निशिगंधा भाग 101

Story Of A Girl Who Wants Run School


निशिगंधा भाग १०१
क्रमश : भाग १०० बोनस पार्ट
अजूनही नक्की हे काय आहे हे नीटसे कळत नव्हते .. पण रेनाटे आणि मॉम सांगतात म्हणून एक प्रकारे निशी करत होती ..
स्वराज " मॉम .. नेक्स्ट मंथ निशिज ७थ मंथ विल स्टार्ट .. सो प्लॅन अकॉर्डीन्गली .. "
मॉम " येस माय बॉय .. आय एम अल्सो एक्ससायटेड .. यु नो व्हॉट स्वराज .. देअर इज बिग सर्पराईज फॉर बोथ ऑफ यु .. "
स्वराज " आय नो ..समथिंग इज ह्यापनिंग बिटवीन यु अँड रेनाटे .. "
मॉम " डोन्ट टेल हर .. इट्स ह्यूज .. युअर वाईफ ह्याज बिन नॉमिनेटेड फॉर वर्ल्ड बेस्ट टीचर अवॉर्ड.. अँड इट ह्याज मनी व्हाल्यू अराउंड १ करोड इंडियन रुपीज "
स्वराज " व्हॉट ... व्हॉट आर यु सेयिंग मॉम .. आय कान्ट बिलिव्ह "
मॉम " येस .. अँड इफ शी गॉट दयाट अवॉर्ड शी विल बी नॅशनल सेलिब्रेटी फॉर इंडिया .. अँड हर स्कुल विल बी फेमस इन ऑल द वर्ल्ड "
स्वराज " मॉम .. व्हॉट आर यु सेयिंग .. शी इज माय वाईफ . आय डोन्ट वॉन्ट इट .. ऍट लिस्ट नॉट नाऊ "
मॉम " ओह .. कम ऑन स्वराज .. डोन्ट बी टिपिकल .. "
मॉम ने फोन ठेवला पण स्वराज मात्र बेचैन झाला होता .. आता सहावा महिना चालू आहे .. दोन दिवसांनी जर तिला अवॉर्ड मिळाला तर .. इथे किती गर्दी होईल .. निशी ला मीडिया वाले त्रास देतील तिला आरामाची गरज आहे .. एकी कडे असे वाटू लागले .. तर दुसरीकडे ओह माय गॉड .. निशी .. भारताचे नाव मोठे करणार आहे .. आपल्या बाबांचे.. नवऱ्याचे नाव खराब होऊ नये म्हणून झटणारी निशी .. आपल्या देशाचे नाव उंच करेल .. माझी निशी .. असा विचार करत समोर असलेल्या निशी कडे चालत आला तो ..
निशी चे आता पोट दिसत होते .. गाल थोडे वरती आले होते .. पण डोळ्यांखाली काळे झाले होते .. चेहरा काळवंडला होता .. दमून जायची .. पायाला सूज येत होती .. श्वास घ्यायला त्रास होयचा म्हणून त्रासून जायची ... उन्हाळा सहन नाही होयचा .. कितीही फास्ट फॅन असला तरी गरम होतंय अशी कम्प्लेंट करायची ..
निशी एका विद्यार्थ्याला डोळे मोठे करून गोड ओरडत होती .. आणि त्याला सांगत होती हे असे नाही असे करायचे .. आणि तिचे डोळ्यांतले हावभाव बघून स्वराज ला हसू आले .. तिला बघता बघता एकदम तिच्या समोर येऊन उभाच राहिला
निशी " हा बोल स्वरू .. काही हवंय का तुला ? .. मी आताच पाणी प्यायलेय .. गोळ्या खाऊन झाल्यात .. फ्रुट मी थोड्या वेळा नंतर खाईन "
स्वराज " तू ... तू हवीय मला "
निशी आता पर्यंत त्याच्या कडे बघून बोलत नव्हती .. हे ऐकूनच हसत त्याच्या कडे बघून हसली आणि डोळ्यानेच विचारू लागली "हे काय ?"
स्वराज " आत ये ना लगेच .. नाहीतर मी उचलून नेईन .. "
निशी " काही पण .. स्वरू . माझे लेक्चर चालू आहे ना "
स्वराज " ये ना .. प्लिज "\"
\"निशी " बरं तू पुढे हो मी आलेच .. " मीनाक्षी ला मुलांवर लक्ष ठेवायला सांगून \"निशी आत आली
स्वराज ने तिला घट्ट मिठीत घेतले " निशी .. तू माझी बायको आहेस हे विसरू नकोस हा काही झाले तरी .. प्लिज .. मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय .. तू .. मला सांगितलंय कि हे तुझे इथले शाळेचं काम झाल्यावर तू माझ्या स्वप्नांची राणी बनून कायमसाठी माझि बनून येणार आहेस "
निशी " स्वरू .. ह्या साठी आत बोलावलंस .. सोड मला जाऊ दे बाहेर .. हे काय आता उगाच मधेच हे काय बोलतोय "
स्वराज " तू नाही आलीस ना तर मी .. तुला उचलून नेईल .. आधीच सांगतोय .. तू आधी माझी आहेस आणि मग नंतर शाळा .. गाव आणि मग देश कळलं ना "
निशी " स्वरू .. काय उगाच वेड्या सारखा बोलतोय .. मी तुझी आणि चिकूची जास्त आहे .. ठीक आहे .. जाते आता मी "
स्वराज " चिकू पण नंतर .. आधी मी "
निशी हसतच " होरे .. पण हे काय नवीन मधेच ?
स्वराज " मधेच भीती वाटते मला .. तुला तुझी समाजसेवा माझ्या पासून दूर तर नाही करणार ना अशी .. मी आणि चिकू तुझ्याशिवाय शून्य आहोत .. तुझ्यासाठी मी इकडे थांबलोय कारण आता लांब नाही राहायचंय मला .. चिकू नव्हता तोपर्यंत लॉन्ग डिस्टन्स रिलेशन ठीक होते पण आता नाही .. आता आपली फॅमिली लाईफ सुरु झालीय खऱ्या अर्थाने .."
निशी " हो .. खरं आहे तुझे .. आणि मी पण मनाने तिकडे यायला तयार आहेच कि .. आता शाळा पण बांधून होतेय .. घरात शाळा छान चालू आहे .. १०० मुलं स्वरू १०० मुलं रोज आपल्या शाळेत येतात .. मी किती खुश आहे सांगू शकत नाही .. आणि शाळा बांधून होतेय ते वेगळंच तू आलास आणि शाळेला प्रत्यक्ष रूप आले .. तू आल्यावर मुलं वाढवली .. शाळा बांधायला सुरुवात झाली .. आता एकदा शाळा सुरु झाली कि माझे काय काम आहे इकडे .. मी काय अशी हि शाळा झाली कि दुसऱ्या गावी जाऊन शाळा बांधणार नाहीये .. माझ्यातल्या शिक्षिकेला ओळखून तिकडे पण जॉब ऑफर झालाय .. मी तो जमलं तर करण्याचा प्रयत्न नक्की करेन .. नाहीच जमलं तर मी तुझी असिस्टंट म्हणून येईल .. "आणि हसली
स्वराज " हमम .. ठीक आहे " आणि तिच्या गालावर किस करून बाहेर निघून गेला "
दोन दिवसा नंतर तो सुवर्ण दिवस आला .. पुन्हा निशी ला लिंक पाठवण्यात आली .. आज रिझल्ट डिक्लेर होणार होता .. निशी ला नक्की काय आहे हे माहीतच नव्हते .. पण जगातले सगळे शिक्षक जे कि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत त्या शिक्षकांसाठी काहीतरी उपक्रम आहे हे तर तिला नक्कीच कळले होते .. झालाच तर आपल्या शाळेला फायदा होईल .. हे तिला नक्की माहित झाले होते .. आता जपान , चीन , पाकिस्तान , जर्मनी , ऑस्टेलिया या देशातल्या शिक्षकांना ती ओळखायला लागली होती त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स एक्सचेंज झाले होते .. बाकी काही झाले नाही तरी निदान महिन्यातून एकदा तिकडच्या शाळेला कनेक्ट करून मुलांना इंटरनॅशनल फ्लॅटफॉर्म ओपन करता येईल हे तर नक्कीच होते ..
थोड्याच वेळात ऑनलाईन मिटिंग सुरु झाली .. स्वराज पण तिच्या आजू बाजूला बसला होता .. कारण आता काय होणार आहे हे त्याला नक्कीच माहित होते .. निशी चा तो इंटरव्यूह त्याने पाहिला होता .. इतका प्रभावी इंटरव्यूह तिने दिला होता .. आणि काम तर ती निरपेक्ष पणे करतच होती त्यामुळे अवॉर्ड मिळण्याची दाट शक्यता होती ..
मिटिंग मध्ये होस्ट बोलू लागला ..
" लेडीज अँड जण्टलमन .. एव्हरी इअर विई अनाऊन्स वन वर्ल्ड बेस्ट टीचर .. धिस इज व्हेरी प्रेस्टीजिअस अवॉर्ड .. इट गिव्हज रेकग्निशन अँड सपोर्ट टू द टीचर हू इज वर्किंग अँड फायटिंग फॉर एडुकेशन .. एडुकेशन इज नेसेसरी अँड एव्हरी स्टुडन्ट शुड गेट इट .. बट स्टील ऑल अराऊंड वर्ल्ड सम पार्ट ऑफ द एव्हरी कन्ट्री इज अन प्रिव्हिलेज टू गेट द बेसिक नीड दयाट इज एडुकेशन.. हैविंग फेथ इन ह्युमॅनिटी गॉड ह्युज क्रीएटेड टीचर .. अ टीचर स्पेन्डस हिज लाईफ इन क्रिएटिन्ग जनरेशन्स ..
बट लेडीज अँड जण्टलमन देअर आर टीचर हू इज वर्किंग अँड फायटिंग फॉर एडुकेशन विथ आऊट हैविंग रिसोर्सेस ,
दे इव्हन डोन्ट गेट सॅलरी इंस्टेंड दे ह्याव टू स्पेंड मनी फ्रॉम देअर पॉकेट .. दे ह्याव टू कन्व्हिन्स पेरेंट्स as वेल as स्टुडंट्स टू गेट एडुकेशन .. दे ह्याव टू फाईट विथ सिस्टम अँड कस्टम ऑफ सोसायटी .. गर्ल चाईल्ड अँड बॉय चाईल्ड बोथ आर सेम अँड शुड गेट चान्स टू लर्न ..

धिस अवॉर्ड इज गिव्हन टू हॉनर बेस्ट टीचर .. टू सपोर्ट बेस्ट टीचर . टू हेल्प दयाट बेस्ट टीचर टू अचिव्ह हिज टार्गेट अँड कंप्लिट हिज ड्रीम ..

लेडीज अँड जण्टलमन .. आय वूड लाईक टू टेल यु दयाट धिस अवॉर्ड कॅन्टेनस १० मिलिअन्स .. विच विल कन्व्हर्टेड इन रेस्पेक्टिव्ह विनर कंट्रीज करन्सी .. as आय मेंशन्ड धिस इज नॅशनल अवॉर्ड सो इट ह्याज रेकग्निशन अँड व्हॅल्यू ..

बराच वेळ तो बोलत होता .. त्याच्या संस्थेची माहिती सांगत होता .. गेले २० वर्ष हि संस्था काम करतेय .. आणि एडुकेशन साठी मदत करतेय .. मधेच स्पॉन्सरर ची नवे सांगत होता .. हा आवर्ड आज घोषित होईल आणि पुढल्या महिन्यात uk मध्ये मोठा सत्कार होईल आणि चेक विनर ला सोपण्यात येईल ..
गरिबी मुळे , पैशानं अभावी जर शिक्षण अडत असेल तर त्यांचे कार्य थांबू नये म्हणून या अवॉर्ड ला एक करोड इतकी रक्कम दिली जाते . हा पैसा योग्य माणसाच्या हातात जाऊन त्याचा वापर हा शिक्षणासाठीच झाला पाहिजे या साठी आम्ही एक पॅनल ठेवतो .. आणि त्या कॅन्डीडेट चा ३६० डिग्री इंटरव्यूह घेतो .. आणि जेव्हा खात्री होते कि हा टीचर फक्त आणि फक्त शिक्षणा साठीच काम करतोय तर अशा टीचर आम्ही हा वर्ल्ड बेस्ट टीचर हा पुरस्कार देऊन सत्कार करतो .. या टीचर ने दिलेले सजेशन्स शिक्षण क्षेत्रात राबवण्याचा प्रयत्न केला जातो ..
लेडीज अँड जण्टलमन हिअर आय डिक्लेअर विनर ऑफ धिस प्रेस्टीजिअस अवॉर्ड गोज टू इंडिया ... लेडीज अँड जण्टलमन व्यिई ह्याव गॉट worlds बेस्ट टीचर फॉर धिस इअर इज मिसेस निशिगंधा स्वराज .....
तसा स्वराज आणि जुलीन ने टाळ्या वाजवल्या .. निशी च्या स्टुडंट्स नि टाळ्या वाजवल्या .. सगळे एकदम खुश झाले ..
लगेच स्क्रीन वर निशी चा तो व्हिडीओ जो स्वराज ने केला होता तो रन झाला .. आणि आज अख्ख्या जगाला तो लाईव्ह टेलिकास्ट होत होता ... अख्खा जग निशी ला आज टिव्ही वर पाहत होते...
निशी मात्र उठून आत मध्ये गेली आणि बेड वर आडवी पडून राहिली .. या सगळ्याची तिला अपेक्षाही नव्हती आणि गरजच नव्हती
इकडे हरी भाऊंच्या मोबाईल वर कॉल येऊ लागले .. कारण आज ते आडगाव जिथे एस टी सुद्धा जात नाही तेच गाव आज इंटरनॅशनल टी व्ही वर झळकत होते ..आणि हरिभाऊ सरपंच असल्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट केला जात होता ..स्वराज खूप खुश झाला होता .. आता निशीला शाळा बांधायला कोणासमोर हात पसरायची गरज नाहीये .. एक करोड रुपये म्हणजे इथं पाहिजे ती ऍडव्हान्स टेकनॉलॉजी असलेली शाळा सुरु करता येऊ शकते .. निशी ने केलेल्या अपार कष्ठांचे आज चीज झाले होते .. मान , सन्मान , तर मिळालेच होता पण गाव , तिची शाळा आणि आता तिच्या शाळेतले विद्यार्थी सगळेच खुश होते ..
निशी इथे नाहीये म्हटल्यावर स्वराज आत आला
स्वराज " ए हॅलो ... बायको .. हे काय .. तू रडतेय "
निशी " स्वरू .. मला काहीच कळत नाहीये .. मला कोणी तरी अवॉर्ड द्यायला पाहिजे म्हणून मी हे काम नव्हते करत .. . "
स्वराज " अरे डार्लिंग .. माहितेय मला .. निरपेक्ष भावनेने तू करत होतीस म्हणूनच तुला हा अवॉर्ड मिळालाय .. आणि चांगलेच आहे ना त्यात रडायचं काय ? तुझ्या बाबांचे नाव .. जे कि तुझ्या त्या व्हिडीओ मध्ये आहे .. ते नाव आता अख्ख्या जगात माहित झालेय .. तू आणि तुझे बाबा जे काम निरपेक्ष भावनेने करत होतात ते काम आज जगाला कळलं आहे .. डार्लिंग आणि तुझ्या बरोबर माझे पण नाव जगात घेतले जातंय .. नुसता तुझा नवरा काय झालो .. तुने तो मुझे फेमस बना दिया यार "
तशी निशी खुद्कन हसली

🎭 Series Post

View all