Login

रहस्य कथा निर्दयी मन भाग ४

A Story About A Woman Who Killed Her Husband
निर्दयी मन भाग - ४

"रूपे! तुया मामा आला व! ये रे बस खुर्चीवर."
सरलाने त्याला बसायला जागा करून दिली.

"प्रशांत कुठे दिसत नाही. कुठे गेला? शाळेत गेला वाटते. दाजी कुठे आहेत?"
निलेशने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

"माया बाप गेला ढोरं चाराले अन् प्रशांत शाळेत गेला."
रूपाने मामाला सांगितले.

"अग रूपा, बापाला एकेरी नावाने बोलतेस! तुझे बाबा आहेत ना ते!"

"कायचा बाबा! त्याले बोलणं नाही समजत. कधी चांगलं प्रेमानं बोलत नाही तो मायाशी. फक्त तो प्रशांतशी चांगलं बोलते."

"बर! मी प्रशांतच्या शाळेत जातो त्याला भेटायला."

"अरे जेवण करून जानं."

"नाही आधी मी शाळेत जातो."
निलेशला त्याच्या भाच्याची, प्रशांतची खूप आठवण येत होती; म्हणून तो त्याला भेटायला आलेला होता. त्याला या सरलाचं प्रकरण काहीच माहित नव्हतं. तो सोपानराव सारख्या शांत व सोज्वळ माणसाचा आदर करीत होता. तो एका शाळेवर प्राध्यापक होता.
शाळेत गेल्यावर तो प्रथम मुख्याध्यापकाच्या कार्यालयात गेला. आपला परिचय दिल्यावर त्याने प्रशांतला बोलावयास सांगितलं. प्रशांत लगेच कार्यालयात आला.

मामाला बघितल्या बघितल्या त्याने मामाला मिठी मारली व तो स्पंदून स्पंदून रडायला लागला. मामाला हे अनपेक्षित होतं. त्याने प्रशांतला शांत केलं. मुख्याध्यापकांना हे प्रकरण माहित होतं, परंतु त्यांनी ते दर्शवू दिलं नाही.

"तुमचा भाचा खूप हुशार आहे. तो शांत शांत राहत असतो. कुणात  जास्त मिसळत नाही. त्याच्या मनात काहीतरी चालू असतं. परंतु तो तसा दाखवित नाही."
मुख्याध्यापकांनी निलेशला सांगितले. त्यांनी त्याच्या शिक्षिकेला सुद्धा कार्यालयात बोलाविले.
शिक्षिका आल्यावर प्रशांत रडायला लागला. शिक्षिकेने त्याला शांत केले. त्याच्या मामा जवळ त्याची खूप स्तुती केली.
"माझा लाडका विद्यार्थी आहे हा. घरच्या वातावरणामुळे याची मानसिकता थोडी ढासळली आहे. यातून तो बरा होईल, पण तुम्ही याचं शिक्षण अर्धवट सोडू नका. हा पुढे खूप शिकेल. फक्त याला चांगल्या वातावरणात ठेवा."

निलेश हे ऐकून बुचकळ्यात पडला. प्रशांतच रडणं, घरच्या वातावरणाचा ताण, नेमकं यातून काय सांगणं अपेक्षित आहे कोण जाणे!
तो भाच्याला भेटून तडक घरी आला. बहिणीला विचारणार, एवढ्यात सोपानराव आले. त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा करून वेळ मारून नेली. निलेशने सुद्धा जास्त खोलात न जाता निरोप घेतला.
रूपाने बापाला ताट वाढलं व स्वतः बाहेर निघून गेली. सरला सुद्धा घरात नव्हती. सोपानरावने जरा विश्रांती घेतली व ते सुद्धा बाहेर निघून गेले.

सुनील, सरला व रूपा, तिघेही घरात आले. तिघेही सोपानराव बाहेर जायची वाट पाहत होते. आज त्यांना एक योजना आखायची होती. तिघांनीही योजना तयार केली व ती अंमलात  कशी आणायची? कोणत्या वेळी व कोणत्या दिवशी? इत्यादीची सविस्तर माहिती सुनीलने दोघींना  दिली. रूपा आणि सरला दोघेही या योजनेत सामील झाल्या.

दुसऱ्या दिवशी सुनील सकाळीच सोपानरावच्या घरी आला. ते गोठा स्वच्छ करीत होते. तो गोठ्यात आला व म्हणाला,
"काय सोपानजी! काय म्हणते धंदा?"
ते मुकाट्याने शेण उकिरड्यावर टाकीत होते.

"मी काय म्हणतो सोपानजी, हा उकिरडा लहान झाला असं वाटत नाही काय? तुम्ही याच्या बाजूला जवळच दुसऱ्या उकिरड्यासाठी एक मोठा खड्डा खणून काढा. वाटलं तर मीही मदत करू लागतो म्हणजे हे शेण दुसऱ्या खड्ड्यात टाकता येईल. आणा द्या इकडं पावडं आणि घमेलं, पहा मी कसा देतो खड्डा करून. तुम्ही त्यातली माती उपसा. पहा आपण दोन दिवसात हा खड्डा मोठा करू."
सोपान रावांनी साधेपणाने हो म्हटले. सुनीलने खड्डा तयार करायला सुरुवात केली. सोपानरावांनी सुद्धा त्याला माती बाहेर काढण्यास मदत केली.

सरला व रूपा गोठ्यात आल्या.
"थांबा मामा! मी चहा करून आणतो. थकला असान तुम्ही ह्या खड्डा खोदून." रूपा म्हणाली तसे तिने लगबगिने घरात जाऊन चहा तयार करून आणला. दोघांनीही गोठ्यातच चहा घेतला. सोपानराव आपली कामे उरकून बाहेर पडले.

सुनील आणि सरला पुढे कोणती योजना आखणार पाहू या पुढील भागात

🎭 Series Post

View all