निशिगंधा भाग 35

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ३५

क्रमश: भाग ३४
स्वराज विचार करू लागला .. हि मोठी माणसे पण किती विचारांनी परिपक्व असतात.. मी प्रोब्लेम मध्ये आहे हे मी न सांगताच डॅड ला कळले आणि मला खात्री आहे माझ्याशी बोलायला मॉम ने च सांगितले असेल .. काही पण का असेना .. आज डॅड नि मला छान गाईड केले .. पण माझी निशी बिचारी शी इज ऑल अलोन .. मी ज्या फेज मध्ये आहे .. मी ज्या दुःखात आहे .. त्याच दुःखात ती आहे .. माझी काळजी घ्यायला माझे मॉम डॅड आहेत माझ्या बरोबर पण ती तर एकटीच आहे .. सारखी देवा समोर बसून रडत असेल .. कारण रडायला आनंद शेअर करायला तिच्या जवळ फक्त देवच आहे .. पण आता मी आहेच कि.. मी तिच्याशी बोलून घेतो ... तिने पुन्हा जोश मध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे .. नाहीतर ती माझी कशी होईल ..
जराही वेळ न घालवता स्वराज ने निशी ला कॉल केला
बेड वर आडवी पडून होती .. अचानक या वेळेला स्वराज चा कॉल कसा आला .. म्हणतच तिने कॉल घेतला
स्वराज " हॅलो .. बायको .. काय करतेय ?"
निशी " हॅलो .. काही नाही पडलेय .. काहीच करावेसे वाटतं नाहीये मला .. मुलांच्या वह्या चेक करायच्यात .. तीन दिवस सुट्टी दिली .. नको वाटतंय मला .. स्वरू .. सॉरी .. मी ... चुकलेय का ? मी यायला पाहिजे होते का तुझ्या बरोबर ? "
स्वराज " वेल .. यायला तर पाहिजेच होतेस तू .. असे नवऱ्याला एकट्याला पाठवतात का ?"
निशी " बघ . मी चुकलेय .. मला माहितेय .. "
स्वराज " ए हॅलो ... असे काहीही नाहीये .. कम ऑन निशी .. तुला माहितेय मी प्रेमात का पडलो तुझ्या ?"
निशी " का ?"
स्वराज " लहानपणी जेव्हा तू आमच्या घरी आली होतीस ना तेव्हा .. आई ने घर सारवल्यावर बाबांनी सहज तुला विचारले " निशी बेटा तुला रांगोळी काढता येते का ? जर येत असली तर तू सारवलेलं सुकल्यावर रांगोळी काढ "
निशी " मग ?"
स्वराज " मग अशी गम्मत झाली कि तू होतीस तेव्हा खूप लहान .. रांगोळी तुला काढता येत नव्हती .. तू जे सकाळी रांगोळी चा डबा घेऊन बसलीस ते रात्री चे ९ वाजले तरी तू ते काम सोडले नव्हतेस .. ना जेवायला उठलीस .. ना कशाला उठलीस ... आणि जबरदस्तीने कोणी तुला त्या जागेवरून उठवायला गेलं कि रडायचीस .. एवढी कि असे वाटायंच .. रडण्या पेक्षा करू दे काय करायचंय ते .. दिवस भर तुझे नाजूक हात .. आणि त्या इवल्याश्या हाताची इवलीशी बोटं त्या रांगोळीत होते .. काढायचं ,, नाही आवडली म्हणून पुसायचं .. हेच चाललं होते दिवसभर .. शेवटी आम्ही सगळे उगाचच तुला म्हणू लागलो " अरे वाह !! .. खूप छान काढलीय ... " तरी तू आमच्या वर चिडायचीस ..आणि गाल फुगवून बोलायचीस " नाही आहे ती छान उगाच खोटं नका बोलू .. मला अजून नीट जमली नाहीये .. " इतकी क्युट दिसत होतीस ना तेव्हा .. मी तुझ्या वेडे पणाला हसलो ना तर माझ्यावर पण चिडली होतीस .. मला जीभ वेडावून म्हणालीस" हसतोस काय ? एवढा मोठा झालास .. तुला तरी येते का रांगोळी काढायला " तसे सगळे तुला हसले ..
