपल्या शाळेत कधी कधी येतील आणि तुम्हाला शिकवतील .. तुम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार करा बघू "
तशी सगळी मुलं उभी राहिली आणि म्हणाली " एक साथ नमस्ते रणजित सर "
रणजित ला पण खूप छान वाटले .. त्याने पण हात जोडून सर्वांना अभिवादन केले आणि बोलायला सुरुवात केली
समजा तुमच्याकडे १०७ रुपये आहेत .. आणि ५ जणांना ते वाटायचे आहेत तर हे गणित आपण कसे सोडवणार ? गुणाकार कि भागाकार ?"
मुलांनी एक मिनिट विचार केला आणि सांगितले "भागाकार"
रणजित " बरोबर .. व्हेरी गुड .. मग आपण कसे हे गणित सोडवणार तर १०७ ला ५ ने भागायचे .. तर उत्तर येते २१ आणि बाकी उरते २ .. म्हणजे प्रत्येकाला २१ रुपये वाटून सुद्धा २ रुपये शिल्लक राहतील .. ते शिल्लक म्हणजे बाकी राहिले आता मग राहिलेले २ रुपये प्रत्येकात वाटायचे . 2 रुपये म्हणजे २०० पैसे म्हणून २०० भागिले ५ म्हणजे उत्तर किती आले ?"
सर्व मुले २० ..
रणजित " म्हणजे २० पैसे प्रत्येकाला अजून वाटायचे .. म्हणजे प्रत्येकाला २१ रुपये २० पैसे वाटले तर बाकी काही शिल्लक राहणार नाही .. कळलं "
सर्व मुले " कळलं "
मग निशी ने सर्वांना भागाकाराची दोन दोन गणित वहीत सोडवायला दिली आणि ह्या दोघांना आत बोलावून नाश्ता दिला
रणजित नंदा ला " तू इकडे राहते का ?"
नंदा " नाही मी शेजारी राहते .. निशी माझी मैत्रीण आहे .. लहानपणा पासूनची ..
रणजित " ओके .. ठीक आहे मी निघतो मग .. तो चहा नाष्टा घेऊन निघाला ..
निशी आणि नंदा ने बाय केले आणि पुन्हा शाळेकडे बघू लागल्या
-------------------------------------------------
रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी स्वराज तिला कॉल करायचा .. आणि कॉल वर ती तर बोलायचीच पण तिचे स्टुडंट पण स्वराज काका .. काका करून लॅपटॉप वरून त्याच्याशी बोलायची .. आणि मग रोज रात्री त्याच्या कॉल पुन्हा असायचा .. खास तिच्याशी बोलायला .. तिने कोणती साडी नेसलीय .. आज ती कशी दिसत होती असे सगळे बोलायचा .. शिवाय शाळेच्या कामाचे अपडेट्स घ्यायचा ..
एक दिवस हरी भाऊ धावतच आले पोस्टमन ला घेऊन .. निशी चा पत्ता विचारत पोस्टमन आला होता .. निशी च्या नावाचे पार्सल आले होते .. पार्सल निशी चा बघितल्यावरच कळले कि निशि चा पासपोर्ट आलाय ..
निशी ने लिटरली आनंदाने उडीच मारली ..
हरी भाऊ " आपल्या गावात पहिल्यांदा कोणाचा तरी पोसपोर्ट आला पोरी .. आपल्या गावाचे नाव तू नक्कीच एक दिवस मोठे करणार आहेस .. "
निशी " काका .. ते सर्व जाऊ द्या .. आता स्वराज येईल मला घ्यायला .. मी स्वराज बरोबर एक महिन्या साठी जाईन .. " आनंद ओसंडून वाहत होता.
निशी नुसता पासपोर्ट आला तर मनाने UK ला पोहचली होती ..
अरे गंगा तू काहे जाए परदेस
काहे जाए परदेस
छोड़के अपना देस
छोड़के अपना देस
गंगा चलि कहाँ कसम तोड़ के
हमे छोड़ के
गंगा चलि तू कहाँ कसम तोड़ के
हमे छोड़ के

पिया मेरे पिया
जहाँ पिया वहाँ मैं
मेरे पिया वहां मैं
देस छुड़ाया परदेस बुलाया
देस छुड़ाया परदेस बुलाया
संदेश ये आया मेरे नाम
जहाँ पिया वहाँ मैं
मेरे पिया वहां मैं
मैं क्या करूं मेरे राम
आम आम आम आम
जहाँ पिया वहाँ मैं
मेरे पिया वहां मैं

ऐसा लगता है कि दिल के
अंदर कुछ टूट रहा है
बाबुल के आँगन में
मेरा बचपन छूट रहा है
मैं खुश भी हूँ उदास भी
नदियां में जैसे प्यास भी
मैं क्या करूँ मेरी राम
आम आम आम आम
जहाँ पिया वहाँ मैं
मेरे पिया वहां मैं

चांदी की कटोरी सोने का पिटारा
चांदी की कटोरी सोने का पिटारा
लागे मैया मेरी मुझको
सासू ने पुकारा
लाली काजल पाउडर बिंदिया
लाली काजल पाउडर बिंदिया
लागे मेरी मैया मुझको
सैया ने पुकारा
अनदेखा अनजाना सा
एक सपना देख रही हूँ
अपने मनन के दर्पण मैं
मुख अपना देख रही हूँ
ये मैं हूँ या कोई और है
संजोग पे किसका ज़ोर है
मैं क्या करूँ मेरी राम
आम आम आम आम

गंगा चलि कहाँ कसम तोड़ के
हमे छोड़ के
हमे छोड़ के
वहां मैं
जहाँ पिया वहाँ मैं
वहां मैं
हरी भाऊ " पोरी .. मी काय सांगतो ते ऐक .. हे शाळेचे खूळ डोक्यातून काढून टाक .. मी बघतो .. याच्यावर काम चालूच आहे माझे .. त्या हॉस्पिटल च्या जवळचा प्लॉट शाळे साठी मिळण्याचे चान्सेस आहेत .. आज ना उद्या शाळा होईलच .. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे .. स्वराज मुलगा चांगला आहे पण शेवटी पोराची जात आहे .. वाट बघून कंटाळला तर .. "
निशी " काका .. असे काही होणार नाही .. तो आधी माझा मित्र आहे नंतर माझा नवरा .. तो स्वप्नांत पण माझ्याशी वाईट वागणार नाही .. "
हरिभाऊ " हो पण तू त्याच्याशी वाईट का वागतेय ? तू अन्याय करतेय त्याच्यावर "
निशी "काका तुम्ही काळजी करू नका .. एका पत्नीच्या कोणत्याही कर्तव्यात मी कमी पडणार नाही .. आणि आता शाळा छान चालू झालीय .. पालक मुलांच्या अभ्यासात लक्ष देत आहेत .. मुलं वाढत आहेत .. पुढल्या महिन्यात NGO चे लोक येतील आपण त्यांच्या कडून पैसे आले कि लगेच बांधायला सुरुवात करू”
निशी एकदा का शाळे बद्दल बोलायला लागली कि बाकी सगळे विसरूनच जायची .. हे हरी भाऊंना डोळ्यात दिसायचं ..
आणि मग तिचं मन मोडवायचं नाही त्यांना पण .. तसेही खूप चांगले काम करत होती .. गावात चांगली शाळा चालू होणे गरजेचेच होते ..
नेहमी प्रमाणे रात्री स्वराज चा कॉल आला
निशी " स्वरू .. एक गुड न्यूज आहे "
स्वराज " अरे वाह .. शाळे ची मुलं १०० झाली वाटतं "
निशी " नाही .. हे शाळे बद्दल नाहीये "
स्वराज " चक्क जे शाळे बद्दल नाहीये ते सुद्धा तुला गुड वाटतं .. याचंच मला आश्यर्य वाटतंय "
निशी " स्वरू .. मला घ्यायला कधी येतोय ? "
स्वराज " अरे .. आधी पासपोर्ट तर येऊ दे .. त्या शिवाय मी काही करू नाही शकत "
निशी " तेच तर गुड न्यूज आहे .. पासपोर्ट आला.. "
स्वराज " आला .. ओके गुड .. उद्या मी तुला मेल वर काही डॉक्युमेंट्स पाठवतो .. तू शहरात जाऊन त्याचे प्रिंट आऊट घेऊन ठेवशील का ?\" मग काही डॉक्युमेंट्स ची पूर्तता केल्यावर विझा प्रोसेसिंग करू .. त्यात सुद्धा एक महिना जाईल "
निशी " काय ? इतका उशीर लागेल का ?" जरा नाराजीतच ती बोलली
स्वराज " हो ना डिअर .. म्हणजे एकदा विझा मिळला कि तू केव्हाही येऊ जाऊ शकतेस ना इकडे "
निशी " ठीक आहे .. पाठव लवकर "
स्वराज " मी तू विझा प्रोसेसिंग केल्यावर येईन .. म्हणजे लगेच आपण इकडे निघू शकतो "
निशी " ठीक आहे .. "
स्वराज " विझा संदर्भात कुठे जाऊन काय काय करायचं ते तुला मी सांगतो .. तसे तू कर "
निशी " ओके .. बाकी काय रे .. आज जरा दमल्या सारखा वाटतोय ?\"
स्वराज " हो ना .. आज खूप दमलोय .. आज क्लाएंट मिटिंग होती .. २ तास ड्राईव्ह करून गेलो होतो .. ४ तास मिटिंग मग पुन्हा ड्राईव्ह करून आलो "
निशी " ठीक आहे .. मग आराम कर .. मी ठेवते फोन "
स्वराज बेड वर आडवा पडूनच बोलत होता ..
स्वराज " निशी .. इकडे आल्यावर वेडिंग रिसेप्शन करायचेय .. तर माझी ईच्छा होती ... "
निशी " तू म्हणशील ते अगदी तसेच होईल .. "
स्वराज " बघ हा .. मी काय बोलतोय ते ऐकून न घेता आधीच बोलतेय तू "
निशी " खरं सांगू . तू आधीच माझ्यासाठी खूप केलंय .. तुझी एक जरी ईच्छा मी पूर्ण केली ना तरी मला समाधान वाटेल "
स्वराज " ठीक आहे मग डन .. तू इकडे आल्यावर फक्त मी सांगेल ते "
निशी " होय "
स्वराज " याहू.. आय एम सो एक्ससायटेड "
निशी " मी बोलू .. "
स्वराज " बोल ना डिअर "
निशी " मी पण एक्ससायटेड आहे .. आणि माझी अजून एक ईच्छा आहे ती पण तुला सांगायचंय मला "
स्वराज " बोल मग "
निशी " आपण ना रिसेप्शन च्या आधी सत्य नारायची पूजा ठेवू तिकडे .. मस्त ट्रॅडिशनल .. मी आणि मॉम नऊवारी साड्या घालू .. तू आणि डॅड कुर्ता धोतर आणि फेटा घाला .. भटजी पूजा सांगायला मिळतील का तिकडे ? .. आणि मग नेक्स्ट डे रिसेप्शशन "
स्वराज " भटजी बघतो .. नाहीतर आपण ऑनलाईन अव्हेलेबल करू .. डोन्ट वरी .. तुम्हांरी हर ख्वाईश पुरी होगी मॅडम "
निशी " अरे वाह !! लवकर लवकर विझा च बघू .. तरी पण आता एक महिना होत आला ना .. स्वरू तू जाऊन "
स्वराज " हो ना .. दिवस जात जात नाहीयेत यार "
विषय बदलण्यासाठी
स्वराज " नेक्स्ट डे मी सांगेन ते तू घालायचेस ..”
निशी तशी जरा शांत झाली
स्वराज " काय ग शांत झालीस ? हे बरं आहे तुझे.. तू सांगशील ते आम्ही ऐकायचं आणि आम्ही काही सांगितलं कि ऑब्जेक्शन "
निशी हसायला लागली
निशी " असे काही नाहीये .. ते वेस्टर्न कपड्यांमध्ये मी छान नाही दिसत असे वाटतं मला "

🎭 Series Post

View all