निश्चय... नव दुर्गेचा.

अशी ही एक दुर्गा.


*निश्चय.. नवदुर्गांचा..!!


गावाकडचे दुष्काळी वातावरण बदलण्यास तयार नव्हते.नुसते कधीतरी परिस्थिती बदलेल म्हणून हातावर हात ठेवून ढगांमध्ये बघण्यात अर्थ नव्हता.म्हणून घरातील सर्वांच्या संगनमताने सरस्वती आणि तिचे पती.त्यांच्या दोन मुलांना म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी घेऊन शहरात आले.
बिकट परिस्थिती आणि भयंकर संकटे यातून मार्ग काढण्याचे एकमेव हत्यार म्हणजे अथक मेहनत आणि कष्ट करण्याची इच्छा व मनाची तयारी हेच होय....!!
सरस्वती आणि तिच्या पतीने शहरात येऊन आधी कुटुंबासाठी छत असावे म्हणून एका छान एरिया मध्ये दोन बैठ्या खोल्यांचे घर भाड्याने घेतले.आणि लागलेच मार्केटच्या रहदारीच्या भागामध्ये दोन हातगाडे व्यवस्थित बसतील अशी रिकामी शेडची जागा भाड्याने घेतली.
एका गाडीवर त्यांनी वडापाव सेंटर चालू केले.आणि चांगला जम बसू लागल्या नंतर दुसऱ्या गाडीवर नाश्ता न्याहरी चे कांदा पोहे,उपमा,इडली, डोसे,असे पदार्थ ठेवायला सुर वात केली.
दोघांचा स्वभाव, कष्टालूपणा, संवादातील गोडवा,आणि महत्वाचे म्हणजे ते बनवत असलेले रुचकर ,, स्वदिष्ट पदार्थ यामुळे त्यांचे नाव होऊ लागले.पैसाही मिळू लागला.आणि त्यांना गावाकडे सगळ्यांसाठी मदत म्हणून पैसे पाठवता येऊ लागले.
आता हळूहळू सगळे सुरळीत होईल गावाकडे असलेली शेती आणि दुष्काळामुळे शेतीवर असलेला कर्जाचा डोंगर उपसून काढता येईल अशी आशा त्यांच्या मनात मनात निर्माण झाली होती.

.......आणि अशातच 2019 साल उगवले.हे वर्ष संपता संपता कोरोनाने आपला विषारी विळखा जगाला मारण्यास सुर वात केली होती.लोकांना कोरोना म्हणजे नेमके काय आहे हे समजे पर्यंत 2020 वर्ष भयंकर वाईट परिस्थितीत सुरू झाले होते.नवीन वर्ष आले ..अन् आख्या जगाला लॉक डाऊन मध्ये कोंडून ठेवले.

सरस्वती अन् तिचे कुटुंब तरी यातून कसे सुटणार होते.हे वर्ष संपता संपता अनेक कुटुंबे पूर्ण पने उध्वस्त झाली.मृत्यू चा एवढा भयानक आकांड तांडव थयथयाट मानवाने कधी न बघितला असेल ,ना कधी कल्पना करवली असेल....
सरस्वती च्या छोट्या कुटुंबाला ही या अत्यंत बिकट परिस्थितीतून जावे लागले होते.लॉक डाऊन मूले रोजची कमाई बंद झाल्याने अचानक आलेल्या परिस्थितीतून पार निघण्यासाठी उधारी,कर्ज,व्याज ,असे प्रकार करावे लागत होते.
एव्हढे कमी होते की काय म्हणून अजून एक महा भयंकर संकट सरस्वतीच्या कुटुंबावर आले होते.त्या दोघा पती पत्नी ला कोरोणाने त्याच्या विषारी विळख्यात पकडले होते.आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे मुलांचा.लहान शाळेत शिकणारी मुले त्यांना कोण बघणार होते.म्हणून तातडीने सरस्वतीचे कुटुंब परत गावी आले होते.
गावी आल्यावर सरस्वतीच्या पतीची तब्येत अजूनच खराब झाली होती.आणि काही समजण्याच्या

आतच त्याने प्राण सोडलेही होते.
.सरस्वती मात्र कसे तरी करून कोरोणा वर मात करू शकली होती.....
....पण ही मृत्यूवर केलेली मात,तिला जिवनाच्या अती भयंकर अग्निकुंडात ढकलल्यासारखी वाटू लागली होती.पतीच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या मनावर पडलेला दुःखाचा डोंगर ,तिला काही केल्या सोसवत नव्हता.
रडणे...आणि नुसते रडणे....रोज नी रोज.....नुसते दुःख ,आणि दुःखी मन....
असेच तीनेक महिने होऊन गेले,पण सरस्वतीच्या डोळ्यातून दुःखाची दरी ओसंडून वाहत च होती ,या दुःखाच्या नदीने तिच्या सुखी संसाराला दुःखाच्या न संपणाऱ्या सागराला कायमचे आपले केले होते.तिला एकटीला उर्वरित आयुष्य कंठताच येणार नाही.अशी तिच्या मनाने तिला पक्की ग्वाही दिली होती.

मुख्य प्रश्न होता तो तिच्या दोन लहान मुलांचा .....
त्यांच्यासाठी तिला जगावे तर लागणारच होते...
त्यांच्या साठी तिला ह्या दुःखाच्या महा सागरातून पार व्हावेच लागनार होते....

बाहेरची परिस्थिती हळू हळू निवळत चालली होती. टप्प्या टप्प्याने लॉक डाऊन शिथिल होत चालले होते.मुलांची शिक्षणाचा प्रश्न होता.तिला परत शहरात यावेच लागणार होते.आणि तिने निश्चय केला ...
शेवटी स्वतहानेच स्वतःचे मनाला धमकावले...
समजावले....आणि आहे ते सत्य आहे,ते स्वीकारण्यास भाग पाडले....

* काय होता सरस्वतीचा निश्चय...!!!*

सरस्वती यापुढे कधी ही त्या दोघा पती पत्नीने सुरू केलेल्या व्यवसायात पडणार नाही.परत वाडा पाव सेंटर सुरू करणार नाही.परत नाष्टाचे कांदा पोहे, उपमा, इडली, डोसा,बनवणे,पार्सल देणे सुरू करणार नाही.....!
होते नव्हते ते .आणि जो शिल्लक राहिला होता तो पैसा.तिच्याकडे राहिलेला एकादा दुसरा दागिना तिने विकून लॉक डाऊन मध्ये झालेले कर्ज,घेतलेली उधारी,सर्व चुकती केली.
मागील काही वर्षा मध्ये सरस्वती आणि तिचा पती शहरात आल्या नंतर त्यांचा दिवस पहाटे साडेचार पाच ला सुरू व्हायचा.मुलांचे आणि स्वतःचे करून साडेआठ नऊ पर्यंत त्यांचे वडापाव सेंटर सुरू व्हायचे.अतिशय हसत मुखाने,दोघेही प्रत्येक काम समसमान वाटून विभागून करायचे.खुप नम्रतेने गोडव्याने प्रत्येक गिऱ्हाईक ला त्यांच्या हाताने बनवलेल्या पदार्थ मधून प्रसन्न करायचे.दिवसभर प्रत्येक क्षणाला ते दोघे सोबत असायचे .कच्चा मालं खरेदीपासून ते पदार्थ विक्री पर्यंत आणि नंतर चे जमा खर्चाचे हिशोब दोघे मिळून एक जीवने करायचे.....

......आणि म्हणूनच सरस्वतीचे तो कठीण निश्चय केला होता...मुलांच्या भवितव्यासाठी , स्वतःचे आरोग्य जपनेसाठी,पतीची आठवण तिला दडपून टाकायची होती.उर्वरित जीवन  कंठण्यासाठी ह्या महान दुःखातून तिने बाहेर येण्याचा हाच पर्याय शोधला होता.
सरस्वती आता तब्बल एक वर्ष नंतर परत एकदा तिच्या दोन मुलं घेऊन शहरात आली होती.पण आता कधीही घरातून बाहेर ना जाण्याचा तिने निश्चय केला होता.म्हणून तिने घरातूनच खाना वळीचे डबे देण्यास सुरवात केली.घरातूनच ती कपडे शिलाईचे काम करू लागली.घरामधून ती दूध आणि भाजी पाला,फळे,विकण्यास सुरू केले.हळू हळू तिला मोठ्या टेलरचे कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले.हर प्रकारे ,तिला जे सुचेल,जे जमेल ,ते कष्ट करण्यास तयार होती.आणि ते ही घराच्या चार भिंतींच्या आतूनच....!!
अर्थातच गावाकडचे नातीगोती ,येणे जाणे ,दर रोज फोन वर विचार पुस करत असायची.
अशा पद्धतीने 2021 कधी गेले ते ही समजले नाही.आणि आज 2022 मध्ये सरस्वती एकट्याने तिचं विश्व उभं करत आहे...मुलांना शिकवत आहे ...
त्यांच्या सोबत ती तिच्या जीवनाकडे यशस्वी होऊन दाखवण्याचा प्रयत्नात सफल होत आहे...!
* सरस्वती ,एक अशी नव दुर्गा आहे...जिच्या मध्ये देवी दुर्गेचा वास आहे...जीच्य मध्ये नारी शक्ती आहे...जी कधीही...कोणत्याही परिस्थितीवर मात करून दाखवण्यास समर्थ आहे...जिच्य मध्ये कमालीचा संयम आणि सामंजस्य आहे...स्वतःचे शील आणि स्वतःचे मुल यांचे रक्षण करण्यास ती सदैव सज्ज आहे
. * पार्वती..* ही एक मध्यम वयीन गृहिणी आहे.बऱ्यापैकी शिक्षित ,सुसंस्कारित,फक्त कुटुंबासाठी आयुष्य खर्च केले होते.
पार्वती तिचा पती,आणि मुलगा,इतकेच तीच विश्व होते.पती एक उच्च शिक्षित आणि चांगला नोकरदार असून स्वतःची छोटी कंपनी सुरू केली होती .यामुळे इतरांसारखे तो ही पुरुषी अहंकार ग्रस्त होता.आपण एव्हढे जास्त कमावतो तर पत्नीला बाहेर जाण्याची आणि काही कमवण्याची काय गरज,असे त्याला वाटायचे.म्हणून लग्नानंतर चे पूर्ण वीस वर्षे पार्वतीला कधीही घरा बाहेर जाऊ दिले नाही.
लग्नाआधीच वीस वर्षे शिक्षण आणि सुखा लाडात गेले होते,अन् लग्नानंतर चे वीस वर्षे पार्वती जणू काय संसाराच्या सोन्याच्या पिंजऱ्यात कैद होती.
म्हणतात ना ,पुस्तकी अनुभव हे न अनुभवता मिळाले ले शिक्षक असतात.त्याप्रमाणे तिचे आयुष्य घडले गेले होते.
पार्वतीला लागणारे कपडे लत्ते,गरजेच्या वस्तूही तिचा पती तिला घरात आणून द्यायचा.
मनुष्याच्या जीवना मध्ये परिस्थिती सदैव एक सारखी कधीच राहत नाही.असा मनुष्यच आगळा असावा ,की त्याच्या आयुष्या मध्ये ," टर्निंग पॉईंट,"आलाच नसावा.
विशेष करून प्रत्येक स्त्रिच्या जीवनामध्ये एखादा तरी प्रसंग असा येतो की,तेव्हा तिला तिच्यातल्या स्वआ स्तीवतची जाणीव होते.ती मनाने नेहमीच सबला असते...फक्त नियतीने तिला त्यासाठी प्रवृत्त करावे लागते...!!
इतर हजारो लोकांच्या प्रमाणे ,महामारीचे निमित्त झाले,आणि पार्वतीचे जीवनाला ही एक वेगळीच कलाटणी मिळाली.तिच्या पती ची नोकरी गेली,वाढत चाललेल्या लॉक डाऊन मुळे त्याने सुरू केलेली कंपनीही बंद पडली.त्याच्या तल्या अहंकाराला हे सहन झाले नाही.भविष्यात पुढे काय होईल,याचा धसका त्याने घेतला.तो आजारी पडला.त्याचा आजार वाढतच गेला.आणि एके दिवशी त्याला अर्धांग वायूचा झटका आला.त्याचे अर्धे शरीर हालचाल करण्याचे बंद झाले.बोलता येईना,सर्व दैनंदिन कामे आराम खुर्चीवर बसून च करायला भाग पडले.आणि त्याचेच जीवन दुसऱ्यांवर अवलंबून झाले.
पार्वती आणि तिचा मुलगा ही सुखाच्या अंधाऱ्या छायेत सुखाचा मार्ग शोधू लागले.आणि तो मिळाला ही.पार्वतीने तिच्या मुलाला ,त्याचे लग्न करून टाकण्यास सांगितले.त्यामुळे घरात वेगळे वातावरण निर्माण होईल असे तिला वाटले होते.
ते ही खरेच होते.पाहिले वाहिले नऊ नव्हलीचे दिवस छान आनंदात गेले.जस जसे दिवस जाऊ लागले नवीन आलेली सून च तिच्यावर अपमानाचा पायंडा बसवायला लागली. छोटी छोटी करणे शोधून पार्वतीला खिजवण्याची,कमीपणा दाखवण्याची, असहायते पुढे नत मस्तक होण्याची......
....घरातील कलुशीत वातावरण मध्ये स्त्रियांची मानसिक स्तिथी ही विस्कल्यासारखी होते.असेच एक दिवस पार्वती स्वतःचे दुःखद जीवन प्रवासाच्या आठवणी मध्ये भूत काळात पोहचली होती.आणि तेव्हढ्यात गॅस वर गरम करायला ठेवलेले दूध भरकन..उतू..गेले..!
..... इतकसे कारणही पार्वतीच्या सुनेला बस झाले होते...
" कोण कमावणारे,आणि कोण उधळणार,हे दिसतंय की.आता पप्पा कमवत होते ,तेव्हाचे दिवस राहिले नाहीत.त्यांची नोकरी गेली आणि कंपनीही बंद पडली आहे.घरात बसून कमीत कमी विनाकारणच खर्च तरी वाढवू नका.....""
असले अतिशय अपमांस्पद शब्द सुनेच्या तोंडून फटाफट बाहेर पडत होते.विचार ही ना करता ,नालस्ती करणे हाच त्या बोळण्यामागचा उद्देश होता.
त्या रात्र भर पार्वतीला झोप आली नाही.संपूर्ण गत आयुष्याचा चित्र पट नुसता नजरेसमोर सारखा रिवाइंड होऊन परत परत फिरतोय असे वाटत होते.
इतक्याश्या छोट्या कारना वरून सुनेने एव्हढे सूनवले.उद्या आणखी काय काय अभद्र सूनवेल...???
पार्वती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ते मनोमन निर्धार करून पक्का ," निश्चय " करूनच उठली होती.....
* काय होता पार्वतीचा निश्चय...!!*

