निशिगंधा भाग 16

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंध भाग १६

क्रमश : भाग १५

स्वराज " थांब तुला आत बघतोच .. म्हणून स्वराज तिच्या मागे पळत होता आणि चिखल फेकत होता .. आणि ती तो चुकवायचा प्रयत्न करत असतानाच .. एक चिखलाचा गोळा बरोबर कपाळावर जाऊन पडला .. आणि तो खो खो हसू लागला .. आणि ती एकदम शांत झाली ..
निशी " जा आता मी बोलणारच नाही .. एवढा चिखल फेकलास तू ,माझ्या अंगावर " लटका राग .. किती ग क्युटि पाय दिसत होती ती… लहानपणी कशी फुरंगटून बसायची ना अगदी तशीच
ते म्हणतात ना मनवायला कोणी असलं तर रुसण्यात मज्जा असते ... ज्याला आपल्या अश्रूंची किंमत असते ना त्याच्या समोर च रडावे .. नाहीतर बाकी लोकां समोर दाटून येतं पण अश्रू आटून जातात.
स्वराज " तू मला गाढव.. नालायक .. बावळट .. काय काय बोललीस ते विसरलीस का ?" बोलतच तो तिच्या जवळ गेला.. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या खिशातून त्याचा पांढरा शुभ्र रुमाल बाहेर काढला आणि तिचा चेहरा साफ करू लागला .. एकदम हळू .. अलगद .. मन लावून .. तिला लागणार नाही असे .. जसे कि कॅनवास वर एखादा चित्रकार त्याच्या कुंचयल्याने नाजूक कोरीव काम करताना तल्लीन व्हावा तसा तो तल्लीन झाला .... आणि ती त्याच्या डोळ्यांत स्वतःला पाहण्यात हरवून गेली ..
स्वर्गहा नवा, वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी, या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
चिमणे घरटे सजले साजरे
इवलेसुख हे फुलले आज रे
भरले घर हे आहे आनंदाने
मन हे गीत गाते तुझे ऐक ना
प्रेमगीत छेडितो ऊरात पारवा
बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन, नाचले
जुळलेनातेदोन जिवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
https://www.youtube.com/watch?v=iWtzd53peQ4&ab_channel=RohimusicalAlbumbyA.S.K.
(गाणे जरूर जरूर ऐका)
आणि निशी शिंकली
स्वराज " जा कपडे चेंज कर .. नाहीतर आजारी पडशील .. गार पाणी होते ना "
निशी " हो जातेच आहे "
तेवढयात पिंट्या आला चुना आणि काव माती घेऊन
पिंट्या " चल रे ह्या काव मातीने आपण भिंती रंगवू .. फार काम नाहीये .. पटापट दोघे मिळून करू .. "
मग दि इंडस्टियालिस्ट मिस्टर स्वराज पिंट्याच्या हाताखाली रंगारी चे काम करू लागले .. दोघांनी मिळून सगळ्या भीती रंगवल्या .. आणि काव माती आणि चुन्याच्या कॉब्मिनेशन मुळे घर एकदम टुमदार दिसू लागले
निशी ने काऊ मातीने चूल पण रंगवली .. देव खोली पण काऊ मातीने रंगवली .. शेणाने सारवले .. घर आतून बाहेरून खूप छान दिसत होते .. प्रसन्न वाटू लागले
निशी काम उरकून अंघोळीला गेली ... छान मस्त अंघोळ करून तिने क्रिम साडी त्याला गोल्डन काठ असलेली साडी घातली
निशी " स्वराज .. तू अंघोळ करून घे .. मग देवाची पूजा तुझ्या हस्ते करायचीय .. जा .. आता थोडा ब्रेक घ्या .. मी प्रसादाचा शिरा बनवते .. "
स्वराज लगेच अंघोळीला गेला .. तोपर्यंत हिने चुलीची पूजा करून त्यावर शिरा बनवला ..
स्वराज कपडे घालत होता तर तिने त्याला सिल्क चा झब्बा लेंगा दिला .. आणि घालायला सांगितला .. त्याने पण काचकूच न करता झब्बा लेंगा घातला .. इतका मस्त दिसत होता .. एकदम राजबिंडा .. त्याच्या गोऱ्या रंगाला तो सिल्क चा क्रिम व्हाईट झब्बा लेंगा शोभून दिसत होता
स्वराज " अरे वाह !! हा ड्रेस कधी घेतलास .. ?"
निशी " आवडला तुला ? त्या आपल्या गावातल्या दुकानातुन घेऊन ठेवला होता .. तुझ्यासाठी .. "
