निशिगंधा भाग 29

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग २९

क्रमश: भाग २८

दोघे ब्रेकफास्ट करून ताज महाल जवळ जितक्या जवळ गाडी ने जाता येईल तेवढे आले .. मग चालतच निघाले .. एक दीड किलोमीटर पोल्युशन नको म्हणून चालतच यावे लागते .. किंवा मग घोडा गाडीत बसून यायचं .. असेच चालत ते आले आणि मग दोघे हातात हात घेऊन ताज महाल च्या इथे आले ..
ताजमहाल बघून आणि त्याची सुंदरता बघून निशी एकदम खुश झाली.. कायच्या काय वाटत होते तिला .. आनंदाच्या भरात तिने स्वराज चा हातच घट्ट पकडला ..
निशी " स्वरू .. किती सुंदर आहे ना .. थँक यु मला इकडे आणल्या बद्दल "
स्वराज " अरे थँक यु काय ? आणि म्हणयचेच झाले तर मी तुला थँक यु म्हंटले पाहिजे .. कारण इट इज रिअली ब्युटीफुल प्लेस .. तुझ्यामुळे मी आलोय "
पूर्ण संगमरवरी पांढऱ्या दगडात कोरीव काम केलेला कलेचा अप्रतिम नमुना म्हणजे ताज महाल .. दोघे हातात हात घेऊन बघत होते .. खूप छान फोटोस . सेल्फी काढत होते .. वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढत होते .. ज्या तळ्यात ताज महाल चे पूर्ण रिफ्लेक्शन होते त्या तळ्याच्या इथे तिचा एक सोलो फोटो स्वराज ने काढला .. आणि मग फोटो ग्राफर काढून दोघांचा छान फोटो काढून घेतला ..
इकडे अप्रतिम कला ताज महाल जो कि प्रेमाचे प्रतीक आहे आणि इकडे स्वराज चे प्रेम निशी .. दोघेही कुदरत का करिष्मा असल्या सारखे सुंदर भासत होते त्याला
सुनो ना संगेमरमर कि ये मीनारें
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे
राज तुम्हारा ताज तुम्हारा
सुनो ना संगेमरमर कि ये मीनारें
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे
राज तुम्हारा ताज तुम्हारा
सुनो ना संगेमरमर कि ये मीनारें

बिन तेरे मद्धम मद्धम
भी चल रही थी धड़कन
जब से मिले तुम हमें
आँचल से तेरे बंधे
दिल उड़ रहा है
सुनो ना आसमानों
के ये सितारे
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे

ये देखो सपने मेरे
नींदों से होक तेरे
रातों से कहते हैं लो
हम तो सवेरे हैं वो
सच गए जो
सुनो ना दो जहानों के ये नज़ारे
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे
राज़ तुम्हारे ताज तुम्हारा
सुनो ना संगेमरमर की ये मिनारे

https://www.youtube.com/watch?v=83pr5QLz6Bc&ab_channel=T-Series
तिला बघत होता .. कधी तिचे केस मागे घेत होता .. कधी ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होती .. कधी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून ऐकत होता .. खूप छान टाइम एकत्र त्यांनी तिथे घालवला .. खूप सारे फोटोज काढले .. डॅड ला तिथूनच त्याने कॉल करून सांगितले कि तो ताज महाल बघायला आलाय आणि इथे खूप छान वाटतंय ..
असेच हसत आनंदात परत रूम वर आले ..
स्वराज "थँक यु .. तुझ्या निमित्ताने मला पण ताज महाल बघायला मिळाला .. "
निशी " ते गाईड आपण केला ते बर झाले .. खुप डिटेल माहिती मिळाली .. मला शाळेतल्या मुलांना पण माहिती सांगता येईल "
स्वराज हसू लागला .. “ झाल्या शिक्षिका जाग्या झाल्या लगेच .. अरे हनिमून नाही पण यु आर विथ युअर हँडसम हजबंड .. जरा तरी बायको म्हणून वाग ना .. मी ताज महाल माझ्या बायकोला दाखवला .. तर या शिक्षिका कुठून आल्या माझ्या बरोबर .. “
निशी " सॉरी सॉरी .. अरे ते चुकून गेले माझ्या तोंडून मी ना आज ठरवले होते कि आज मी शाळे बद्दल काहीच बोलणार नाही तरी आलेच माझ्या तोंडात ते "
स्वराज " मग आता माझि कमाई काही झालीय का? झाली असली तर ती मिळाली पाहिजे मला " हसत तिला मिठीत घेतले त्याने आणि कपाळावर किस केले .
निशी पण त्याच्या मिठीत आनंदाने गेली .. आणि हळूच त्यालाच ऐकायला जाईल असे "आता काय तुझी कमाईच कमाई आहे .. "
स्वराज " ए हॅलो .. एवढी ओपन कमाई चा चान्स देऊ नकोस काय मला .. मी एक नंबरचा बिझनेस मॅन आहे .. तुला भारी पडेल "
निशी " अजिबात नाही .. आज मी बायको आहे .. आज नवरा सांगेल ते "
स्वराज " बघ हा .. "
निशी " बोला नवरोबाची आज काय ईच्छा आहे .."
स्वराज " आता आपण लंच ला जातोय तर जीन्स घालून येशील का ? एवढे घेतलंय तर यूज होईल .. "
निशी " ओके .. "
स्वराज " बाय द वे .. तुझी चॉईस पण खूप छान आहे .. आज ह्या ड्रेस मध्ये थेट ताज महाल च्या सौंदर्याला कॉम्पिटिशन देत होतीस "
निशी " काहीही काय ? "
स्वराज " खरं आहे .. " तिच्या काना जवळ त्याचे श्वास तिला जाणवत होते " यु आर लुकिंग गॉर्जस इन धिस ड्रेस " आणि तिच्या गालावर त्याने किस केला
निशी " थँक यु .. "
स्वराज " माझी रिटर्न तिकिट्स बुक झालीत .. लवकरच मला निघावे लागेल "
त्याने जास्त आढेवेढे न घेता तिला सांगून टाकले
निशी च्या हृदयाचा ठोकाच चुकला होता .. लग्नाला जास्त दिवस झाले नव्हते .. आणि आता ४ दिवसात तो जाणार होता .. तो UK मध्ये कुठे राहतो माहित नाही ? कसे जायचं माहित नाही ? तो परत नक्की कधी येईल माहित नाही .. अनेक असंख्य प्रश्न लगेच समोर उभे राहिले होते ..
एकदम शांतच झाली ती .. मनात अस्वथता जाणवू लागली
स्वराज " आर यु ओके ?"
निशी " स्वराज .. तू येशील ना परत .. मला अर्ध्यात सोडून नाही ना देणार ? मी माझ्या मनाला समजावले होते कि मी एकटी जगायला तयार आहे .. पण आता .. आता मी तुझ्या बरोबर माझ्या भविष्याची खूप स्वप्न बघायला लागलेय..."
स्वराज "मी .. पण .. खूप स्वप्न बघतोय तुझ्या बरोबर .. तू आणि मी UK मध्ये .. तू येशील ना माझ्या कडे ? प्लिज तुझ्या स्वप्ना साठी मला सोडू नकोस .. "
निशी " नाही रे .. असे कधीच नाही होणार .. मी आता तुझी सात जन्म साथ नाही सोडणार .. "
स्वराज " आय नीड यु .. निशि .. आय नीड यु "
दोघे एकमेकांच्या मिठीत डोळे मिटून बोलत होते .. एकमेकांचा सहवास अनुभवत होते .. एकमेकांना दोघे किती महत्वाचे आहेत ...ते सांगत होते ..स्पर्शातून .. श्वासातून ..
स्वराज " चल .. तुला भूक लागली असेल ना .. "
निशी " हमम .. मी जीन्स घालते "
निशी वॉशरूम मध्ये जाऊन जीन्स आणि टॉप घालून बसली ती बाहेरच येई ना .. खूप लाज वाटतं होती तिला .. आणि ती जितका उशीर लावत होती हा अधीर होत होता ..
स्वराज " हॅलो .. आर यु ऑल राईट .. खूप वेळ झाला ?"
निशी " काय हे स्वराज .. हे छान नाही दिसत आहे .. मी नाही येत जेवायला .. तू जा .. माझ्या साठी पार्सल घेऊन ये "
स्वराज " नॉट डन .. यार . बाहेर ये ना "
निशी " नाही .. मी एक टीचर आहे .. मला हे असले वागणे शोभत नाही "
स्वराज " अरे काय वेड्या सारखं बोलतेय जीन्स म्हणजे एक प्रकारचा ड्रेस आहे बाकी काही नाही .. ह्यात काय शोभत नाही "
निशी " नको ना .. नाही छान दिसत आहे .. कोणी बघितले तर काय म्हणतील ?"
स्वराज " आधी मला तर बघू दे ना .. मग बाकीच्यांना "
निशी " नको ना .. स्वराज .. तू जा .. जेवून ये .. उशीर होईल "
स्वराज " मी आता येतोय आत .. मला माहित नाही "
निशी पटकन वॉशरूम चे दार लॉक करायला धावली त्या आधीच स्वराज ने दार उघडले ..
स्वराज ने तिला हाताला धरले आणि आरशा समोर धरले
स्वराज " बघितलेस का आरशात .. किती सुंदर दिसतेय .." आणि त्याने तिचे बांधलेले केस त्याच्या हाताने मोकळे केले ..
निशी " ठीक आहे .. आता बाहेर नको यावर .. तू बघितलेस ना .. बास झाले .. मी चेंज करून येते "
स्वराज " निशी .. तू म्हणालीस ना मला कि मी आज तुझी बायको आहे .. शिक्षिका नाहीये .. बायको असताना मी एकटा रेस्टारंट ला जाऊन जेवणे बरोबर दिसते का ? सांग बरं ? लोक हसतील मला .. आणि .. " निशी " सॉरी .. खूप कसतरी होतंय अरे .. मला नाही छान दिसत आहे .. बाकी काही नाही "
स्वराज " छान दिसतंय .. मी सांगतोय ना .. मला जास्त माहित आहे "
निशी " तू काही ऐकणार नाहीस .. "
स्वराज " अरे .. हि फॅशन आहे हे आधी डोक्यातून काढून टाक .. जसे तू इकडे साडी नसतेस ना तसे शहरात लोक जीन्स घालतात .. .. पटपट वावर होण्यासाठी शिवाय थंडी पासून पण रक्षण होते .. इट्स जस्ट अ क्लोथ "
निशी " चल .. आणि रागातच तिने केस पिरगळून त्याचा अंबाडा बांधला .. आणि बाहेर जायला निघाली
स्वराज ने तिचे नाक ओढले " रागात असताना हेअर स्टाईल मस्त केलीस .. पण जरा प्रेमाने कर ग .. एवढे छान केस .. कसे हॅन्डल करतेस "
निशी " चल .. मला भूक लागलीय "
स्वराज " मला पण .. "
दोघे रेस्टोरंट ला गेले .. शेवटी लिफ्ट मध्ये त्याने तिचे केस पुन्हा मोकळे सोडलेच .. आणि कानामागे टाकले " हे असं जास्त छान वाटतंय " लिफ्ट मध्ये एक सेल्फी घेतला तिच्या बरोबर
निशी गालातच हसली .. पण मधेच टॉप नीट कर .. खाली ओढ .. असे काहीसे उदयोग चालू होते तिचे
स्वराज " छान दिसतंय .. प्लिज बी कंफर्टेबल .. "
लंच झाल्यावर त्याने तिला जबरदस्तीने बाहेर फिरायला नेले .. अर्ध्या एक तासाने मग ती रस्त्यावर पण जीन्स मध्ये फ्री वावरू लागली हे तीच तिला पण कळलं नाही .. पण तो मात्र हे सगळे एन्जॉय करत होता ..
शिडशिडीत बांधा आणि तिचे लांब केस .. मोदका सारखे नाक .. बारीक जिव्हणी .. नजेरेतून जणू बाणच सोडत होती आणि तो घायाळ होत होता .. हसता हसता मधेच केस हाताने मागे करायची ना तेव्हा तर हृदयाचा ठोकाच चुकत होता त्याचा .... हा समोर असलेला सौन्दर्याचा खजिना फक्त माझा आहे .. याचा आनंद काही वेगळाच .. नाही का !!
मीना बाजार सारख्या बाजारात ते आले होते .. त्याला वाटले निशी ला या मार्केट मध्ये सोडली तर कदाचित अख्खे मार्केट खरेदी करेल कि काय ? पण मॅडम चक्क तिकडे पण पुस्तकांच्या शॉप मध्ये घुसल्या .. मुलांसाठी सायन्स प्रोजेक्ट .. एन्साय्क्लोपीडिया .. ऑक्सफर्ड डिक्शनरीं अशी बरीच बुक्स तिने घेतली ..
स्वरू " निशी .. ते तिकडे खूप छान बँगल्स आहेत ... असे म्हणतात इकडे बँगल्स स्पेशल घ्यायला लोक येतात .. तुला घे ना "
निशी " मी कुठे घालते रे बँगल्स .. मला नाही फारशी आवड .."
स्वरू " हे बघ झुमके .. हे आवडत का ते बघ ?"
निशी " किती मोठे आहेत .. "
स्वरू " घालून तर बघ ?"
निशी तिथेच असलेल्या आरशात बघून ते झुमके घालत होती आणि स्वराज तिला पाहत होता .. नाजूक कानाची पाळी .. त्यात गोल झुमके .. तिने घातले आणि तिचे तिने एक टिचकी मारली तसे तो झुमका मागे पुढे हळू लागला .. हिने डोळ्यानेच खुणावून त्याला विचारले कसे दिसतंय ?"
स्वरू ने हाताने तीन बोटे दाखवून छान आहे म्हणून खुणावले
निशी " ठीक है .. भैया ऐसे पॅक कर दो .. " असे ती पटकन बोलली
तिच्या सगळ्या अदा बघून त्या झुमक्या सारखे त्याचे मन हिंदोळे खात होते ..
हातात हात घालून दोघे खूप फिरले .. दोघात एक कॉफी .. दोघात एक आईस्क्रिम .. तिचा हसरा .. आनंदी चेहरा.. खूप सारे सेल्फीज .. तिचे सोलो फोटोज .. तिचे मोकळे केस .. जीन्स आणि शून्य मेक अप मध्ये सुद्धा चमकणार तिचा चेहरा .. बोलके डोळे ज्या मध्ये आता स्वराज बसला होता .. त्याच्या बरोबर असताना तिला जागाचा विसर पडू लागला होता कारण आता तोच तीचं विश्व बनला होता ..

🎭 Series Post

View all