Feb 24, 2024
रहस्य

निलय रहस्य-भाग १- अदृश्य शक्ती

Read Later
निलय रहस्य-भाग १- अदृश्य शक्ती


       भारतीय कंपनीत काम करणारा तो एकमेव पाकिस्तानी चीफ ऑफिसर परवेज खान . कामात अगदी चोख आणि शिस्तप्रिय. जहाजावरील प्रत्येकाला आनंदीत ठेवणारा. मग ते उच्च अधिकारी असो कि इतर खलाशी (crew) सगळ्यांशी तो प्रेमाने राहायचा. कॅप्टनची परीक्षा त्याने नुकतीच पास केली होती. आता वाट होती फक्त प्रमोशनची. एकदाच प्रमोशन झाल कि मग ती स्वप्नातील कॅप्टनची कॅप त्याची होणार होती. आपला चीफ ऑफिसरचा पाच महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपवून तो काहीच दिवसांपूर्वी घरी परतला होता. आईची प्रकृती जरा बरी नव्हती आणि या वर्षी त्याच्या निकाहाचाहि घात घालणार होते घरचे. 
         तो हि हवसूनच होता. आईची तब्यत स्थिरावली आणि त्याचा निकाह हि झाला. लग्न होऊन पंधराच दिवस झाले होते. त्याला सकाळी कंपनीमधन कॉल आला. 
"Hello Mr. Parvej. First of all congratulations for your marriage.”

“Ohhh Thanks a lot sir.”

“I have a wonderful news for you.”

“What sir?”

“ your wife is so lucky for you. You are promoted as A captain.”

“Oh god That’s a wonderful news.”

" पण तुम्हाला अवघ्या चार दिवसातच निघाव लागेल जॉइनिंग करायला."

"This not fair sir.”

“I’m extremely sorry Mr. Parvej. पण जहाजावर कॅप्टनचा अपघाती मृत्यू झाला म्हणून ताबडतोब तुम्हाला जॉइनिंग करावं लागेल."

"ohh That’s very sad... पण काय झाल होत त्यांच्या सोबत."

"मध्य समुद्रात खूप रोलिंग सुरु होत because of bad weather समोरहि दिसणं कठीण होत आणि त्यांनी तसे सगळेच safety mejors पाळले होते पण अचानक एक झकोला आला आणि जहाज एका बाजूला झुकल त्यांनी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तरी त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहील नाही आणि ते दारावर धडकले. त्यांच्या डोक्याला तीव्र जखम झाली आणि ते जागेवरच गेलेत."

" अरे बापरे फारच वाईट झाल."

"मग तुम्हाला गुरवारला संध्याकाळी निघावं लागेल. सिंगापूर वरन जॉइनिंग असेल."

" हम्म्म्म बर ठीक आहे. तुम्ही तिकिट पाठवा मी लागतो तयारीला."

   परवेज ने प्रमोशनची गोष्ट बायको आणि आईला कळवली. सगळे अगदी आनंदाने गदगद झालेत पण चार दिवसांनी जॉइनिंग आहे हे ऐकताच दुसऱ्याच क्षणी  ते तेढेच दुखी झाले. परवेज मोठ्ठ मन करून आपल्या घरच्यांचा निरोप घेऊन निघाला आपल्या मार्गी. 
   
     नवीन पद, नवीन जवाबदारी सगळंच क्षणात बदलणार होत पण त्याच स्वप्न आज खरं होणार होत. कॅप्टन म्हणून एक मोट्ठी जवाबदारी त्याला पार पडायची होती. तो जरा घाबरलेलाच होता. तसा त्याला शिपिंगचा अनुभव जवळपास चौदा वर्षांपासुन होता. तरीही मनात धडधड सुरूच होती. 
    पाकिस्तान ते दोहा आणि दोहा ते मलेशिया असा खूप लांबचा प्रवास करून तो जहाजावर चढला. पहिला दिवस खूप हेक्टिक आणि व्यग्र गेला. हॅंडिंग ओवर आणि सगळ तंत्र समजून घेण्यात तो एवढा थकला कि थोडं अन्न पोटात घालून लगेच बेडवर पडला. त्याने निवांत डोळे बंद केले आणि स्वतःला रिलॅक्स करू लागला. पूर्ण शरीर अंग दुखीने ग्रस्त होत. मोबाईलच्या स्क्रीन त्याने बायकोचा फोटो बघितला आणि मोबाईल छातीवरच ठेवून डोळे बंद केले. डोळा लागणारच होता तेवढ्यात त्याला त्याच शरीर अचानक भारी वाटायला लागल. पाय अजिबातच हले ना. हात सुद्धा सुन्न झाले होते. शरीर नम वाटायला लागल होत. जीभ आतल्या आत आळल्या सारखी वाटत होती. काय करू? कस करू? कोणाला आवाज देवू ? काहीच शक्य नव्हत. त्याने खूप प्रयत्न केला. आंतरिक सर्व बळ पणाला लावून तो खाड्कन उठला. 
        तेव्हा त्याला बर वाटलं. अंग आधीसारख सामान्य झाल. शरीर हलकं झाल होत पण तो घामाने चिंब झाला होता. अचानक काय झालं असाव. असा अनुभव त्याला पहिल्यांदाच आला होता. "हार्ट अटॅक वगैरे तर नसावा ना? बी॰पी॰ वाढलं? नाही ते नसू शकत कारण; असला त्रास नाही आपल्याला. मग? जे काही घडल ते खूप अवर्णनीय आणि अविश्वसनीय आहे. काय करायला हवं? आपण कुणाला सांगावं काय? कंपनीला इन्फॉर्म करू काय? उफ्फफफ्फ जाऊ दे खूप दिवसानंतर एवढं दमल्यामुळे आणि कामाच्या जादा ताणामुळे झाल असावं. चल सोड झोपून जा!" डोळे दिपले होते पण पूर्ण रात्र घडलेल्या प्रसंगाच कारणच शोधण्यात गेली. 
        पहाटे उठून तो ब्रिजवर गेला. कामाचा पहिला दिवस. त्यात रात्रभर झोप झाली नव्हती. डोक तडकल्या सारखं होत होत आणि कामाचं फुल लोड होत. तो येऊन खुर्चीवर बसला. अजूनही तो भयानक अनुभव त्याच्या अंगाला शहारून जात होता. तो एक टक समुद्राकडे बघत होता. समुद्र अगदी शांत होता. एकसंथ जहाज आपल्या वेगात वाहात होता. सगळीकडे निरव शांतता होती. एकटक बाहेर बघितल्यामुळे त्याचे डोळे पाणावले आणि डोळे पुसायला त्याने डोळे बंद केलेत आणि रुमालाने डोळे पुसू लागला. 
       त्याने डोळे स्वच्छ केलेत आणि मागे वळला.. तोच त्याला कुणीतरी जखमी अवस्थेत पायलट सीट वर बसलेलं दिसल. अतिशय भयानक दृष्टांत होता तो. त्याला आधी कळलंच नाही काय होते आहे. तो चटकन खुर्ची वरून उठला आणि बाहेर गेला. कोणाला काय सांगावं आणि कस सांगावं त्यालाच कळत नव्हत. हृदयाची स्पंदन अगदी वेगाने वाढू लागली होती. थपथप घामाने तो चिंब झाला होता. कसाबसा ऑफिसर्स रूम पर्यंत पोहोचला आणि लांब श्वास घेऊ लागला. 
  "Captain saab any problem. Are you alright?” , कॅडेट नी विचारल.
"Ya I’m alright.”
         तो त्याला मी ठीक असं तर बोलला पण तो रक्तबंबाळ चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून ओझरतं नव्हता. अल्लाह च्या नामस्मरणाने तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. डोळे मिटले कि ते भयानक दृश्य त्याच्या समोर यायचा आणि हृदयाचे कंपन वाढवायचा. काहीच कळेनासं झाल होत. पहिल्यांना असा भीतीदायक प्रसंग त्याच्यासोबत घडला होता ते हि त्याच्या पहिल्या कॅप्टनसी कॉन्ट्रॅक्टमध्ये. 
       ना कामात लक्ष लागे ना जेवणात. झोपेने तर छत्तीसचाच आकडा बनवून घेतला होता. घरी हि काही विशेष बोलणं होत नव्हत. बायकोची चिंता न वाढावी म्हणून तो तिच्या समोरही व्यक्त होऊ शकला नाही. 
     दिवसा मागून दिवस जात गेले कधी कॅबिनमध्ये, कधी ऑफिसर्स रूममध्ये तर कधी ब्रिजवर त्याला तो चेहरा दिसू लागला. हळूहळू तो त्याच्या सोबत घडणाऱ्या घटना शिप वरील इतर लोकांसोबत शेअर करू लागला. पण तो चेहरा फक्त त्यालाच दिसायचा म्हणून ईतरांसाठी हा फक्त गप्पेचा विषय असायचा.
     एका मध्यरात्री ब्रिजवर फक्त एक 3 rd इंजिनिअर आणि कॅडेट होता. अगदी झोपेची वेळ होती. सगळे ऑफ ड्युटी असलेलं लोक गाढ झोपेत होते. ती रात्रच तशी अबोल आणि सुस्तावणारी होती.
    अचानक ब्रिजवरून अनाऊन्समेन्ट झाली..... 
"Everybody please be alert. Now we are going to face a big cyclone. Please be cautious and safe.”
    
         क्षणभरा आधीच डोळा लागलेला 3 rd इंजिनिअर आणि कॅडेट अगदी दचकून उठले. वॉच असलेले इतर क्रू मेम्बर अलर्ट झालेत आणि जे झोपेत होते ते दचकून जागे झाले. कॅप्टन हळबळीने उठले आणि तसेच ब्रिजवर आलेत. खर तर या चक्री वादळाची पूर्व कल्पना कुणालाच नव्हती. 2-3 दिवसां आधी फक्त अशी बातमी आली होती कि पॅसिफिक ओशन मधन एक बळकट चक्री वादळ पास होणार आहे पण तो त्याच्या मार्गावर अशी सूचना त्यांना कपंनीकडन आली नव्हती. सगळे तातडीने आपल्या आपल्या कामावर सावध झाले होते. 
        कॅप्टन ब्रिजवर पोहोचताच दोघेही उभे झाले.
"sir, you should tell us about this cyclon”, 3rd इंजिनिअर म्हणाला.
"What...? Even I was not aware of this".
“Who announced this news.”
“Sir we thought that was you.” 
“काय? वेड बीड लागलंय काय. मला जर माहिती असलं तर मी कळवलं असता ना! 
   बर जाऊदे शिप्स ऑफिस मध्ये पटकन कॉलकर बघ कि कोणाला मेल आला कि कोणी अनाऊन्समेन्ट  केली.
    कॅडेटने फोन केला तिकडन क्रुने कॉल उचलला. पण तो म्हणाला इकडन कोणीही अनाऊन्समेन्ट केली नाही मी जागाच आहे. 
    आता कस..? काय घडत आहे..? सगळच एका भयानक कोड्यात गुरफटल होत. तिघेही एकामेकाकडे मटमट बघत होते. 
"How’s this possible.”
“Sir, we don’t know”, 3rd इंजिनिअर म्हणाला.
      अनाऊन्समेन्ट एक तर शिप ऑफिस मधन होते नाही तर ब्रिजवरून. ना इकडे ना तिकडे मग केली कोणी. 
     समुद्राच्या त्या भागात चक्री वादळाचा परिणाम जाणवायला लागला होता. झोपलेल्या प्रत्येकांनी आपापली सामान बांधून ठेवली होती आणि जवळपास सगळेच जागी उठून बसले होते. अश्या चक्री वादळात काय होईल आणि काय नाही काही सांगता यायचं नाही.
    कॅप्टनने लगेच मेल चेक केला. कुठलाही मेल आला नव्हता. तिघेही विचारात पडले. अनाऊन्समेन्ट कोणीही केली असावी पण चक्री वादळ येऊन ठाकलं होत he हि तितकंच खर. पण असं नाही होऊ शकत कंम्पनी या बद्दल आधीच पूर्वसूचना देते. कस काय घडलं काहीच कळेना. 
    जहाजाची गती त्यांनी कमी केली. सरसर हवेला चिरत जहाज जात होत आणि चक्री वादळामुळे धडधड धडक्या जहाजावर मारत होत. रोलिंग व्हायला सुरवात झाली होती. ऑफ वॉच असलेली मंडळी आणखीनच अलर्ट झाली.
     एवढ्या अथांग समुद्रात काळोखाच्या पडसादात, पावसाच्या बेधुंद सरी आणि विजांचा काचकडून आवाज, वाऱ्याची तीव्र गती मोठ्या संकटाची चेतावणी देते होते. 
इंजिन रूममध्ये असलेले सावधान झाले. रोलींगची तीव्रता आता वाढत चालली होती. जहाज डोलायला लागल होत. ब्रिजवर सगळ सामान अस्ताव्यस्त झालं होत. इंजिन रूम मध्ये सगळे खांबाला पकडून उभे होते कारण चुकीने तोल गेला आणि एखाद्या मशीनवर आदळलं तर स्फोट व्हायला वेळ लागणार नव्हता आणि तिथे हजर असण हि गरजेचं होत काही अडचण आली तर लगेच काम करता आलं असत. म्हणून ते तिथेच थांबले. 
      ईकडे स्वयंपाक खोलीत उथळ पुथल माजलेली होती. रोलिंगच्या तीव्रतेमुळे सगळी चिनी मातीची भांडी जमिनीवर धडाधडा आदळत होती. सगळं अस्ता व्यस्त झाल होत. टेबल-खुर्च्या भिंतीला आदळत होत्या. 
    खोलीत असणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली होती. ब्रिजवर कॅप्टन समतोल राखायचा प्रयत्न करीत होते पण कंटेनर शिप होती हवा आणि पाऊस दोघांचीही तीव्रता एवढी जास्ती होती कि समन्व्य साधने अशक्य झाल होत. तेवढ्यात ब्रिजवर असलेली पायलट चेअर जहाजाच्या तीव्र हालचालीमुळे मुळासकट उखळली आणि स्टेअरींग सांभाळत असलेल्या कॅप्टनच्या अंगावर जाऊन आदळली. 
    ती चेअर एवढ्या तीव्र वेगाने त्यांच्या छातीवर धडकली आणि ते तेवढ्याच वेगाने लोखंडी दारावर आदळले. आदळताच त्यांच्या छातीला जोराचा मार लागला व ते जागीच बेशुद्ध पडले. इंजिनिअर आणि कॅडेट दोघेही असहाय्य होते. जहाज इतकं हलत होत कि ते जागेवरुन उठू शकत नव्हते.
      पण स्टेअरींग आणि गतीचा समतोल राखणे खूप महत्वाचं होत एक चुकी अन जहाज पाण्यात. 
        इंजिनिअर आणि कॅडेट दोघेही उठायचा प्रयत्न करीत होते पण शक्य होई ना.
        हवेचा झोक आणि पावसाची तीव्रता दोघेही चरणसीमेवर होते. समुद्राच्या निरव शांततेत कंटेनरच्या हलण्याचा आवाज खूप मोठा आणि भीतीदायक वाटत होता. लाटा ओसंडून ओसंडून जहाजावर येत होत्या. खोलीतील सामान इकडून तिकडे तिकडून इकडे आदळत होत. खुर्च्या-टेबल भिंतीवर आदळून जवळपास तुटण्याच्या मार्गावर होते. सगळ्यांच्या मनात दहशत गवसली होती. 
      काहीच हातच राहिलेलं नव्हत तेवढ्यात परत अनाऊन्समेन्टचा आवाज आला...
     "Dear friends Don’t worry keep believing God... Everything will be alright very soon. Take care.”
   
