Dec 06, 2021
रहस्य

निकीता राजे चिटणीस. भाग 2

Read Later
निकीता राजे चिटणीस. भाग 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


भाग 1 वरून पुढे वाचा ..........

                             नितीन चिटणीस

मुकुंद काका म्हणाले आणि लक्षात आल चुकलच जरा. पण गेले तासभर जी गडबड चालली होती त्यामुळे डोक कामच कारेनास झाल होत. किती वाजले .. पहाटेचे चार म्हणजे आई बाबा गाढ झोपेत असतील. काकांनाच विचारतो.
काका चार वाजले आहेत. आत्ता करू फोन ?
अरे लगेच कर ही वेळ रात्र किंवा दिवस पाहायची नाहीये.
एकदम बरोबर अनंतराव.
Ok
हॅलो
हॅलो मामा मी नितीन बोलतोय
कोण नितीन ? आणि एवढ्या रात्री काय आहे ?
अहो मी नितीन चिटणीस ओळखल का ?
अरे बापरे नितीन ! एवढ्या रात्री ? काय झालं ? सगळं ठीक आहे ना ?
काहीच ठीक नाहिये मामा. निकिताला अपेंडिक्स चा अटॅक आला आहे आणि तिला अॅडमिट केलंय.
बापरे,
कुठे पुण्यालाच न ?
नाही. आम्ही इथे मुकुंद काकांकडे आलो होतो त्यांच्याचकडे त्रास व्हायला लागला आणि emergency म्हणून इथल्याच राजवाडे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलंय. तिला सोनोग्राफी करायला नेलय. नंतर ऑपरेशन करतील आणि अपेंडिक्स काढून टाकणार आहेत.
अरे देवा महिना झाला लग्नाला जेमतेम आणि हे काय. विठ्ठला तूच आहेस रे बाबा. तूच पोरीला सांभाळून घे.
मामा काळजी नका करू मी आहे, मुकुंदकाका आहेत आणि शेजारचे दामले काका पण आहेत. त्यांच्याच गाडीतून निकिताला हॉस्पिटलला आणल.
चला ते दोघ आहेत हे बर आहे. तू खंबीर रहा. आम्ही तिकडे कसं यायच ते बघतो.
नको मामा तुम्ही सध्या इतकी धावपळ करू नका. औरंगाबाद खूप दूर आहे. शिवाय पावसा पाण्याचे दिवस आहेत. त्रास होईल तुम्हाला खूप. मी सांगतो नंतर. बर आता ठेऊ ? बाबांना पण फोन करायचाय. ठेवतो.
हॅलो
हॅलो बाबा मी नितीन बोलतोय.
काय रे काय झाल इतक्या रात्रीचा फोन केलास.
निकिताला अॅडमिट केलंय
का काय झालंय ?
तिला अपेंडिक्स चा प्रॉब्लेम झालाय, पोटात असह्य कळा येताएत.
मग आता ?
डॉक्टर म्हणतात अपेंडिक्स काढून टाकाव लागेल. तिच्याकडे बघवत नाही हो. इतक्या वेदना होत आहेत की जीवाचा थरकाप होतो.
....
बाबा आहात ना ? फोन कटला वाटत, पावसामुळे फोन च काही खरं दिसत नाही.
अरे बाबा I am verymuch on line. तू बोल. tests केल्यात का
हो. सोनोग्राफी करताहेत रीपोर्ट यायचाय. थोडा वेळ मिळाला म्हणून लगेच तुम्हाला कळवतोय.
अशा गाव खेड्यांमद्धे अशी मोठी शस्त्रंक्रिया म्हणजे प्रॉब्लेमच.
बाबा अस का म्हणता हे हॉस्पिटल खूपच चांगल आहे आणि डॉक्टर राजवाड्यांशी बोलल्यावर तर एकदम आश्वस्त झालो. तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हालाही असच वाटेल.हवं तर मुकुंद काकांशी बोला, इथे दामलेकाका पण आहेत, त्यांच्यांशी पण बोला.
अरे मी डॉक्टरांच्या अनुभवा बद्दल बोलत नाहीये. अनुभवी आहेत नक्कीच चांगले असतील. पण समजा जर काही complications झाले तर अश्या ठिकाणी सर्व सोयी available असतीलच अस नाही असा विचार मनात आला. अजून काही नाही.
हां हे नाकारता येत नाही. पण आता अश्या परिस्थितीत आपण काय करू शकतो.
Exactly तेच म्हणतो मी. डॉक्टरांना म्हणाव वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार करा. दुख: कमी झाल्यावर तिला गाडीत घाल आणि पुण्याला या. इथे बरीच super speciality hospitals आहेत. त्यामुळे सगळ काही व्यावस्थित होईल आणि आपल्याला काही टेंशन राहणार नाही. परत इथे आपल्याकडे माणुसबळाची पण कमतरता भासणार नाही.
बरोबर आहे बाबा तुमचं म्हणणं पण पुण्याला आजच्या आज आणण शक्य नाही. इथली परिस्थिति खूप विचित्र आहे.
आता याच्यात काय विचित्र आहे ? साधी सरळ सोपी गोष्ट आहे. गाडीत घाल आणि घेऊन ये संपल.
...... कसं सांगू sss
एक तर काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आत्ताही पडतोच आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालय. दहा फुटावरच दिसत नाहीये. वर आपली गाडी बंद पडली आहे. काल दामले काकांनी आणलं म्हणून अॅडमिट तरी करता आल. त्यांचे उपकारच मानायला हवेत. अगदी देवासारखे धाऊन आले. खरं तर या वयात अश्या वेदर मध्ये गाडी चालवण त्यांच्या साठी फार अवघड गोष्ट होती. but he did it for us.
Ok. आपल्याला फारसा चॉइस दिसत नाहीये तेंव्हा let us face it. तू मात्र धीर सोडू नको. खंबीर रहा ते जास्त जरूरी आहे. आम्ही पण निघतोच.
बाबा तुम्ही स्वत: ड्राइव्ह करू नका. ड्रायव्हर घ्या.
अर्थातच ड्रायव्हर घेणार. अश्या हवेत कोण गाडी चालवणार. इथे पण चांगलाच पाऊस पडतो आहे.
ठीक तर मग वाट पहातो. पण मग आता डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे पुढे जायच ना ?
Ofcource. Follow the doctor. बर ठेवतो आता. तयारी करायची आहे. ड्रायव्हरला फोन करायचा आहे. ok ?
Ok. निघाल्यावर फोन करा.
करतो.
हुशः एक काम झाल. आता रीपोर्ट आला का ते बघाव. चला नितीनराव चला. बसायला वेळ नाही.
हॉल मध्ये मुकुंद काका बसले होते आणि दामले काका फेऱ्या मारत होते.
काका रीपोर्ट आला का
नाही अजून.
मी विचारून येतो.
हे अनंतराव आता पर्यन्त चार वेळा विचारून आलेत. पण तुझे फोन झालेत का. काय म्हणाले बाबा ?
बाबांना सर्व डीटेल मध्ये सांगितल. ते इथे यायला निघताहेत. कारनेच येतायत.
अरे एवढ्या पावसात कार चालवत येणार ? काल पाहिलंसना आनंतरावांना किती त्रास झाला ते.
हो बाबांना म्हंटलं मी की ड्रायव्हर ला बोलवा म्हणून.
मग ?
हो म्हणालेत.
डॉक्टरांनी बोलावल आहे. नर्स सांगत आली.
हं डॉक्टरांच्या समोर सोनोग्राफी चे फोटो होते. आणि एक रीपोर्ट चा कागद . काय करू प्रथम फोटो समजाऊन सांगू का फायनल result सांगू. ?
डॉक्टर फोटो राहूद्यात तसंही आम्हाला त्यातलं काही कळणार नाही. तुम्ही रीपोर्ट काय आहे तेच सांगा.
Ok. कंडिशन विशेष चांगली नाहीये. infection ची मात्रा बरीच आहे. खूप सूज आलेली आहे. त्वरित ऑपरेट करांव लागणार आहे. आपल्या जवळ थांबण्यासाठी फारसा वेळ नाहीये.
तरी किती वेळ आहे आपल्या कडे ? म्हणजे माझे आई बाबा पुण्याहून इकडे यायल्या आत्ता निघताहेत म्हणून ....
दोन चार तास थांबू शकतो पण तेव्हढेच. शिवाय पेशंटला तितका जास्त वेळ वेदनांचा त्रास होणार.
नितीन जर आपण emergency पर्यन्त पोचलोच आहोत तर चार तास थांबून काय करणार. why wait for situation going from bad to worse. त्या पोरीला इतक्या वेदना सहन करण्याची किती शक्ति उरली असेल हाही एक प्रश्नच आहे. माझ्या मते तू बाबांना फोन लाव आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे.
मी थोडा विचार केला. दामले काकांच्या बोलण्यात तथ्य जाणवत होत. बाबांना फोन लावायला हवा. मला पाच मिनिटे द्या. मी फोन लावतो. मी डॉक्टरांना म्हंटल .
अरे अरे अरे इतक panic होण्याच काहीच कारण नाहीये. Think over it. Discuss with your father and these two elders. If required, माझ्याशी बोलणं करून दे. We
certainly have that much time. Ok ? डॉक्टर म्हणाले.
ठीक आहे. समजा बाबांना तुमच्याशी बोलायच असेल तर तुम्ही कुठे असाल ?
मी इथेच आहे. काळजी करू नको.
आम्ही हॉल मध्ये बसून एकमेकांकडे बघत बसलो.काय बोलावं ते सुचेना. तस दामले
काकांनी मघाशी व्हर्दिक्ट दिलंच होत. त्या दोघांचही त्यावर एकमत होत.माझीच द्विधा मनस्थिती झाली होती.
मग नितीन काय म्हणतोस .मला अस वाटत की तू एकदा जाऊन तिची तब्येत बघून ये. आल्या पासून ती एकटीच आहे. तिला जरा धीर येईल तुला बघून. थोडा वेळ बस तिच्या बरोबर.
बाबांना फोन करू का, काय करू ? बाबांनी follow the doctor अस मघाशी फोन केला तेंव्हाच सांगितलं. पण मलाच ठरवता येत नाहीये. तुम्हीच सांगा
जे काय करायचं ते लगेच कर. मी बोलू का बाबांशी ? पहा ठरव काय ते.
खरंच तुम्हीच बोलता का
ओके मी बोलतो पण तू जाऊन तिला धीर दे. आणि हे बघ गंभीर चेहऱ्याने बसू नको. लाईट मूड घे. जा आता. मी बोलतो.
हॅलो
हॅलो अविनाश मी मुकुंदा बोलतोय.
हुं , बोल काय situation आहे ?
डॉक्टर म्हणतात की operation लगेच करावं लागणार आहे. तसे ३_४ तास आहेत हाताशी. तू येई पर्यंत, पण प्रश्न हा आहे की एवढा वेळ वाया घालवायचा का ?
अरे तुम्ही लोकं आहात ना तिथे मग परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्या. माझ्यासाठी थांबण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. कारण ऑपरेशन तर अटळ आहे. आम्ही आता निघतोच आहोत. कोणच हॉस्पिटल म्हणालास राजवाडे हॉस्पिटल ?
हो.
चल तर मग ठेवतो.
निकिताला भेटून आलो. मुकुंद काका म्हणाले की बाबांशी बोलणं झालं. त्यांनी go ahead म्हणून सांगितलं आहे तेंव्हा आता clearance देऊन ये. बरं आता कशी आहे निकिता ?
पेन थोड कमी आहे. औषधांचा परिणाम होतोय.
डॉक्टरांना सांगून आलो.
काका डॉक्टर म्हणतायेत की ऑपरेशन पहायचं असेल तर येऊ शकता . फक्त मनाची तयारी करून या.
छे रे बाबा, ते शरीराची चिरफाड करतांना बघवणार नाही. नकोच ते.
हुं ss s
दोन तास उलटुन गेले. डॉक्टर बाहेर आले.
ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. Nothing to worry. Relàx . कॉफी घ्या नाश्ता करा.
आम्हाला भेटता केंव्हा येईल ?
अजुन दोन तासांनी . अजुन ती गुंगीत असेल. चला.
हॅलो
हॅलो बाबा ऑपरेशन झालं. सगळ ठीक आहे. डॉक्टर आत्ताच सांगून गेलेत. तुम्ही केंव्हा पोचता आहात
साधारण दहा होतील.
Ok
हॅलो
हॅलो मामा मी नितीन.
हं बोल नितीन, आम्ही तुझ्या फोनचीच वाट पाहत होतो. कशी आहे परिस्थिति ?
मामा, ऑपरेशन पार पडल. सर्व काही व्यवस्थित आहे अस डॉक्टर म्हणाले. अजून दोन तास तरी ती गुंगीत असल्यामुळे भेटता येणार नाही. भेटल्यावर तुम्हाला पुन्हा फोन करीन. चिंता करू नका. मी फोन करतो नंतर. आणि हो दोन तीन दिवसांत डिस्चार्ज पण मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्ता येण्याचा विचार करू नका. पुण्याला गेल्यावर बघू. बर ठेवतो आता.
डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित आहे अस म्हंटल्यामुळे नाश्ता करतांना आम्ही सगळेच relaxed होतो. दहा साडेदहा वाजे पर्यंत आई बाबा पण पोचले. तेवढ्यात नर्स आली. म्हणाली, तुम्ही आता भेटू शकता. पण एका वेळेला एक जण आणि पाच पाच मिनिटं फक्त. अजुन तासाभराने रूम मध्ये shift करु. मग तुमच्या वर बंधन नाही. पण पेशंट ला त्रास होईल इतक बोलू नका. आणि तिने एका बाटलीत solution मध्ये ठेवलेले appendix चे तुकडे दाखवले.
निकीता कुठे आहे
Recovery room मध्ये. ती समोर जाऊन डावीकडे.
निकिताच्या चेहऱ्यावर थकवा होता पण नजर हसरी होती. तिचा हात धरुन थोपटले. बोलण्याची जरूर नव्हती. आम्ही एकमेकांकडे बघत होतो फक्तं. मला भीती वाटत होती की केंव्हाही डोळ्यात पाणी येईल. तिच्या ते लक्षात आले. हात हलवून हसली आणि डोळे मिटले. मी बाहेर आलो आणि मग आई बाबा आत गेले.
क्रमश: .............
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
[email protected]
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired