निशिगंधा भाग 17

Story Of A Girl Wants To Run School


निशिगंध भाग १७

क्रमश : भाग १६
तोंडच पडले बिचार्याचे
स्वराज " एव्हढा आगावूपणा .. तो हि माझ्या समोर .. "
स्वराज " का ? एक मित्र म्हणून एवढं पण मी नाही का करू शकत हक्काने तुला ?"
निशी " बरं .. सॉरी ... आता तू चिडू नकोस .. मला आता इथे भांडणे नकोयत .. "
स्वराज " तुझे टाळकं ना जरा जास्तच चालतं .. नको तिथे तेही .. आज तुला मी मोठे सरप्राईज देणार आहे .. २ तासांनी .. हि साडी नेसून तयार रहा "
निशी " आता आणि काय ? सांग ना .. असे नको करुस "
स्वराज " नाही .. तुला सांगितले तर तू भांडशील म्हणून डायरेक्ट ऍक्शन घेणार आहे मी "
निशी " स्वर्या , घाबरवू नको काय "
स्वराज ने तिचे गाल हातात पकडून " माझी सोनुली ... असे तुझे बाबा तुला म्हणायचे ना …. “
निशी " हमम .. तुला कसे माहित ?"
स्वराज " तर मी काय म्हणत होतो .. माझी सोनुली… आता स्वऱ्या बोलून घे .. नंतर स्वऱ्या बोलताना नाही अडखळलीस तर नाव स्वराज लावणार नाही
निशी " काय ? म्हणजे काय करणार आहेस तू ? हे बघ स्वराज .. प्लिज उगाच काहीतरी मजाक नको करुस .. मला अजिबात नाही आवडत मजाक .. काल पण पाणी टाकलेस असे नाही आवडत मला .. मला कसे तरी होत "
स्वराज " अरे तू काय म्हातारी झालीस काय ? अशी मजा आता नाही मग कधी करणार तू ? आणि मला सांग माझ्या शिवाय अशी मजा तू कोणा बरोबर करशील ? मी आहे म्हणून थोडी.. अगदी थोडी जरा मोकळी वागलिस ना .. मला खूप बरं वाटले "
निशी " हमम .. तेही आहेच .. किती तरी वर्षांनी अशी मजा मी काल केली तेही कोणतीही चिंता मनात नव्हती .. फक्त आंनद होता मनात .. किती हसले .. बागडले ..ना . मी .. विसरूनच गेले कि मी एक शिक्षिका आहे "
स्वराज “मला माझी लहानपणी ची मैत्रीण परत भेटली .. या अंगणात आपण किती खेळलोय .. किती मज्जा केलीय .. काल पासून माझे लहानपण जे मी तुझ्या बरोबर जगलो ना ते तसेच्या तसे आठवतेय .. या अंगणातून तुझा परकर पोलका हातात पकडून इकडून तिकडून पळत जायचीस तू .. आणि मी तुझ्या मागे मागे धावायचो " निशी .. हळू .. निशी थांब .. म्हणत " ... तुला झोका द्यायचो .. तेव्हा पण स्वऱ्या .. अजून उंच .. अजून वर असे म्हणायचीस .. यार निशी .. आई ची खूप आठवण येतेय मला इथे येऊन .. काय काय मनात होतंय .. मला शब्दात सांगता येत नाहीये ..
निशी " मला तर किती तरी वर्षांनी असा आनंद मिळालाय .. आई बाबा गेल्या नंतर एकटीने आता पर्यंत कशी जगले .. मी सांगू नाही शकत तुला .. मी .. मी .. (पाणी आले तिच्या डोळ्यांत ) मी .. का एकटी .. देवाने का असे केले असेल माझ्याशी .. ज्या वयात मला सर्वात जास्त गरज होती तेव्हा .. मी एकटी होते .. एकटी आहे .. आणि हे एकटे पण आता मला संपवायचं नाहीये .. त्यातच आयुष्य काढायचयं "
निशी " सॉरी .. आज कसे काय एकदम मन भरून आले .. जनरली असे होत नाही मला .. सॉरी .. तू इतका खुश आहेस मी माझे रडगाणे काढले "
स्वराज मनात " असे वाटतंय तुला घट्ट मिठीत घ्यावे .. तुझं सगळे दुःख त्या मिठीत विरघळावे .. पण तू मित्र म्हणून सुद्धा असे करायला अधिकार देणार नाहीस मला याची जाण आहे मला .. काय करू निशी .. सॉरी .. मी तुझ्या संर्पकात नाही राहिलो .. चक्क तुला विसरलो होतो .. कसला आहे ग मी .. "
