निशिगंधा भाग 24

Story Of A girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग २४

क्रमश: भाग २३

तू जर लग्न करण्या बद्दल आधी माझ्याशी बोलला असतास मी कुठेतरी पळून गेले असते पण तुझ्याशी लग्न नसते केले .. कारण मला तू म्हणालास तसे तुझे हाल करायचे नव्हते .. खरं आहे .. माझ्याशी लग्न करून तुझे हालच होणार आहेत .. आपला संसार होणे कठीणच आहे ..
पण .. पण .. पण.. आता परिस्थिती बदललीय …लग्न झालय ... म्हणजे आता पुन्हा माझा विचार बदलावा लागतोय .. म्हणजे .. आता लग्न झालेय तर आता पुढे काय ? तर पुढे लग्न स्वीकारून आपला संसार कसा चांगला होईल आणि मी तुझ्या सर्व अपेक्षांना मी कशी खरी उतरेन याकडे माझा कल गेलाय .. तुझे हाल कसे होणार नाहीत या कडे बघणे हे हि माझे कर्तव्य आहे .. आज पर्यंत माझ्या वडिलांचे नाव माझ्या मुळे खराब होऊ नये म्हणून मी स्वतःला जपत आले तर आता वडिलांबरोबर तुझे नाव सुद्धा मला जपायचे आहे .. "
स्वराज " हाडाची शिक्षिका आहेस खरी .. यु नो यु आर सॉर्टेट .. "
निशी " नक्कीच .. मी खूप विचार करते .. प्रतेय्क छोट्या छोट्या गोष्टीचा मी खूप डिटेल मध्ये विचार करते… हे असे का घडले ? आणि आता घडलेच आहे तर त्यातून मी काय शिकले आणि काय घेऊ शकते "
स्वराज " मग .. आत आपल्या अचानक झालेल्या लग्नाकडे तू कोणत्या दृष्टीने बघतेस ?"
निशी " तेच तर मला कळेल का ? नक्की एवढा मोठा डिसिजन तू अचानक का घेतलास .. आणि प्लिज लहानपणी चे प्रेम आठवले म्हणून घेतले असे कारण नको सांगुस . ?"
स्वराज " मला पण नाही माहित या प्रश्नाचे उत्तर . मी काल अचानक ठरवलं कि गाव जेवण करू तर पिंट्या म्हणाला मग घरात सत्य नारायणाची पूजा घाल .. म्हणजे आमंत्रण दयायला बरं पडेल "
निशी " हो मलाही हेच वाटले कि तू सत्य नारायण पूजा घालत आहेस म्हणून .. पण तू तर अचानक लग्नाला उभा राहिलास "
स्वराज " खरं सांगू का ? काल जो दिवस मी तुझ्या बरोबर जगलो ना तो दिवस माझ्या आयुष्यात रोज यावा .. इतका आनंदी मी होतो काल आणि शांतपणे विचार केला तेव्हा मला कळले कि हा आनंद मला तुझं माझ्या बरोबर असण्याने आहे .. तिकडे असताना मला काहीतरी मिसिंग आहे माझ्या आयुष्यात असे वाटायचे .. पण काय ते मला माहित नव्हते .. तुला पहिल्यांदा पाहिली तेव्हाच मी कामातून गेलो होतो .. गाडी ठोकली होती आठवतंय ना "
बोलता बोलता त्याने तिला स्वतःच्या कुशीत घेतले .. आणि डोक्यावरून केसांवरून हात फिरवू लागला .. आणि ती निद्राधीन झाली..
स्वराज मात्र झोपलेल्या तिला बराच वेळ बघत होता .. तिच्या केसांवरून .. कधी कपाळावर हात फिरवत होता .. आणि तिला रिलॅक्स होत होते .. जगातली सगळ्यात सेफ जागा आज तिला सापडली होती .. आणि तितकीच गाढ ती झोपली होती…
स्वराज किती तरी वेळ विचार करत होता .. किती विचार करते .. किती सोर्टेड आहे .. मला नक्की काय करायचंय .. मला काय नाही करायचंय हे सगळे तिच्या डोक्यात एकदम फिक्स आहे .. शिवाय सतत होणारे बदल मग ते आपल्या बाजूने असावे कि नसावे त्याला कसे फेस करावे त्याच्या वर लगेच विचार करते .. truly fighter आहे .. असा विचार करता करता तो पण झोपून गेला ...
निशी सकाळी उठली तर त्याच्या कुशीत स्वतःला बघून जराशी लाजलीच .. त्याच्या अंगावर पांघरूण टाकून तीने उठून स्वतःचे आवरून ..नाश्ता बनवला .. चहा करायला गेली तर दूध नव्हते .. स्वराज काही काळा चहा पिणार नाही म्हणून ती पिंट्या कडे गेली एक पेला भर दूध आणायला
निशी " वाहिनी , मला फक्त एक पेला भर दूध द्याल का ? स्वराज ला काळा चहा नाही आवडत .. आणि नाश्ता झाल्यावर आम्ही दोघे बहुदा निघून जाऊ तिकडे .. म्हणून आज विकत नाही आणत आहे "
शारदा " निशी .. आता तुला मी काय हाक मारू.. वाहिनीच म्हणते आता .. तशी तू माझ्या पेक्षा कदाचित मोठी असशील ..आणि शिक्षिका म्हणजे मी काही तुला शिकवत नाहीये .. एक लहान बहीण म्हणून सांगते .. माझी आई म्हणायची नवऱ्याचे नाव घ्यायचे नाही .. कालची गोष्ट वेगळी आहे आणि आजची गोष्ट वेगळी आहे "
निशी तिला काहीच बोलली नाही आणि दुध घेऊन आली
बाकीचे सर्व सामान बांधा बांधून ठेवली .. झाका झाकी झाली .. फक्त तो उठायची वाट बघत बसली .. कपडे वगैरे सगळे भरून ठेवले तिने .. उठला कि नाश्ता करायचा आणि जायला बरं पडेल म्हणून
स्वराज उठला तर हि मागच्या दारात पाण्यात काम करत होती ..
