निलय रहस्य - भाग ६-अनाकलनीय रहस्य

हो मी हि बघितलं.. ते दोघे होते तिथेच..


सन १९४७.. जून महिन्याची भर उन्हाने सनानलेली दुपार...  मलेशिया आणि सुमात्रा दोन्ही शहरांच्या दरम्यान असलेल्या मलाक्काच्या समुद्रधुनीतून ओरँग मेडान या  जहाजाचा मदतीसाठी अचानक आक्रोश आणि  चिंताग्रस्त करणारा संदेश मिळाला. 
"जहाजावर सर्व अधिकारी मरण पावले आहेत. कॅप्टनदेखिल मरण पावला आहे. चार्टरुम आणि ब्रिजवर प्रेतं पडली आहेत! बहुतेक सर्वजण मरण पावले असावे!"
या संदेशानंतर काही क्षण मोर्स कोडमध्ये संदेश पाठवण्याच्या प्रयत्नात सुरु असलेली खडखड ऐकू आली. 
शेवटी, "आता मी ही मरतो आहे!" 
या वाक्यानंतर भीषण शांतात पसरली. सगळे एकामेकाकडे बघत स्तिरावले. 
काय झालं असावं? कस झालं असाव? सगळंच कोड होत. त्या जहाजाच्या जवळपास काही अमेरिकन आणि डच जहाज होते त्यांनी तो संदेश पकडला. आपापसात चर्चा करून जहाजावरील काही अधिकाऱ्यांनी कदाचित हा संदेश "ओरँग मेडान" या डच जहाजावरून आला असल्याचा निष्कर्ष  काढला. काय करावं? मदत कशी पोहोचवावी? सगळेच या विचारात होते शिवाय सगळेचे सगळे कसे मृत्यू मुखी पडू शकतात. मदत करणे गरजेचं होत. मग ब्रिटीश आणि डच अधिकार्‍यांनी त्या प्रदेशातील सर्व जहाजांना ओरँग मेडानच्या मदतीला जाण्याची सूचना केली.
     हा संदेश मिळताच ओरँग मेडानच्या मदतीसाठी अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलला. यापैकी सर्वात जवळचं जहाज होतं ते म्हणजे सिल्व्हर स्टार! 
        काही तासातच सिल्व्हर स्टार ओरँग मेडानच्या जवळ आलं.जहाजावरील सगळेच घाबरलेले होते. जहाजावर जावं तरी कस? काय प्रसंग घडला याची कोणालाही कल्पना नव्हती. जीव आगेत झोकण्यासारखं जोखीम होत. 
      जहाजाजवळ पोहोचल्यावर सिल्व्हर स्टारच्या कॅप्टनने ओरँग मेडान जहाजावर रेडीओसंदेश पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकाही संदेशाला उत्तर मिळालं नव्हतं. दुर्बीणीतून निरीक्षण केल्यावरही नेमकं काय झालं आहे याचा पत्ता लागत नव्हता. डेकवर माणसांची प्रेतं विखुरली असावीत, सगळं अस्ताव्यस्त झालं असावं... परंतु इतक्या अंतरावरुन काहीच दिसत नव्हतं. करावं तरी काय मोठ्ठ प्रश्नचिन्ह होत???? 
सिल्व्हर स्टारच्या कॅप्टनने अखेर आपल्या खलाशांची एक तुकडी ओरँग मेडानवर पाठवण्याचा निर्णय घेतला. खूप चर्चेनंतर काही खलाशी जायला तयार झालेत. एका लहानशा बोटीतून काही खलाशी आणि अधिकारी ओरँग मेडानच्या दिशेने निघाले.
आपली बोट ओरँग मेडानला बांधून सिल्व्हर स्टारवरील नाविक ओरँग मेडानवर चढले. जहाजावर पाय ठेवताच त्यांना जबरदस्त हादरा बसला. ते अमानवी दृश्य बघून सगळे हादरले. मन व्यथित करणार होत सगळ. 
ओरँग मेडान हे संपूर्ण जहाज म्हणजे एक तरंगती शवपेटी बनलं होतं! जिकडे तिकडे देह विखुरलेले होते. 
डेकवर डच खलाशांच्या प्रेतांचा खच पडला होता. त्यांचे डोळे विस्फारलेले होते. जणू काही तरी भयानक डोळ्यांना बघावं लागलं असावं.मुठी वळलेल्या होत्या. जणू कुणी तरी खूप त्रास देऊन त्या जबरदस्ती वळवल्या. वेदनेने आणि भयाने त्यांचे चेहरे पिळवटून गेलेले दिसत होते. त्यांचा चेहरा विद्रुप दिसत होता. काही तरी अतिमानवीय आणि अदयनीय घटना त्यांच्या सोबत घडली असावी. 
संपूर्णपणे अज्ञात आणि भीतीदायक रुपात समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूमुळे त्यांची ही अवस्था झाली होती हे उघड होतं.
जहाजावरील भला मोठ्ठा दांडगा कुत्राही मृतावस्थेत डेकवर पडला होता! त्यालाही कोणी मारलं असावं? 
जहाजाच्या ब्रिजवर कॅप्टनचा मृतदे. दिसला. त्यांच्या  आजूबाजूला काही अधिकारी इतस्ततः पडलेले होते. चार्टरुम मध्ये आणि जहाजाच्या सुकाणूजवळही प्रेतं पडलेली होती. जिकडे तिकडे देहांचा खच होता. 
रेडीओरुममध्ये रेडीओ ऑपरेटर रेडीओवर झुकलेल्या अवस्थेत दिसला. तोच शेवटपर्यंत जिवंत असावा! त्याची बोटं संदेश देण्याच्या किल्लीवर टेकलेली होती. शेवटचा संदेश पाठवल्यावर काही क्षणांतच त्यालाही मृत्यूने गाठलं असावं!
डेकच्या खाली इंजिनरुममध्येही अनेक प्रेतं आढळून आली. डेकवरील मृतदेहांप्रमाणेच सर्वांचे चेहरे भीतीयुक्त वेदनेने पिळवटलेले दिसत होते. ज्याप्रमाणे डेकवर खच होता तसाच इंजिनरूममध्ये हि सगळं अस्ताव्यस्त होत. 
इंजिनरुम आणि बाहेरील तापमानातील फरक मात्रं जाणवण्याइतका होता. बाहेर ४३ अंश सेल्सीयस असतानाही इंजिनरूममध्ये मात्रं अनैसर्गीक गारवा जाणवत होता! ज्याप्रमाणे काही अनैसर्गिक शक्ती असल्यावर आपल्या आजूबाजूला काही तरी अघटित वाटतं तसच काहीस त्यांना आढळलं. त्यांनी लगेच तिथून पाय काढला.
जहाजावरील सर्व माणसं मृतावस्थेत आढळली असली तरी जहाजाचं मात्रं अजिबात नुकसान झालेलं नव्हतं. 
पण असं कस होऊ शकत? एवढी जीवितहानी? पण जहाजाला काहीच धक्का नाही. जसच तसच होत सगळ. ना डेकवरला हानी झाली होती ना इंजिनरुम ला.मग झालं तरी काय असाव? कोणतं वादळही आल नाही? हा समुद्री लुटऱ्यांचाही एरिया नाही? 
         आफ्रीकेच्या पूर्व किनार्‍यापासून ते पार ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत आणि दक्षिणेला पार अंटार्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेला सागर म्हणजे हिंदी महासागर! त्याच रहस्य असच अकलनीय. 
 अनेकविध संस्कृती या सागराच्या किनार्‍याने नांदताना दिसतात. पृथ्वीवरील तिसर्‍या क्रमांकाचा महासागर असलेला हिंदी महासागर. अक्खच्या अक्ख जहाजं, विमानं आणि माणसांना कोणतीही खूण न ठेवता गायब करण्यात मात्रं इतर महासागरांइतकाच पराक्रमी! किती तरी अवर्णनीय रहस्य आणि काळ या समुद्रात बुडले असतील. किती तरी अनैसगिक, अनाकलनीय आणि सर्वशक्तिशाली शक्ती या महासागरात वास्तव्य  करतात. 