       अनाऊन्समेन्ट ऐकून क्रू मेम्बर अजूनच घाबरले. असली अनाऊन्समेन्ट कोण करतो आहे ? जहाजावर काय होते आहे ? सगळेच चिंताग्रस्त होते. 
      अचानक ब्रिजवर इंजिनिअर आणि कॅडेटला कोणी तरी स्टेअरींग आणि वेगाचं नियंत्रण करीत आहे अस जाणवलं. ते दोघे अचंभित झाले. घाबरून जागेवरून उठले पण  रोलिंगमुळे ते जागेवरच पडले पण ते एवढे घाबरले होते कि सरपटत सरपटत एका कोपऱ्यात जाऊन बसले. 
वाटल कोणती तरी अदृश्य शक्ती तेथे प्रकट झालेली आहे आणि त्याच्या रक्षण करीत आहे. स्टेअरींग पलटतांनी आणि कंट्रोल पॅनल कोणी तरी नियंत्रित करताय असं जाणवलं. नियंत्रित करणारा व्यक्ती खूप अनुभवी असल्याचं जाणवत होत. एक तर तीव्रतेने हलणार जहाजाची दहशत होती सोबत ती अदृश्य शक्ती बघून दोघेही खूप घाबरले होते. ते घामाने चिंब होऊन त्यांच्या हृदयाचे स्पंदन गारठल्या सारखे झाले होते. स्पंदनांचा वेग वाढण्याऐवजी मंदावत चालला होता. थोड्या वेळात स्पंदन थांबून ते हि बेशुद्ध पडतील अशी त्यांची अवस्था झाली होती. 
     तिकडे त्या अदृश्य शक्तीच्या चमत्काराने जहाज बरेच नियंत्रणात आले होते. वादळाची गतीही हळूहळू मंदावत चालली होती. रोलिंग होणे कमी झालं होत. त्या जहाजावर २५ कर्मचारी कार्यरत होते. सगळेच आपला जीव मुठीत घेऊन बसले होते. 
    थोड्या वेळात पुन्हा अनाऊन्समेन्ट झाली ....
"आप सभी का मैं तहें दिल से शुक्रिया करता हुँ... आप सभी ने इस मुश्किल घड़ीका एकजुट होकर सामना किया। मैं हमेशाही यही चाहूँगा इस जहाज़पे आनेवाला हर एक साथी ख़ुशहाल रहे। बस आप सब बेफ़िक्र होकर अपना काम करे। मैने ख़ुद अपनी जान इसी तरहके हादसे मैं गवाई हैं। अल्लाह का तहें दिल शुक्रिया उन्होंने मुझे आप सबकी जान बचाने का मौक़ा दिया। आप सभी को नए ज़िंदगी की शुभकामनाएँ।  अल्लाह हाफिस।”
  
