निशिगंधा भाग 28

Story Of A Girl Who Wants Run School


निशिगंधा भाग २८
क्रमश: भाग २७
स्वराज " ठीक आहे .. मग मी मिटिंग ला गेलो कि लॅपटॉप तुला देऊन ठेवतो .. तू प्रेझेन्टेशन बनवून ठेव .. आणि माझि मिटिंग झाली कि प्रेझेन्टेशन दे "
निशी " स्वरू .. थँक यु " आणि तिने त्याला फ्याइंग किस दिला "
स्वराज " अरे वाह माझि अर्निंग वाढत चाललीय "
निशी " मग काय ? यु डिझर्व इट " बोलता बोलता तिने बॅगेतून एक रेड साडी काढली आणि नेसायची तयारी करू लागली .. तर त्याने " हि नको .. त्या पेक्षा हि ब्लॅक नेस .. ब्लॅक मध्ये तू छान दिसतेस "
निशी " ओके .. "
स्वराज तयार होऊन बाहेर गेला .. मग हि तयार झाली .. शिक्षिका मुरलेली तिच्या अंगात .. चालता बोलता पण असेच वाटायचं कि कोणीतरी शिक्षिका आहे बरोबर .. केसांचा बन बांधला होता तिने .. साडी चांगली चापचपून नेसली होती .. पिन अप केले होते ..
स्वराज " निघायचं ?"
निशी " हो .. निघूया .. मी एक विचारू ?"
स्वराज " बोल ना "
निशी " मी बरी दिसतेय ना .. म्हणजे तू एवढा मोठा बिसनेस मॅन आणि त्याची बायको शोभले पाहिजे ना म्हणून विचारले ? "
स्वराज " मी काही चेंजेस सांगितले तर करशील का पण ? तरच मला विचार .. नाहीतर तू आहे तशीच छान आहेस .."
निशी " म्हणजे बदल करावे असे वाटतंय तर सांग ना "
स्वराज ने तिचे केस मोकळे सोडले .. आणि साडी चा पिन काढून सिंगल पदर घ्यायला लावला ..
स्वराज " मला असे वाटतंय ... हे छान वाटतंय .. बाकी तू ठरव "
निशी " केस मोकळे मी तिकडे गेले कि सोडेन .. जाई पर्यंत खराब होतील नाहीतर " आणि बोलता बोलता तिने एक क्लचर घेतला आणि त्यात कसे बसे बसवले "
स्वराज " हे .. असे जास्त छान वाटत आहेत .. "
मग दोघे मिटिंग ला गेले .. तिला एका कॉन्फरंस रूम मध्ये जागा दिली .. आणि ती तिचे प्रेझेन्टेशन तयार करत बसली .. चहा पाणी झालेच होते .. ह्याची मिटिंग संपल्यावर स्वराज ने सांगितले कि माझ्या बरोबर ज्या मॅडम आल्यात त्यांना काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचंय .. तर थोडा वेळ द्याल का ?.. स्वराज च्या शब्दा खातिर क्लाएंट रेडी झाला
स्वराज ने निशी ला बोलावून घेतले .. आणि त्याचा लॅपटॉप तिथल्या एका मुलीने लॅपटॉप प्रोजेक्टर ला जोडून दिला ..
निशी च्या चेहऱ्यावर थोडेशे टेन्शन त्याला दिसले\"त्याने तिला मेसेज पाठवला " तिथल्या ग्लास मधले पाणी पी .. आणि मी आहे इथेच समोर .. डोन्ट टेक टेन्शन आणि एक स्माईली.
निशी ने तो मेसेज वाचला आणि एक क्षण त्याच्या कडे बघितले .. आणि पुन्हा लॅपटॉप कडे बघितले .. तिथल्या मुलीला PPT रन करायला सांगून ती पुढे उभी राहिली .. बोलायला सुरुवात करणार तर आधी ग्लास मधले थंड पाणी प्यायली आणि खरंच तिला बरे वाटले ..
आणि मग तिने तिचे प्रेझेन्टशन सुरु केले
निशी " हॅलो सर .. माय नेम इज निशिगंधा .. आय एम फ्रॉम .... व्हिलेज .. सर माय मोटिव्ह बिहाइंड द प्रेझेन्टेशन इज टू कलेक्ट फंडस् फॉर स्कूल ..
आणि मग तिने तिच्या वडीलां पासून घरी ते लोक कसे शाळा चालवत आहेत ... काय काय प्रॉब्लेम्स आहेत .. आणि काय स्वप्न आहे ? काय काय करू शकतो .. वगैरे सगळे सांगितले ..
पहिल्या दोन वाक्यातच डोनेशन चे बोलल्यामुळे पुढील रामायण ऐकण्यात समोरच्याला इंटरेस्ट नव्हता .. शिवाय PPT पण एकदम बेसिक होती .. थोडक्यात इतना इम्प्रेशन नाही जमा था ..
प्रेझेन्टेशन झाल्यावर
निशी "वुड यु लाईक टू सपोर्ट अस फॉर धिस नोबल कौज ? " असा प्रश्न विचारला
क्लाएंट " हाऊ मच मनी यु एक्सपेक्ट फ्रॉम असं ?"
निशी " टेंटेटिव्ह बजेट फॉर स्कूल इज 20 लाख .. "
क्लाएंट " बेसिकली आय एम नॉट at ऑल इम्प्रेस्ड विथ युअर प्रेझेन्टेशन .. बट .. आय कॅन सी सिन्सिअरिटी इन युअर आईज .. सो करंटली २००००/- रुपीज मॅक्स आय कॅन गिव्ह .. "
निशी " ओके .. थँक यु सो मच .."
मग निशी ने लॅपटॉप प्रोजे क्टर ला लागला होता तो काढून घेतला .. आणि मागच्या चेअर वर जाऊन बसली ..
क्लाएंट स्वराज ला इंग्लिश मध्ये विचारू लागला " कि हो कोण आहे ? आणि तुमच्या बरोबर हिला घेऊन का फिरताय .. म्हणजे ती नक्कीच खूप चांगले काम करतेय .. बट हाऊ यु गॉट कनेक्टड टू हर "
स्वराज आधी जरासा हसला .. त्याने त्याला सांगितले कि आधी तुम्ही ज्या अमाऊंट चा चेक देणार आहात तो द्या .. मग मी सांगतो कि ती कोण आहे ते
क्लाएंट ने " विद्यालयच्या नावाने २००००/- चा चेक तिला दिला .. " ती पण थँक यु म्हणून बाहेर जायला निघाली तर
स्वराज " निशिगंधा .. एक मिनिट .. तुझी खरी ओळख दिली नाहीस तू .. मिस्टर रघुनाथ .. मीट माय वाईफ निशिगंधा "
रघुनाथ " ओह माय गॉड .. आय एम रिअली सॉरी मिसेस स्वराज .. प्लिज ह्याव अ सीट.. " आणि मग तिला तो चहा कॉफी आदराने विचारु लागला
क्लाएंट " मिस्टर स्वराज .. चेक ची अमाऊंट वाढवू का ?
निशिगंधा ने लगेचच सांगितले " नो .. प्लिज .. डिसिजन टेकन बाय यु इज परफेक्टली ऑल राईट ..it was my first presention अँड was not that good "
स्वराज " आय थिंक विई शुड एन्ड धिस मिटिंग .. "
तिकडून बाहेर पडले आणि पुन्हा हॉटेल ला आले .. स्वराज बराच वेळ त्याचे लॅपटॉप वर काम करत बसला .. एक दोन मोबाईल वरच मिटींग्स त्याने घेतल्या .. आणि तो कसा काम करतोय हे सगळे निशी बेड वर आडवी पडून पाहत होती .. पाहता पाहता ती झोपून गेली .. दुपार ची संध्याकाळ झाली ह्याचे काम काही संपेना .. आणि हि दोन तास झोप काढून उठून बसली . तिथेच कॉफी मेकर होता त्याच्या इंस्ट्रक्शन वाचून वाचून तिने दोघांना कॉफी बनवली .. आणि रूम च्या गॅलरीत एकटीच बसली ..
बराच वेळाने त्याचा कॉल संपला .. मग तो पण लॅपटॉप बंद करून गॅलरीत आला ..
स्वराज " कंटाळीस का ? सॉरी .. आज च्या आज हे काम होणे गरजेचे होते .. सॉरी .. तुला बोअर झाले ना "
निशी " नाही .. ठीक आहे ना .. काम महत्वाचे आहे "
स्वराज " बरं .. ठीक आहे .. चल आपल्याला शॉपिंग ला जायचंय .. तयार हो "
निशी " मी अशीच येणार आहे "
स्वराज " नको ना .. अरे साडीत नको .. तुला कंटाळा येईल .. नवीन नवीन ड्रेस ट्राय करायचे मग किती वेळेला साडी मध्ये तू ट्राय करणार ?"
निशी " मग तू गावी जाताना दोन ड्रेस दिलेस त्यातला घालू का ?"
स्वराज " ओके .. घाल कोणता पण त्यातला "
स्वराज ने मस्त जीन्स आणि टी शर्ट घातला होता.. त्याचा परफ्युम रूम मध्ये दरवळत होता .. ती पण वॉशरूम मध्ये जाऊन तयार होऊन आली .. सिम्पल लूज वेणी .. पंजाबी चुडीदार .. त्यात पण ती इतकी लाजत होती .. सतरंदा ओढणी मागे पुढे करत होती
स्वराज " निघायचं ?" आणि त्याने त्याचा कोपरा पासून हात पुढे केला .. तिने पकडला हात पण खूप ऑकवर्ड होत होते तिला "
स्वराज ने तिला मॉल मध्ये नेले .. दोन जीन्स .. त्यावर टॉप्स .. स्कर्ट .. टॉप असे कपडे घेतले .. आणि ते निघालेच होते बाहेर तर एका शॉप च्या आत एक लखनवी चुणीदार तो हि पांढऱ्या रंगाचा लावला होता .. त्याच्याकडे तिचे लक्ष गेले
निशी " स्वराज . ऐक ना .. आज खूपच पैसे खर्च केलेत आपण माहितेय मला ..यातले काही कॅन्स ल करता येईल का ?\"
स्वराज " का ? तुला आवडले नाही का ?"
निशी " त्या जीन्स मी कधी घालेन .. आणि हि अशी लांब वेणी त्यात कसे दिसेल ते .. म्हणजे आपण ट्राय केलंय ते तरीपण "
स्वराज " नको आता .. छान आहेत सगळे .. उद्या ताजमहाल बघायला जाताना घाल .. "
निशी " मला तो ड्रेस आवडलाय ?"
स्वराज " कोणता ?"
निशी " तो .. त्यांनी लावलाय तो ?"
स्वराज " ठीक आहे तो पण घेऊ .. आणि स्वराज ने लगेच तिला तो पण ड्रेस घेऊन दिला .. तिच्या साईज वर अल्टर करुन मिळाला .. फुल स्लीव्हज .. अम्ब्रेला पॅटर्न आणि लखनवी .. अमेझिंग ड्रेस होता तो .. निशी त्या ड्रेस ला बघून खूप खुश झाली होती ..
रात्रीतच स्पेशल कार ने ते आग्र्याला आले आणि तिकडच्या हॉटेल मध्ये २ वाजता पोहचले.
स्वराज " सकाळी लवकरच जायचंय ताज महाल बघायला .. मी हॉटेल वाल्याला सांगितलंय ब्रेकफास्ट नंतर कार येईल आपल्याला सोडायला .. सो बी रेडी"
दोघेही खूप दमले होते लगेचच झोपून गेले ..
निशी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मस्त अंघोळ करून तो व्हाईट लखनवी ड्रेस घालून तयार .. आज तिने वेळ घेऊन केस मोकळे सोडले आणि क्लचर मध्ये पुढचे केस बांधले .. हि हेअर स्टाईल त्याला आवडली होती .. तिच्या लक्षात होते .. छोटुसे कानातले .. हातात घड्याळ घालून रेडी .. कपाळाला टिकली .. नाजूक .. क्युट . सुंदर दिसत होती .. आणि हे तिला हि माहित होते .. या ड्रेस मध्ये आपण खूप छान दिसत आहोत ते कळले होते तिला .. ती आता वाट बघत होती तो कधी उठतोय ते ..
आज मी स्वराज ची बायको म्हणून वावरणार आहे .. शाळा आणि मुलं या बद्दल अजिबात विचार करणार नाहीये .. फक्त मी आणि माझा स्वराज !! माझा स्वराज असे मनात म्हणताच शहारा आलं तिच्या अंगावर .. झोपलेल्या स्वराज कडे बघून लाजत होती .. एवढा मोठा कंपनीचा डायरेक्टर आहे पण माझ्या पुढे मात्र एकदम कॉमन म्हणून वावरतो .. UK मधल्या घराचे फोटो तिने पहिले होते .. ह्या माझ्या जुन्या घरात राहतोय .. किती डाऊन टू अर्थ आहे .. आणि काहीच माझ्याकडून अपेक्षा नाहीये .. अर्थात मी काय दमडी पण देऊ शकत नाही त्याला .. तरीपण माझ्या शी लग्न केलंन .. खरंच तो म्हणतो तसे प्रेम झाले असेल का त्याला ? मला तो कंप्लिट विसरला होता .. असा कसा काय विसरला ? मन त्याच्याकडे पाहत त्याच्या बद्दल चिंतन करत होते तिचे ..
वाट बघत विचार करत समोरच्या चेअर वर बसली पण बसल्या बसल्याच झोपली ..
स्वराज ने ९ चा गजर लावला होता आणि तो त्याच्या वेळेवर उठला .. डोळे उघडताच .. सुंदर एखादे निशिगंधाचे पांढरे शुभ्र पवित्र फुल नुकतेच उमललंय आणि त्याच्या अस्तित्वाने आजू बाजू चे वातावरण प्रसन्न करून सोडत आहे असे वाटले त्याला .. चेअर वर बसल्या बसल्या ती मान टाकून झोपली होती .. सुंदर दिसत होती .. स्वराज ने तिला चेअर वरून हलकेच उचलले आणि बेड वर ठेवले .. एक क्षण तिच्या सुंदरतेचे निरीक्षण केले ..ब्युटीफुल... असेच मनात आले त्याच्या आणि तो फ्रेश होयला गेला ..
खरतर तिने जीन्स आणि टॉप घालावा किंवा निदान स्कर्ट टॉप घालावा असे त्याला वाटत होते पण इकडे मॅडम आधीच परी होऊन बसल्या होत्या .. त्याने पण तिला मॅच केले .. व्हाईट टी शर्ट आणि क्रिम पॅन्ट .. छान तयार झाल्यावर त्याने तिला उठवले ..
निशी " अरे .. सॉरी .. मला पुन्हा झोप लागली "
स्वराज " चल .. निघायचं .. ब्रेकफास्ट करू कार येऊन थांबलीय "

🎭 Series Post

View all