Feb 24, 2024
रहस्य

निलय रहस्य-भाग ९- हवाई जादू

Read Later
निलय रहस्य-भाग ९- हवाई जादू

   समुद्र म्हंटल की जेवढ खोल त्याच काळीज... तेवढच गुढ आणि अनाकलनीय त्याच रहस्य... कित्येक भयंकर आणि अमानवीय किस्से आपल्या काळजात साठवणार. ईस्ट इंडिज समुद्र किनारा असाच असाधारण व अनाकलनीय...किती तरी भेद आपल्या खोलात साठवून बसलेला. 
 याच समुद्रात शेकडो स्वप्न घेऊन "दि फ्लायइंग डच" या ऑइल टँकर जहाजावर सगळे खलाशी आपलं घर दार सोडून कामावर आले. जहाज तस जुन्या बांधणीच पण भल्ल मोठं ईस्ट इंडिजच्या पोर्टवरून आपलं प्रोव्हिजन आणि केमिकल घेऊन निघाल. 
परतीचे वारे समुद्रात उधळून निघाले होते. भरती-ओहटी मुळे किनाऱ्यावर खळबळ माजलेली होती. वातावरणाच्या उलाढाली मुळे तळाशी घोळ उडालेला होता. 
 "दि फ्लायइंग डच"  आपल्या दिशेने प्रवास करीत होत. 
म्हणतात त्या वेळच सगळ्यात मोठ्ठ जहाज. सगळ्या सोयींनी सुसज्ज. रात्रीच्या वेळेला रंगेबिरंगी दिव्यांनी लखलखीत असायचं. आणखीन वरच्यावर एक बातमी यायची की या जहाजावर काम करणारे खलाशी खूप मौजमस्ती करणारे होते. रोज म्हणजे रोजच रात्री जहाजावर पार्टी व्हायची. खाण्या पिण्यात ही ह्या जहाजाचे खलाशी अव्व्ल होते. तिथे जुगार खेळला जायचा. नाच-गाणं व्हायच. जहाजाच्या आजूबाजूने जाणारे जहाज त्या जहाजाची रंगत बघून चकित व्हायचे.
अश्याच एका रात्री जहाज रंगेबिरंगी दिव्यांनी सजलेलं होत. फुल आवाजात जहाजावर गाणी सुरू होती. खलाशी खाऊन-पिऊन टुन्न होते. परतीच्या वाऱ्यांची उधळून सुरु असल्यामुळे तळाशी माजलेली खळबळ तीरावर स्पष्ट दिसत होती. तिकडे जहाजाचं रोलिंग करणं सुरु होत आणि इकडे यांची धुमाकूळ. त्यांची पार्टी रंगात होती आणि वातावरणही हळूहळू रंग बदलत होत. पण या खलाश्यांना त्याचा काहीही फरक पडत नव्हता. त्यांच्या नाच गाण्याची मचमच सुरूच होती तेवढ्यात रोलिंगची तीव्रता वाढली आणि जहाज अनियंत्रित झाल. सगळे खलाशी डेकवर पार्टीसाठी जमले होते.
खुल्या जागेत त्यांना स्वतःवर नियंत्रण राखता आलं नाही त्यातल्या त्यात ते पिऊन टुन्न होते म्हणून त्यांचा तोल आणखीनच खालावला आणि रोलिंगच्या तीव्रतेने ते सगळेचे सगळे समुद्रात धकलल्या गेलेत. म्हणतात सगळ्यांचा त्या रात्री समुद्रात डुबून मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही शिवाय ते असल्या संकटात सापडले याची कुणालाही भनक पडली नाही. त्यामुळे सगळ्यांना आपला जीव गमवावा लागला. 
जहाजावरील खलाशी समुद्रात डुबून मृत्युमुखी पडले होते त्यांचे देह सुद्धा कुणाला सापडले नाही पण ही दुर्दैवी घटना इथेच संपली नव्हती. 
    त्या मार्गावरून जाणाऱ्या कित्येक जहाजांना  "दि फ्लायइंग डच" अजूनही तसेच दिव्यांनी लखलखलेलं... मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवतांनी... तर त्यावरील खलाशी नाचतांनी आणि खाता-पितांनी चक्क स्पष्ट दिसतात. मध्येच जहाजावरुन गर्द धूर बाहेर येतांना दिसतो आणि मग खलाशी समुद्रात एकामागून एक समुद्रात उड्या मारतांना दिसतात.. 
बऱ्याच जहाजांना "दि फ्लायइंग डच" ने धडक ही मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच खूप नुकसानही झाल. 
भरल्या दिवशी ते जहाज कुणालाही दिसत नाही पण रात्र झाली.. वाऱ्याचा झोक वाढला... तीरावर खळबळ माजली की त्याची लखलखाट दुसऱ्यांना धोका पोहचवायला तयार असते.. 
कित्येकांना "दि फ्लायइंग डच" उघड्या डोळ्यांनी दिसलेलं आहे तर कित्येकांच्या डोळ्यात धूळ उडवून ते वरच्या वर गायबही झाले आहे.. त्याची हवाई जादू अजून कोणाच्याही पल्ले पडली नाही पण ते हयात आहे हे ही तितकंच खरं... 

धन्यवाद...!
©️®️ सौ.अश्विनी रोशन दुरुगकर 


    

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashvini Roshan Duragkar

Housewife

मला जिवंत अनुभव मांडायला आवडतात...

//