Dec 06, 2021
रहस्य

निकिता राजे चिटणीस. भाग 6

Read Later
निकिता राजे चिटणीस. भाग 6

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

 

भाग ६
भाग 5 वरुन पुढे वाचा .........

                     

 

                        वाटवे मॅडम


आज पासून ६ ट्रेनी येणार. ४ मुलं आणि २ मुली. त्यांच्या विभागांची वाटणी करावी लागणार आहे. साधारण पणे सुमारच असतात हे लोक. तसा गाळच असतो. पण क्वचित हुशार पण असतात. परिस्थितीमुळे त्यांना वाव मिळालेला नसतो. अश्या दोन जणांना आम्ही नोकरीत पण घेतल आहे. आणि ते उत्तम काम पण करताहेत आजपर्यंत तरी कुठल्याही तक्रारीला वाव नाहीये. पण बाकी सगळा आनंदच असतो. आमचंच काम वाढतं त्याच्यामुळे, आणि ज्यांच्या हाताखाली हे काम करतात ते वैतागतात. अश्या लोकांना संधि द्यायची अशी पॉलिसी असल्यामुळे कोणाला बोलता येत नाही. साधी कुरबुर सुद्धा खपवून घेतल्या जात नाही. ह्या बाबतीत मोठे सर म्हणजे अविनाश सर फार कडक आहेत. एक दृष्टीने समाजसेवा म्हणून चांगलंच आहे. पण ज्यांचं काम आहे ते रेंगाळतं मग जास्तीचा वेळ थांबून काम निपटांव लागतं त्यातून मग चिडचिड होते. आणि हे सगळं माझ्याच अखत्यारीत असल्यामुळे मलाच सगळी भांडण सोडवावी लागतात. समजूत काढावी लागते. त्याच्यातच थकायला होत. मग माझी पण चिडचिड सुरू होते. एरवी शांत असणारी आई चिडली की मुलं विचारतात की ट्रेनी आले आहेत ? आणि उत्तराची वाट न पाहता सर्व कामे बिनबोभाट आटोपतात. मीच मग स्वत:ला समजावते. असो. जे आहे ते अस आहे.

दोघा मुलींना अंजिकर सरांकडे धाडलं दोघा मुलांना पांडे सरांकडे जनरल अॅडमिनिसट्रेशन ला आणि दोघांना सांखळकरांकडे फॅक्टरी मध्ये, विभागणी संपली.ही नेहमीचीच प्रथा होती. मुली फक्त अंजिकर आणि पांडे सरांकडे आणि मूल फॅक्टरी ला. पद्धत अशी होती की ट्रेनी लोकांना कामे वाटून द्यायची ती त्यांनी पूर्ण करायची. weekly रीपोर्ट बनवायचे आणि त्या त्या सरांकडे सबमिट करायचे. त्यानंतर सांखळकर पांडे आणि अंजिकर ते तपासायचे आणि आपली नोटिंग करून माझ्याकडे पाठवायचे. त्यावर चर्चा करून काय कमतरता आहे,त्यावर उपाय योजना करायची. तीन महिन्यांनंतर सर्व रिपोर्टस एकत्र करून त्यावरून निष्कर्ष काढून तो इंस्टीट्यूटला पाठवून द्यायचा. त्याप्रमाणे इंस्टीट्यूट त्यांना प्रमाण पत्र द्यायची. कोणी खूप चांगला performance दिला असेल तर कंपनी वेगळं प्रमाणपत्र पण द्यायची. बऱ्याच मुली मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्याचं कानावर पण आलं होत.
आठवडा सांपला. दुपारी चार वाजता मी आणि अंजिकर conference room मध्ये बसलो. त्या अगोदर अंजिकर , पांडे आणि सांखळकर यांची मीटिंग होऊन गेली होती.
अंजिकर मला एक विचारायच होत की मी पाहते आहे ही मुलगी काय नाव तीच ? हं राजे, तर गेल्या दोन तीन दिवसांपासून फार इकडे तिकडे फिरतांना दिसते आहे. काम फारसं करतांना दिसत नाहीये. पण तुमचा रीपोर्ट सांगतो आहे की तिचं काम चोख आहे आणि वेळेच्या आधी होत आहे हे कस काय ?


अहो तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय.
म्हणजे ?
ही मुलगी म्हणजे चमत्कार आहे. सौन्दर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम एकाच ठिकाणी आज तागायत कधी पाहिला नव्हता. नुसत एवढंच नाही तर कामात बिजली आहे बिजली. अहो तीनच दिवसात तिनं सगळ आत्मसात केलं. स्वत:च काम पूर्ण करून, ते ही जेमतेम २ तासात, ही पोरगी दुसऱ्यांना मदत करायला धावते. जेणेकरून त्यांचा सुद्धा रीपोर्ट चांगला जाईल.


काय सांगताय काय ? तुम्हाला चांगलंच impress केलेल दिसतंय ह्या पोरीने.
खरं तर तिला तुम्हीच ट्रेनिंग द्यावं अस मला वाटतंय. अहो काय spark आहे तिच्यात ते तुम्हाला पण कळून येईल.
अंजिकर, आठ दिवसात कोणाबद्दल मत बनवण बरोबर नाही. इतक प्रभावाखाली येऊ नका.
मॅडम अॅडमिनिसट्रेशन मधली लोक आपण, इतक्या चटकन कोणाच्या प्रभावाखाली येऊ का
तेच म्हणतेय मी. बर ते सोडा त्याबद्दल आपण नंतर बोलू. मला अजून एक विचारायच होत ते अस की ती बाकीच्या ट्रेनीज बरोबर बोलते, त्यांना मदत करतेय हे सर्व ठीक आहे. पण ती आपल्या स्टाफ बरोबर पण बोलते आणि कुठला तरी फॉर्म भरतेय, हे तुमच्याही लक्षात आलंच असेल. हा काय प्रकार आहे ? मला तर वेगळाच संशय येतोय. मला जरा काळजीच वाटतेय.


अं मला समजल नाही तुमच्या काळजीच कारण. आणि संशय म्हणजे कसला मॅडम ? अस काही आहे का की जे तुमच्या नजरेस आलंय आणि कुठेतरी खुपतय पण नेमक काय ते कळत नाहीये पण हे नॉर्मल नाहीये अस जाणवतय.
यस तसंच काहीतरी. म्हणजे मला अस सांगा की
एक एखादी मुलगी एवढ्या कमी वेळात आपल्या कामात जवळ जवळ पारंगत
झालेली अख्या आयुष्यात तुम्ही पाहिली आहे का ? दुसऱ्यांनी कोणी सांगितल असतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ?
दोन सुंदर मुलींच वर्णन गजगामिनी अस केल्या जाते. पण हिच्या हालचाली फार चपळाईच्या आहेत. इतर सुंदर मुली बरोबरच्या मुला मुलींना कामाला लाऊन आपल काम काढून घेतात. ही तर मदतीला धावते आहे. हे कस काय ?
तीन सुंदर मुलींना आपल्या सौंदर्याचा गर्व असतो. एक प्रकारची ऐट त्यांच्या प्रत्येक हालचालीतून इतरांना जाणवते. ही तर ह्या बाबतीत अत्यंत बेफिकीर दिसतेय, आणि लाघवी तर इतकी आहे की मदर तेरेसाच अवतरल्यात की काय अस वाटाव.
ह्या सगळ्या गोष्टींचा भुंगा डोक्यात फिरतो आहे म्हणून मी अस म्हणाले की मला काळजी वाटते आहे. हे काहीतरी वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतो आहे. आपल्याला सतर्क राहायला हव अस मला वाटत.


मॅडम तुम्हाला अस म्हणायच आहे का की कोणीतरी तिला हेरल, भरपूर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढल आणि मग तिला full training दिल. मग ती सर्व दृष्टीने get set and go स्थितीला पोचल्यावर आणखीही बरच काही शिकवून मग institute मध्ये प्रवेश घेतला आणि institute ला पण मॅनेज करून आपल्याकडे पाठवलं ?
अंजिकर मला अगदी हेच म्हणायच होत. आता पुढे बोला.
प्रकरण प्रथम दर्शनी तरी सिरियस दिसतंय. आपण हे मोठ्या सरांच्या कानावर घालायच का
नको आपण प्रथम स्टाफ शी बोलू. त्यांना कुठली प्रश्नावली दिली ते बघू. मग ठरवू . पण तो पर्यन्त आपल्याला जागरूक राहायला हवं. कुठली माहिती ती गोळा करतेय ते बघण जरुरीच आहे.
ठीक आहे.
तेवढ्यात बबन, आमचा शिपाई चहा घेऊन आला. अंजिकरांनी त्याला थांबवल म्हणाले मॅडम ह्याच्याशी पण ती बराच वेळ बोलत होती. ह्याच्यापासूनच सुरवात करूया का ? मी मानेनेच होकार दिला. अंजिकर सुरू झाले.
बबन मला सांग गेली किती तरी वर्ष आपल्याकडे ट्रेनी मुलं येतायत पण कधी स्टाफ शी कधी जवळीक केलेली पाहिलीस का ?
नाही साहेब, जरा दबूनच असतात ही मुलं.
बरोबर मग याच वेळेस काय झालं की तुम्हा लोकांशी गप्पा मारताहेत ?
हे बघ घाबरू नकोस, आमचं त्यावर काहीच म्हणणं नाहीये, पण जे इतक्या वर्षात घडलं नाही ते होतय म्हंटल्यांवर जरा कुतूहल वाटतंय एवढंच. काय बोलता रे एवढं ?
काही नाही सर असच इकडच तिकडच म्हणजे कुटुंबात कोण कोण असत, मूलं किती, आई वडील जवळ असतात का, मूलं कोणत्या शाळेत आणि वर्गात आहेत, असेच प्रश्न, बायको किती शिकली आहे, मुलांना शिकवू शकते का, नोकरी करते का वगैरे.
बस इतकंच ? आणखी काही नाही ?
आई वडिलांच्या औषध पाण्यासाठी काय व्यवस्था केली आहे ,आकस्मिक खर्चासाठी
काय तरतूद आहे , मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या वेळी पैशांच गणित कसं बसवता, भांडणं किती होतात वगैरे वगैरे.
आणि त्या प्रश्नावली च काय ?
हेच प्रश्न होते त्यात साहेब.
अरे वा, चालू द्या. जा तू. बबन गेल्यावर अंजिकर माझ्याकडे बघत होते, काय मॅडम ?
वर वर बघितल तर हे सर्व harmless दिसतंय, पण ही एवढी माहिती ही मुलगी का गोळा करतेय हे कळल पाहिजे.
बोलावू का तिला म्हणजे हा विषय आज संपवूनच घरी जाऊ उगाच डोक्याला भुंगा नको
चालेल पण अगोदर थोडा विचार करू. थोडा वेळ तसाच गेला. शेवटी अंजिकरांना म्हंटल बोलवा.
May I come in ?
राजे आत आली आणि बाजूला उभी राहिली. मला बोलावलत मॅडम ?
का ग तुला तर सरांनी बोलावल आणि इथे अंजिकर सर बसले आहेत त्यांना नाही विचारलस. मला का ?
सरांच्या तुम्ही वरिष्ठ आहात आणि वरिष्ठ हजर असतांना त्यांनाच अॅड्रेस करायची पद्धत आहे म्हणून.
बर सरळच विषयाला हात घालतेय . तू जे प्रश्नावली अभियान सुरू केल आहेस त्याच्याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायच आहे. तेंव्हा आता तू सविस्तर बोल आम्ही ऐकतोय. इंस्टीट्यूट ने यावेळेस काही अभ्यासक्रम बदलला का ? कारण आम्हाला त्याची कल्पना दिली गेली नाही. आम्हाला त्यांच्याशी बोलाव लागेल. कारण ट्रेनी मुलांनी काय काय करायच यांचा चार्ट आमच्या जवळ असतो. त्यात हे बसत नाही.


नाही इंस्टीट्यूट नी आखून दिलेल्या कार्यक्रमात हे नाहीये. हा माझ्या personal initiative चा भाग आहे. थोड सविस्तर बोलाव लागेल. थोडा वेळ लागेल तुम्ही ऐकून घ्याल का ? प्लीज मला या कारणांसाठी वापस पाठवू नका.
ते तू काय सांगतेस त्यावर अवलंबून असेल. तू बोल आम्ही ऐकायलाच बसलो आहोत. तू पण बसू शकतेस.
नको उभीच ठीक आहे. बसून नको.
ओके तुला हव तसं.
मॅडम, सर, मी विज्ञानाची पदवीधर आहे. केमिस्ट्रि हा माझ्या आवडता विषय. आता मी जे काही बोलणार आहे त्याचा आणि माझ्या या शिक्षणाचा काही संबंध नाहीये. इंस्टीट्यूट च्या क्लास मध्ये आम्हाला मानसशास्त्राचे पण काही धडे असतात. त्यामध्ये मला इंट्रेस्ट निर्माण झाला. मग मी थोडा यावर रिसर्च केला आणि एक निष्कर्ष काढला. सांगू ?
हं सांग पण पाल्हाळ न लावता सांग.
हो. अगदी सारांश रूपात सांगते. आपल्या कंपनी ची उद्दिष्ट काय आहेत ? कंपनी ची उत्तरोत्तर सर्वंकष प्रगती बरोबर ?
बरोबर
आता ही प्रगती साधण्यासाठी काय आवश्यक आहे ? कंपनीच्या प्रॉफिट चा म्हणजेच नफ्याचा आलेख सतत चढता असणे बरोबर ?
हॅ, यात तू काय विशेष सांगितलं हे समजण्यासाठी तुला रिसर्च करावा लागला असेल तर कठीण आहे. हे तर सर्वश्रुतच आहे.