पार्वतीने ठरवले होते की,इथून पुढे घरात बसायचे नाही...
आपल्या नवऱ्याची बंद पडलेली कंपनी परत चालू करायची....
घर सोडायचे......
बाहेरच्या जगाशी समरस व्हायचे....
काहीतरी कर्तुत्व करून दाखवायचे...
इतके दिवस सगळे घरात बसून मिळत होते,आता जे पाहिजे ते स्वतः कमवायचे.....!!!!
पार्वतीने तिचा निर्णय पतीला,मुलाला,सुनेला सांगितला.
पार्वतीचा निश्चय ऐकून सर्व आचंबित झाले होते.
"" पण आई,हे तू कसे करणार ,अग साधा प्रवास ही तुला एकटीला करता येत नाही.बंद पडलेली कंपनी कशी चालू करणार...???""
मुलाच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे ते तिने ठरवून च ठेवले होते.
"* जसे मी तुला शाळेसाठी प्रायव्हेट रिक्षा लावली होती ना.तशी आता माझ्या येण्या जाण्यासाठी लावणार.जाणे येणे महत्त्वाचे आहे मग ते रिक्षाने असो वा कसेही...आणि पतीला दिवसभर सांभाळण्यासाठी मदतनीस ठेवणार....!!""
तिथून पुढे पार्वतीने स्वतःसाठी प्रायव्हेट रिक्षा येण्या जाण्यासाठी लावली.रोज कंपनीवर जाऊन व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू केला.हळू हळू कामा मधले बारकावे तिला समजू लागले.कामगार संख्या एका वरून चालू करून दहा वर नेली.आणि स्वतःचे हरवलेले अस्तित्व तिनं नव्याने शोधून काढले.
एकच जीवनात अनेक नाती नीभवणारी स्त्री,त्याच जीवना मध्ये दुसरे समाजाला दिसणारे अस्तित्व ही जगू शकते.
आज सरस्वती प्रमाणे पार्वती ही आजची एक नवदुर्गा आहे.जी आयुष्यभर स्वतहाला घराच्या चार भिंती मध्ये सुरक्षित समजत होती.तीच आज घरा बाहेरचे विस्तृत जग स्वतःचे हिमतीने आणि आत्मिक शक्तीने हाताळत आहे.
तिच्या मध्येही न दिसणारी लुप्त अशी नारीशक्ती होतीच.
त्या शक्तीने तिने ,तिच्या सारख्या अनेक स्त्रियांना नव चैतन्य देण्याचे ,उदाहरण दाखवून दिले आहे.
आपल्या सभोवताली ,आपल्या आसपास अशा कितीतरी नवदुर्गा आपल्याला दिसून येतील जर आपण त्यांच्या कडे आपल्यात असणाऱ्या नवं दृष्टीकोनातून बघितले तर...!!!!!

घट स्थापना किंवा नवरात्रोत्सव .या नऊ दिवसांचे एक वेगळे महत्व आहे.
नव दुर्गा देवीचे नऊ रूपांचे प्रत्येकी चे वैशिष्ट्य आहे.
शैलपुत्री... निर्धारी.
ब्रम्हाचारीनी....सामर्थ्यशाली.
चंद्र घंटा....खंबिरता.
कुष्मांडा....अस्तित्व.
स्कंदमाता...निरागसता.
कात्यायनी....मातृत्व.
कालरात्री.... कार्य क्षमता.
महागौरी....विद्वत्ता.
सिद्धी रात्री...बुध्दी आणि दृष्टी.

* आजही प्रत्येक स्त्री मध्ये ही अशा प्रकारची नवं दुर्गेची वैशिष्ठे दिसून येतात.
तुम्हालाही अशा दुर्गा दिसतील ,ज्या आपल्या अगदी आसपासच असतात.
" सरस्वती आणि पार्वती ," या आहेत मला दिसलेल्या आजच्या दुर्गा....!!*