Dec 06, 2021
रहस्य

निकिता राजे चिटणीस. भाग. 3

Read Later
निकिता राजे चिटणीस. भाग. 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 2 वरून पुढे वाचा .......
                              अविनाश चिटणीस
निकिताला भेटून बर वाटल. ही तिच्या जवळ बसली होती. हातात हात घेऊन धिराच काही बोलत होती. पाच मिनिटांनंतर नर्स नि खूण केली आणि आम्ही बाहेर आलो.
मुकुंदा अरे अनंतराव कुठे आहेत ओळख करून दे न.
हे अनंतराव दामले आणि हा अविनाश चिटणीस, नितीन ह्यांचा मुलगा आणि सून निकिता.
तुझ बरोबरच आहे मुकुंदा. तुला आणि विनायकरावांना घरी जायच असेल.रात्रभर खूप दगदग झाली तुम्हा दोघांची. आता आम्ही आलोय तेंव्हा आता तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्यावी अस वाटत. आता अस करू, अनंतराव तुम्ही तुमच्या गॅरेज चा फोन नंबर आणि ते कुठे आहे ते नितीनला सांगा, म्हणजे तो आमच्या ड्रायव्हरला घेऊन मेकॅनिक कडे जाईल आणि आमची बंद पडलेली कार दुरुस्त करून घेईल. तो पर्यन्त आम्ही इथे थांबतो. तो आल्यावर मग इथे जवळपास एखाद चांगल हॉटेल असेल तर आम्ही तिथे शिफ्ट होऊ. माझ बोलणं पूर्ण ऐकून घे मुकुंदा, मग बोल. तुझ घर दूर आहे आणि अश्या पावसात जाण येण जरा अवघड होईल. जवळ असेल तर फेऱ्या मारणं सोयीच असणार आहे. पुरुशांच ठीक आहे पण आता ही पण बरोबर आहे तेंव्हा सोय प्रथम पाहायला हवी. अस मला वाटत.
अविनाशरावांच बोलण मला पटतय मुकुंदराव. तुमच घर असतांना तुमच्या मित्रांनी हॉटेल मध्ये राहणं तुमच्यासाठी अवघड आहे. पण let’s consider the practical difficulties. हॉस्पिटल मधून discharge मिळाल्यावर राहतील की दोन दिवस तुमच्याकडे. काय अविनाशराव राहाल न. म्हणजे आमच्या मित्राला पण बर वाटेल. दोन तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. तीन दिवसांपेक्षा जास्ती हॉस्पिटल मध्ये ठेवतील अस वाटत नाही. काय ?
नक्कीच. हा काय प्रश्न झाला
हूं ठीक आहे. मग आता काय आपण घरी जायच. चला तर मग अनंतराव दामले चला.
ते दोघ गेल्यावर नितीनला म्हंटलं की ड्रायव्हरला घेऊन जा. आता पाऊस पण थांबला आहे. आणि अकरा वाजले आहेत म्हणजे गॅरेज पण उघडल असेल. नितीन पण गेला. ही निकिताच्या खोलीत. मी पण निकिताच्या खोलीत डोकावलो ती झोपली होती. अजून गुंगीचा परिणाम ओसरायला बहुधा वेळ लागणार असावा. थोडा वेळ हिचाशी बोलत बसलो.
Tension तस उतरल होत. सिगरेट ची तलफ आली पण जवळ काहीच नव्हत. बाहेर आलो. एखादी पानाची टपरी दिसते का बघत होतो. बाहेर वॉर्ड बॉय होता त्याला विचारल. त्यांनी टपरी तर दाखवली पण म्हणाला साहेब आतमध्ये सिगरेट नाही नेता येणार. पाकीट पण नाही. तसा इथला नियमच आहे. म्हंटल ठीक आहे .ठेल्या वर जाऊन तलफ भागवली थोडा टाइम पास पण झाला. कुठे इकडे तिकडे फिरू म्हटल तर सगळीकडे चिखल राडा झाला होता. फिरण कॅन्सल. वेळ कसा घालवायचा हा एक प्रश्नच होता. आत गेलो. निकिता झोपलीच होती. सौ. चिटणीस रामरक्षा म्हणत होत्या हातात अंगाऱ्यांची वाटी होती. थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा बाहेर. लॉबी मध्ये बसलो. patients यायला लागले होते. लॉबी जवळ जवळ भरली होती. बसण्याचाही कंटाळा आला. पुन्हा बाहेर. टपरी, चहा. सिगरेट, वापस लॉबी, रूम अश्या येरझारा. शेवटी त्याचाही कंटाळा आला. रूम मध्ये येऊन खुर्चीवर बसलो. बायको म्हणाली जरा शांतपणे बसा. काय सारख सारख आत बाहेर करता.
खुर्चीवर बसल्या बसल्या डोळा लागला. तास भर कसा गेला पत्ताच लागला नाही. डोळे उघडले तेंव्हा नितीन आला होता. निकिताशी हलक्या आवाजात बोलत होता.
काय रे गाडी ठीक झाली का ? काय झाल होत ? आणि तू केंव्हा आलास ?
मी आत्ताच पाच मिनिटांपूर्वीच आलो. बॅटरी गेली होती. नवीन टाकली. बस, गाडी सुरू झाली. no problem now.
निकिता चा चेहरा बराच टवटवीत दिसत होता. रिकव्हरी चांगली होती. थोड्या वेळाने मी आणि नितीन हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडलो. थोडी चौकशी केल्यावर कळल की जवळच एक हॉटेल आहे. जाऊन पाहिल, ठीकच होत. दोन तीन दिवसांचाच मुक्काम होता, फिक्स करून टाकल. मग नितीनला म्हंटलं की
तू इथेच थांब. मी जाऊन ड्रायव्हर बरबर समान पाठवून देतो. तुमच्या बॅगा गाडीतच असतील न, त्या काढून घे. तर म्हणाला
सगळ्यांच्याच बॅगा गाडीतच आहेत.
हॉटेल मध्ये चेक इन केलं सगळं सामान ड्रायव्हरला सांगून रूम मध्ये आणून घेतल. आणि नितीन ला म्हंटल
तू आटपून घे, फ्रेश हो. जेवायची वेळ आहे. जेउन घे. आणि मग हॉस्पिटल मध्ये ये. हवं तर थोडी झोप काढ. रात्रभर जागरण झाल असेल. आणि मग तिकडे ये. तो पर्यन्त आम्ही बसतो.
मग मी नितीनला तिथेच सोडून हॉस्पिटलला परत आलो. निकिताला संध्याकाळ पर्यन्त पाणी सुद्धा द्यायच नव्हत. मग आम्हीच कॅंटीन मध्ये जाऊन जेवून आलो. जेवण झाल्यावर इतकी झोप येत होती की मी पाय लांब केले. ही बसली होती निकिता जवळ रामरक्षा म्हणत. तशी तिला दुपारी झोपायची सवय नाहीच आहे. मला पण नाहीये कारण दिवसभर मी ऑफिस मध्येच असतो. पण आज झोपलो थोडा वेळ. चार च्या सुमारास नितीन आला. fresh दिसत होत. बहुधा एक डुलकी काढून आला असावा.
सहा च्या सुमारास रेसिडेंट डॉक्टर आपल्या बरोबर डाएटिशन ला घेऊन आलेत. त्यांनी खाण्या पिण्याचा चार्ट बनवून दिला. म्हणाली की
हा चार्ट कॅंटीनला जाईल आणि त्याप्रमाणे पेशंटच जेवण, नाश्ता, चहा, कॉफी सगळ पाठवल्या जाईल. बाहेरून आणि घरून पण काहीही आणून पेशंटला देऊ नका.
आम्ही माना डोलावल्या. निकितानि नर्सला खूण केली तीनि आम्हाला बाहेर काढल डॉक्टर पण बाहेर आले आणि म्हणाले की
बोला पण भावना आवरा कारण हुंदका, ठसका, खोकला आत्ता तरी यायला नको. जखम ओली आहे. इंटरनल ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. तस झाल तर भारी पडेल. अजून एखाद्या तासाने चमचाभर पाणी दिल तर चालेल. but carefully. दहा वाजे पर्यन्त सूप येईल ते अर्धा अर्धा चमचा करत द्या.
दहाच्या सुमारास डॉक्टर राजवाडे आलेत. तपासून म्हणाले की सगळ ठीक आहे. आत्ता रात्री इथे एकालाच थांबता येईल. तुम्ही तुमची सोय केली आहे न ?
हो डॉक्टर इथे जवळच हॉटेल बूक केलंय. आम्ही आता निघतोच. नितीन थांबेल.
डॉक्टरांच्या पाठो पाठ आम्ही पण निघालो. कॅंटीन मध्ये जेवून हॉटेल चा रस्ता पकडला.पुढचे दोन तीन दिवस पण असेच गेलेत. फक्त निकिता चालायला लागली होती. शक्ति भरून येत होती. मुकुंदा आणि दामले संध्याकाळी तासभर येत होते. चौथ्या दिवशी डॉक्टरांनी बोलावल. म्हणाले
सगळ ठीक आहे. आजच डिस्चार्ज देऊ. अजून आठ दिवसांनी टांके काढावे लागतील. तुम्ही टांके पुण्याला काढणार का ? की आठ दिवस इथे राहू शकता.
पण तुम्हीच आत्ता म्हणाला की आजच डिस्चार्ज मिळेल.
हो. डिस्चार्ज आजच मिळेल. तुम्हाला बाहेर सोय करावी लागेल. किंवा टांके पुण्याला काढा. बाकी post operation care काय घ्यायची ते तुम्हाला नीट समजाऊन सांगीन आणि डिस्चार्ज रीपोर्ट मध्ये पण लिहिले असेल. पुण्याला तुमचे डॉक्टर असतीलच ते guide करतील. काही प्रॉब्लेम नाहीये. मुख्य म्हणजे आता कुठलीच emergency नाहीये. फक्त काळजी घ्यायची आहे. प्रवासात गाडी हळू न्या . धक्के बसणार नाहीत यांची काळजी घ्या. बस.
मुकुंदाला फोन करून सांगितल की निकिता ला डिस्चार्ज मिळतोय आणि आम्ही येतोय. नितीन डिस्चार्ज प्रोसीजर पूर्ण करे पर्यन्त आम्ही जाऊन हॉटेल मधून चेक आउट करून आलो. नितीन आणि निकिता तयार होऊन लॉबीतच बसले होते. निकिता साठी वहिनींनी खास साधा स्वयंपाक वेगळा केला होता. जेवण झाल्यावर गप्पा टप्पा मध्ये संध्याकाळ केंव्हा झाली हे कळलंच नाही. संध्याकाळी दामले पती पत्नी आले. पुन्हा गप्पा. रात्रीच जेवण दामल्यांच्या कडे. बऱ्याच वर्षांनी दिवस कसा छान गेला. डॉक्टर काय म्हणाले ते सांगितल्यावर मुकुंदा म्हणाला की इथेच रहा. आमचा पाहुणचार घे. मस्त मजेत आठ दिवस जातील
अरे माझा व्यसयाय आहे बाबा, आधीच चार दिवस कंपनी वाऱ्यावर सोडून आलो आहे. आता जायला हवं. टांके काय पुण्याला पण काढता येतील. बरीच भवति न भवति होऊन अस ठरल की ही आणि निकिता इथेच राहतील आणि मी आणि नितीन पुण्याला जाऊ. टांके काढायच्या वेळेला नितीन येऊन जाईल. त्याच्याच बरोबर ह्या दोघी ही पण पुण्याला येतील. फायनल.
क्रमश: .............
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
[email protected]
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired