Jan 27, 2021
स्पर्धा

निराशेवर मात

Read Later
निराशेवर मात

निराशेवर मात ...

          ग्रामिण भाग हा आपल्या देशाचा चेहरा मोहरा आहे .ईथले जीवन हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे .अशाच ग्रामिण भागात लपलेली भावमुद्रा घेवून सुमन आपले जीवन जगत होती .एका गरीब शेतक-याची सुमन ही मुलगी ..अत्यंत देखणी व नैसर्गिक सौदर्याची खाण होती .जन्मताच तिला प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभली होती .आईवडिल शेतीतच कस्ता काढत होते .पण आपल्या एकलुत्या एक लेकीला त्यांनी जीवापाड सांभाळले होते .लहानपणाची सारे सुख देताना तिला मनावर ओरखडासुद्धा पडू दिला नाही ..मनसोक्त आनंद ती लुटत होती ... शाळेतही ती न चुकता जात होती ..शाळेतिल अभ्यास वेळच्यावेळी करत होती .बघता बघता तीची शाळा पुर्णत्वास आली होती ..शैक्षणिक क्षेत्रांत तीची चमक असुनही तिला गरीबीअभावी शिक्षण घेता येत नव्हते .पण त्याचा परिणाम तिने कधीच जाणवू दिला नाही ..हसतखेळत तिने प्रत्येक गोष्टीला  सामोरे जाताना ईतरावरही आपली छाप पाडली .आपल्या आईवडिलांना दैवत मानणाऱ्या सुमने कधीच कुठली गोष्ट लांछनास्पद केली नाही ..हा आदर्श जपणारी सुमन कधी मोठी झाली हे समजलेच  नाही .. मनाने सोज्वळ असणारी सुमन संसाराचा  गाडा हाकण्यासाठी आतुर झाली होती ..आईवडिलांचे शुभसंकेत तिला आता स्पष्ट दिसत होते यासाठी सुमन मनाने खंबीर झाली होती .

      सुमनचा विवाह त्यांंच्याच नात्यातील शेखर या मुलांशी झाला .शेखर हा शिक्षक म्हणून मराठी शाळेत कार्यरत होता .आपल्या कलागुणांनी व प्रामाणिकपणाने शेखर भावी पिढी घडवत होता . सुमनसारखी कष्टाळू व दृढनिश्चयी पत्नी मिळाल्यामुळे शेखरला अधिक आनंद झाला होता .घरातील कामकाजात पारंगत असलेल्या सुमने शेखरच्या आईवडिलांची मने ताबडतोब जिंकली होती त्यामुळे सुमन आता घरातील मुख्य भाग झाली होती .हसत्या खेळत्या घरात एका गोंडस बाळाच पुनगमन झाले होते त्यामुळे घरात नवचैतन्य पसरले होते .सुमनने घराला नंदनवन बनविले होते ..!!

      एकदिवस सुमन व शेखर मोटरसायकलने गावी जात होते .जाता जाता दोघांचे छान वार्तालाप  चालू  होते ..इतक्यात  भरधाव फोर व्हिलरने  शेखरच्या गाडीला टक्कर दिली .क्षणार्धात शेखरला कांहीच समजले नाही ..शेखर व सुमन दुरवर फेकले गेले होते ..शेखरला बराच मार लागला होता ..पण भयंकर गोष्ट म्हणजे सुमनचा उजवा पाय निकामी झाला होता .. शेखर वा सुमनला आपण हॉस्पिटलमध्ये कधी आलो हे समजलेच नाही ...प्रचंड वेदना तिला होत होत्या ...जीवनातील सारी स्वप्न धुळीला मिळाली होती ..लहानमुलाचा सांभाळ व पुढील आयुष्याची चिंता सतावत होती ..या अपंगत्वामुळे  सारेच तिला आक्राविक्राळ वाटू लागले ... मनाची निरागसता नैराश्याकडे सरकू लागली.क्षणांक्षणांला मनात वाईट विचार येऊ लागले .धास्तावलेल्या मनाला जीवनच नकोशे झाले होते .पाय तर गेलाच पण मनानेही अपंगत्व स्विकारले होते .अधेमधे नातेवाईक विचारपूस करत होते पण सुमनचे कोणत्याही गोष्टीकडे अजिबात लक्ष नव्हते .सुमन या सर्व गोष्टींचा विचार करत बसत असत .आनंददायी क्षणांची आठवण आल्यावर सुमन ओक्साबक्सी रडत होती , कुंदत होती ..एक सुसह्य जीव निराशेच्या गर्तेत अडकलेला होता .

     शेखर आता बरा झाला होता .झाला प्रकार त्याच्या डोळ्यासमोर आला की अंगावर काटा मारत होता .यातुन स्वतःला त्याने कसेबसे  सावरले होते पण सुमनला या निराशेतुन कसे बाहेर काढायचे हा  यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता .यातुन मार्ग काढण्यासाठी शेखरने अनेक डॉक्टरांचे सल्ले ,  मार्गदर्शन घेणे चालुच ठेवले .सुमन मात्र खिन्न मनाने बसत होती ..ना   जेवणाचे  भान ना बोलण्यावर लक्ष ... एरवी धष्टपुष्ट असणारी सुमनची काया बघवत नव्हती ...!! 