पुढे ऐका न.
कंपनी चा नफा हा कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो. high performance is directly related to gain in profit. आता कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सतत वाढीव स्तरावर राखणे हे दर वर्षी वाढीव नफा मिळण्यासाठी आवश्यक आहे. आता ताळेबंदात दिसणारा वाढीव नफा हा काही अंशी inflation मुळे किंवा महागाई मुळे जो price escalation फॉर्म्युला असतो त्यामुळे पण असू शकतो. पण तो फसवा असतो. कारण खर्च सुद्धा त्याच प्रमाणात वाढालेले असतात. कार्यक्षमता जर वाढली तर खर्चाला पण आपोआप लगाम घातल्या जाईल. आता , प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तशीच ती कार्यक्षमतेला पण आहे. प्रत्येक जण ह्या मर्यादेला पोचला की कार्यक्षमतेची उतरण सुरू होते.


आता दुसरी बाजू बघू जशी मानवी क्षमतेला मर्यादा असते तशीच ती यंत्रांनाही असते. जुनाट यंत्रांवर पूर्ण क्षमतेनी काम करून सुद्धा अपेक्षित आउटपुट मिळत नाही.
आता तिसरी बाजू काळा बरोबर जर कार्यपद्धती बदलल्या नाही तर कामा मध्ये तोच तो पणा म्हणजे monotony येते. त्यामुळे सुद्धा आउटपुट वर परिणाम होतो.
ह्या सर्व गोष्टींचा प्रॉफिट वर negative परिणाम होतो. result काय तर you see decline in profit. आणि प्रॉफिट कमी असेल तर त्याचा बऱ्याच गोष्टींवर डायरेक्ट परिणाम होतो. आधी कुजबूज आणि नंतर कुरबुर ही सर्व स्तरांवर सुरू होते. आणि हे मॅनेजमेंट वर एका आव्हांनाच्या स्वरूपात येऊन कोसळत. आणि मग बाकीच्या सर्व गोष्टींची प्राथमिकता बाजूला ठेऊन यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्यावर विजय मिळवावाच लागतो. याला पर्याय नाही.
तुला नक्की काय म्हणायचं आहे ते आमच्या अजून लक्षात येत नाहीये. जरा तुझा मुद्दा अजून स्पष्ट कर.
ठीक आहे.
मुद्दा न. २ जुनाट यंत्रांचा कायापालट किंवा नवीन मशीनरी आणणे.
मुद्दा न. ३ कार्यपद्धती बदलणे.


ह्या दोन्ही गोष्टी professional consultant ला बोलावून काय तो निर्णय मॅनेजमेंट घेऊ शकते त्यामुळे मी त्यांच्या तपशिलात शिरत नाही. माझा जो रिसर्च चालू आहे तो कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि क्षमता maximum ला कशी पोचेल याच्यासाठी.
म्हणजे तुला अस म्हणायच आहे का की आपले कर्मचारी त्यांच्या क्षमतेनुसार पूर्ण आउटपुट देत नाहीत. अस असेल तर हा गंभीर आरोप आहे आणि त्याचा तुला पुराव्यासह जबाब द्यावा लागेल.


नाही नाही मला अस मुळीच म्हणायच नाहीये. मी माझा मुद्दा अजून स्पष्ट
करते. कोणाचीही क्षमता ही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असते. मानसिक स्थिति ही त्यांच्या घरी कौटुंबिक वातावरण कसं आहे त्यांच्यावर अवलंबून असेल. मी नेमक्या ह्याच वातावरणाचा शोध घेते आहे. त्याच्यासाठी त्यांची पूर्ण माहिती गोळा करणं चालू आहे. ही माहिती नीट संकलित करून वर्गवारी करायची. मग आपल्याला कळेल की माणूस कोण कोणत्या कारणांनी मन:शांती गामावतो ते. कसं आहे न मॅडम कुटुंब ही माणसाची वैयकत्तिक तशीच सामाजिक गरज आहे. सुखी आनंदी परिवार माणसाला समाधान देतो. त्याकरता पैश्यांची गरज लागते म्हणून माणूस नोकरी किंवा व्यवसाय करतो. जर काही कारणांमुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर असमाधानी कुटुंबात राहून माणूस मॅक्सिमम आउटपुट देऊच शकणार नाही. त्या त्या कारणांचा शोध घेऊन त्यावरचं सोल्यूशन काढता आल तर माणूस कामावर येतांना आनंदात येईल. आणि या परिस्थितीत तो मॅक्सिमम आउटपुट देऊ शकेल. आपल्याला हेच साधायच आहे.
हे सगळ ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना फारसं लागू होत नाही. म्हणजे तुम्ही कोणाला सांगितल की आज संध्याकाळ पर्यन्त हे काम पूर्ण झालंच पाहिजे. आणि ते काम दुसऱ्या दिवशी झालं तर फारसा फरक पडणार नाही. तुम्ही त्याला चार शब्द सूनवाल, तो ऐकून घेईल. टाटा बाय बाय.


पण जर हा फॅक्टरी वर्कर असेल तर काम वेळेतच व्हावं लागेल नाही तर त्याच्यापुढची कामं थांबतील आणि त्याचा delivery date वर परिणाम होऊ शकतो. जर ती एक्सपोर्ट ऑर्डर असेल तर शिपमेंट ची तारीख चुकून चालतच नाही. त्यामुळे त्याला चार शब्द सुनावून सुद्धा त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे मला अस वाटत की फॅक्टरी मध्ये काम करणारे जर चिंतामुक्त स्थितीत कामावर आले तर ते पूर्ण क्षमतेनी आउटपूट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. मला अस वाटत की कामावर येतांना A person should be free from home worries. मी तुम्हाला प्रश्नावली आणि आतापर्यन्त जे काम केलंय ते दाखवते. मी जाऊन papers घेऊन येते.


We were speechless. अंजिकर काय म्हणताय ?
मी म्हंटलं होत ना मॅडम की ही मुलगी म्हणजे चमत्कार आहे. हिच्यात मला तरी काही खोट दिसत नाही. शोधून सुद्धा कुठे बोट ठेवता येत नाहीये.
खरंय येऊ द्या तिला प्रश्नावली घेऊन. बघू.
आल्यावर तिने प्रश्नावली दाखवली आणि जी काय माहिती गोळा केली होती ती आणि त्यावरचे तिचे रिमार्क्स सर्व तपशीलवार सांगितलं. आम्ही फक्त माना डोलवत होतो. सर्व पसारा नीट गोळा करून फोल्डर मध्ये ठेवल्यावर आमच्या समोर प्रश्नार्थक मुद्रा उभी राहिली.
चांगलं काम करते आहेस. चालू ठेव.
मॅडम मला फॅक्टरी मध्ये जाव लागेल.
जरूर जा पहिल्या दिवशी अंजिकर कोणाला तरी बरोबर देतील. तू सांग केंव्हा पासून सुरवात करणार आहेस ते.
Thank you


ती गेल्यावर मी अंजिकरांना म्हंटलं की वरवर पहिलं तर सर्व ठीकच दिसतंय तिच्या चेहऱ्यावर कुठे बेरकीपणाची एखादी तरी छटा दिसते का पाहत होते पण पोरगी निरागस वाटली. म्हणजे माझा संशय आता जवळजवळ फिटला आहे, पण आपण कंपनी चे सीनियर लोक आहोत त्यामुळे इतक्या चटकन हे हातावेगळं करायची इच्छा होत नाहीये. सर्व झाल्यावर तिच्याकडून सगळं बाड ताब्यात घ्या. मग आपण रोज तासभर संध्याकाळी बसून त्यावर अभ्यास करून आपले निष्कर्ष काढू आणि मगच सरांकडे जाऊ. तुम्हाला काय वाटत ?
ठीकच आहे मॅडम. ती काय काय रिमार्क्स देते आणि काय निष्कर्ष काढते ते पण
बघाव लागेल. काय काय करांव लागेल त्याच्या काय सूचना देतेय ते पण बघाव लागेल.
बरोबरच आहे. तुमचं तिच्याकडे बारीक लक्ष असू द्या. म्हणजे आजची मीटिंग झाल्यावर तिनी आपल्याला गृहीत धरायला नको. चला बराच उशीर झाला आहे. निघूया.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
[email protected]
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired