निशिगंधा भाग। 20

Story Of Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग २०
क्रमश: भाग १९

तिच्या डोळ्यांत त्याला असंख्य प्रश्न दिसत होते आणि ते लवकरात लवकर क्लिअर करणे गरजेचे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने हळू हळू बोलायला सुरुवातच केली ..
स्वराज " हे बघ , लग्न करायचे किंवा इकडे करायचे हे खरच ..मी पण अजिबात विचार नव्हता केला .. इनफॅक्ट मी हि शॉपिंग करता ना हे सगळे तुझ्याशी लग्न करण्यासाठी नव्हते घेतले मी .. काल अचानक गाव जेवण करायचा विचार मनात आला आणि आणि तिथून पुढची सगळी सूत्र बदलली .. असे वाटले आता घर तर छान झालेच आहे .. गावातल्या लोकांना बोलावणारच आहे ..
लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या .. आणि तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे मला जाणवले.. त्या नवीन शी लग्न लावून मी तुला गमावून बसतोय असे वाटू लागले .. त्यात पिंट्या इतका चिडवत होता तुझ्यावरून आणि मला चक्क छान वाटतं होते .. आणि मी ठरवले गाव जेवणाला काहीतरी कारण पाहिजे ते कारण म्हणजे आपले लग्न असले तर किती छान वाटेल .. लगेच डॅड ला फोन लावला .. आणि मनात आलेला विचार त्यांना सांगितला .. तर डॅड एकदम खुश झाले मला म्हणाले " आता कळालं कि मी का तुला तिकडे पाठवत होतो ते " आणि हसायला लागले
निशी ने दोघांना चहा घेतला आणि घराच्या बाहेरच्या पायरीवर बसून दोघे चहा घेऊ लागले ..
स्वराज " भारतात येताना मी यायला तयार नव्हतो .. उगाच ऑफिस मधले महत्वाचे काम टाकून इकडे तुझ्या लग्नाची जवाबदारी डॅड माझ्यावर टाकत होते .. आणि मला ते अजिबात आवडत नव्हते .. तेव्हा त्यांनी मला सांगितले कि असे असे तुझ्या बाबांनी माझ्या डॅड ला लेटर लिहून घर त्यांच्या नावावर केले वगैरे .. खरं सांगू .. मी तुला कम्प्लिट विसरून गेलो होतो .. कारण खूप वर्ष उलटून गेली होती आणि तिकडच्या लाईफ स्टाईल मध्ये गावा कडची आठवण येईल अशी वेळच येत नव्हती .. तरी पण आई आठवली कि हे घर मात्र नक्कीच आठवायचे .. आणि तेव्हा किंचितशी , पुसटशी तू आठवायचीस .. तुझे आई बाबा दोघेही गेलेत ,, तू इकडे एकटी आहेस हे काहीच मला माहित नव्हते .. आणि डॅड नी अचानक हि जवाबदारी माझ्या वर टाकली ती मी लिटरली झटकत होतो .. मग डॅड मला म्हणाले लहानपणी तिला तू माझी होणारी बायको असेच म्हणायचास .... " आणि गालातल्या गालात तो हसला .
निशी मात्र शून्यात होती ... हसणे .. लाजणे च्या पलीकडे होती ती
स्वराज " मला एक क्षण भीती वाटली कि कोणत्या तरी गावातल्या मुलीशी डॅड माझे लग्न लावतील कि काय ? मी कसलाही विचार ना करता डॅड ला सांगितले कि मी आणि क्रिस्टिना रिलेशन मध्ये आहे .. त्यावर डॅड म्हणाले कि ठीक आहे मग एक काम करू त्या मुलीची जवाबदारी तिच्या वडिलांनी आपल्यावर सोपवलीय .. तू तिचे लग्न गावातल्या किंवा तिच्या आवडीच्या मु ला बरोबर लावून ये .. मग तू आल्यावर तुझे आणि क्रिस्टीनाचे लग्न लावून देतो .. "मी हुश्श असे म्हटले लिटरली .. "
निशी ने चहाचे रिकामे कप हाताने मागे ठेवले .
स्वराज " मग मी क्रिस्टिना ला मेसेज केला आणि विचारले डू यु ह्याव बॉयफ्रेंड ? तर ती म्हणाली "येस .. व्हाय यु आर अस्किंग ?" मग मी तिला सांगितले कि डॅड नि जर तुला विचारले कि तू रिलेशन मध्ये आहेस का ? तर येस सांग "
नेक्स्ट डे डॅड नि हरी भाऊंना फोन केला तर कळले कि आलरेडी तुझं लग्न ठरलंय .. आणि ते लग्न होतंय .. मी इतका खुश झालो .. म्हटले चला आता इकडे यायला नको .. तर डॅड म्हणाले नाही भारतात जायला तर लागेलच तुला .. हे घर जे तिच्या वडिलांनी माझ्या नावावर केलंय ते मी तुझ्या नावावर करून टाकलेय .. आता तू तिचा नवरा नाहीयेस तर मग हे घर तिच्या आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावावर करून ये .. " हे काम माझ्या साठी अगदी सोपे होते .. इनफॅक्ट तुझ्या लग्नच्या दिवशीच तुला तुझे घर तुझ्या नावावर करून द्यायचे असा विचारही मी केला होता .. पण एका अर्जंट मिटिंग मुळे मी लग्नच्या नंतर यायचं ठरल .. इकडे आलो तर कळले कि लग्न मोडले .. .
जेव्हा मी इकडे येत होतो कार ने… तेव्हा तुला बैलगाडीवर बसलेलं बघितले .. तू तूच आहेस जिला मी भेटायला आलोय हे मला माहित नव्हते तेव्हा .. मातीचा रास्ता .. गाडीमुळे उडणारी धूळ .. आणि वाऱ्यामुळे तुझे उडणारे केस मी गाडीच्या काचेतून तुला वळून वळून बघण्यात इतका गुंतलो कि पुढे जाऊन झाडाला धडकलो .. एक क्षण डोळे मिटतात कि काय असे झाले होते तर तूच माझ्या एकदम जवळ आलीस .. मला गाडीतून ओढून बाहेर काढत होतीस .. थोडासा अन कॉन्शस होत होतो पण तुझ्या माझ्या जवळ येण्याने माझे हृदय एकदम जोरात पळू लागले .. अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी मी तुझ्या डोळ्यांत पाहत होतो .. माझ्या साठी किती तरी काळजी तुझ्या डोळ्यात होती आणि तुझ्या जीवा पेक्षा जड असलेला मी त्याला गाडी तुन बाहेर काढण्यासाठी तुझा चाललेला आटापिटा मला दिसत होता .. तुझा स्पर्श मनाला हवा हवासा वाटत होता . मग मी बेशुद्ध झालो आणि जाग आली तेव्हा दवाखान्यात .. तूच माझ्या डोळ्या समोर होतीस .. कसल्याश्या खोल विचारात हरवली होतीस ..
मग हरी भाऊ आल्यावर तू निघून गेलीस .. मला तुझे नावही कळले नाही .. मी विचार करू लागलो .. कोण असेल हि .. जिच्या बद्दल एवढी अचानक ओढ का लागावी मला .. मग हरी भाऊ मला त्यांच्या घरी घेऊन आले .. आणि मग मला कळले कि तू तीच आहेस जिला भेटायला मी आलोय .. आणि मी खूप खुश झालो ..
हरी भाऊं नी मला सांगितले कि आता सध्या तरी तू लगेच लग्नाला होकार देणार नाहीस कारण काही दिवसांपूर्वी लग्न मोडलेय .. त्यामुळे पुन्हा लग्ना साठी ती तयार होणार नाही .. मग मी डॅड ला फोन करून सांगितले कि असे असे झालेय .. तिचे लग्न इतक्यात होण्याची शक्यता नाहीये .. मग डॅड म्हणाले .. कि आता तिला इकडे घेऊन ये .. आपण तिचे इकडे आपल्या कंपनीत राजेश आहे ना त्याच्याशी लग्न लावून देऊ .. म्हटले ठीक आहे हे पण ठीक आहे .. राजेश चांगला मुलगा आहे हे मला माहित होते .. आणि मग तुला तिकडे घेऊन जाऊन राजेश शी तुझे लग्न लावून दिले कि मी आणि डॅड तुझ्या जवाबदारीतून मोकळे आणि तुझे हि लाईफ सेट होईल .. UK मध्ये असशील त्यामुळे तुला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही असूच तिकडे अशा सर्व विचारात मी तुला भेटायला आलो.
आणि जसा तुझ्या कडे आलो तसा तुझ्या कडे हळू हळू आकर्षित होत होतो .. माझ्याच मनात एक प्रकारचा गोधळ होत होता .. असे वाटायचे कि काय वेड्या सारखा मी तुझ्या कडे ओढला जातोय .. माझ्यात आणि तुझ्यात जमीन अस्मान चा फरक आहे .. माझ्या संस्कारात आणि तुझ्या संस्कारात फरक आहे .. राहणीमान , शिक्षणात सगळ्यात फरक आहे.. असे मी मनाला समजावत होतो कि तू तुझे काम कर आणि मोकळा हो .. जास्त गुंतू नको .. शी इज जस्ट अ व्हिलेज गर्ल फॉर यु .. अशा विचाराने मग मी तुझ्याशी मोकळा वागू लागलो .. नवीन मध्ये मला तुझ्या साठी एका चांगला लाईफ पार्टनर दिसला ..असे वाटले हिला जर हा आवडला तर इथेच दोघांचे लग्न लावतो आणि मोकळा होतो .. मी जेवढा मोकळा होण्याचा प्रयत्न करत होतो ना तेवढाच तुझ्यात गुंतत होतो .. अविरत काम करणारी .. अनेक प्रॉब्लेम्स ला एकटीने फेस करणारी हि कोणत्या मातीची बनलेली आहे .. हिला अजिबात स्वतःच्या भविष्याची चिंता कशी नाहीये .. चक्क UK ला येण्या सारख्या गोल्डन संधीला हि कशी नाकारू शकते .. हि नवीन ला पण नाकारते .. हि शाळा काढण्यासाठी माझ्या बरोबर UK ला यायला नकार देते या विचाराने मला झटका बसला होता .. आणि माझी अतिशय चिडचिड होऊ लागली .. का मी माझा वेळ वाया घालवतोय हिच्या मागे .. घर तिच्या नावावर करतो आणि निघून जातो .. काय करायचंय ते करेल .. तिची लाईफ ती बघेल अगदी या विचारावर आलो .. ह्या चीड चिडी मुळे तुला मी भिंतीवर ढकलले सुद्धा .. मी ठेवलेल्या कोणत्याही प्रस्तावाला तू भीक घालत नाहीयेस आणि तुझ्या पायाला काळजीने हात लावला तर माझ्यावर डाउट घेतल्या सारखे बोललीस .. हि समजते कोण स्वतःला ? तू माझ्या पायाला तेल लावलेस आणि मला खूप रिलॅक्स वाटले म्हटले माझ्या पेक्षा जास्त वेळ हि उभी होती तर हिच्या पण पायाला तेल लावावे ह्या हेतूने मी आलो होतो .. पण तू जेव्हा माझ्या वर ओरडलीस ना तेव्हा माझा इगो खूप दुखावला आणि खूप राग आला तुझा ..
आता तर मी हट्टाला पेटलो होतो .. तुला काही पण करून इथून घेऊन जायचेच .. मग मला तुझ्यावर माझि शारीरिक ताकद काढावी लागली तरी चालेल अशा विचाराने मी सकाळी तुझे हात पिरगळले होते .. तरीही तू तुझे सोडायला तयार नव्हती .. अरे यार फ्रस्टेड झालो होतो मी .. तू रागाने बाहेर पडून गेलीस ना तेव्हा नवीन आला होता .. आणि मला म्ह णा ला मला तिच्याशी लग्न करायचंय .. आणि हे ऐकून मला आनंद होत नव्हता उलट त्या नवीन ला धक्के देऊन बाहेर काढावेसे वाटू लागले .. का ? ते मला माहित नाही ?
तो गेल्यावर मी घराचे कागद घेऊन सिटी मध्ये जाऊन वकी ला कडून ते तुझ्या नावा वर करून द्यायचे ठरवले आणि ते बघण्यासाठी मी तू सांगितलेली पेटी उघडली .. बहुदा डावी उजवी मध्ये मी कन्फ्युज झालो आणि मी चुकीची पेटी उघडली आणि त्यात मला तुझे आणि माझे लहान पणाचे फोटो दिसले .. तू जपून ठेवलेल्या आपल्या प्रेमाच्या आठवणी दिसल्या .. आणि मला सगळे भरभर आठवू लागले .. लहान पणी ची तू आणि तुझ्या केसांत फुले घालणारा मी किती खुश होतो . तुझ्या खांद्यावर हात असा टाकला होता जशी तू माझीच प्रॉपर्टी आहेस आणि माझा राग गेला आणि हसूच येऊ लागले .. तेव्हड्यात हरी भाऊ आणि तू आलात .. मी ते तसेच च्या तसे ठेवून दिले आणि दुसऱ्या पेटीतले घराचे कागद घेतले आणि बाहेर आलो ..

🎭 Series Post

View all