निशिगंधा भाग 13

Story Of Girl Who Wants To Run School


निशिगंध भाग १३

क्रमश: भाग १२

माझी सोनुली ,
खरंच बाळा .. आता मरणाच्या दारात असताना हे पत्र तुला लिहतोय .. मन भरून आलय .. तुझ्या साठी काय काय करू असे झालंय .. वेळ होती तेव्हा काहीच करू नाही शकलो .. तुला पण नाही आणि तुझ्या आई साठी पण नाही काहीच करू शकलो याची खंत राहील मनात
बाळा .. पुढील काही दिवसातच मी मरणार आहे .. मरणाला मी अजिबात घाबरत नाही ग .. पण जीव तुझ्यात अडकलाय माझा .. तू .. तू एकटी कशी राहशील अशी काळजी लागून राहिली .. तुझ्या आई ची तब्बेत बरी करण्या करता मी कर्ज बाजरी झालो पण आई ला नाही वाचवू शकलो .. आपले शेत विठ्ठल काकाला देऊन टाकले मी .. तुला आता त्याचाही काहीच उपयोग होणार नाही .. हे राहतं घर जे आहे ते .. तू जिवंत असे पर्यंत तुझेच असेल पण बाळा हे मी माझा परम मित्र सुधीर आहे ना त्याच्या नावावर करतोय .. कारण आहे त्याला .. सुधीर आता या देशात नाही राहत पण तो जेव्हा इकडे होता तेव्हा त्याने तू त्याला सून म्हणून हवी आहेस असे सांगितले होते .. स्वराज ला तू खूप आवडतेस आणि तूच त्याची होणारी बायको आहेस असे तो दिवस रात्र बोलत असतो असे सुधीर मला सांगत होता ..
तू म्हणशील बाबा माझ्या साठी काहीच ठेवून गेले नाहीत .. काय करू बाळा .. परिस्थिती समोर हरलो मी .. तुझ्या आई च्या तब्बेती साठी आपले घर पण गहाण टाकले होते .. पण नाही सोडवू शकलो .. एक दिवस आपल्याला बेघर व्हावे लागले .. अचानक राहत्या घरातून बाहेर पडलो .. तू लहान .. आई ची तब्बेत फारशी बरी नसायची .. मला काहीच सुचले नाही मी सरळ सुधीर चे घर गाठले ... सुधीर माझा लहानपणीचा जीव भावाचा मित्र .. त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा घरात चांगले दोन महिने आसरा दिला .. तो आणि मी दोघे त्याच्या शेतात काम करू लागलो .. शेवटी मित्राच्या घरात असे किती दिवस राहणार .. मी तिकडून पण निघायचे ठरवले तर सुधीर ने मला घराची चावी दिली .. त्याने सावकाराला पैसे देऊन आपले घर सोडवून घेतले होते .. आपण पुन्हा सगळे आपल्या घरात परत आलो .. मी सुधीर चे पैसे काही परत नाही करू शकलो .. म्हणून मग हे घरच त्याच्या नावावर करून टाकले .. आता खरा मालक तोच आहे या घराचा..
पण बाळा आता तो या देशात राहत नाही .. मोठा झाल्यावर स्वराजला तू आठवशील कि नाही हे सुद्धा मला माहित नाही .. भविष्यकाळ कसा येईल कोणचं सांगू शकत नाही ..
आणि आठवलीस तरी कदाचित तुझ्यात त्याला त्याचा जीवन साथी दिसेल कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर काळच देईल .. घराची घरपट्टी आणि पाणी पट्टी सुधीर काका भरतील .. आणि त्यांच्या नावावर असल्यामुळे ह्या घरासाठी तुला कोणी फसवणार नाही ..
माझे शाळेचे स्वप्न अर्धवटच राहिले पण तू छान शिकतेयस यात मला समाधान आहे .. तुला जमेल आणि वेळ मिळेल तेव्हा गरीब मुलांना शिकवत जा .. ज्ञान दिल्याने वाढत जाते बाळा ..
