निशिगंधा भाग 33

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ३३
क्रमश: भाग ३२

स्वराज "एक विचारू ?"
निशी " विचार ना ?"
स्वराज " जर मी परत आलोच नाही तर .. अशी भीती नाही वाटत का तुला ? आय मिन अचानक आलो .. आता निघालोय .. "
निशी " ओये .. मला माणसे चांगली ओळखतात .. नाहीतरी कोणीतरी नवीन सारख्या माणसाला गळ्यात घेऊन बसले असते .. आणि तू UK काय जगात कुठेही जा .. तुझी पहिली चॉईस मी आहे हे मला चांगलेच माहितेय .. आणि त्यातून तू आलाच नाहीस तर मी येईन तुला भेटायला .. आता सात जन्म सुटका नाही तुझी माझ्या पासून "
स्वराज " पण कशी येणार तू ?"
निशी " कशी म्हणजे ? विमानाने " आणि हसायला लागली
स्वराज " हो पण कुणीकडे यायचंय ते माहितेय का ?"
निशी " अरे .. बाबा …ऍड्रेस तू दिलायंस ना मला ..
स्वराज " अरे यार .. आय एम टोटली इम्प्रेस ड .. यु आर जेम "
निशी "थँक यु "
स्वराज "निशी .. आय लव्ह यु .. "
निशी " स्वरू .. बचपन का प्यार भूल नहीं जाना रे ... " आणि हसायला लागली
स्वराज " आता मी नव्याने परत तुझ्याच प्रेमात पडलो इतका गाढव आहे मी .. लहानपणी च प्रेम विसरलो होतो पण पुन्हा तूच आवडलीस .. असे कसे काय शकत ग .. एक माणूस पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात कसा काय पडू शकतो ?"" आणि हसायला लागला
निशी खूप हसत होती .. "स्वरू .. याचा अर्थ काय आहे माहित आहे का ? तुझ्या सब कॉन्शस माईंड मध्ये मी कायम होते .. अगदी दोन दोन गर्ल फ्रेंड्स केल्यास ना तेव्हाही .. मन नेहमी माझ्याशी त्यांना कम्पेअर करत असेल .. आणि मग कुठेतरी त्या आपल्या टाइप च्या नाहीयेत हे जाणवलं असेल मनाला …
स्वराज " तू म्हणतेस ते सगळे खरं का वाटते मला .. मी तुझ्या प्रेमात गाढव होत चाललोय .. व्हॉट ह्याव यु डन विथ मी .. अरे इतका प्रभाव कसा होऊ शकतो तुझा माझ्यावर ??"
निशी " ए .. माझ्या नवर्याला गाढव नाही म्हणायचं हा .. आधीच सांगते .. माझा हिरो आहे तो .. आणि तो गाढव असेल तर मी गाढवीण आहे मग "

