निशिगंधा भाग 37

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ३७
क्रमश: भाग ३६
स्वराज ने बघितले .. चांदीचे पैंजण होते " हे काय ? ते तुम्ही मुली पायात घालता ते आहे ना ?"
निशी " हो ... हे बघितल्यावर तुला काही आठवतंय का ?"
स्वराज " असे नको ना .. सांग ना निशी ... इट्स युअर टर्न नाऊ "
निशी " बरं .. बाबा .. ऐक .. हे पैंजण मला बाबांनी घेतले होते दसऱ्याला .. आणि मी खूप खूप खुश होते .. घरात दिवस भर छुम छुम वाजवत घरभर फिरत होते .. खूप आनंद होयचा मला .. आणि मला असे पाय वाजवत चालताना बघून आई आणि बाबा खूप खुश होयचे .. .. आम्ही नुकतेच तुमच्या कडे राहून आलो होतो .. तुझ्या डॅड नि सावकार कडून हे घर सोडवून आम्हांला बहुदा परत दिले होते आणि बाबा डॅड बरोबर शहरात जाऊन आले होते तेव्हा त्यांनी दोघांनी हे पैंजण माझ्या साठी आणले होते .. शेतात एकत्र काम केल्या नंतर बरेच पैसे मिळाले होते वाटत तेव्हा .. "
स्वराज " ओके .. मग पण आपल्या दोघांत काही आहे ना याचे ... मला नीट आठवत नाहीये .. "
निशी "हो . म्हणूनच तर सांगते ना .. हा तर दसऱ्या च्या पूढे दोन दिवसांनी तुम्हीं अचानक आमच्या घरी आलात .. मी ही तुला बघून खूप झाले .. तुमच्या कडे दोन महिने राहिल्या मुळे तुझी आणि माझि चांगलीय गट्टी झाली होती तेव्हा .. लिटरली तुला हाताला धरून मी घरभर फिरवले होते .. मग मागच्या अंगणात आपण खूप सारे खेळ खेळलो होतो .. लपाछपी खेळताना तर तुला एकदम सोप्प झाले होते .. माझे पैंजण वाजले कि तू लगेच शोधून काढायचास मला .
हे ऐकून स्वराज जरासा हसला
स्वराज " तसे तर आता पण तुला मीच शोधून काढले .. काय यार एव्हरी टाईम आय ह्याव टू कम टू मीट यु .. तुला वाटतच नाही का मला भेटावे .. तू असे माझ्या साठी आलिसंच नाहीस कधी "
निशी " ऐक ना स्वरू . अजून पुढे आहे "
स्वराज " हा बोल .. मी ऐकतोय "
रात्री डॅड सांगत होते कि तू रडत होतास कि आपण निशी ला भेटायला जाऊ .. म्हणून तुम्ही अचानक खास मला भेटायला आले होते
निशी " मग त्या रात्री तुम्ही राहिलात आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघालात .. तर मी नाराज बसले होते आणि रडत होते " स्वराज .. नको ना जाऊ ... म्हणून .. " तर मला तुझ्या आई ने समजावून सांगितले होते कि " आम्ही आता जाऊ तेव्हाच आम्ही परत येऊ ना तुला भेटायला .. म्हणून आता आम्हाला जावे लागेल .. हे काय लॉजिक आहे मला माहित नाही पण मला तेव्हा पटले होते ..
मी मागच्या पायरी वर जरा हिरमुसून बसले होते .. तर तू आलास आणि माझ्या शेजारी बसलास आणि मला म्हणालास मी तुझ्या साठी काहीतरी भेट आणलीय .. पाहिजे का तुला ? तर मी म्हटले " दे " .. मग तू सांगितलेस कि डोळे मीट .. मी देतो .. मी डोळे मिटून बसले होते तर मला चेहऱ्यावर गुदगुदल्या होऊ लागल्या ..आणि मी खुदू खुदु हसू लागले .. आणि डोळे उघडले तर ती भेट वस्तू तू लगेच मागे लपवलीस " ओळख काय आहे ते ?" तर मी म्हटले मला नाही माहित .. पुन्हा तू मला डोळे मिटायला सांगितलेस आणि पुन्हा गुदगुदल्या केल्यास .. तेव्हा हि मला कळले नाही .. मग तू माझ्या डोक्यात टपली मारलीस आणि मला म्हणालास " बुद्धू .. अग हे मोरपीस आहे " मी त्या आधी मोरपीस कधीच पहिले नव्हते .. मी ते मोर पीस हातात घेऊन किती तरी वेळ माझी मलाच गुदगदल्या करायची आणि हसायची ... मग अगदी निघताना तू पण नाराज होतास कारण मी तुला काहीच भेट नव्हती .. तर तू मला म्हणालास " तुला माझी आठवण आली ना कि हे मोरपीस बघशील .. पण मला तुझि आठवण आली कि मी कशाकडे बघू .. ?" मग मी विचार करू लागले कि आता हा प्रश्न कसा सोडवायचा .. मग तू म्हणालास " काहीतरी तुझं आहे ते मला दे .. तर मी म्हटले .. माझ्या कडे काहीच नाहीये तुला द्यायला .. थांब मी बाबांकडून काहीतरी आणू का ? तर तू म्हणालास कि नाही .. हे मोरपीस मला शेतात सापडले .. तसे जे तुझे आहे ते मला दे ..