      अनाऊन्समेन्ट ऐकून सगळ्यांचेच अंग शहारले. सगळ्यांना कळलं होत. संकट टळलं आहे . एवढ्या भयानक आणि तीव्र वादळातून एका अदृश्य शक्तीने त्यांचे रक्षण केले होते. 
त्यांना कळलं होत शिपवर जॉईन व्हायच्या आधी जवळपास सगळ्यांनीच या शिपवर भूत असल्याची माहिती मिळाली होती. आज त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं पण ते त्यांच्यासाठी भूत नव्हतेच ती एक देवांनी मदतीसाठी धाडलेली अदृश्य शक्ती होती ज्यांच्या चमत्काराने आणि सहयोगाने ते या जीवघेण्या वादळातून वाचले होते. सगळे घाबरले होतेच पण आपण या संकटातून वाचलो म्हणून सगळे आनंदीही होते. 
     थोड्या वेळात सगळं सामान्य झाल. जवळपास ५-६ तास त्यांना त्या वादळाचा सामना करावा लागला. थोड्या वेळात कॅप्टन हि शुद्धीवर आलेत. ते खूप घाबरलेले होते. त्यांना सगळी हकीकत सांगितली. 
     ऐकून ते अवाक झालेत. गेल्या काही दिवसात त्यांनी त्याच्या सोबत घडत असलेले प्रसंग सांगितले. सगळ्यांनाच माहिती होत शिपवर आत्मा फिरत असते कॅप्टन सोडून कुणाला अनुभव आला नव्हता पण जॉईन व्हायच्या आधी गॉसिपस मात्र सगळ्यांनीच ऐकल्या होत्या पण असला चित्त थरारक अनुभव मात्र त्यांना पहिल्यांदाच आला होता.
  सगळ्यांनी मिळून त्यांच्या आत्मा शांती साठी प्रार्थना केली. परत त्यांनी शिपवर कुणालाही त्रास दिला नाही.
           आणि पुन्हा एकदा त्यांचे अस्तित्वाचे रहस्य अथांग समुद्रात खोलवर बुडले...
 
       कथा कशी वाटली नक्की अभिप्रायाने कळवा.

धन्यवाद...!
©️®️सौ. अश्विनी दुरुगकर
     
   
 


     

     
       
         
   

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashvini Roshan Duragkar

Housewife

मला जिवंत अनुभव मांडायला आवडतात...

//