स्वराज लगेच घालून दाखवला .. आणि तिला खूप समाधान मिळालं.. ते तिच्या डोळ्यांत त्याला दिसले..
मग निशी सांगेल तसे करत करत त्याने देव्हाऱ्यातले देव सजवले आणि त्याची रीतसर पूजा केली .. पूजा झाल्यावर प्रसादाचा शिऱ्याचा नेवैद्य दाखवला
मन प्रसन्न , घर प्रसन्न ... दोघांनी देवांना मना पासून नमस्कार केला .. दोघे खुश झाले .. आनंदाच्या भरात स्वराज ने लगेचच वडिलांना कॉल केला .. त्यांनी काय काय केल ते सांगितले .. घराचे आताचे फोटो पाठवले .. देव घराचे फोटो पाठवले ... डॅड एकदम खुश झाले .. आनंदाश्रू च आले .. मनापासून त्यांनी अनेक आशीर्वाद दिले त्याला आणि त्याच्या बरोबर निशिगंधाला ……
बोलता बोलता तो किचन मध्ये आला तर निशी चुलीवर जेवण बनवत होती .. त्याने डॅड ना व्हिडीओ कॉल केला होता ..
स्वराज " डॅड .. हि बघा निशी .. भाकऱ्या करतेय .. आपल्या घरात .. निशी ला असे बघून डॅड मला आई ची खूप आठवण येते .. आई पण अशीच जेवण बनवायची ना .. चुलीवर “
निशी लगेच उठून उभी राहिली आणि काकांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला .. दोन्हि हात पिठाचे होते .. हाताचे पीठ तिच्या गालाला लागले .. ती सुधीर काकांशी बोलत होती त्यामुळे तिचे त्याकडे लक्ष नव्हते… थोडा वाकून स्वराज पण स्क्रीन कडे बघत होता .. अनावधानाने त्याने त्याच्या रुमालाने तिचा गाल पुसला .. नॅचरल ऍक्शन .. आणि त्याचे दोघांनाही काही वेगळे वाटले नाही..
सुधीर काकांना फार अप्रूप वाटले .. दोघांमध्ये एक प्रकारचा वागताना चा स्मूथनेस आला होता ..
मग तो बोलता बोलता पुन्हा बाहेर गेला .. आणि डॅड शी बोलत बसला बराच वेळ ..
तोपर्यंत पिंट्या आणि त्याची बायको आणि मुले जेवायला येणार होती ते लोक आले ..
शारदा ने पटापट पाने घेतली ... मुले आणि पिंट्या आणि स्वराज जेवायला बसले .. आजचा मेनू म्हणजे गजानन महाराजांचा आवडीचा प्रसादच होता ..
पिठलं भाकरी , मिरचीचा ठेचा आणि प्रसाद म्हणून गोडाचा शिरा .. भुकेच्या तडाख्यात चार पाच भाकऱ्या सर्वांनी हाणल्या .. मग या दोघी जेवल्या .. मागचे भांडी कुडी आवरले ..
मग निशी आणि पिंट्या ची मुलं फुलांच्या माळा करायला बसली .. संपूर्ण घराला पुरेल इतक्या माळा त्यांनी बनवल्या .. आणि संध्याकाळी ऊन ओसरल्यावर लावून टाकल्या .. घराला घरपण देणारी माणसं आल्यामुळे एका दिवसातच भकास पडीक घराला सुंदर वास्तूत बदलले होते सर्वांनी मिळून .. जेवल्या जेवल्या स्वराज जो बाहेर बाज वर आडवा पडला ते संध्याकाळ झाली तरी उठला नाही .. शेवटी पिंट्या चहा घेऊन आला तेव्हा उठला .. सर्वांनी मिळून शारदा ने केलेला चहा घेतला .. आणि मग बाहेर गप्पा मारत बसले ..
पिंट्या " अरे आपले गावात जायचं राहिलं ना .. शंकऱ्या , रव्या , संज्या सगळे भेटले असते तुला .. “
स्वराज " तू एक काम कर त्यांना घरी बोलावं .. इथेच भेटू .. "
पिंट्या " आता कुठे ?"
सरोज " आता नको .. उद्या दुपारी बोलावं .. उद्या आपण जेवणाची तयारी करू .. कोणीतरी आचारी मिळेल का ? गाव जेवण च ठेवू ... आधी देवळात जाऊन येऊ .. मग सर्वांना गाव जेवण ठेवू .. मस्त बुंदीच्या लाडवांचं जेवण ठेवू "
पिंट्या " अचानक ?"
स्वराज " अरे आता गेलो कि कशाला परत इकडे फिरकतोय इतक्यात .. आलोय तर सर्वांनाच गाव जेवण करू .. फार काही खर्च नाही येणार .. मला माहितेय "
पिंट्या "चालेल ."
स्वराज च्या डोक्यात काय शिजत होते काय माहित पण गाव जेवणाचा प्लॅन तर त्याने बनऊन टाकला .. मग पिंट्या आणि स्वराज दोघे आचार्याला बोलवायला गेले .. जेवणाच्या ऑर्डर्स दिल्या .. त्याला पैसे वगैरे देऊन आले .. अजून त्याने निशी हा प्लॅन सांगितला नव्हता .. तो येई पर्यन्त निशी आणि पिंट्या च्या पोरं होतीच जोडीला .. बाहेर अंगणात मोठी रांगोळी काढली .. त्यात रंग भरले .. रांगोळीत दिवे लावले .. तुळशी वृंदावनात एक तुळस लावली .. वृंदावन पण छान काऊ मातीने सजवले .. त्यावर चुन्याने छोटी छोटी चित्र काढली .. आजूबाजूचा परिसर पण शेणाने सारवल्याने घर तर घर पण अंगण पण टुमदार दिसत होते .. तुळशीत दिवा लावला .. पायऱ्या रांगोळी आणि दिव्यांनी सजल्या .. घर दिव्यांच्या उजेडात उजळून गेले .. खूप छान आणि सुंदर.. प्रसन्न वाटत होते .. मनोमन स्वराज खूप खुश झाला होता ..
निशी चे .. पोरांचे , स्वतःचे , रांगोळीचे , घराचे त्याने खूप सारे फोटो काढले .. पुन्हा रात्रीचे जेवण सर्वांनी एकत्र केले ..
रात्री खूप वेळ गप्पा मारून पिंट्याची फॅमिली त्याच्या घरी झोपायला गेली .. मग हे दोघे खाली सतरंजी वर पडले ते पडल्या पडल्या झोपले .. आजचा दिवस अविस्मरणीय दिवस होता दोघांसाठी ..
दुसऱ्या दिवशी कोंबड्याच्या बांगेने निशी उठली .. पहाटे पहाटे तिने अंघोळ करून तुळशीला पाणी घालून तयार .. चुलीवर जेवण बनवायचे म्हणजे वेळ जातो म्हणून त्याला उठवाय च्या आधीच चूल पेटवली आणि चहा नाष्टा करू लागली
चुलीच्या धुराने आणि गरम पोह्यांच्या वासाने तो उठला ..
स्वराज " गुड मॉर्निंग .. "
निशी चुली समोर फुकणि ने फुक मारून झाल्यावर " गुड मॉर्निंग .. उठ जा आता नाश्ता करून घे .. आणि मग तू आणि पिंट्या गावात जाऊन फिरून ये .. नाहीतर आलास ते राहूनच जाईल भेटायचं मित्रांना "
स्वराज उठून अंघोळ करून आला आणि तिच्या समोर बसला .. तिने दोघांना पोहे वाढून घेतले आणि चहा पेल्यात ओतला
स्वराज " पोहे वगैरे .. "
निशी " सगळे सामान मी आणलेलं .. म्हणून तर गाडी भरली .. काल बघितलेस ना एवढया जणांचे जेवण झाले .. एवढे पीठ आणले होते "
स्वराज " ग्रेट आहेस तू यार .. एक नंबर प्लांनिंग .. आणि पिठलं तर अमेझिंग झाले होते "
निशी " थँक यु .. पोहे आवडले का ? साखर नाही टाकलीय .. तुला आवडत नाही म्हणून "
स्वराज " अरे काही नाही .. चालते मला .. तू खूप छान बनवतेस सगळं .. "
नाश्ता झाल्यावर
स्वराज " निशी आज मी गाव जेवण ठेवायचा विचार करतोय .. आचार्याला बोलावलंय .. तो त्याला पाहिजे ते सामान घेऊन येईल आणि बनवेल .. आज दुपारी गावातली सगळीच मंडळी जेवायला येतील .. पिंट्या आमंत्रण देणार आहे .. "
निशी " अरे वाह .. फार चांगली गोष्ट करतोय तू .. आणि ते हि कोणीच न सांगता .. अरे वाह .. शाब्बास… अन्नदाना इतके पुण्य नाही... आणि एक सांगू का … इथल्या गाव देवाला पण नारळ वाहून येशील .. आपल्या गाव देवाशी पण आले एक नातें असते "
स्वराज " आणि ऐक ना .. मी एक निर्णय पण घेतलाय तुझ्या बाबतीत तो मला तुला सांगायचा आहे ..आज .. सांगू का आता ?"
निशी " ऐक ना .. स्वराज .. प्लिज आता भांडण नको .. इकडून तिकडे गेलो कि भांडू पाहिजे तेवढे .. मी काल पासून माझ्या सगळ्या चिंता विसरलेय .. तर आठवण नको आता त्याची "
स्वराज " बरं .. ठीक आहे .. नाराज नको होऊस "
तो एक मिनिट गाडी कडे गेला आणि एक पॅकेट घेऊन आला
स्वराज " आज दुपारी हि साडी नेसशील .. प्लिज .. माझ्या साठी "
निशी " साडीच आहे ना .. ठीक आहे नेसेन .. एवढे तर मी नक्कीच करू शकते तुझ्या साठी .. आणि तसेही माझ्या साड्या जरा साध्याच असतात .. हि तू आणलीस म्हणजे नक्कीच भारी असेल .. पण याचे पैसे मी तुला देऊन टाकेन प्लिज याला नाही नको म्हणूस "

🎭 Series Post

View all