निशिगंधा भाग 25

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग २५

क्रमश: भाग २४

स्वराज ने निघता निघता मन भरून एकदा घराकडे पहिले .. दोघांनी एकत्र सेल्फी घेतला .. आणि पिंट्या च्या फॅमिली ला बाय करून निघाले .
निशी " स्वराज.. तू शांत वाटतोय ? तू ठीक आहेस ना ?"
स्वराज " हो .. ठीक आहे ग .. आता परत या घरी यायला कधी मिळेल काय माहित .. या विचाराने जरा नाराजी आली "
निशी " हमम .. येऊ ना .. आता हेच माझे सासर आहे .. इकडे तर यावेच लागेल ना .. "
तसा स्वराज हसला
निशी " स्वराज .. तू काल म्हटल्या प्रमाणे काल पासून आता तुला स्वऱ्या नाही म्हणू शकत आहे .. इनफॅक्ट आता तुला स्वराज पण बोलणं बंद करावे लागणार आहे .. मला तुला अहो म्हणावे लागेल "
स्वराज " इझ इट ? डू यु बिलिव्ह ऑन धिस "
निशी " वेल .. येस .. निदान दुसरे कोणी समोर असले तर तुला मान द्यावाच लागेल "
स्वराज " द्यावा लागेल म्हणजे .. जबदस्ती ने द्यायची काही गरज नाही "
निशी " अरे नाही रे .. म्हणजे तुला कसे बोलू .. म्हणजे मला विचारायचय तुला कि मी तुला काय हाक मारावी अशी तुझी ईच्छा आहे ते मला सांगशील का ?"
स्वराज " वेल .. यु कॉल मी हनी .. डार्लिंग .. स्वीट हार्ट ..”
निशी " जा बाबा .. तू काय पण बोलतोस ? "
स्वराज " अरे .. ह्याला काय अर्थ आहे .. तू विचारलेल्या प्रश्नाचे मी फक्त प्रामाणिक उत्तर दिले "
निशी " जाऊ दे .. माझे माझं मी ठरवेल .. आपोआप सुचेल मला "
स्वराज " ओके .. ठीक आहे .. बरं आता मी काय म्हणतो .. आपण उद्या तुझा पासपोर्ट काढायला जाऊ.. तयार रहा "
निशी " ओके .. बारा च्या पुढे गेलं तर चालेल का ?\"
स्वराज " चालेल "
निशी " ठीक आहे.. "
बोलत बोलत दोघे घरी आले तर हरी भाऊंनी जोरदार तयारी करून ठेवली होती .. स्वराज च्या गाडी च्या मागे पुढे बँड वाजवत निशी च्या घराच्या इथे आले .. घराला फुलाच्या माळांनी सजवले होते .. दोघांना ओवाळून घरात घेतले .. लग्नाच्या पूजेची तयारी केली होती .. दोघांकडून पूजा करवून घेतली .. हरी भाऊंनी सगळ्यांना गाव जेवण घातले .. आणि गावच्या जावयाचे जोरदार स्वागत केले .. असा हा हि दिवस आनंदात आणि जल्लोष मध्ये गेला ..
सगळे ओटीवर गावातली मोठी मंडळी बसली होती
हरी भाऊ " मग स्वराज .. कधी नेणार आहेस आमच्या मुलीला तिकडे ?"
आला हा प्रश्न आलाच समोर .. इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते त्याला आणि तिला पण ..
निशी " काका .. अहो .. ते आज आम्ही ठरवू ते सगळे .. अजून काल पासून व्यवस्थित असे बोलायला वेळच नाही मिळालाय \"
हरी भाऊ " बर .. बरं .. ठीक आहे .. बोलू नंतर या विषयावर "
निशी ने पुढच्या पुढे वेळ मारून नेली .. कारण हा प्रश्न नीट हाताळणे गरजेचे होते आणि पुन्हा एकदा स्वराज इम्प्रेस झाला तिच्यावर ..
सगळे आपापल्या घरी गेले .. पण ह्या दोघांमध्ये अजून एक प्रकारचा ऑकवर्ड नेस होता .. नक्की कसे वागावे .. समजत नव्हते .. आता आज हि माझ्या रूम मध्ये झोपायला येईल का आज ती तिच्या रूम मध्ये झोपेल इथपासून स्वराज ला प्रश्न पडला होता ..
दोघ एकत्र बसून जेवण जेवले .. आणि ती किचन मधले आवरे पर्यंत ह्याने बाहेर पडवी मध्ये सतरंजी टाकली आणि तिथे लॅपटॉप ओपन करून बसला
हिचे काम आवरल्यावर
निशी " अरे .. तू इकडे का बसलास ? झोपायचस ना ?आतमध्ये .. मी बेड मगाशीच नीट करून ठेवलाय "
स्वराज " येस .. जातोच आहे .. थोडेसे काम करून घेतो .. मेल्स चेक करून घेतले .. झाले का तुझे काम ? "
निशी " हो .. झालेच .. "
स्वराज " मला थोडे बोलायचे होते .. बस ना "
निशी "ओके .. एक मिनिट मी आलेच .. "आणि आत जाऊन एक शाल घेऊन आली त्याच्या पाठीवरून टाकून दिली " अरे इकडे सगळे ओपन आहे ना .. हवा गार आहे "
स्वराज " थँक यु "
निशी " बोल "
स्वराज " उद्या आपण आधी हरी भाऊंना भेटून नीट समजावून सांगू ... कि मी तिकडे का जाणार आहे आणि तू ईकडे का राहणार आहेस .. कारण त्यांना पटलं कि मग तेच तुझ्या बाजूने उभे राहतील "
निशी " हमम ... "
स्वराज " आता विषय शाळे बद्दल .. शाळेसाठी जागा , पैसे . आणि मग स्टुडंट्स या सर्व गोष्टी एकत्रित पणे असले पाहिजेत .. आता साधारण किती स्टुडंट्स आहेत "
निशी " साधारण ३५ आहेत .. तेही मिक्स "
स्वराज " हे बघ शाळा सुरु होण्यासाठी कमीत कमी १०० एक मुले तर असली पाहिजेत "
निशी " हमम "
स्वराज " गावात किती मुलं असतील "
निशी " गावात असतील 80 एक मुले "
स्वराज " म्हणजे आहेत पण येत नाहीयेत.. बरोबर "
निशी " हो ना .. लोकांना मुल शेतात काम करायला हवी असतात .. शाळा दुय्यम होते त्यांच्यासाठी "
स्वराज " मी हे का सगळे बोलतोय सांगू का ? तू प्रयत्न करतेयस पण त्यांना थोडा विचार करून स्टेप बाय स्टेप काम करावेस .. मी आहेच तुझ्या बरोबर .. जरी मी तिकडे असलो तरी मला शक्य तेवढी मदत मी करणारच आहे तरी पण कामाचा लोड सगळा तुझ्यावर येणार आहे .. कारण मला नुसत्या आयडिया द्यायच्यात पण एक्सिक्युट तुला करायच्यात .. "
निशी "मी नक्कीच करायला तयार आहे .. कष्ट करायची माझि तयारी आहे .. जराही मागे हटणार नाही मी "
स्वराज " हो ते मला माहित आहे.. म्हणूनच मी हा विषय छेडलाय .. कसे आहे ना प्रॉपर प्लँनिंग करून आपण वर्क आऊट करू "
बोलता बोलता निशी त्याच्या शाल मध्ये गेली त्याने खुणावले म्हणून आणि त्याला रेलून बसली
स्वराज " थंडी लागतेय का तुला .. चल आत मध्ये जाऊ "
निशी च्या डोळ्यात पाणी भरले होते ..
स्वराज " काय झाले ?"
निशी थोडीशी भावनिक झाली होती " स्वरू .. काल पर्यंत मी एकटीच होते .. ना आगा ना पिच्छा .. कोणाला माझ्या स्वप्ना बद्दल पडली नव्हती .. आणि आज एका दिवसात सगळी गणितं एकदम बदलली .. अजूनही मला विश्वास होत नाहीये कि माझे तुझ्या बरोबर लग्न झालंय आणि लिटरली यु आर वर्किंग ऑन माय ड्रीम्स .. हा तुझा मॉरल सपोर्ट आहे ना तो खूप आहे माझ्यासाठी .. थँक यु सो मच "
स्वराज " अरे .. डायरेक्ट थँक्स .. म्हणून समारोपचं करून टाकलास तू "
निशी " उम्म .. असे नाहीये काही .. मला काय बोलावे ते समजत नाही .. एवढंच सांगते .. व्हॉट यु आर डुईंग इज जस्ट आऊट ऑफ द वर्ल्ड आहे .. तुला सांगू भारतातल्या प्रत्येक स्त्री ला जर असा नवरा भेटला ना तर भारत खूप प्रगती करेल "
स्वराज " अरे ए .. लेट्स थिंक अबाउट असं .. नॉट अबाऊट कंट्री " आणि तिचे डोळे हलके भरून आले होते ते त्याने पुसले ..
निशी " बरं चल .. झोपूया .. उद्या सकाळी शाळा आहे मला "
स्वराज " ऐक ना .. अजून एकच मुद्दा माझा बोलायचा राहिलाय तो बोलू का फक्त .. मग झोपूया "
निशी " बोल मग "
स्वराज " तर आता थोड्याच दिवसात मी जाईन .. लक्षांत आहे ना तुझ्या .. "
निशी " हो .. खूप कसेतरी होतंय .. तू जाशील या विचाराने .. गेल्या काही दिवसात तुझ्या सोबतीची सवय झालीय आता मला .. "
स्वराज " हो ना .. मला पण .. सर्वच कठीण होणार आहे .. तर माझा सांगायचा मुद्दा असा आहे कि .. तू फक्त शाळा आणि शाळेच्या रिलेटेड काम कर .. बाकी आता ते शेतात जातेस .. कधी वखारीत जातेस हिशोब करायला जातेस .. आणि २००/३०० रुपये कमवतेस ना ते नको करुस .. प्लिज .. राग मानू नकोस .. कोणतंही काम कमी जास्त महत्वाचे आहे असे नाहीये .. पण तुझी खूपच दमछाक होते .. तर त्या पेक्षा तू आधी थोडे दिवस विचार कर कि मुलं कशी वाढवू .. शिक्षक कसे वाढवू .. कोण कोण असे लोक आहेत जे कि शिकवू शकतात .. शाळा काढली तर कोणत्या लोकेशन वर असली तर ती मुलांना सोयीस्कर होईल . हे जे अन अटेंडेड मुद्दे आहेत ना त्यावर प्लॅन ऑफ ऍक्शन तयार कर .. "
निशी " हो चालेल .. पण .. "
स्वराज " पण माहितेय मला .. कि तू शाळेची फीज घेत नाहीस .. आणि म्हणून तू हि कामं करतेस .. तर आता नवरा म्हणून हि जवाबदारी माझी आहे .. नाही का .. बायकोचे निदान दोन वेळेचे पोट भरण्याचे काम माझे आहे .. नाही का .. तर ते तू मला करायचा अधिकार द्यावा .. "
निशी " ऐक ना .. होतयं अरे माझे इकडे मॅनेज .. खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये .. आणि मला एकटीला असे किती लागतंय खायला .. "
स्वराज " म्हणजे तुला हा मुद्दा नाही पटला का ?"
निशी " तुला एक सांगू का स्वरू .. मला ना खूप भीती वाटते कि मी डिपेन्डन होईल का मग तुझ्यावर .. सगळ्या साठी तुझ्यावर अवलंबून तर नक्कीच नाही राहू शकत ना .. मग असे करते .. मी शहरात एखादा जॉब बघू का ?\"
स्वराज " अरे नको ना .. कशाला कामं वाढवतेय तू ? बरं मी काय सांगतो ते ऐक .. सध्या ३ महिने तू असली काम न करता कसे मॅनेज होतंय ते बघू .. आणि मग डिसाईड करू काय चेंजेस करायचे ते .. आता ह्याला नाही म्हणू नकोस .. अशी एक दोन इक्वेशन करून बघतच होणार आहे आपला संसार "
निशी " ओके .. चालेल .. "
स्वराज " थँक यु .. ऐकल्या बद्दल "
निशी " थँक यु काय . आता तू सांगशील ते सगळे ऐकणार आहे मी "
स्वराज " अरे वाह .. मग तर काय भारीच "
निशी " चला तर मग गुड नाईट करू "

🎭 Series Post

View all