साडी थोडी ओली झाली होती .. केसांचा लांब शेपटा मागे पुढे हलत होता आणि तिचे नाजूक हात .. जे कि अविरत काम करत असतात .. त्या हातांनी ती मोठं मोठी भांडी धुवत होती .. खाली साडी भिजू नये म्हणून तिने थोडीशी वर घेतली होती त्यामुळे तिची गोरी पाऊल त्याला दिसत होती .. मागच्या दारातल्या पायरीवर बसून सकाळचे कोवळे ऊन घेता घेता तिचे सौदर्य पाहत होता .
स्वराज " निशू .. बस कर .. बस कर यार किती काम करते तू "
निशू " अरे उठलास का तू ? जा फ्रेश हो .. मग चहा नाश्ता करू .. मग मला तुझी मदत लागणार आहे .. जायच्या आधी हि भांडी सगळी पोत्यात भरून नीट झाकून ठेवून देऊ ... म्हणजे नेक्स्ट टाईम आली कि जास्त घासावी नाही लागणार " घसा घसा भांडी धुतानाच ती बोलत होती .
स्वराज " ठीक आहे .. आलोच मी .. आणि ११ पर्यंत निघूया "
बाहेरच गरम पाण्याचा बंब होता .. त्यातले त्याला पाहिजे तेवढे पाणी त्याचे त्याने घेतले आणि बाथरूम मध्ये अंघोळीला गेला ..
पाच एक मिनिटांनी तांब्या खाली पडल्याचा आवाज आला .. ती अजूनही तिथेच तिचे काम करत होती .. तांब्याचा आवाज ऐकल्यावर ती धावतच बाथरूम जवळ आली आणि बाहेरून
निशी " स्वराज .. काय रे .. ?
आतून काहीच आवाज नाही
निशी " स्वराज .. अरे ओ तरी देना .. काय झालं ? बरा आहेस ना ?"
तरी पण आतून काहीच आवाज नाही आला .. तशी हिला थोडी काळजी वाटली .. कारण अंघोळीला गेला तेव्हा झोप झाली नव्हती त्याची ..
निशी ने बाथरूम चे दार ठोकले तसा पुन्हा तांब्या पडल्याचा आवाज आला .. आणि एक सेकंदात दार उघडून तो बाहेर पळाला ..
तर समोरचे दृश्य बघून निशी ला हसूच येऊ लागले .. त्याच्या अंगाला त्याने साबण लावला होता .. आणि घाबरून पळत बाहेर आला होता
निशी " अरे काय ? अंघोळ कर ना बाहेर का आलास ?"
स्वराज " मूर्ख .. दिसत नाही का तुला .. पाणी दे ना आधी तोंड तरी धुवू दे ना "
निशी ला हसायलाच येत होते
निशी ने बंबातले पाणी काढले त्यात गार पाणी मिक्स केले आणि त्याच्या हातावर दिले .. आणि त्याने फक्त चेहरा धुवून घेतला आणि दोन तीन तांबे घेऊन साबण धुवून काढू लागला
निशी तोंड दाबून हसत होती
स्वराज " व्हाय आर यु लाफिंग ? इज इट सो फनी ?"
निशी " नाही .. कुठे काय ?पण झाले काय ? तांब्या का फेकलास ?\"
स्वराज " तांब्या .. ते आत मध्ये किती पाली आहेत .. बघितल्यास का ? तिच्या अंगावर पाणी फेकलं तर ती माझ्यावरच धावत आली .. आणि माझ्या पायाखाली येणार होती .. मी पडलो असतो .. .. ती दारावरच्या कडीवर येऊन बसली होती .. मला बाहेर पण येता येत नव्हते .. आणि तू बाहेरून बोंबलत होतीस ते वेगळे "
निशी जोरात हसू लागली
स्वराज " अरे तुझ्या तर आता .. हसते काय ? कसली घाण दिसते ती पाल .. याक .. मला बघूनच उलटी येते .. .. यार ... "
निशी " बरं चल .. मी काठीने तिला बाहेर काढून देते .. "
आणि निशी कपडे वाळत घालायची काठी घेऊन झाशीची राणी बनून बाथरूम मध्ये तिचा पराक्रम दाखवायला आत गेली .. . घर शेणाने सारवल्यामुळे घरातले सगळे किडे मकोडे . पाली झुरळे .. घरा बाहेर पळाली होती आणि जमेल तिकडे थाम्बली होती.. त्यात पालींनी त्यांचा नवीन अड्डा बाथरूम बनवून टाकला होता .. निशी ने आत मध्ये डोकावले तर चांगल्या दोन मोठ्या पाली .. भिंतीवर वर खाली पळत होत्या .. ती काठीने भिंतीवर ठोकत ठोकत त्यांना वर हाकलवल .. आणि बाहेर आली
निशी " जा आता .. गेल्या त्या "
स्वराज " निशी .. वॉच आऊट .. तुझ्या साडीवर दोन दोन पाली आहेत .. "
अंगावर पाली आहेत म्हटल्यावर ती पण घाबरली… पटकन उडीच मारली तिने .. तिला पण जाणवलं कि अंगावर काहीतरी वळवळतंय .. म्हणून ती ओरडू लागली .. स्वराज तर आधीच घाबरून लांब थांबला होता .. मोठ्या दोन मगरी तिच्या अंगावर फिरतायत असेच काहीसे त्याला एक सेकंड वाटले ... आणि तिला वाचवायला म्हणून तो पटकन पुढे गेला .. आणि तीची साडीच त्याने ओढून काढून फेकून दिली .. तिने बादलीत त्याचे तोंड धुवायला पाणी काढलेच होते . ते पाणी तिच्या अंगावर डोक्यापासून ओतले .. तशा त्या दोन पाली पाया खालून सरकून कुठेतरी गेलेल्या दोघांनी पहिल्या .. दोघे त्या पालीलाच पाहत होते ..
दोन एक सेकंदांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिले तर दोघे एकमेकांच्या मिठीत जीव मुठीत घेऊन उभे होते ..
ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची,
कविता अनं जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके,
पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना ?

ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची,
कविता अनं जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी ही आजवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाऊल खुणा
सोबत तुझी साथ दे

ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची,
कविता अनं जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला
माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी
देईन साथ ही तुला

ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा....
कोऱ्या कागदाची,
कविता अनं जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

स्वतःला अशा अवस्थेत पाहून ती भांभावून गेली .आणि तो मात्र तिला सोडायचे नाव काढत नव्हता . ती एकटक त्याच्या डोळ्यांत पाहत होती
निशी " सोड ना .. काय केलेस तू हे .. " खूप लाज वाटत होती ..
स्वराज " सॉरी .. ते पाल .. तुझ्या अंगावर होत्या .. म्हणून मी .. " असे म्हणे पर्यंत तिला घट्ट मिठीत घेतले त्याने .. “आय थिंक आय शुड से थँक यु टू लिटिल मॉन्स्टर .. “आणि तिच्या गळ्यावर .. त्याने किस केले
निशी एकदम हळू आवाजात " स्वराज .. काय करतोय .. " आणि त्याला पुश करून ती आत मध्ये पळाली ..
स्वराज " थांब .. ना .. " असे तो म्हणे पर्यंत ती आत मध्ये गेली पण ..
स्वराज अंघोळ करून आला .. तोपर्यंत तिने चहा टाकला .. नाश्ता करून .. चहा पियुन आवरा आवरी करून निघायची तयारी करत होते . मगाचच्या झालेल्या प्रकारामुळे दोघेही एकमेकांकडे चोरून पाहत होते ..
(स्नेहल नावाच्या एका वाचकाने पाली , झुरळं स्वराज च्या मदतीला धावून आले तर मज्जा येईल असे सुचवले आणि मी लगेच पालीला स्वराज च्या मदतीला आणले .. भागात आयत्या वेळेत चेंजेस केले .. कसे वाटतंय नक्की सांगा)

🎭 Series Post

View all