निर्णय भाग 2

Tragedy Of A Girl

कथा-निर्णय भाग2

सब कॅटेगरी - कौटुंबिक कथा

टीम-अमरावती


         श्यामल ही तशी खूपच कणखर मनाची. तिचा तसा स्वभावच लहानपणापासून धडाडीचा. कोणत्याही प्रसंगातून मार्ग काढण्याचा. आई वडिलांना सुद्धा तिने खचू दिले नाही,.. तर धीर दिला. स्वतः सुद्धा खचली नाही.


        तिच्या संसारासाठी तिने किती गोड स्वप्न रंगवली होती!! परदेशातला नवरा मिळाला म्हणून ती आपल्या मैत्रिणींमध्ये तोरा मिरवीत होती. तिच्या आई वडील सुद्धा परदेशात ला जावई मिळाला म्हणून सर्वांना तिचे कौतुक सांगत फिरत होते... पण शेवटी तिच्या रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला..

      तो मुलगा ओमानला एकटाच पळून गेला. कारण शामल नी पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दाखल केलेली होती. तिने तिचे सर्व दागिने आधीच सोबत आणलेले होते. परंतु बाकीचे जे की तिचं स्त्री धन आई वडिलांकडून तिला दिल्या गेल्या होतं, ते तिने महिला समुपदेशन केंद्रामार्फत परत मिळवलं..

          त्या मुलाने तिला स्वतःचा पासपोर्ट तयार करायला तिला आधीच सांगितलेला होता. त्यात त्याचा वेगळाच डाव होता........ तिचा पासपोर्ट तयार करण्यात थोडा वेळ गेला म्हणून बरं झालं.. तेवढ्या दिवसात त्याचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आला. ही जर त्याच्यासोबत गेली असती, तर पुढे तिचं काय झालं असतं ही कल्पनाच नाव केलेली बरी..........


           शामल ने आता नव आयुष्य जगायला सुरुवात केली. कारण मागे गेलेल्या आयुष्याचं दुःख करीत बसणं हे तिच्या स्वभावात नव्हतं. तिच्या पाठच्या बहिणीच्या लग्नाची सुद्धा तयारी करायची होती.
तिची बहीण तिच्यापेक्षा दोन वर्षांनी व लहान बहीण तीन वर्षांनी लहान होत्या. लहानीला सध्या लग्नाला पुष्कळ वेळ होता.

तिच्या पाठच्या बहिणीचं लग्न उरकवणे आता तिच्या वडिलांचं प्रथम कर्तव्य होतं.

काय ग शामल ताई, माझी मुळात लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. तिची बहीण सोनल तिला म्हणाली.. कारण तुझ्या लग्नाची झालेली अशी परवड आणि आई-बाबांचं मनातल्या मनात चाललेलं रुदन मला बघवत नाही ग!! आणि ताई हे बघ! मुळात अरेंज लग्न करूनच संसार सुखाचा होतो का?
शामल तिचं बोलणं ऐकून एकदम चपापली. का ग!! अशी का बोलतेस? तुझं प्रेम आहे का कुणासोबत?? अगं हळू बोल! कुणी ऐकेल... सोनल शामल ला म्हणाली.. आणि तिने तिच्या तोंडावर हात ठेवला! सोनलने शामलला खुर्चीवर बसवलं. व तीही तिच्याजवळ बसत बोलती झाली.. ऐक ताई! माझ्याच कॉलेजमध्ये इंजीनियरिंग ला एकाच फॅकल्टी त शिकणारे आम्ही दोघं म्हणजे सुमित हा चांगला मुलगा आहे. तो आता स्वतः त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळणार आहे. तेव्हा मला वाटते की मी माझ्या भावी आयुष्यात त्याच्याबरोबर सुखात असे न


ही गोष्ट शामल नाही आई-वडिलांना पटवून सांगितली. की सोनलचा ठाम निश्चय आहे ती सुमित सोबतच लग्न करेन. आई वडिलांनी विचार केला की मोठ्या मुलीचा संसार क्षणात कोलमडला... तर हिच्या आयुष्यात आपण का ढवळाढवळ करावी??? त्यामुळे त्यांनी आनंदाने सोनलचे लग्न सुमित सोबत लावून दिले..

आता शामलचं विचार चक्र फिरू लागलं.... आपल्यापेक्षा लहान असलेल्या सोनल ने स्वतःच आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर केलं. आणि आपण एवढं धडाडीचे असूनही मनाने मात्र खूप संवेदनशील राहिलो. आई वडील, व इतर नातेवाईक यांचा विचार केला...

आता आपण मागे राहणं बरोबर नाही. आपल्या आयुष्याचे आपण स्वतः च मार्ग काढणं गरजेचं आहे. तिने आपल्या मनातले सर्व नकारात्मक विचार बाजूला सारले.
तसंही सकारात्मक विचार व कृतिशीलता ही माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात असा अनुभव आहे..
तिच्या विचारांची , भावनांची झालेली तगमग तिने सर्व एका झटक्यात दूर सारले.
तिने बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी पाय पिट केली. आणि ते कुटुंब तालुकास्तरावर राहत असल्यामुळे, तिला जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीसाठी जाणे फार अवघड होते. पण कसंही करून स्वतःच्या पायावर उभे राहणं गरजेचं होतं.

तिला तशी संधी फुलपाखरासारखी हवेत फेर धरत, भिरभिरत चालून आली.
तिला जिल्हास्तरावर एक कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी मिळाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
वादळात सापडलेल्या प्रचंड लाटांवर हेलकावे खाणार तिचं आयुष्य मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आल..

तिच्या आईला तर तिची खूपच चिंता वाटत होती. तिचं कसं होणार??? हा सारखा ध्यास तिच्या आईने घेतला होता. प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलीचा आयुष्य सदाफुली सारखं सदैव बहरणार असावं....
संकट कितीही आली तरी त्यातून मार्ग काढणार असावं

तिने ही बातमी आईला सांगितली. आईला खूप आनंद झाला. वडिलांनी सुद्धा होकार दिला. तस तिला आणखी बळ आलं..

तिने जॉब साठी ची तयारी सुरू केली. सोबत मदतीला असावं म्हणून तिथे बाजूलाच राहणाऱ्या मानलेल्या काकांच्या मुलीला सोबत घेतलं. तिला जिल्हास्तरावरच्या जवळच्या कॉलेजला प्रवेश घेऊन दिला.. दोघेही एकाच खोलीत राहायला लागल्या. जेवणाचा डबा लावून घेतला. तिने ज्या संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर ची नोकरी पत्करली त्या ठिकाणी ती रुजू झाली...

पहिल्याच दिवशी तिला आपलं शरीर हवेत असल्या गत हलकं हलकं वाटायला लागलं. तिचं मन तर अगदी थुई थुई नाचायला लागल.
मोर पावसाच्या मेघांना पाहून जसा आपला पिसारा फुलवतो गोल गिरकी घेतो तशी तिने गोल गिरकी घेतली.. रूमवर येऊन निवांत पडली. तिची चुलत बहीण स्नेहल सुद्धा कॉलेजमधून आलेली होती.. दोघेही निवांत पडल्या...
हळूहळू दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाल्या.

स्नेहल कॉलेजमध्ये खुश होती. तर शामल आपल्या जॉब मध्ये.. दोघींचंही भावविश्व वेगळच.....
परंतु शामल ही तशी नव्हती. तिच्या एकाच अनुभवातून तिने चांगला धडा घेतला होता.
म्हणतात ना!! खुरट्या झाडाला लवकरच फुले येतात!!!
तसेच!!!!

शामलला स्नेहल ची काळजी होती. हिने कॉलेजमध्ये काही लफडं केलं तर!!
झालं ही तसंच! स्नेहल एका मुलाच्या प्रेमात पडली. आणि त्यांची प्रेमाची नाटकं सुरू झाली. व्हेरी व्हेरी रूमवर येणे, बाहेरचे खाणे, खानावळ इथला डबा तसाच ठेवणे...... वगैरे..
तिचं लक्षण काही ठीक नव्हतं. आपण पुढे शिकण्यासाठी येथे आलो आहे हेही ती विसरली.

तसंही विचार शून्यता ही आजच्या पिढीची सार्वजनिक आपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही...

स्नेहलचं असं वागणं शामल ला खटकायला लागलं.. तिने लगेच निर्णय घेतला. प्रकरण तिने तिच्या वडिलांना कळवलं..

छायाताई तुम्ही केव्हा आल्या.?बरोबर बरोबर बरोबर!किती वाजता येणार आहात हे सगळं उद्याचं पूर्ण भरून नंतर करायचं. आपल्याला आहे आपण ं

आणि शामल पुन्हा एकटी पडली........


शामल च पुढे काय होतं, हे हे पुढच्या भागात भाग तीन मध्ये वाचा.......

कथा आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा


टीम-अमरावती


🎭 Series Post

View all