निर्णय भाग १

Tragedy Of A Girl

कथेचे नाव-निर्णय

कॅटेगिरी- राज्यस्तरीय कथा मालिका

सब कॅटेगिरी-कौटुंबिक कथा

टीम-अमरावती




            शामल..,.... रंग तिचा काहीसा शामलच.. वर्णाने सावळी असली तरी व्यक्तिमत्व काहीसं धडाडीचे...

नाकी डोळी नीट! अशी ही शामल!!!

ही लहानपणापासूनच खोडकर....

       एकदा शाळेत ती सातवीत असताना वर्ग सुरू होता! शिक्षक गणिताचा तास घेत होते. वर्गातील विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेली उदाहरणं सोडवित होते.

            शामलने उदाहरण सोडवायला घेतलं. पण तिला ते काही केल्या जमेना!! तिने शिक्षकांना ते उदाहरण बोर्डवर समजावून देण्याची विनंती केली. सर्व मुलांचे लक्ष बोर्ड कडे, शिक्षक काय समजावून सांगतात त्याकडे.... पण हीच लक्ष च बोर्ड कडे नव्हतं! तिचं लक्ष होतं बिळात जाणाऱ्या उंदराकडे!!

         शिक्षकांनी विचारलं , सांग शामल या उदाहरणात खाली किती शिल्लक राहिले?

          शामल एकदम उच्चारली.... सर फक्त शेपूट शिल्लक राहिले.... आणि वर्गात एकच हशा पिकला..

          अशी ही शामल! बघता बघता बारावी उत्तीर्ण करून पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं. आणि तिच्या आई वडिलांना वेध लागले तिच्या लग्नाचे......

          आई वडील कितीही पुरोगामी असले तरी त्यांना मुलीच्या लग्नाची काळजी असतेच. त्यातून तिला पाठच्या दोन बहिणी होत्या.... त्यामुळे तिच्या लग्नासाठीची हीच वेळ होती..

          वर संशोधन सुरू झालं........ ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या ओळखी मधून काही मुलांची पाहणी केली. कधी मुलीला मुलाकडे पाहायला घेऊन जाणे तर कधी मुलांकडील मंडळी हिला पाहायला घरी येणे... असा ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला. पाहाणी पाहणीत चार वर्षे उलटून गेलीत. मुलांकडच्यांचा होकार आलाच नाही..

        आज काल मुलांना मुलगी नाजूक, गोरी आणि कमावती असावी असे वाटते. पण अशा या मुलांकडच्या अटींमुळे शामल आणि तिचे आई वडील त्रस्त होऊन गेलेत. काय करावे त्यांना काही सुचेना!!!!

         अशातच शामलने एका वधू वर सूचक मंडळाचा पत्ता घेतला. आणि तिथे लग्नाबाबत ची नोंदणी केली. फॉर्म भरला. फोटो सुद्धा दिला.

       काही दिवसांनी तिला तिच्या नंबर वर कॉल आला. एका मुलाने तिला तिचा फोटो पाहून मागणी घातली. तो म्हणाला, की मला तू आवडली आहेस. पण मी ओमान ला राहतो. माझे नातेवाईक तुमच्या जिल्ह्यात राहतात. त्यांच्याकडे माझ्या विषयीची खात्री करून घ्या.. त्याने नातेवाईकांचा पत्ता दिला.

       शामलने त्याच्या नातेवाईकांकडे त्याची नात्यात असण्यासंबंधीची खात्री केली. त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा प्रतिसाद दिला.

        तिला वाटले, चला आयतच परदेशातलं स्थळ चालून आलं. तिच्या आई-वडिलांनी सुद्धा तिला संमती दिली. त्याने तिला फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने सुद्धा ती सहज स्वीकारली.. दोघांचे संवाद सुरू झाले. त्याचं तू मला आवडतेस वगैरे.........

        असे संवाद सुरू असताना, लग्नाची बोलणी करायला त्याला फोन करून बोलावण्यात आले. परंतु त्याने कामा चे निमित्य करून ते टाळलं.

      आपल्या नातेवाईकां च्या मदतीने सर्व बोलणे करून घ्या मला काही नको.....

        मला फक्त आपली भारतीय मुलगी हवी आहे. ओमानला फक्त मी नोकरी निमित्त आहे. लग्नानंतर शामल ला घेऊन तिकडे जाणार, अशी बतावणी करून विश्वास संपादन केला.

      शामल तर हवेतच तरंगायला लागली. की मला परदेशात जायला मिळणार!! तिच्या आई वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला. त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. आई वडील थोडे सुखा वस्तू असल्यामुळे त्यांनी शामलच्या लग्नात कोणतीही कसूर ठेवली नाही.

         वर मुलगा लग्नाच्या दोन दिवस आधी लग्नासाठी मुक्कामी आला. त्याने आपले लग्नाचे कपडे सर्व स्वतः घेतले होते. पैसे मात्र शामलच्या वडिलांकडून उकळले...

           लग्नात आई-वडिलांसकट सर्व नातेवाईकांनी मिरवून घेतलं. श्यामला दागिन्यांच्या स्वरूपा त स्त्रीधन देण्यात आलं...

      लग्न धुमधडाक्यात पार पडलं. लग्नात मुलाचं वर्तन तिच्या मैत्रिणींना खटकलं. कारण कितीही झालं तरी मुलींना निसर्गानेच सिक्स सेन्स दिलेला असतो. तिच्या मैत्रिणी कुजबूज करू लागल्या... हीच काही खरं दिसत नाही,.. तिला पण ते जाणवलं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.. कारण पाहता क्षणी च तो इतरांवर छाप पाडेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं.

त्यामुळे शामल त्याच्यावर पूर्णपणे भाळली....

लग्न सुरळीत पार पडलं. त्याच्याकडील नातेवाईकांनी सुद्धा लग्नात मजा करून घेतली. मानपान करून घेतला.

     नवरी नवरदेवाच्या घरी आली. म्हणजे त्याच्या नात्यातल्या काकूंकडे... तेथेही यथा सांग कार्यक्रम पार पडला... नवरी म्हणजे शामल ला सगळं काही ठीक वाटलं. नवरीने घरी येऊन सांगितलं, छान आहे सगळं!!!!!

नवरीची पाठवणी झाली.........

       लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याचा खरा चेहरा समोर आला. त्याचं मध्य धुंद अवस्थेत बोलणं..... तिला मारहाण करणं, असं त्याचं विकृत रूप शामल ला नवीन होतं. दुसऱ्या दिवशी तिने त्याच्या काकूंना सर्व हकीगत सांगितली.. हे असं कसं याचं रूप...... हे रूप तर काही वेगळेच आहे.........

         त्याच्या काकूंनी तिचं सांत्वन करण्याचं नाटक करी त तिला म्हणाली, अगं असं असतं च.. मुलगा थोडा मद्य प्यायला तर त्यात काय एवढं!!!! आजकाल असं चालतं की!!

      तिने सुद्धा मनाला सावरलं.. की असेल तसे, तसा तर तो सकाळी आपल्याशी चांगलं वागतो......

       चार दिवस गेले. रोज तिची अवस्था तीच...... तिने मनाशी काहीतरी निश्चय केला. कारण अशावेळी स्त्रियांना वेगळच बळ येत असतं... तिने हळूहळू आपले सर्व दागिने, कपडे बॅग मध्ये भरले. आणि दोन दिवस आईकडे जाते आणि येथे परत! असं म्हणून ती स्वतःची बॅग घेऊन आईकडे आली...आसव लाटांनी भरून आलेलं तिचं मन ती आईजवळ नितांत मोकळी करती झाली..... तिने सर्व वृत्तांत आई-वडिलांना सांगितला..

आई वडील आणि ती सर्वांनी मिळून आता मुलाकडे जायचे नाही यावर ते ठाम राहिले... आपण कसे फसलो, हे सर्व माझ्यामुळे झाले म्हणून शामल खूप रडायला लागली.. वडील बिचारे पार खचून गेले. लग्नात झालेला एवढा मोठा खर्च पूर्णपणे वाहून गेला.. त्याहीपेक्षा त्यांच्या डोळ्यात आसवांचा महापूर आला.......


       पुढे कथेत काय होईल हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा निर्णय भाग 2 


छाया राऊत बर्वे

टीम- अमरावती


https://www.facebook.com/581606972323826/posts/pfbid03WZqWuawVYVUay7BG9awyyJwpWNJTo9SX4xpy18gtDhbpfPjcumpZLDs1tM2xwUMl/?sfnsn=wiwspwa

🎭 Series Post

View all