निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ५

एक कथा
निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ५


मागच्या भागात आपण बघीतलं की माधवीशी
पंकजचे बाबा दत्तक या विषयावर बोलतात.
आता माधवी काय निर्णय घेते बघू

माधवी गेले आठ दिवस बाबांनी सुचवलेल्या दत्तक या पर्यायाचा विचार करत होती. तिच्या मनात प्रचंड घालमेल चालू होती. विषय इतका नाजूक आहे की त्यावर कोणाशी मनमोकळेपणाने बोलावं तिला कळत नव्हतं. स्वतःच्या आईबाबांशी कसं बोलावं हेही तिला उमगत नव्हतं.

पंकज माधवीची घालमेल बघत होता पण मुद्दामच काही विचारत नव्हता. त्याच्या बाबांनी त्याला सांगीतलं होतं की हा निर्णय माधवीलाच घेऊ दे. तिच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत तू हा विषय तिच्यासमोर काढू नकोस. खूप नाजूक विषय आहे आणि यावर निर्णय घेणं कठीण आहे तो तिला पूर्ण तयारीनिशी घेऊ दे.

***
आत्ता माधवी सोफ्यावर बसली असताना सगळं घर तिच्या डोळ्यासमोर आलं. किती हौसेने तिने प्रत्येक खोलीतील भिंत आपल्या आवडीनुसार सजवली होती. एकेक वाॅल पीस, पेंटींग, फ्रेम सगळं काही युनिक होतं. भिंतीचा रंग बघून त्याला मॅच होतील असे पडदे लावले होते. ती ज्या सोफ्यावर बसली होती तो सोफा सेट, काचेचं डायनिंग टेबल, टिव्हीयुनीटकम शोकेस आणि त्या शोकेसमध्ये असणा-या सुंदर वस्तू हे लक्षात येताच माधवीच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागलं.

" हे सगळं माझ्या मनासारखं आहे पण तरी माझ्या आयुष्यात मला काहीतरी उणीव भासते. अजून काहीतरी मला हवंय. मी त्या इवल्याशा जीवाला भेटायला आतूर झाले आहे. कधी येणार तो जीव माझ्या आयुष्यात?"

हताशपणे माधवी स्वतःशीच बडबडली.

" काय करावं ? बाबा म्हणतात तसं बाळ घ्यावं का दत्तक! ते बाळ माझ्या कुशीत येईल? माझा होऊन माझ्याशी बोबडं बोलेल? मला हवंय असं कोणीतरी माझ्याजवळ लाडाने माझ्या कुशीत स्वतःला घुसळवून लाडाने झोपणारं हवयं. "

माधवीच्या मनात एक विचित्र हुरहुर दाटली. बाळ यांना शब्दापलीकडे तिला काही नकोसं वाटू लागलं.

कितीतरी वेळ असाच गेला. पंकज घरीला त्याने बेल वाजवली तरी माधवी तंद्रीतून बाहेर आली नाही. शेवटी पंकज स्वतः जवळच्या किल्लीने दार उघडून आत शिरला.

आता शिरताच त्याला सगळीकडे अंधार दिसला. त्याने समोरच्या खोलीतला दिवा लावला तर त्याला सोफ्यावर डोळे मिटून बसलेली माधवी दिसली. पंकज जरा घाबरला कारण दिव्याच्या ऊजेडानेही माधवीने डोळे उघडले नाही. तो चटकन माधवी जवळ गेला.

" माधवी अगं काय झालं? बरं नाही का?"
माधवी जवळ सोफ्यावर बसत माधवीला हलवत पंकजने विचारलं.

माधवीने हळूच डोळे उघडले. पंकजकडे बघीतलं. पंकजला तिच्या डोळ्यात तिची वेदना दिसली. तो काहीच बोलला नाही. माधवीने त्यांचा हात घट्ट पकडत रडतरडत म्हटलं,

"पंकज मला बाळ हवंय. मी नाही जगू शकत बाळाशिवाय."

माधवी हमसून हमसून रडायला लागली.
पंकज तिला थोपटत म्हणाला,

" तू ठरवलं तर बाळ येईल आपल्या घरी."

" पंकज मला तुझ्या त्या राहूलच्या भावाकडे घेऊन चल. मला त्यांचं बाळ बघायचय. त्या बाळाला माझ्या मांडीवर घ्यायचय. नेशील नं? तीच माझं मन समजून शकेल."
माधवीचं हे कळवळून बोलणं पंकजचं मन हलवून गेलं.

" हो.मी नेईन तुला. तू रडू नकोस."

" आत्ता घेऊन चलशील?"

" आत्ता? मला विचारवं लागेल त्याला.आम्ही येऊ का? ते घरी आहेत का? "

" विचार नं.लगेच विचार."

माधवी आता एकही क्षण थांबायला तयार नव्हती.आधी दत्तक या गोष्टी बद्दल तिची नाराजी होती. पंकजच्या बाबांनी तिच्या मनात दत्तक या गोष्टी बद्दल असणारा गैरसमज काढल्या मुळे आता ती बाळासाठी ऊतावीळ झाली होती.

पंकजने तिला शांत करत राहूलला फोन लावला.

" राहूल अरे आम्हाला तुझ्या भावाच्या बाळाला बघायला यायचं आहे. माधवीची तशी खूप इच्छा आहे."

" अरे व्वा! म्हणजे तुझ्या बाबांच्या बोलण्याचा परिणाम दिसतोय. थांब मी त्याला फोन करून विचारतो आणि तुला कळवतो."

" ठीक आहे."

"काय म्हणाला राहूल? या म्हणाला नं?"
माधवीने पंकजला फोन ठेवल्यावर एक सेकंद उसंत न देता विचारलं.

" तो भावाला विचारून सांगतोय."

" मला आता घाई झाली पंकज. बरं झालं आपण तुझ्या बाबांनी बोललो. माझ्या मनात कोणाला आलेले काही तरी विचित्र अनुभव होते. ही मुलं वाईटच निघतात असंच कोणी तरी म्हणालं होतं. कोणाचं रक्त असतं माहिती नसतं म्हणून अशी टाकून दिलेली मुलं घेऊ नाही असं म्हणालं होतं."

बोलताना शेवटी माधवीच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
पंकज काही न बोलता फक्त माधवीला थोपटत होता. त्याला माधवीच्या मनाची तगमग कळत होती. माधवी बारा बारा तास या घरात एकटी बसून विचारांच्या तडाख्यात सापडते. तिचं मन कुठे रमतच नाही कारण कुठेही गेलं तरी इतर बायका गुडन्यूज कधी देणार? एवढं फॅमिली प्लॅनिंग बरं नाही असं म्हणायच्या. त्याने माधवी रक्तबंबाळ होऊन घरी यायची.

हळुहळु माधवीने घराबाहेर पडणं आणि बाकीच्या बायकांमध्ये मिसळणं बंद केलं.

माधवी फक्त पंकजबरोबर मोकळेपणाने फिरत असे बोलत असे.

पंकजला या रिकामटेकड्या बायकांचा फार राग आला. समोरच्याला काही समस्या असू शकते हे जाणून न घेताच टोमणे मारणा-यांचा राग आला. बायकाच बायकांना त्रास देतात. आम्हा पुरुषांना नाही कोणी विचारत इतके दिवस झाले का मूलबाळ नाही म्हणून! पुरूष स्त्रीच्या पेक्षा बाहेरच्या जगात सुखी असतो. कारण त्याला कोणी पुरूष टोचे मारत नाही

पंकजने डोळ्यातून वाहणारे पाणी पुसले.तेवढ्यात त्याचा फोन वाजला.

" हॅलो.बोल राहूल. होका…बरं ऊद्या येतो.ठीक आहे."

" काय म्हणाला?"

" अगं आज त्यांच्याकडे भावाचे सासू सासरे आलेत म्हणून तो म्हणाला ऊद्या या. ऊद्या आपण जाऊ.राहूल आणि त्यांची बायको पण येईल.ठीक आहे."

माधवी शांत झाली.पंकज मात्र विचारात गणला.
__________________________________
ऊद्या पंकज आणि माधवी राहूलच्या भावाकडे गेल्यावर त्यांच्या बाळाला बघितल्यावर माधवीला काय अनुभव येईल बघू पुढील भागात.


🎭 Series Post

View all