ना जेवता .. ना जागे वरून उठता .. तू तिथे रांगोळी काढत बसली होतीस .. आम्ही जेवून बाहेर आलो ना तर तिथेच दमून झोपली होतीस .. शेवटी तुझ्या आईने तुला उचलून आत नेऊ लागली तर मुसमुसत होतीस " मला छान रांगोळी का नाही येत काढता ... "
डॅड ला इतकं वाईट वाटतं होतं .. त्यानां असे झाले होते कि कुठून मी हिला रांगोळी बद्दल बोललो
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून तू पुन्हा रांगोळी काढायला बसलीस आणि पहिल्याच वेळात तुला छान स्वस्तिक काढायला जमले होते .. आणि तू इतकी खुश झालीस होतीस .. घरभर नाही गावभर सगळ्यांना सांगितले होतेस कि मला रांगोळी काढायला जमली म्हणून ..
निशी ला इतकं सगळं आठवत नव्हतं पण स्वराज ला आज हा किस्सा सगळा आठवला होता .
स्वराज " तुला आठवतंय .. डॅड नि तुला परकर पोलका घेतला होता ते ?"
निशी " हो .. ते आठवतंय मला .. काकांनी मला ड्रेस घेतला होता "
स्वराज " ते तुझ्यावर इतके खुश झाले होते कि त्यांनी तुला बक्षीस म्हणून परकर पोलका घेतला होता .. मला म्हणाले .. स्वराज .. ह्याला म्हणतात चिकाटी .. जोपर्यंत तिला येत नाही तोपर्यंत तिने ते काम सोडले नाही .. "
निशी निशब्द झाली होती ..
स्वराज " तर मिसेस स्वराज .. हे मी तुला आज का सांगतोय ? "
निशी " आज कसे काय आठवलं एकदम तुला ?"
स्वराज " ते माझे सब कॉन्शन माईंड आता जागृत झालंय .. आता मला खूप सारे आठवतंय .. मी हल्ली स्टोअर रूम मधेच जाऊन बसतो .. तुझ्या आणि माझ्या जुन्या बऱ्याच आठवणींच्या खुणा सापडतात मला "
निशी " अरे वाह !! काय काय आहे स्टोअर रूम मध्ये "
स्वराज " ते जाऊ दे ग .. तू आलीस कि स्वतःच बघ सगळे .. मी आज हे सांगतोय कारण मला तुला आठवण करून द्यायचंय कि तू किती चिकाटी वाली आहेस .. आता हा तुझा शाळेचा प्रोजेक्ट पण तू हातात घेतला आहेस आणि आता तो पूर्ण करायचाय .. आणि तू हे करू शकतेस .. आय नो .. यु कॅन डू इट "
निशी " स्वरू .. थँक यु .. मला हे आठवण करून दिल्या बद्दल .. मी उद्या पासून पुन्हा कामाला लागते "
स्वराज " दॅट्स लाईक माय गर्ल .. माझा मागचचा विषय अर्धा राहिला .. लहानपणी नुसती दिसायला क्युट आहेस म्हणून नव्हती आवडलीस तू .. तुझ्या कडे अश्या अनेक स्किल्स आहेत ज्या बघून तूच माझी बायको असावीस असे वाटायचं मला .. " आणि हसला
निशी " आणि आता ?"
स्वराज " तरी म्हटले अजून कसा काय इंटीलिजन्ट बाईंकडून प्रश्न कसा आला नाही ???” आणि हसला .. तू मला हा प्रश्न विचारला होतास कि पैश्यांची च मदतच करायची होती तर लग्न का केलेस .. त्याचे उत्तर देतो आता "
निशी " ओके " आणि कान देऊन ऐकू लागली
स्वराज " साम दाम दंड .. मैत्री .. आरडा ओरड .. भांडं भांडी .. अगदी मारामारी सगळे करून थकलो पण तुला UK ला घेऊन येण्याच्या निर्णय पर्यंत तुला आणू शकलो नाही .. इतकी चिकट आहेस तू .. तुला कोणी हरवू शकत नाही .. इनफॅक्ट तुझ्या पुढे कोणाचा निभाव च लागू शकत नाही .. आणि मी चक्क तुझ्या समोर कमजोर पडतोय .. एक प्रकारे हरतोय .. हे मला दिसत होते …तेव्हा मला कळले कि मी तुझ्या सौदर्याकडे जेवढा ओढला गेलो त्या पेक्षा तुझ्या अथक परिश्रम बघून .. आपल्या कामात स्वतःला झोकून देण्या कडे बघून हडबडलो होतो .. कशाचाच फरक पडत नव्हता तुझ्यावर आणि मी पुन्हा माझे मन हरवूंन बसलो .. म्हणून तर तुला मी म्हटले कि पुन्हा तुझ्याच प्रेमात पडलो..
स्वराज " तुला एक सांगू का ? तुला करोडो स्वराज भेटतील ग .. पण तू करोडो मध्ये एक आहेस .."