स्वराज " ए . तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला गाढवीण म्हणायची .. शी इज माय हार्ट .. प्रेशिअस थिंग इन माय लाईफ "
निशी “ थँक्स तू आलास .. तुला माहितेय .. तू क्रिस्टिना बद्दल सांगितलेस ना तेव्हा मी खूप जेलस होत होते .. असे वाटत होते तिचा फोटो तुझ्या मोबाईल मधून डिलीट करून टाकावा "
स्वराज हसायला लागला " ओह रिअली .. आणि मी सांगू .. नवीन जेव्हा घरी आला होता ना तेव्हा ठोकून काढावासा वाटत होते मला .. साला .. माझ्या निशी वर डोळा ठेवून होता तो " आणि तिला त्याने पुन्हा घट्ट मिठीत घेतले
निशी " म्हणजे आपण दोघेही गाढव आहोत ना "
स्वराज " म्हणूनच लग्न झाले आपले .. मेड फॉर इच अदर .. गाढवाची बायको गाढवीण "
आणि दोघे हसू लागले .. हसता हसता दोघांच्याही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या पण स्पर्शातून दोघे एकमेकांवर हक्क गाजवत होते .. प्रत्यक्षांत हनिमून नसले तरी दोघांचे मिलन नक्कीच होते ..
मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी
नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी, गोड हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..
तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी
तू कळी कोवळी साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावारी
स्वप्न भासे खरे स्पर्श होता खूळा
ओळखू लागलो तू मला मी तुला, गोड हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..
शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गालिया सोवरी चांदणे
पाहाताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..
नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी,
मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी
तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी
(https://www.youtube.com/watch?v=eCAV70r5-GI&ab_channel=AbhishekNaik)
गाणे प्लिज प्लिज नक्की ऐका .. अमेझिंग सॉंग .. हेडफोन लावून ऐका .. अल्टिमेट .. होणार सून मी या घरची सीरिअल मधलेच आहे ..
उत्कट प्रेमाचे हे क्षण उद्या त्यांना एकतर भक्कम बनायला साथ देतील नाहीतर पुन्हा पुन्हा भेटायला बेचैन नक्की करतील
स्वराज " आय एम गोइंग टू मिस यु badly "
निशी " मी टू "
खूप छान टाइम ते एकत्र घालवत होते आणि आठवणीची साठवणी करत करत होते .. हे उद्या आठवून ते दोघे आधी हसणार होते आणि मग नंतर रडणार होते.
आजची सकळ दोघांसाठी खूप वेगळी होती .. एकमेकांच्या सहवासाच्या आनंदातून सावरले नव्हते तर विरह .. त्यांच्या मागे हात धुवून लागला होता .... एकी कडे दोघांकडे असंख्य प्रेमाच्या खुणा होत्या ज्या दिसताच हृदयाच्या तारा छेडत होत्या आणि घडाळ्याचा काटा जसा पुढे जात होता तसा हेच हृदय ठप्प होतंय कि काय असे वाटत होते ..
निशी सकाळ पासूनच त्याच्या आवडीचा मेनू बनवायला लागली होती .. तिला त्याच्या साठी काय काय बनवू आणि काय नको बनवू असे झाले होते . आज तिने शाळेला सुट्टी दिली होती .. जेवढा वेळ मिळेल तेव्हढा तिला त्याच्या सोबत घालवायचा होता ..
रव्याचा लाडू , बेसनाचा लाडू . चकली .. असा खाऊ तिने घरी पाठवण्यासाठी तयार केला होता .
आज त्याच्यासाठी वालाची उसळ , काकडीची कोशिंबीर .. गुलाब जामून बनवले होते .. तो उठला आणि त्याचे पॅकिंग करत होता .. बरेच कपडे इथेच ठेवून जाणार होता .. करीन साठी त्याने एक बनारसी साडी घेतली होती आणि काही गिफ्ट्स घेतले होते ते भरत होता.. पॅकिंग करून झाली .. बोल बोलता दुपारचे १२ वाजले .. हरी भाऊ... गावातले एकेक जण भेटून गेले ..
दुपारचे जेवण झाल्यावर तो निघणार होता .. निशी त्याला शहरा पर्यंत सोडायला जाणार होती .. जाताना कार तीच चालवणार होती .. दुसऱ्या दिवशी कार वाला कार घेऊन जाणार होता ..
स्वराज " निशु .. जरा इकडे येतेस का ? "
निशी ने हातातले काम टाकले आणि स्वराज च्या रूम मध्ये आली
स्वराज ने त्याचे कपाट ओपन केले .. त्यात त्याचे कपडे एक साईडला ठेवले होते आणि हँगर ला खूप साऱ्या साड्या होत्या ..
स्वराज " हे बघ काल मी तुझ्यासाठी शॉपिंग केलीय .. आता आईच्या जुन्या साड्या नेसायची गरज नाहीये .. म्हणजे प्रेमाने नक्की नेस .. पण नवीन नाहीयेत म्हणून आईच्या नेसायच्या असे नको .. हि कॅश .. मी इथे काढून ठेवलीय .. दूध वाल्या काकांना .. वर्ष भरचा ऍडव्हान्स दिला आहे .. भाजी रोज आणून खायची .. मी रोज व्हिडीओ कॉल वर तुझे जेवण बघणार आहे .. हि रिसिप्ट मी एक कार बुक केलीय छोटी .. तुझ्यासाठी जेव्हा पण सिटीत जाशील तेव्हा कार ने जा .. दोन एक दिवसन्नी कार ची डिलिव्हरी होईल .. कार तुला चालवता येतेच हे मला माहीतच आहे .. त्यामुळे मला काही काळजी नाही .. फक्त शाळा यावर काम करायचेस तू .. नो अदर वर्क .. हे डेबिट कार्ड आहे जे तुझ्या आणि माझ्या जॉईंट अकॉउंट चे आहे .. केव्हाही जेवढे पैसे लागतील ते तू काढू शकतेस .. याचा pin मी मी तुला मेल करेन .. ओके .. अजून नंदा ला तुझ्या बरोबर झोपायला बोलावं .. आता एकटीला झोपायला होणार नाही तुला .... पासपोर्ट आला कि मला कळव .. मग पुढे व्हिसा चे बघू ..
तो बोलत होता आणि भरल्या डोळ्यांनी निशी त्याच्या मिठीत होती.
निशी " किती करतोय तू स्वराज .. इतकं नको ना करू ? मला सवय नाहीये या सगळ्याची "
स्वराज " इतके काही नाहीये .. हे सगळे महत्वाचे विषय आहेत तेवढेच केलेत मी "
निशी " एवढ्या साड्या कशाला पैसे खर्च केलेस ?"
स्वराज " अरे निशी .. आता जाता जाता वैताग नको देऊ यार .. आता एवढे पण नाही करू शकत मी आवडीने "
निशी " बरं बाबा .. सॉरी .. नसेन मी ह्या साड्या .. "
स्वराज " द्याटस लाईक गुड गर्ल " आणि त्याने तिच्या केसांत हात फिरवून डोक्यावर किस केले.
निशी ने देव घरातून एक सोन्याची चेन आणली आणि त्यात ओम चे पेंडंट होते ती त्याच्या गळ्यात घातली "
स्वराज " हे काय ?"
निशी " हे तुला तुझ्या सासऱ्यांनी आशीर्वाद म्हणून दिलंय .. अरे आई बाबांनी चेन आणि अंगठी ठेवली होती जुनी .. त्याला मोडून मी एक नवीन चेन आणि पेन्डन्ट बनवलं .. " तिच्या हाताने तिने त्याच्या गळ्यात घालून दिले
स्वराज " खूप छान आहे .. थँक यु "
अजूनही तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यातच होते .. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती बोलत होती
निशी " स्वरू .. सावकाश जा .. स्वतःची काळजी घे .. मी नसणार आहे आता बरोबर .. चीड चीड करू नकोस "
स्वराज " हमम .. कसे करणार आहे आपण दोघे काय माहित ? मी तर बहुतेक रोज एक कप फोडणार आहे ऑफिस मध्ये "
निशी "तेच सांगतेय मी .. चीड चीड नको करुस .. माझी आठवण आली कि केव्हाही कॉल कर .. मी लगेच कॉल घेईन .. आणि तू पण माझा कॉल लगेच घ्यायचा .. आणि मिटिंग मध्ये असलास तर एक सेकण्ड बोलून मिटिंग एवढच बोल आणि कट केलास तरी चालेल .. पण कॉल पीक कर "
स्वराज " हमम .. "
दोघे एकमेकांच्या मिठीत बोलत होते ..
स्वराज " मला तुझी आठवण म्हणून काही पाहिजे होते "
निशी " काय ? तू ज्यावर बोट ठेवशील ते तुझे आहे "
स्वराज "तशी तर तूच पाहिजेस .. पण आता ते जे झाड आहे ना त्याला अजून एकदाही फुल आले नाही ते झाड हवंय मला "
निशी " तेच कशाला ? बाकी बघ किती छान आहेत .. किती बहरली आहेत "
स्वराज " मला तेच हवंय ."
निशी ने लगेचच ते छोटेसे रोपटे एका पॅस्टिक च्या पिशवीत पॅक केले .. त्याला एअर मिळेल अशी सोय केली आणि त्याला दिले ..
निशी ने तिच्या टाचा वर केल्या आणि त्याच्या कपाळावर किस केले ..त्याने तसेच तिला हाताने उचलून घेतले .. आणि तिला किस करू लागला .. .. दोघांच्या हि डोळ्यात पाणी होते .. तिला तर मोठा हुंदका येत होता .. जशी काय शेवटची मिठी असल्या सारखंच वाटत होते दोघांना
स्वराज " रडू नकोस ना .. तुझी ताकद बनायचंय मला .. तुझा विकनेस नाही "
निशी "मी पण एक मुलगी आहे रे .. ध्येय एका बाजूला आता तर बायको आहे .. आतून कुठेतरी हळवी आहे .. मला तुझ्या साथीची गरज आहे .. "
स्वराज "मी समजू शकतो .. मी आहेच तुझ्या बरोबर .. तू एक कॉल कर मी १० तासांत तुझ्या समोर हजर असेल .. हा माझा शब्द आहे " त्याने तिचे डोळे पुसले
स्वराज " निघायचं .. यु आर ब्रेव्ह गर्ल .. आय नो तू करशील हॅन्डल .. आणि नो रोना धोना .. हे आपण आपल्या मनाने स्वीकारलंय ना मग .. त्याचे दुःख नाही करायचं .. ओके .. " असे म्हणत त्याने स्वतःच्या ओल्या कडा पुसल्या

🎭 Series Post

View all