       म्हणून सगळ्यांनाच ठाऊक होत जहाज जेवढ्या लवकर हलवता येईल तेवढ्या लवकर बर शिवाय त्यांच्या बरोबर इतर लोकांच्या जीवालाही धोका होता. असच काही त्यांच्या सोबत घडल तर इतरांना आपले प्राण गमवावे लागेल शिवाय या रहस्याची खोली तपासणे आणि अंदाजा लावणेही कठीण होत. 
सिल्व्हर स्टारच्या कॅप्टनने ओरँग मेडान ओढत नेण्याचा निर्णय घेतला. पोर्टवर पोहोचल्यावरच या जहाजावरच्या खलाशांच्या मृत्यूला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत झाली होती हे कळू शकणार होतं.
जहाज ओढून नेण्यासाठी दोरखंड तयार करण्यात आले. इकडे सगळे जहाजाला बांधण्याची तयारी करीत होते. मृत्यूदेहांनी माखलेल्या या जहाजावर केव्हा काय होईल काही सांगता येत नव्हत. हिम्मत दाखवून सगळे जहाजावर काम करण्याचा प्रयत्न करीत होते पण सगळेच त्या देशांकडे बघून घाबरले होते. ह्रदयाची स्पंदने गती पकडत होती. शिवाय काही तरी अदृश्य शक्ती आजूबाजूला असल्याचा भास प्रत्येकालाच अधून मधून जाणवत होता. कुठे कुठे अतिशय थंड वातावरण होत तर कुठे कुठे अतिशय घाणेरडा वास. कुठे काही असल्याची चाहूल तर कुठे काही चालण्याचा आवाज. 
दोन्ही जहाज समुद्राच्या अगदी मधोमध होते. जहाज बांधण्यापूर्वीच सामान ठेवण्याच्या कोठारातून अचानक  धूर येत असल्याचं लक्षात आलं! अक्षरशः आग लागली होती. जहाजाचा बॉयलर सुरू नसल्याने त्यावर विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. 
आगप्रतिबंधक साधनांनी जहाजावर लागलेली आग आटोक्यात येईना. 
ओरँग मेडानवर असलेल्या सिल्व्हर स्टारवरील खलाशांना जहाज सोडून आपल्या जहाजावर परतणं हा एकच मार्ग शिल्लक होता. अन्यथा त्यांचेही प्राण संकटात आले असते.
सिल्व्हर स्टारवरील खलाशांनी घाईघाईने आपल्या बोटीत उड्या टाकल्या आणि ओरँग मेडानपासून झपाट्याने दूर जाण्याचा ते प्रयत्न करू लागले. ते जेमतेम आपल्या जहाजावर पोहोचत नाहीत तोच....
ओरँग मेडानवर जबरदस्त स्फोट झाला!
या स्फोटाचा दणका एवढा जोरदार होता, की ओरँग मेडान संपूर्ण पाण्यावर उचललं गेलं आणि जोरात उभंच्या उभं पाण्यावर आदळलं! काही मिनीटांतच पाठीमागच्या बाजूने संपूर्ण जहाज पाण्याखाली गेलं.
ओरँग मेडानच्या अस्तित्वाची कोणतीही खूण शिल्लक राहीली नाही!
जहाजावरील खलाशांच्या गूढ मृत्यूमागे काही रहस्यं असलं तर जहाजाबरोबर ते देखील सागराच्या तळाशी गेलं होतं!
 
        सिल्व्हर स्टारवरील खलाशांसाठी मात्र हे एक भयानक कधीही न विसरणार स्वप्न म्हणून चिरस्मरणात राहिलेलं होत... 


धन्यवाद..!
©️®️सौ. अश्विनी दुरुगकर.

🎭 Series Post

View all