निशी ने डोळे पुसले .. " स्वरू .. तू इकडे आणलेस मला त्या बद्दल थँक्स .. मला हा चेंज आवश्यक होता .. म्हणतात ना कामात बदल .. आणि हवापालट केलं कि मन फ्रेश होते .. आणि रिफ्रेश होऊन माणूस तेच काम पुन्हा छान मन लावून करतो .. तसा हा आनंद मला माझ्या पुढील आयुष्यात मला नक्कीच छान आठवणी देणारा आहे.. हा काळ असाच राहावा .. त्याला फ्रिझ करून ठेवावा असा आहे .. स्वरू .. आता मला विसरू नकोस .. मला महिन्यातून एकदा फोन करशील का ? म्हणजे जर क्रिस्टिना ला चालले तरच कर .. जमलं तर दोन चार वर्षांतून तुझ्या गावी म्हणून ये .. इथे ये .. माझ्या घरी ये .. थँक यु .. मला हा आनंद दिल्या बद्दल .. या क्षणांना मी कधीच विसरणार नाही "
स्वराज " असाच आनंद कायम मिळाला पाहिजे .. नाही का ? काय वाटतं तुला ? काल मी पण खूप खुश होतो .. ऑफिस , ऑफिस चे काम , टार्गेट… इव्हन तुझे लग्न .. तुझी शाळा सगळं विसरलो होतो "
निशी " होईल होईल नक्कीच असेच होईल .. जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घालतील .. माझ्या बेस्ट विशेश आहेत तुझ्यासाठी "
स्वराज " अरे .. मी पण हाच विचार करतोय .. तुला पण असेच आयुष्य जगायचे आहे आणि हाच माझा प्रयत्न असेल .. फक्त मी जे काही करेन त्याच्यावर विश्वास ठेव "
निशी " हमम .. आता मी एक ठेरवलंय .. जगात माझं असे कुणीच नाहीये तुझ्याशिवाय .. आता तू सांगशील ती पूर्व दिशा .. निदान तुला तरी मला दुखवायचे नाहीये .. बरं ऐक ना क्रिस्टीनाचा फोटो तू दाखवणार होतास ते दाखवला नाहीस मला "
स्वराज " हो ना .. दाखवेन नंतर कधी तरी "
निशी " दाखव ना .. मोबाईल मध्ये तर असतीलच ना .. एवढा काय भाव खातो रे "
स्वराज " बर बाई .. चिडके .. ये इकडे दाखवतो .. आणि त्याने मोबाईल मधून एक फोटो काढला आणि तिला दाखवला .. एक ऑफिशिअल कपडे घातलेली .. सोनेरी केसांची .. निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी होती ..
निशी " अरे बापरे .. कसली सुंदर आहे .. आणि डोळे बघ निळे आहेत लिटरली .. आणि केस सोनेरी .. ब्युटीफुल .. "
स्वराज " छान आहे ना .. काय च्या काय आहे अरे ती .. आणि नुसतीच सुंदर नाही .. हुशार पण आहे .. माझ्या अबसेन्स मध्ये ती माझे ऑफिस हॅन्डल करते .. काही लागले तर डॅड आहेतच पण अल्मोस्ट सगळे तीच हॅन्डल करते "
निशी " म्हणजे ती तुझ्या ऑफिस मध्ये काम करते का ?"
स्वराज " नाही आमचे पार्टनर आहेत ना त्यांची मुलगी आहे ती .. जस मी ऑफिस जॉईन केले तसे तिने पण एडुकेशन नंतर ऑफिस जॉईन केले .. "
निशी " दोघे एकमेकांना कामात पण सुटेबल आहात म्हणजे .. मस्तच .. स्वऱ्या .. तिला पण आणायचे होतेस तू ?"
स्वराज " अरे ती घाबरते इकडे यायला .. खूप गर्दी आहे तिच्या मते "
निशी " ठीक आहे .. जायच्या आधी माझि ओळख करून देशील .. तिला सांग माझी लहान पणीची मैत्रीण आहे म्हणून "
स्वराज " हो ओळख तर करून द्यावीच लागेल .. लवकरच.. बरं जा आता साडी घाल जा नाहीतर उशीर होईल .. आणि त्या पॅकेट मध्ये जे जे आहे ते सगळे घाल .. जुलरी आहे ती पण घाल "
निशी " ए नाही हा ,, तुला माहितेय .. मला अजिबात दागिने घालायला आवडत नाहीत "
स्वराज " फक्त दोन तास घाल .. नंतर काढून ठेव .. मग झाले "
निशी " बघते "
निशी आत मध्ये कपडे चेंज करत होती .. बाहेर कोण कोण येतंय आणि बोलतंय असा आवाज येत होता .. त्याने आचार्याला जेवणाचे सांगितले .. त्याने मागच्या अंगणात मो ठी चूल पेटवली आणि जेवणाला लागला .. अजून कोणी तरी भटजी आला असावा .. असे तिला वाटले .. बहुदा सत्य नारायणाची पूजा घालतोय कि काय असे क्षणभर वाटून गेले तिला
रेड साडी त्यावर सोनेरी जरी काठ असलेली बनारसी साडी मस्त नेसली.. त्यावर मॅचिंग दोन्ही हातात बांगड्या .. गळ्यात सोन्याचा हार आणि त्यावर मॅचिंग कानातले .. आरशात बघून तिने एक चंद्रकोर लावली ... साधीशी वेणी घातली आणि मोगऱ्याचे गजरे पिनेने लावले .. आज आपण खूप नटलोय असेच तिला वाटत होते .. इतक्या सगळ्याची काहीच गरज नाहीये असे वाटून तिने स्वराज ला आत मध्ये बोलावले
स्वराज तिला बघतच बसला .. सिम्पल.. सुंदर दिसत होती
स्वराज " इंडियन ब्युटी .. यु आर लुकिंग गॉर्जस ... "
निशी " अरे हे खूप होतयं .. मी सगळे दागिने काढून ठेवते .. उगाच कशाला आणलेस हे .. तुला माहितेय ना मी नाही घालत "
स्वराज " फक्त २ तास घाल .. नंतर तुझी मर्जी .. आता मी तयार होतो .. तू तर एकदम तयार झालीस”
निशी " अरे पण काय नक्की प्रोग्रँम आहे .. भटजी का आलेत बाहेर ?"
स्वराज लांबूनच " सरप्राईज .. कळेल तुला अर्ध्या तासात "
स्वराज ने पण तिच्या साडीला मॅच अशी नाजूक शेरवानी घातली आणि आणि बाहेर आला
स्वराज " निशू , अग हि बटन्स लागत नाहीयेत .. बघ ना जरा "
निशू ने त्याच्या कुर्त्याची बटन्स लावून दिली .. स्वराज एकदम जवळून तिला बघत होता .. तिच्या डोळ्यात .. खोल डोळ्यांत .. भुऱ्या डोळ्यात .. स्वराज एक मिनिट हरवला .. केस भुर्र भूर उडत होते आणि तिला त्रास देत होते .. एक क्षण त्याला त्याच्या हातांनी ते कानामागे घ्यावे असा मोह होत होता ..
स्वराज "कशी आहेस तू ? "
निशी "छान आहे कि .. खरं तर जरा ऑकवर्ड होतंय आणि मनात कुरबुर आहे .. असे वाटतंय बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना .. आणि हसायला लागली "
स्वराज "म्हणजे ?"
निशी "म्हणजे .. जरी पूजा असली तरी मी एवढे नटायची काहीच म्हणजे काहीच गरज नाही .. तू छान दिसणे महत्वाचे आहे .. तू एवढं सगळे मला उगाच आणलेस .. आणि हे सोन्याचे दागिने .. हल्ली सोनं किती महाग झालंय .. काय गरज होती तुला .. "
स्वराज "मला थोडे बोलायचं होते .. ऐकायला वेळ आहे का तुला ? का यातच अडकून बसणार आहेस ?"
निशी "बोल ना .. मी ऐकतेय "
स्वराज "हे बघ .. मी आता तुला जे सांगणार आहे ते खूपच सरप्रायझिंग आहे .. तर तुझ्या मनाला धक्का बसणार आहे याची तयारी ठेव .. आणि माझ्या वर विश्वास ठेव .. तुझा नाही माझा विचार करून मी हा निर्णय घेतलाय हे हि लक्षात ठेव "
निशी "कोणता निर्णय ?"
निशी " बाहेर खूप सारे पाहुणे का आलेत ? भटजी पण आलेत .. आणि .. आणि ...
स्वराज " नवीन .. तो पण आलाय "
निशी त्याच्या डोळ्यांत एक टक पाहत होती .. तिचे पाणीदार .. कमलनयनी डोळ्यांत खूप सारी भीती .. खूप सारे प्रश्न होते
स्वराज " आज लग्न आहे तुझे “

🎭 Series Post

View all