स्वराज हे ऐकताना एवढा इंपेशण्ट झाला होता " मग नक्की काय दिलंस तू मला .. मला आठवत नाहीये यार .. निशी सांग ना पटकन "
निशी " हो रे .. मग मी तुला माझ्या एका पायातले पैंजण काढून दिले होते "
स्वराज " सिरिअसली .. आय डोन्ट ह्याव इट .. मला काहीच का आठवत नाहीये .. ? "
निशी " ह्याचे एक पेअर तुझ्याकडे आहे .. असेलच .. तू नक्कीच हरवले नसणार .. कारण सांगू .. मी हे तुला दिल्यावर तू इतका खुश झाला होतास .. मला गालावर पप्पी देऊन पळाला होतास "
स्वराज " आई शपथ यार निशी .. कसला भारी किस्सा सांगितला आहेस तू .. आज रात्री स्टोअर रूम मध्ये जाऊन बघतो .. तुझे पैंजण आहे का ते ?"
निशी " राहू दे रे .. शोधायची गरज नाही .. मी असेच आपली एक आठवण सांगितली "
स्वराज " साला आपल्या दुराव्याच्याच गोष्टी भरपूर आहेत .. आणि नेहमी मला पप्पी साठी तरसायला लागतंय .. आय वॉन्ट टू गिव्ह यु पप्पी नाऊ "
निशी हसली .. आणि तिनेच मोबाईल स्क्रीन वर देऊन टाकली … पप्पी
------
आता निशी स्वतःशी ठरवून टाकले .. शाळा आणि शाळेचं काम ती जोर लावून करणार होती .. लवकरात लवकर तिला शाळा बांधून सुरु करायची होती .. आणि त्या दृष्टीने तिने काम करायला सुरुवात पण केली ..
दुसऱ्या दिवशी तीने गावातल्या अशा लोकांना गाठले जे आपल्या मुलाला /मुलीला शाळेत पाठवत नाहीत .. ती आणि नंदा ने मिळून घरो घरी जाऊन मुलांना शाळेत पाठवा .. शाळेचे .. अभ्यासाचे महत्व समजावून दिले .. शिक्षणाचा फायदा काय काय होतो .. जरी शेतकरी झाले तरीही शिक्षण किती महत्वाचे आहे .. आणि सर्व मुलांचा बेसिक अधिकार आहे हे समजावून सांगायला सुरुवात केली .. नंदा ला वेळ असेल तेव्हा ती तिच्या बरोबर असायचीच .. ती नसेल तर ती एकटीच फिरायची ..
नंदा चे डी एड चे शिक्षण चालू होते .. त्यामुळे मुलांना शिकवायचे प्रॅक्टिकल करायला तिला चांगलीच संधी मिळायची .. निशी च्या शाळेतील मुलांना ती एकेक विषय शिकवायला सुरुवात केली तिने .. शिकवण्याची प्रॅक्टिस तिला होऊ लागली आणि तिलाही त्या मध्ये इंटरेस्ट येऊ लागला .. निशी च्या पाऊलावर पाऊल टाकून ती पण एक चांगली शिक्षिका बनू लागली ..
त्याच्या शेजारच्या गावातील रणजित पण नंदाच्या कॉलेज मध्ये डी एड करत होता .. निशी ने एकदा त्याला पण भेटायचे ठरवले .. तिला पण शिक्षक नवीन शाळे साठी शिक्षक तयार करायचे होते .. रणजित पण इथे शिकवायला येऊ लागला तर तिला फायदाच होणार होता ..
निशी " नंदा .. मग काय म्हणतायत रणजित राव "
नंदा " अग .. काही फारसे बोलणे होत नाही .. अभ्यासात खूपच हुशार आहे .. खूप छान नोट्स असतात त्याच्या "
निशी " अरे वाह !! .. माझी ओळख करून देशील का एकदा तू त्याच्या बरोबर .. मला महत्वाचे बोलायचे होते "
नंदा " ठीक आहे.. मी तुझा मेसेज देईल त्याला उद्या .. कधी बोलावू घरी "
निशी " मी आधी हरिभाऊंशी बोलते .. ते काय म्हणतात त्यावर ठरवू ?"
नंदा " ठीक आहे "
त्याला घरी बोलवायचे म्हणजे कोणीतरी पुरुष माणूस पण असला तर बरे पडेल या हिशेबाने तिने हरी भाऊंशी बोलून त्याला भेटायचं दिवस आणि वेळ फायनल केली .. आणि आज तो भेटायला घरी येणार होता .. निशी ने मुद्दामून शाळा असताना बोलावले ..
आज नंदा एकदम खुश होती .. नंदा मस्त छान साडी घालून तयार .. रणजित त्यांच्या गावात येणार म्हणून खुश दिसत होती .. निशी ने प्रार्थना झाल्यावर नंदा लाच गणिताचा तास घ्यायला लावला .. तोपर्यंत रणजित त्याच्या एम ८० गाडीवरून निशी च्या शाळेत आला .. हरी भाऊ आधीच येऊन थांबले होते ...
हरिभाऊ " या या .. रणजित राव .. "
रणजित " नमस्कार काका .. नमस्कार निशी ताई !! "
निशी " नमस्कार !! "
निशी ने आत मधून त्याला आणि हरी भाऊ ला पाणी आणि चहा बिस्कीट आणून दिले .. तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या... नंदा मन लावून शिकवत होती हे रणजित च्या नजरेतून सुटले नाही .. स्वतःशीच गालात हसला
हरिभाऊ " निशी ला शाळे संदर्भात बोलायचं होते तुझ्याशी .. तेवढे ऐकून घे .. आणि तुला काय मदत करता येते का ते बघ "
रणजित " हो .. नक्कीच .. मला जे शक्य होईल ते मी नक्कीच करेन "
निशी " या गावात आपल्याला शाळा काढायची आहे .. govt चे सर्व जे काही आहे ते मी आणि हरी भाऊ बघते .. शाळा काढल्या नंतर शाळा चालू राहिली पाहिजे .. मी असले नसले तरीही .. यासाठी शाळेत मुल आणि चांगले शिक्षक असले पाहिजेत .. सध्या मी एकटीच शिकवते .. "
रणजित " माझ्या कडून काय मदतीची अपेक्षा आहे नक्की ?\"
निशी " मी NGO .. GOVT मध्ये अप्लिकेशन आल्रेडी दिलेले आहेत .. पुढल्या आठवड्यात NGO वाले येतील .. त्यांना जर आपले काम आवडले तर ते आपल्याला शाळा काढायला मदत करतील .. Gov ची परमिशन मी आणि हरिभाऊ काढू .. शिवाय शाळा बांधण्यासाठी जागा आम्ही हॉस्पिटल च्या बाजूला बघत आहोत .. "
रणजित " पण ते तर मुलाना जायला यायला लांब पडेल "
निशी " हो पण एवढी मोठी जागा कुठेच मिळणार नाही .. आपल्याला शाळेला ग्राउंड पण तर पाहिजे ना .. म्हणून तीच जागा व्यवस्थित वाटतेय .. "
रणजीत " ठीक आहे .. मी काय मदत करू ?"
निशी " मदत अशी कि तुमच्या ओळखीचे डी एड चे विद्यार्थी इथे मुलांना वेग वेगळा विषय शिकवायला आले तर बघता येईल का बघा ... जशी नंदा शिकवते तसे अजून चांगले शिक्षक पाहिजेत .. आणि दुसरी मदत अशी कि शाळेत अजून मुलं फक्त ५० च आहेत आपल्याला कमीत कमी १०० एक मुलं जमा करायची आहेत .. तर तुमच्या गावातली मुलं पण या शाळेला जोडता येतील का ते पाहू”
रणजित " हो चालेल .. मी या दोन्ही विषयावर नक्कीच मदत करू शकतो तुम्हांला .. "
हरी भाऊ " आपली जीप आपण मुलांना सोडायला आणायला वापरू शकतो .. तुमच्या गावातली मुलं पण जर या शाळेला येऊ लागली तर दोन खेपा मारता येतील ."
रणजित " किंवा बैलगाडी वापरता येईल .. म्हणजे इंधन खर्च नको "
निशी " अजून एक महत्वाचा मुद्दा असा कि सध्या शिक्षकांना पगार नाही देता येणार .. अजून अनुदान प्राप्त झालेलं नाही .. तरी पण मी डोनेशन मधून मिळालेल्या निधी मधून फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करेन"
रणजित " ताई एक सुचवू का ? तसेही डी एड करणाऱ्या प्रतेय्क शिक्षकाला प्रॅक्टिस साठी कोणत्या तरी वर्गात शिकवावे लागते .. तेच काम ते ईथे करू शकतात .. यात मुलांना शिक्षक मिळेल आणि शिक्षकांना मुलं मिळतील .. तुम्हांला फक्त एक लेटर प्रतेय्क शिक्षकाला द्यावे लागेल कि या विद्यार्थाने या शाळेत मुलांना शिकवले आहे "
निशी " अरे वाह .. खूप छान आयडिया दिलीत .. मी शाळेच्या नावाचे रजिस्टेशन करायचे बघते .. म्हणजे मग आपण लेटरहेड अँड स्टॅम्प आणि शिक्के बनवू शकतो .. .."
हरिभाऊ " रजिस्ट्रेशन झाले म्हणजे एक प्रकारे शाळा स्थापन झालीच म्हणायची नाही का निशी " एक दम खुश होत

🎭 Series Post

View all