       इकडे शेखर  सुमनला पुन्हा नविन जीवन देण्यासाठी धडपडत होता .बरेच दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नाने सुमनला कृत्रिम पाय बसविण्यात आला .शेखरला आता थोडा धीर आला होता ...सुमनला चालताना पाहण्यासाठी तो आतुर झाला होता .सुमन थोड थोड चालण्यास प्रयत्न करत होती ...हळूहळू  चालण्यास शिकत होती ..कुबड्या घेऊन चालताना तीला असह्य वेदना होत होत्या ..या वेदनेवर मात करत नवे जीवन जगत होती ..

    शेखर सुमनला धीर देत होता .तिच्या  मनाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता . सुमन तु आता मनातुन वाईट विचार काढून टाक ...या धक्यातुन सावरुन तु नविन जीवन सुरु कर . तु केवळ हिंडती फिरती राहीलीस तर आम्हाला आधार मिळेल ... तुझी प्रेरणा आम्हाला जगण्याचे बळ देईल यासाठी तु सकारात्मक विचार करत जा ..अशा गोष्टी शेखर सुमनला सारख्या सांगत होता . 

     सुमनमध्ये आता बराच बदल झाला होता .सुमन आता चालु लागली होती .शेखरने सांंगितलेल्या गोष्टींचा प्रभाव तिच्या मनावर पडला होता ..अचानक अंगात प्रेरणा यावी व सगळे चित्र पालटावे असेच सुमनच्या बाबतीत झाले होते .तिच्या मनाने सकारात्मक विचारांची भरारी घेतली होती ..आपण पायाने अधू आहे हे ती विसरली होती ...घरातील कामे हळहळू करु लागली ..शेखरला अनेक कामात मदत करु लागली . शेखरच्या आईवडिलांची सर्व सोय करु लागली .शेजारच्या घरातुन उठणेबसणे वाढू लागले .... सुमनच्या या चमत्कारिक बदलाचे सा-या लोकाना नवल वाटत होते .सुमनने अत्यंत जिद्दीने अपंगत्वावर मात केली होती ... सारी नवी स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी ती नव्या जोमाने जीवनाच्या दुस-या इनिंगमध्ये उतरली होती ...आत्मविश्वासाने व प्रबळ ईच्छाशकीतीच्या जोरावर शेखरला आयुष्यात अनमोल साथ देणार होती . निराशा , कमकुवतपणा व शरणागती पत्करली असता आयुष्यात प्रगती साधता येत नाही .पण सकारात्मक विचार , जिद्द , प्रेरणा व मनाचा कणखरपणा यांचा पाठपुरावा केल्यास जीवनात यश हमखास मिळते हे सुमनने  एक पाय गमवूनसुद्धा करुन दाखविले तिच्या या निराशेवर मात करणाऱ्या स्री मनाला सलाम करावेसे वाटते ...!! 

     हल्ली निराशामय जीवन जगण्याचे प्रमाण वाढत आहे .त्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार राजरोस सुरु आहेत ...स्वतःला वाईट विचारांच्या अधिन करायचे व कोणताही मागचा पुढचा विचार न करता जीवन संपवायचे अशी जीवनपद्धती बनू लागली आहे .खासकरुन तरुणवर्गात याचा प्रभाव वाढत चालला आहे .स्रियांही निराशेचे जीवन जगत आहेत .अनेक स्रियांच्यावर अत्याचार  अन्याय होत असतात पण स्रियां शक्यतो सांगत नाहीत ...मग आत्महत्या व निराशामय जीवन जगायचे ...स्रियांच्या अत्याचारात खासकरुन जवळचीच माणसे असतात तेंव्हा त्यांना किती निराशाजनक जीवन जगावे लागत असेल याची कल्पना भयानक आहे ... वास्तविक स्रीने आता प्रखर विरोध करायला शिकले पाहिजे ...प्रत्येकाला प्रसंगी ठेचले पाहिजे ...भिडस्तपणे वागताना आपला गरीब स्वभाव बाजुला ठेवून प्रत्येकक्षणी शब्दांचे आसुड ओढले पाहिजेत .स्रिने  हे रुप धारण केले तर कित्येक निष्पाप जीवांचे प्राण वाचतील ...अनेक नवे येणारे अंकुर आनंदाने नाचतील ... तिचे मन सक्षम होवून घरोघरी मांगल्याचा नंदादीप तेवत राहील ...यासाठी सर्वांनी या निराशेला गाडा व सकारात्मक विचार करुन आनंदी व सुखमय जीवन जगा ...!!
     
फोटो साभार गुगल

       ©®नामदेवपाटील ✍️