मन गहिवरून आले, निरोप तुला देतांना
सांगायचे आहे काही, ऐक जरा जातांना.
न भुतो न भविष्यती, असा अनुभव तू दिला
चाकोरीबाहेर जगण्याचा, मार्ग ही दाखविला.
दुरावले काही कायमचे, काही अधिक जवळ आले,
प्रश्न हा प्रत्येकाचा, काय कमावले? काय गमावले?
कळत होते पण वळत नव्हते, असे होते काही,
तू ठासून सांगितले, जगण्याची करा आता घाई.
लोक लावू देत बोल तुला, तेच असे काम त्यांचे
तुझ्या हाती नाही काही, तरी चोख केलेस तू काम तुझे.
आज आहे उद्या नाही, जाणवून दिले प्रत्येकाला
तारून नेले, मी तुला? की तू मला?
मोनाली पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा