निसर्ग फुलोरा

निसर्ग फुलोरा


*निसर्ग फुलोरा*

निळसर नभ पसरले
छत्र धरुनी आकाशी.
गर्द हिरवळ दाटूनी
धरणीमाता काढते नक्षी..

उंच पहाडी द-या खो-यातून
मंजुळ धुंदित गुंजतो नाद.
झुळूझुळू वाहत वारा गातो
घालूनी निसर्गाला साद..

पाने फुले दवात न्हाऊनी
भल्या पहाटे सडा शिंपिती.
फेर धरत भ्रमर करुनी
तालासुरात पक्षी गाती..

इंद्रधनुची ललाट रेषा
उधळती मधुर रंग बहार.
ऊन्ह, वारा, पावसांनी
नटते सजते खुलूनी शिवार..

शांत प्रवाह सरितेचा
वाहतो जीवन जल खळखळ
फुलवितो फुलोरा निसर्ग
लेवुनी नक्षत्रंची हिरवळ..
---------------

सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all