निकिता राजे चिटणीस भाग 12

निकिता सारखी साधी AANI सरळ मुलगी आयुष्यातल्या अवघड प्रसंगांना कशी सामोरी जाते त्यांची कथा.

                                       पात्र  रचना

अविनाश ͬचटणीस                            चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस                     अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस                                    नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस             नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे          निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे          निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                 मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर                    निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी               निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                 निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                      नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                 चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर               चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

पांडे सर                    चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                  चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

चिंतामण चिटणीस            अविनाश चिटणीसांचा भाऊ

विमल                      चिंतामण चिटणीसांची  बायको

निखिल                           चिंतामण चिटणीसांचा मुलगा

शशांक दामले                चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

पाटील                      पोलिस इंस्पेक्टर

परब                       सब इंस्पेक्टर

गवळी                      कॉन्स्टेबल

मळेकर                     पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

                                    भाग १२

भाग 11 वरून पुढे  वाचा .........

                               शशिकला चिटणीस

मी ऑफिस मधे जायला सुरवात केली. मला काही नवीन वाटल नाही कारण कंपनी च्या सुरवाती पासून मला सर्व गोष्टींची माहिती होती. मी डायरेक्टर बोर्डावर असल्यामुळे मी रोजच्या रोज आढावा पण घ्यायची सवय स्वत:ला लाऊन घेतली होती. काही मुद्दे वादाचे कारण पण ठरायचे. असो. सांगायचा मुद्दा असा की परिस्थितीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवायला फारसा त्रास झालाच नाही. गणित हा माझा विषय असल्याने सगळी आकडेवारी चटकन ध्यानात यायची. रोजच्या रोज निकिता बद्दल पण feedback मिळायचा. निकिता पण रोज रात्री सर्व सांगायची आणि त्यावर चर्चा पण व्हायची. हळू हळू नितीन पण चर्चेत भाग घ्यायला होता. काउन्सेलिंग चा पण परिणाम दिसायला लागला होता. जवळ जवळ वर्ष असच गेल. निकिता ला आता फॅक्टरी वर चांगलीच पकड बसवता आली होती. एक दिवस अचानक नितीन म्हणाला की मी पण आज ऑफिस ला येणार. आम्हा दोघींना खूप आनंद झाला. आणि मग रुटीन सुरू झाल. नितीन पहिल्या सारखा कामात पूर्ण पणे बुडून गेला. मग मी ऑफिस मध्ये जाण थांबवल. पण निकिता च फॅक्टरीत जाण चालूच होत. हळू हळू नितीन ने फॅक्टरी मध्ये पण जायला सुरवात केली. आठवड्यातून दोनदा तो फॅक्टरीत जायचा. सगळ कसं सुरळीत झाल होत. पण दोन वर्ष जावी  लागली स्थिर स्थावर व्हायला. अधून मधून इंस्पेक्टर पाटील यायचे हाल हवाल विचारायला. पण मनातून काही धागा दोरा मिळतो का हे बघायचे. मी फारसं लक्ष्य द्यायची नाही. ते त्यांच काम करत होते. करू द्या असा विचार करून काही बोलायचे नाही. मी असा विचार करत होते की दोन वर्ष झालीत खूप ताण सहन केला. आता थोड रीलॅक्स व्हायला पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून नर्मदा प्रदक्षिणा करायच मनात होत. त्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्याव असा वाटल. म्हणून मी निकिता शी बोलले.

मी आणि राधाबाई नर्मदा परिक्रमा करायला जाऊ का ? तुला काय वाटत.

किती छान. आई मला पण यायला आवडेल. आपण तिघीही ही जावू. पण मला अस वाटत की अजून नितीन पूर्णपणे सावरला आहे की नाही याचा नीट अंदाज येत नाहीये. थोड थांबून मग जावूया. नाही तर आपण कोणीच नाही आणि म्हणून तो पुन्हा dipression मध्ये. अस नको व्हायला.

तू म्हणतेस ते बरोबर वाटतंय आपण नंतर जावू.

आणखी एक दीड वर्ष गेल. मधल्या काळात निकिता च्या योजने प्रमाणे शाळेच्या फी आणि पुस्तकं आणि इतर खर्च यांच अनुदान जाहीर केल. दिवाळीला सीनियर सिटिजन साठी आणि एकंदरच औषधोपचारांसाठी पण अनुदान जाहीर केल. सगळे खुश होते. नितीन आता फूल फॉर्म मध्ये आला होता. मग आम्ही आमचा नर्मदा प्लान त्याला ऐकवला. त्यानी पण लगेच हो म्हंटल. म्हणाला गेली दोन तीन वर्ष तुम्ही माझ्यासाठी फार खस्ता खाल्ल्या तेंव्हा आता जरा मनमोकळ फिरून या. मी आता ठीक आहे माझी काळजी करू नका. आम्ही लगेच बूकिंग केल. एक महिन्यांनी आमची यात्रा ओंकारेश्वरांपासून सुरू झाली. ओंकारेश्वर हे इंदूर जवळ नर्मदेच्या काठी असलेल ज्योतिर्लिंग स्थान आहे. तिथून यात्रा सुरू झाली. यात्रा बसनीच होणार होती. सर्व व्यवस्था ट्रॅवल कंपनी ने अगदी चोख केली होती त्या मुळे  काहीच त्रास झाला नाही. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. 

आम्ही ओंकारेश्वरला पोचलो तेंव्हा संध्याकाळ झाली होती. आता संध्याकाळी हॉटेलवरच आराम करून उद्या ओंकारेश्वरचे दर्शन घेतल की पुण्याचा मार्ग धरायचा. असा विचार करून आम्ही जेवून रूम वर आलो. फोन वाजला. कोण आहे पाहिल तर वाघूळकर साहेब. वाघूळकर मला का फोन करताहेत काही कळेना. नितीन तिथे असतांना वाघूळकरांनी मला फोन करायचं काहीच कारण नव्हतं. तसंच काही कारण असतं तर नितीननेच केला असता. निकिताला सांगितल तर तिला पण आश्चर्य वाटल. रिंग बंद झाली. निकिता म्हणाली की आई नितीनला पुन्हा डिप्रेशन तर नसेल आल ? माझ्याही मनात अगदी हाच विचार आला होता. काही सुचेना. पुन्हा रिंग वाजली. आई घ्या फोन. निकिता म्हणाली. आणि स्पीकर वर टाका.

हॅलो

शशी मॅडम, मी वाघूळकर बोलतोय.

बोला. वाघूळकरांचा आवाज रडवेला होता. काळजात एकदम चर्र झाल.

मॅडम कुठे आहात ? ओंकारेश्वराला पोचलात का ?

हो आजच पोचलो. पण फोन का केला होता ? आणि तुमच्या आवाजाला काय झाल ? असा का येतोय, काही प्रॉब्लेम आहे का ?

काही नाही मॅडम ठसका लागला म्हणून, दूसर काही नाही. पण मॅडम रघुवीर ला गाडी घेऊन तिथे पाठवल आहे. तो कालपासून तिथेच आहे. त्याला काळवतो. उद्या सकाळीच ७ वाजे पर्यन्त निघा. रघुवीर आत्ता येईलच तुमच्या हॉटेलवर. बाकी काही नाही.

रघुवीर ला कशाला धाडल, आम्ही बसनेच आलो असतो की. सगळ्यांच्या बरोबर 

नाही मॅडम इतक्या दिवसांचा प्रवास, शरीर थोड अवघडल्या सारखं होत म्हणून पाठवल. बर ठेवतो आता. बाकी विशेष काही नाही. इथे आल्यावर बोलूच.

हुस्श ! दोन मिनिटांकरता चांगलच दडपण आल होत ते गेल. तेव्हडया दोन

मिनिटांत काय काय विचार मनात येऊन गेले. अर्ध्या तासांनी रघुवीर आला. सकाळी येतो म्हणून सांगून गेला. सगळ ठीकच तर आहे अस म्हणाला.

रात्री ७ वाजता रघुवीर म्हणाला इथे एक चांगला ढाबा आहे आपण जेवून घेऊ.

अरे घरी गेल्यावर जेवू. काय पिठल भात करायला फारसा वेळ लागणार नाही. तू पण आमच्या बरोबरच  जेव.

मॅडम मला भूक लागली आहे. दिवस भर ड्रायव्हिंग करतो आहे. थोडा पायांना पण आराम मिळेल.

आम्हाला पण ते पटलं. आम्ही सगळेच जेवायला थांबलो. रघुवीर जातीने आमच्या जेवणाकडे लक्ष देत होता. आम्हाला आश्चर्यच वाटल. आम्ही विचारल सुद्धा एवढ लक्ष देतो आहेस, काय कारण आहे. आता जेवायला बसलो आहोत तर आम्ही पोटभर जेवुच की. साहेबांनी सांगून पाठवल का काय. ? तर नुसताच हसला.

घरी पोचायला रात्रीचे नऊ वाजले. घरात शिरलो तर मीटिंगच भरलेली दिसली. वाघूळकर, चोरघडे, वाटवे बाई, दामले, चिंतामण  भाऊजी, विमल, निखिल, सगळेच होते. सगळ्यांचे चेहरे गंभीर होते. समोरच नितीनचा फोटो होता. हार घातलेला. उदबत्ती लावली होती. मला गरगरायला लागल. निकिताने पाहिले आणि ती चक्कर येऊनच पडली. तिला सावरायला वाटवे धावल्या पण त्यांना जमल नाही आणि दोघीही पडल्या. राधाबाईंनी मला धरल नाहीतर मी पण पडलेच असते. त्यांनी मला रडत रडतच सोफ्यावर बसवल.

राधाबाई हे काय झाल हो मला धड बोलता पण येईना. राधाबाईंना पण रडू अनावर झाल होत. निखिल निकिता ला सावरायला धावला. त्यानी आणि दामल्यांनी निकिता  ला सोफ्यावर बसवल. पाणी चेहऱ्यावर मारल. निकिता भानावर आली. माझ्या कडे बघितल आणि तिचा बांधच फुटला. तिला थांबवण अशक्य होत

तास दीड तास कोणीच बोलत नव्हत. शेवटी ती शांतता मला असह्य झाली. मी वाघूळकरांना विचारल.

हे कस काय घडल. केंव्हा झाल ?

मॅडम चार दिवसांपूर्वी दुपारी नितीन साहेबांनी बाबनला हाक मारली आणि जेवणाची तयारी करायला सांगितली. डबा आलाच होता. बबनने सर्व गरम करून डिश  मध्ये वाढून दिल. आणि तो बाहेर बसला. दहा मिनिटांनी आत डोकावल आणि ओरडतच माझ्या केबिन मध्ये आला. साहेब कसे तरीच दिसताहेत अस म्हणाला. मी जेवण टाकून तसंच धावत गेलो. मला धावतांना पाहून चोरघडे आणि वाटवे मॅडम पण आल्या. साहेब बेशुद्ध पडले होते. लगेच अॅम्ब्युलेन्स बोलावली आणि हॉस्पिटलला नेल. त्याच वेळी चिंतामण काकांना पण फोन केला. ते पण लगेचच हॉस्पिटलला आलेत. डॉक्टरांनी तपासल आणि म्हणाले कार्डियाक अरेस्ट असू शकत. तो पर्यन्त निखिल पण आला होता. सर्टिफिकेट मोठ्या डॉक्टरांनी पाहिल्यावर  देऊ अस डॉक्टर म्हणाले. दोन तासांनी आम्हाला बोलावून सांगितलं की बॉडी काळी निळी पडली आहे. पोलिस ची केस आहे. आम्ही पण पाहिल खरंच शरीर काळ नीळ पडल होत. मग बाकी सोपस्कार होऊन बॉडी मिळायला तिसरा दिवस उजाडला. शरीराची अवस्था इतकी वाईट होती की ताबडतोब अन्त्य संस्कार करवा लागला. निखिलनीच केल सगळ.

अरे पण आम्हाला का कळवल नाही लगेच. ?

आम्ही फोन करतच होतो पण संपूर्ण दिवस तुमच्या फोन ला रेंज नाही अस उत्तर येत होत. आम्ही ट्रॅवल ऑफिसला पण फोन केला. ते पण तसंच म्हणाले. दुसरंही दिवस तसंच गेला. मग काका म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळ पर्यन्त ओंकारेश्वराला पोचणारच आहात तर निदान तुमची यात्रा तरी पूर्ण होऊ दे. जे घडायच ते तर घडूनच गेल आहे. म्हणून काल संध्याकाळी तुम्हाला कळवल आणि रघुवीरला पण पाठवल.

आता संदर्भ लागला की वाघूळकरांचा आवाज असा का येत होता. आणि रघुवीर आमच्या जेवणाची एवढी काळजी का घेत होता ते.

आता काय. तसंही संस्कार निखिललाच करायचे होते. त्याचा काही प्रश्न नव्हता. म्हणून मी सगळ्यांना म्हंटल की आता बरीच रात्र झाली आहे तेंव्हा तुम्ही सगळे घरी जा. घरी सगळे वाट पहात असतील.

मॅडम आमची चिंता करू नका आम्ही सगळे तीन दिवसांपासून इथेच आहोत. तुम्ही तिघही आता जरा आराम करा. वाघूळकर म्हणाले.

निकिताला झोपेची गोळी देऊन झोपायला सांगितलं. ती गेली. रात्रभर असच बोलण चालू होत. सगळे तपशील कळले. डोळ्याला डोळा लागला नाही.

सकाळी वाघूळकर, वाटवे, दामले सगळे आपापल्या घरी गेलेत. काका, विमल आणि निखिल मात्र राहिले.

संध्याकाळी वाघूळकर आणि वाटवे मॅडम आल्या. ऑफिस मध्ये पाटील आणि परब या जोडगोळी ची जबरदस्त चौकशी चालू होती. बबन, वाघूळकर आणि वाटवे हे त्यांच्या रडार वर होते. हं करू द्या त्यांना चौकशी त्यांच कामच आहे ते. तुम्ही लोक मात्र शांत रहा. मी म्हंटलं. पोलिसांशी वादा वादी करून काही साधत नाही. काय आहे पांच वर्षांपासून ते गुन्हेगार शोधताहेत पण प्रगती शून्य. त्या मुळे स्वत:वरचाच राग ते तुमच्यावर काढाणार हे दिसतच आहे. तुम्ही शांत रहा. कर नाही त्याला डर कशाचा.

एक दोन दिवसात ते इथे पण येतीलच तुम्ही सांभाळून रहा एवढच.

आहे. मला त्याचा अंदाज आहे. तुम्ही काळजी करू नका. मी उद्या पासून ऑफिस ला यायचा विचार करते आहे. तुम्हाला काय वाटत.

नाही मॅडम इतकी घाई कशाला. आम्ही आहोत की सगळे. पुनः काही वाटल तर तुम्ही फोन वर आहातच की. बाकी आम्ही सांभाळून घेऊ. 

वाटवे मॅडम मला ऑफिसची काळजी नाही. तुम्ही आहातच सगळे, माझी काळजी वेगळीच आहे. डोंगरे आणि मेहता पुन्हा पूर्वीचाच राग आलापण्याची शक्यता वाटते म्हणून.

मॅडम आम्ही सावध राहू. तुम्ही चिंता करू नका.

दूसरा दिवस तसंच गेला. संध्याकाळी ऑफिस मधून दिवसभरात काय काय घडल यांचा रीपोर्ट आला. सगळ ठीक चालल होत. निकिता पण आता सावरली होती. रोजचे व्यवहार चालू झाले होते. काका, विमल आणि निखिल इथूनच ऑफिस ला जायचे. मीच त्यांना म्हंटल की तुम्ही ऑफिस जॉइन करा म्हणून. किती दिवस सुट्टी घेणार. तसे ते तेरवी होई पर्यन्त रहाणार होतेच. ठीकच आहे.

दहा बारा दिवस तसेच गेलेत. तेरवी झाली. सगळ निखिलनेच केलं. मग दोन दिवसांनी भाऊजी आणि मंडळी त्यांच्या घरी गेलीत. काही दिवसांनी रविवारी सकाळी देशपांडे आणि दामले पतीपत्नी आलेत. भेटायला आले होते.

आम्हाला पेपर मधून कळल्यावर राहवेना, म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलो. तुम्ही कणखर आहात, स्वत:ला लवकरच सावराल अस वाटतच होत. आज तुम्हाला पाहून खात्रीच झाली. I really admire you. दामले आल्या आल्याच बोलले. काय झाल कसं झाल हे सगळ पेपर मध्ये आलच आहे. त्याच्यावर आपण बोलूया नको. अस मला वाटत. ऑफिस मध्ये आता कोण आहे ? कोण बघतय सगळ ? तुम्ही पुन्हा जाणार का जबाबदारी घ्यायला ?

दामले देशपांडे आल्यावर मलाही जरा बरच वाटल. भाऊजी पण त्याच वेळी आले होते. त्यांची आणि  भाऊजी  ची ओळख करून दिली. छान गप्पा चालल्या होत्या निकिताही सामील झाली होती. राधाबाईंनि कॉफी करून आणली. गप्पा गोष्टींमुळे जरा हलक हलक वाटत होत. आणि दुधात मिठाचा खडा पडला. पाटील आणि परब आले. दामले आणि देशपांडे मंडळी असतांना पोलिस आले म्हंटल्यांवर मला जरा अवघडल्या सारख झाल. देशपांड्यांच्या ते लक्षात आल. ते म्हणाले की तुमच होई पर्यन्त आम्ही बाहेर व्हरांड्यात बसतो. ते चौघेही बाहेर व्हरांड्यात जाऊन बसले.

नमस्कार मॅडम पुन्हा याव लागल. विचारपुस करायची होती.

ठीक आहे. तुमच कांमच आहे ते. बसा. बोला. विचारा जे हव ते.

ही घटना घडली तेंव्हा तुम्ही बाहेरगावी होत्या अस कळल. कुठे गेला होतात

आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो. ट्रॅवल कंपनी बरोबरच गेलो होतो.

काय काय पाहिल ?

यात्रा होती ती. पिकनिक ला गेलो नव्हतो. तुम्हाला कंपनी च ब्रोशर देते. त्यावरून सगळ स्पष्ट होईल. हे घ्या. जस लिहिल आहे त्याप्रमाणेच यात्रा झाली.

तुमच्याच घरी एकसारखेच दोन मृत्यू होतात याच तुम्हाला आश्चर्य नाही वाटल ? तुमच्या मते काय कारण असाव याच. कोणी केल असाव ? काही प्रकाश टाकता का ?

मी काय सांगणार ? घटना आमच्या घरी घडली. आघात आम्ही सोसतो आहोत. शोध तुम्ही घ्यायचा आहे, प्रकाश तुम्ही टाकायचा आहे. गुन्हेगाराला शोधून आमच दुख: हलक करायचा प्रयत्न सोडून तुम्ही आम्हालाच विचारता की कोण असाव म्हणून. हे जरा विचित्र वाटत नाही का ?

आमच काम असच असत. विचार पुस करूनच दिशा ठरवावी लागते. तपास आणि चौकशी च सत्र अव्याहत चालूच असत. आम्ही जेंव्हा १०० प्रश्न विचारतो तेंव्हा एखाद दोन उत्तरांमधून महत्वाची माहिती मिळते. आणि तपासाला दिशा मिळते.तेंव्हा तुम्हीच सांगा तुम्हाला कोणाचा संशय येतो आहे का ? ही बातमी तुम्हाला इतक्या उशिरा का कळविण्यात आली ?

नितीन ला मारण्यात कोणाचा फायदा होईल अस वाटत नाही. आणि आमच्या कंपनी मधले सर्वच फार निष्ठावान आहेत. आणि सर्वांनाच नितीन बद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा होता. दूसरा म्हणजे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न केला या लोकांनी, पण रेंज नसल्याने आम्हाला उशिरा कळलं. तुमचं या बाबतीत काकांशी आणि निखिलशी विचारून झालच आहे.

मॅडम आम्ही कोणाला काय विचारल किंवा काय चौकशी केली हे तुम्ही सांगण्यापेक्षा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच फक्त तुम्ही द्या. ते जास्त बर होईल.

बर.

नितीनच्या जाण्यात तुमचा पण फायदा असू शकतो. काय म्हणता ?

काय बोलता आहात साहेब, अहो माझा एकुलता एक मुलगा गेला आहे. आणि तुम्ही अस बोलता आहात . कमाल आहे.

कमाल माझी नाही, तुमच्या सुनेची आहे. काय चतुराईने हे सगळं तिने घडवून आणल आहे! आम्हाला सगळं कळल आहे पण तुमच्याच तोंडून ऐकायच आहे. तेंव्हा निकिता तू आता पटा पटा सांगायला सुरवात कर.

बाहेर दामले मंडळी बसली होती. सर्व ऐकायला जात असणारच. मनात विचार आला, काय वाटेल त्यांना. निकीता कडे बघितल. ती लाल बूंद झाली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. कुठल्याही क्षणी रडायला लागेल अस वाटत होत. काय करांव ? थोडा वेळ तसंच गेला. ती शांतता असह्य होत होत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली. काही विचार केलाच असणार. माझ्या कडे पहात  होती.

पाटील साहेब आता थांबायला तयार नव्हते.  म्हणाले,

निकिता बोल आता. खेळ संपला आहे तुझा. तुझ्याच तोंडून ऐकायच आहे.

काय ऐकायच आहे. ?

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com    

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

🎭 Series Post

View all