हरी भाऊ , सुधीर आणि मी आम्ही तिघे एके काळी घट्ट मित्र होतो .. सुधीर अभ्यासात हुशार होता .. कठीण परिस्थितीला सामना करत आज तो बाहेरच्या देशात गेला .. हरी भाऊ ला समाज सेवेची आवड तो एक दिवस नक्कीच सरपंच बनेल .. तुला हे सांगतोय या साठी माझ्या पश्चात तुला कोणाची मदत लागली तर बिना संकोच तू या दोघांना भेट .. तुला मुलगी समानच मानतील ते .. तुझ्या लग्नाची जवाबदारी मी सुधीर काकांवर सोपवलीय .. जर स्वराज नाही आला तर सुधीर काका सांगतील त्या मुलाशी लग्न कर.. सुधीर नक्कीच तुझ्या साठी चांगला मुलगा बघेल याची खात्री आहे मला ..
पोरी .. मुलीने जगात एकटीने राहणे सोपे नसते ... माझे नाव कधीच खाली येऊ देऊ नकोस .. तुला जर कोणी तुझे नाव विचारले तर पूर्ण नाव सांग म्हणजे तुला दरवेळी लक्षात राहील कि तू एका शिक्षकाची मुलगी आहेस .. आपली इज्जत आपल्या हातात असते आपल्या वागण्यात असते.. तुझ्या वागण्यातून एक आदर्श मुलगी असावं असेच वागशील .. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा .. देवा वरचा विश्वास ढळू देऊ नकोस .. देव सगळं ठीक करतो .. आपले वागणे निर्मल असले पाहिजे ..
काय काय सांगू तुला असे झालंय .. पण आता थकलोय .. हात थरथरतोय माझा .. थांबवतो
जमले तर या बापाला माफ कर .. तुला एकटीला सोडून चाललोय .. खचून जाऊ नकोस .. कमजोर पडू नकोस .. मनाच्या शक्ती पुढे भली भली संकट निकामी होतात ..
काळजी घे ..
तुझाच अभागी बाबा
स्वराज चिट्ठी वाचत होता पण कधी डोळ्यातून पाणी आले माहित नाही त्याला .. सगळे होते तसे त्याने पुन्हा ठेवले पण मन खूप जड झाले होते .. जोर जोरात रडावे असे त्याला वाटतं होते ..
आज खूप दुखावलं मी .. तिच्या वर हात उचलला .. तिला ढकललं . तिला वाटेल तसे बोललो .. याचे वाईट वाटू लागले त्याला .. तिच्या वागण्यात असलेला पोक्त पणा का आहे ? का ती साडीच घालते .. का ती अशी वेगळी वागते अश्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आज त्याला मिळाली होती ..
हि चिठ्ठी तिने वाचलीय म्हणजे मी इथे का येणार आहे हे तिला नक्कीच माहित होते आणि म्हणूनच तिने माझ्या बरोबर न येण्याचा आधी पासून प्लॅन करून ठेवलाय
तेव्हड्यात बाहेरच्या दारची कडी पुन्हा जोर जोरात वाजू लागली
त्याने जाऊन दार उघडले तर बाहेर निशी आणि हरी भाऊ होते .. त्याला वाटले हिने त्याची तक्रार हरी भाऊंकडे केली असावी ..
हरी भाऊ आणि ती आत आले आणि त्यांनी दार लावून घेतले आणि बाजूला कपडे वाळत घालायची काठी होती ती त्यांनी हातात घेतली आणि रागातच
हरी भाऊ " तुझि हिम्मत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची .. तिच्या डोक्याला काय लागलंय .. हाताला काय लागलंय .. तिने जरी नाही सांगितले तरी मला कळत नाही असे वाटले का तुला .. नीच माणसा .. तुझ्या वर विश्वास ठेवला हीच माझि चूक झाली .. सुधीर चा मुलगा म्हणून मी जास्त विचार केला नाही .. याची शिक्षा तुला नक्की मिळेल ..
स्वराज एकटक निशी कडे बघत होता .. ती मान खाली घालून उभी होती
हरी भाऊ " एकटी पोरं भर उन्हाची झाडाखाली रडत बसली होती .. मी शहरात चाललो होतो आज बघितली नसती तिला तर मला कळले पण नसते कि ती रडतेय म्हणून .. "
आणि हरी भाऊनी काठीने लिटरली त्याच्या दंडावर मारले .. स्वराज ढिम्म जागचा हल्ला नाही .. लागलं तर नक्कीच असेल पण काहीच आवाज नाही त्याच्या तोंडून
हरी भाऊ " निघून जा .. आमच्या गावातून .. निघून जा .. " आणि अजून एक काठीने फटका मारला
हरी भाऊ " हेच संस्कार केले का तुझ्या बापाने तुझ्या वर .. का तिकडे गेल्यावर अक्कल गहाण टाकली दोघं बाप लेकाने "
निशी " काका .. थांबा .. सुधीर काकांना काही बोलू नका प्लिज .. यात त्यांची काहीच चूक नाही .. प्लिज .. आणि स्वराज ची पण काहीच चूक नाही .. मीच त्याला वाटेल ते बोलले बहुदा त्याचा राग आला त्याला .. प्लिज रागावू नका .. त्याला नका मारू .. हवे तर मला मारा .. मीच अपराधी आहे .. तुमच्या सगळ्यांची ..
स्वराज तू बोललास ते एकदम खरं आहे .. माझे बाबा मरून गेले पण तुमच्या डोक्यावर माझे ओझे टाकून गेले .. पण आता मी खूप विचार केलाय आता मी कोणावरच ओझे होणार नाही .. हरी काका तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नवीन शी लग्न करायला तयार आहे .. त्याला माझा होकार कळवून टाका.. लग्न कोर्ट मॅरेज करू म्हणजे पैसे कमी खर्च होतील .
चालत आतमध्ये तिच्या रूम मध्ये गेली आणि पेटीतून घराचे कागद आणले आणि स्वराज च्या हातात दिले
निशी " स्वराज , हे कागद माझ्या बाबांच्या ईच्छे प्रमाणे मी तुला सुपूर्त करत आहे .. आपण ठरवल्या प्रमाणे उद्या आपण तुझ्या गावी जाऊ .. आणि तिकडून आलो कि तू तुझ्या घरी जा .. तुला जमले तर पुढल्या महिन्यात माझ्या लग्नाला ये .... माझ्या बाजूने विटनेस म्हणून सही करायला.. ठीक आहे .. झाले आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व .. तू आनंदात तुझ्या घरी जा .. .. "
हरी भाऊ खुर्ची वर बसले ... स्वराज अजूनही तिथेच तसाच उभा होता ..
स्वराज " मी बाहेर जाऊन येतो .. "
निशी " स्वराज .. थांब उपाशी नको जाऊस .. काहीतरी खाऊन जा "
स्वराज त्याच्या रूम मध्ये जाऊन बेड वर आडवा पडला
हरिभाऊ चहा पाणी घेऊन निघून गेले
तिने पटकन पोळी भाजी केली आणि त्याला खायला बसवले .. तो हि काही बोलत नव्हता .. खाऊन बुलेट घेऊन शहरात निघून गेला .. तिनेही विचारले नाही ? का आणि कुणीकडे जातोय "
आज तिला कुठेही कामावर जायचा मूड नव्हता .. ती दुपारी झोपून राहिली .. जरासे डोकं दुखतच होते तिचे .. पेन किलर ची गोळी खाऊन झोपून गेली
संध्याकाळ झाली तरी तो आला नाही मग तिला जरा त्याची काळजी वाटू लागली .. आधीच तो हि जरा रागात गेलाय .. त्यात त्याचा गाडीचा स्पीड .. आणि इथले रस्ते खड्ड्यांचे ..
काळजीने उठून तिने आज देवा जवळ लवकरच दिवा लावला " देवा त्याचे रक्षण कर .. "
तेवढ्यात तो आलाच घरी ..
आल्यावर अंघोळीला गेला तर त्याला स्वतःच्या अंगावर काठीने मारल्याचे काळे निळे डाग दिसले .. त्याने हात लावून बघितले तर जरासे दुखले ..
तिने त्याला जेवायला वाढले
निशी " कुणीकडे गेला होतास ?"
तो काहीच बोलला नाही
त्याचा अबोला तिला सहन होई ना .. मनातून खूप वाईट वाटत होते ..तिला प्रश्न पडला होता कि कसे समजावू याला कि असा अनोखळी माणसाच्या भरवशावर मी माझा देश माझे स्वप्न सोडून नाही येऊ शकत .. उद्या जर त्या मुलाने ( जो स्वराज च्या बाबांनी निशी साठी बघितलाय ) त्याला नाही आवडले . त्याने सोडून दिले तर मी कुणीकडे जाऊ .. किंवा तो ढीग चांगला असेल पण मला असे परदेशात रहायला जमलंच नाही तर ..
असे अनेक प्रश्न तिच्या पुढे होते
(हा भाग ११ सप्टेंबर चा आहे .. रात्री पोस्ट केला कि १० चा दिसेल)

🎭 Series Post

View all