निशी " बास .. बास .. खूपच जास्त तारीफ होतेय माझि असे वाटतं नाही का तुला ? इतकी पण नको करुस नाही तर मला गर्व होयचा .. "
स्वराज "बघा .. इतकी डाऊन टू अर्थ आहेस .. आपली तारीफ कोणाला आवडत नाही सांग .. सगळ्यांना आवडते .. पण तू वेगळी आहेस .. तुला नाही आवडत तुझी तारीफ मला माहितेय "
निशी "थँक यु स्वरू .. तू माझ्या बरोबर माझ्या या स्वप्नांत आहेस हे खूप आहे माझ्यासाठी .. तुला एक सांगू ? जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा कुठे मला माहित होते कि तू मला इकडे राहून माझे स्वप्न पूर्ण करायला संधी देणार आहेस .. आपले असे बोलणे कुठे झाले होते .. तरी पण मी तुझ्या बरोबर लग्न केले याच अर्थ काय आहे .. मला तूच हवा होतास .. " आणि गोड हसली..
स्वराज " तर मॉरल ऑफ द स्टोरी .. आय लव्ह यु .. आय नीड यु .. अँड आय एम वेटिंग फॉर यु .. आणि त्यासाठी तू तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण कर .. आणि इकडे ये .. "
निशी "येस बॉस .. थँक यु .. उद्या पासून पुन्हा बॅक टू वर्क .. फक्त तूझ्या साठी " आणि हसली
स्वराज " थँक यु माय वाईफ "
निशी " स्वराज .. आय लव्ह यु .. स्वरू तुला बरंच काही आठवतंय अजूनही आपल लहानपण "
स्वराज " तूच सांगितलेस ना सब कॉन्शस माईंड .. तिकडे सेव्ह आहे सगळे ..तुला आठवतं का ?"
निशी " हो .. आठवतंय ना .. "
स्वराज " मग कधी सांगणार आहेस ?" पुढच्या जन्मात
निशी " उद्या सांगते .. "
स्वराज " तुला माहितेय का ? तुला मला तू इकडे आल्यावर रेंट द्यावे लागणार आहे ?"
निशी " रेंट .. "
स्वराज " हो रेंट .. तू म्हणाली होतीस ना मला .. कि तुला मी रेंट देईन "
निशी " हा पण तेव्हा ते घराच्या चाव्या तुला द्यायच्या होत्या .. आणि आपले लग्न पण नव्हते ना झाले "
स्वराज " हो .. असे दे .. पण आता हि घर माझंच आहेस आणि त्यात तू राहतेस .. तेही मला न विचारता ..घुसलीस "
निशी " काय कळत नाहीये मला काय बोलतोय तू ?"
स्वराज " अरे गाढव .. माझ्या मनातल्या घरात मला न विचारता तू रहायला लागलीस आणि वर रेंट पण देत नाहीस .. चल पटकन रेंट देऊन टाक आणि आल्यावर व्याज द्यावे लागेल"
तशी निशी हसली .. मग काय रेंट आहे आपले ते तर कळू दे मला ..
स्वराज " किस .. सध्यातरी त्याच्यावरच काम चालवून घ्यायला लागेल मला ?"
निशी " आता इथून कसा देणार मी ?"
स्वराज " तू तर अशी बोलतेय कि मी समोर असतो तर लगेच दिलाच असतास "
निशी " तू मी देण्याची जशी काय वाटच बघत बसला असतास ?"
स्वराज हसायला लागला " तुला तर मी ना .. तू इकडे आलीस ना .. कशात तरी हरवणारच आहे .. अरे काय बोलाण्यात पण हरवतेस तू मला "
निशी " स्वरू .. तुला एक सांगू का ? तू माझे मन जिंकला आहेस . हे ह्या जन्मात कोणालाच जमले नसते .."
स्वराज " हमम .. खरं आहे .. थँक यु फॉर ऍक्सेप्टइंग मी .. "
निशी " नको ना असे बोलूस .. मी पण थँक यु .. तू माझा आहेस या पलीकडे मला काहीच नकोय .. तुझ्या बरोबर छान संसार करायचा हे माझे पुढचं स्वप्नं आहे "
स्वराज " रिअली !! तू स्वप्न बघ .. आणि ती मी पूर्ण करायला तुझ्या बरोबर असेल .. तुला मी म्हटले ना .. तुला सुखी ठेवायचं हेच माझे स्वप्न आहे "
निशी निशब्द झाली होती कारण पुन्हा डोळ्यांतून प्रेम वाहत होते ..

🎭 Series Post

View all