निशिगंधा भाग 30

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ३०

क्रमश: भाग २९

खूप सारे फिरून .. एन्जॉय करून दोघे पुन्हा हॉटेल रूम आले .. दोघेही खूप दमले होते .. आनंदी होते .. दोघांना एकमेकांचा खूप छान सहवास भेटला होता .. एक प्रकारे निशी ने आग्र्याचे स्वतःहून काढले हे छानच झाले होते .. हळू हळू ऑकवर्ड नेस कमी होऊन .. आपण दोघे नवरा बायको आहोत .. याचा फील आला दोघांना ..
स्वराज फ्रेश होऊन बेड वर आडवा पडला .. हि पण फ्रेश होऊन चक्क त्याच्या कुशीतच शिरली .. आणि त्याने पण एका हाताने तिला कुशीत घेतले ..
निशी " दमलास का ?"
स्वराज " मग काय ? खूपच गरम होते यार इकडे ..त्याने दमायला होते.. आणि आज आपण किती चाललोय .. मला वाटत नाही मी एवढा कधी चाललो असेल "
निशी " पाय चेपून देऊ का ?"
स्वराज " अरे नको रे .. मी असेच बोललो .. झोप आता तू पण दमलीच आहेस "
निशी " स्वरू .. मला ना काहीतरी पाहिजे होते तुझ्या कडून "
ती काहीतरी मागतेय .. या विचारानेच त्याला गुदगुदल्या झाल्या .. कदाचित आज किस मिळायची शक्यता आहे असे वाटले त्याला
स्वराज " बोल ना .. "
निशी " मला जे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन येतेय ना ते खूपच बेसिक आहे .. मला चांगले वाले शिकवशील का ? आणि ते प्रोजेक्टर पण मला खूप आवडलाय .. माझ्या कडे मी शाळेसाठी पैसे साठवलेत ना त्यातून शाळेसाठी प्रोजेक्टर लावायचा का ? मुलांना मोठ्या स्क्रीन वर बघायला आवडेल .. आणि एक लॅपटॉप पण घेऊ .. म्हणजे त्याला कनेक्ट केला ना कि मला पाहिजे ते मी मुलांना स्क्रीन वर दाखवू शकते ... काय वाटतं तुला ?"
मनातल्या मनातच त्याने कपाळावर हात मारला
स्वराज " मला वाटल .. तिच्या कानाशी " तुला किस हवाय माझ्या कडून .. "
निशी " स्वरू .. "
स्वराज " अरे तू .. मला दिलाच नाहीस .. आणि मला घेऊ पण नाही दिलास .. काय पुढच्या जन्मात देशील का ?"
निशी " काय रे स्वरू .. मी काय बोलतेय आणि तू काय बोलतोय ?"
स्वराज " तू तुला काय पाहिजे ते बोलतेय आणि मी मला काय पाहिजे ते बोलतोय .. " आणि हसू लागला
निशी पण हसत " स्वरू .. तू आधी कोणाला किस केलंय का ?"
स्वराज " हि शंका आहे कि .. क्युरीऍसिटी ?"
निशी गोंधळली " तू सांग ना "
स्वराज " तू केलाय का कोणाला किस आधी ?"
निशी " ए .. काय पण काय प्रश्न विचारतो " आणि तिने त्याला दंडावर मारले
स्वराज " मग मला का असा प्रश्न विचारलास तू ? "
निशी " तुला गर्ल फ्रेंड होत्या ना म्हणून .. शिवाय UK मध्ये .. लहानाचा मोठा झालास तू "
स्वराज " हमम .. एक विचारू ? तो माझा पास्ट आहे .. पण जर मी आधी किस केले असेल तर काय ? ते पण सांगून ठेव "
निशी तशी एकदम नाराज झाली .. नाराज काय ... डोळे भरूनच आले तिचे .. आणि तिच्या ह्या असल्या प्रश्नाने तो हि नाराज झाला
स्वराज " गुड नाईट .. मला झोप येतेय "
निशी काहीच बोलली नाही .. आणि त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली
स्वतःशीच विचार करू लागली " हा सांगत नाहीये म्हणजे नक्कीच ह्याने आधी किस केले असेल .. आणि केले असेल तर .. माझा स्टॅन्ड काय असला पाहिजे ..? एक नाही चांगल्या दोन दोन गर्ल फ्रेंड होऊन गेल्यात त्याच्या .. मनातच चरफडत होती त्याच्या वर .. "
तिची चाललेली तडफडं बघून हसायला येत होते त्याला..
त्याने तिच्यावर हात टाकून तिला त्याच्या जवळ ओढले " डोन्ट वरी .. मी कोणालाही किस केले नाही अजून .. म्हणूनं तर ब्रेक अप झाला माझा.. "
तशी थोडीशी स्माईल आलेली त्याने बघितली आणि मनातच म्हणाला " .म्हणून अजून किस केला नाही तिने .. सगळे काढून घेते माझ्याकडून .. थँक गॉड मी अन टचड आहे .. अरे काय दिवस आले ना .. पहिल्यांदा मुलींना अशा परीक्षा द्याव्या लागायच्या आता मुलांना पण सती सत्यवान असावे लागते .. टाईम इज चेंगिन्ग "
स्वराज " ए हॅलो .. विश्वास नाहीये का माझ्यावर ? थांब तुला माझ्या एक्स GF ला कॉल लावून देतो आणि तू विचार त्यांना कि स्वराज ने किस केल का म्हणून " आणि त्याने मोबाईल हातात घ्यायला हात लांब केला ..तशी ती पटकन त्याच्या विरुद्ध चेहरा करून झोपली होती ती पटकन वळली आणि त्याच्या कुशीत पुन्हा गेली
निशी " सॉरी .. नको ना .. मी असे कुठे म्हंटल कि माझा विश्वास नाहीये म्हणून ?"
स्वराज " मी सती सत्यवान आहे "
निशी हसायला लागली .. " स्वराज .. इफ यु वॉन्ट यु कॅन किस मी "
त्याने तिच्या हनुवटी ला पकडले आणि तीची मान वरती केली .. निशी एकटक त्याच्या डोळ्यांत पाहत होती .. तो हळू हळू तिच्या चेहर्या जवळ आला .. आणि गालावर पण जिथे ओठ सुरु होतात तिथे किस केले ..
स्वराज " डोन्ट वरी .. आय विल वेट टील यु रिअली वॉन्ट इट .. मला पाहिजे म्हणून नको .. इट शुड बी अस नॉट ओन्ली मी ऑर यु "
निशी कुजबुजली " मला भीती वाटते .. हे सर्व खूपच नवीन आहे माझ्यासाठी .. पण खरंच सांगते आज मला मी तुझी बायको आहे ह्याचा फील आला .. तू माझ्या मनातुन माझ्या आत्म्या पर्यंत हळू हळू पोहचत चालला आहेस .. तू माझा आहेस .. तुझा माझ्यावर हक्क आहे .. असे वाटू लागले .. "
स्वराज " तसच तुझा माझ्यावर हक्क आहे असेहि वाटले पाहिजे .. तेही अंतर्मनातून .. "
निशी एकदम गप्प झाली .. तो एकदम बरोबर बोलत होता .. समर्पण हे मनाची जेव्हा हि स्थिती येते तेव्हाच होते.. आणि कदाचित अजून ती वेळ आली नव्हती... "
स्वराज " चल .. झोपूया .. उद्या सकाळी जायचंय आपल्याला ..
निशी " हमम .. गुड नाईट " आणि दोघांनीही डोळे मिटले ..
पाच एक मिनिटांनी स्वराज झोपला .. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती .. थोडीशी वर सरकून तिने त्याच्या कपाळावर किस केले .. " गुड बॉय " असे म्हणून मनातच हसली .. तिने गुड बॉय बोललेलं त्याने ऐकले होते आणि तो मनात म्हणाला " हि अशी मला गुड बॉय बोलतेय जसा काय मी तिचा स्टुडन्ट आहे .. वेडी कुठली .. म्हणे "गुड बॉय " का तर गर्ल फ्रेंड ला किस केले नाही म्हणून " आणि मनातच हसत होता ..
दुसऱ्या दिवशी फ्लाईट ने घरी आले
लगेचच हिचे शाळेचे रुटीन सुरु झाले .. स्वराज पण आता गावात रुळला होता .. एक दोन बाहेरची कामं एकटा जाऊन करून यायचा "
रात्री जेवणं झाल्यावर
स्वराज " दमलीय का तू ?"
निशी " नाही .. काही काम आहे का ?"
स्वराज " हो .. आवर ना पटकन ... मला बोलायचंय .. मी पर्वा संध्याकाळी जाणार आहे "
निशी ने कशी बशी भांडी घासली आणि लगेचच आली
निशी हात पुसतच आली
निशी " हा बोल .. बोलता बोलता ती बेड वर नवीन बेडशीट टाकत होती..
स्वराज " नाही आधी तुझे काम उरक .. मग बोलू आपण "
निशी " झाले रे .. म्हणजे तू ला झोप आली तर झोपशील ना .. म्हणून बेडशीट टाकून घेतली "
स्वराज " बस तू पण आता "
निशी बसली त्याच्या शेजारी त्याने लॅपटॉप तिला दिला ..
स्वराज " हा लॅपटॉप मी तुला ठेवून जात आहे .. तुला शाळेतल्या मुलांना दाखवायला पण होईल आणि प्रेझेन्टेशन साठी पण होईल .. प्रोजेक्ट र वाला उद्या येईल आणि फिक्स करून जाईल.. हा माझा UK चा पत्ता .. हा माझा UK च्या ऑफिस चा पत्ता .. हे कॉन्टक्ट नंबर्स .. हा माझा ई-मेल आय डी .. हे सगळे इथे सेव्ह आहे "
निशी सगळे बघून घेत होती ..
“हे आपले मॅरेज सर्टिफिकेट आलंय .. पासपोर्ट आला कि आपण तुझा विझा अप्लाय करू .. विझा आला कि मी येईन तुला घ्यायला .. "
निशी सगळे शांतपणे ऐकून घेत होती
दोघांच्याही मनात खूप अस्वस्थता होती . आता आपण एकमेकां पासून वेगळे होणार याची भीती तिच्या डोळ्यांत त्याला स्पष्ठ दिसत होती ..
स्वराज " तुझा माझ्या वर विश्वास आहे ना ? मी .. मी लग्न करून फसवून जातोय असे तर वाटत नाहीये ना "
निशी च्या डोळ्यांतून घळघळ पाणी येऊ लागले होते एव्हाना
स्वराज " निशी.. इट इज डिफिकल्ट फॉर मी टू स्टे अवे फ्रॉम यु "
निशी " स्वरू .. " खूप भरून आले होते तिला
निशी " स्वरू ... माझा तुझ्या वर खूप विश्वास आहे .. पण आज मला माझाच राग येतोय .. मला तुझ्या पासून लांब नाही राहायचंय .. मी नाही जगू शकणार आता तुझ्या शिवाय .. आता मी पूर्वीची निशी नाही राहिले "
स्वराज " आपण लवकर इकडे शाळा काढू .. म्हणजे तू माझी होशील पूर्णपणे माझी "
निशी " मी आता पण पूर्णपणे तुझी आहे .. "
स्वराज " तू जेव्हा UK ला येशील तेव्हा तू माझी असशील .. माहितेय मला .. "
निशी " नाही रे .. तसे नाहीये .. सॉरी ना .. तुला मी खूप त्रास देतेय ना .. सॉरी .. माझ्यामुळे नॉर्मल संसार नाही करता येत आहे तुला .. लग्न होऊन फक्त काही दिवस होत आहेत तर आपण एकमेकांपासून लांब राहणार ? कसे होईल आपले ? आपण कधी भेटणार एकमेकांना .. मला असे वाटतंय कि हे सगळे सोडून द्यावे आणि तुझ्या बरोबर तू नेशील तिकडे यावे .. " म्हणतच त्याच्या कुशीत ती शिरली .. त्याने पण तिला घट्ट मिठीत घेतले होते .. दोघांची हालत सेम झाली होती .. कितीही जवळ असले तरी ते अपूर्णच वाटत होते .. हृदयातील आर्तता एकमेकांना साद घालत होती .. श्वासांची गती खूप वाढली होती .. दोघे एकमेकांच्या सहवासात एकमेकांवरील हक्क आणि प्रेम सिद्ध करत होती .. स्पर्श ज्यात काळजी होती .. माया होती .. खूप सारे प्रेम होते ..

🎭 Series Post

View all