Dec 06, 2021
रहस्य

निकिता राजे चिटणीस भाग 7

Read Later
निकिता राजे चिटणीस भाग 7

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग  ७

भाग 6 वरून  पुढे  वाचा ...........

                                                 निकिता

त्या दिवशी मिटिंगच्या वेळी माझ्यावर चांगलंच दडपण आल होत. का कोण जाणे पण वाटवे मॅडम चा मूड अत्यंत खराब होता. त्या बारकाईने मीटिंगभर माझ्याकडे बघत होत्या. आवाजामधे जरा धारच होती. पण हळू हळू त्यांचा स्वर बदलत गेला. मीटिंग संपल्यावर मला माझ काम करायला पूर्ण मोकळीक दिली म्हंटल्यावर तर मला इतका आनंद झाला की केंव्हा एकदा घरी जाते आणि आईंना सर्व सांगते अस झाल. ऐकतांना आईंचा चेहराच सांगत होता की त्यांना पण हे सर्व काम आवडलं म्हणून. मला पण खूप छान वाटलं. कार्तिकला सांगितल्यावर तो म्हणाला की करून दाखवलस ! I AM PROUD OF YOU. KEEP IT UP. आमच्या ग्रुप मधे तर सर्वांना आश्चर्य नाही तर विस्मयच वाटला. काय प्रतिक्रिया द्याव्यात हेच कोणाला सुचेना. कोणीही माझ्याकडून मी अस काही करेन अशी अपेक्षाच केली नव्हती. चित्रा तर म्हणाली सुद्धा तू विज्ञानाची विद्यार्थिनी असल्याने हे सर्व वैज्ञानिक दृष्टी वापरुन पूर्णत्वाला नेलस हे ऐकून प्रचंड आनंद झाला. अप्रतिम.

दुसऱ्या दिवसांपासून आमचा accounts चा अभ्यास सुरू झाला. तीन महीने कसे गेले हे कळलंच नाही. एकदम वेगळा विषय, आतापर्यन्त ज्याचा गंधही नाही अश्या विषयाचा अभ्यास म्हणजे माझ्यासाठी फार अवघड काम होत. पण चिकाटीने अभ्यास केल्यावर हळू हळू विषय सोपा  वाटायला लागला. तीन महीने पूर्ण झाले. आता प्रॅक्टिकल आणि ते ही पुन्हा चंदन इंजीनीरिंग मधेच.

 

 

                                                             चोरघडे

नवीन ट्रेनी मुलं म्हणजे एक तापच असतो. एक तर ८० टक्के पोर माठच असतात. त्यांच्या कडून काम करून घ्यायच म्हणजे सतत अवघड पेपर सोडवायला लागला की जशी अवस्था होईल तशी होते. परत आमच्या कंपनी ची पॉलिसी अशी की त्यांच्याकडून काम करून घ्यायचच, जेणेकरून काम शिकल्यावर त्यांना नोकरी मिळण्यास अडचण येऊ नये. एक प्रकारच सामाजिक कार्यच आहे पण आमची होरपळ होते. अर्थात ज्यांच्या हाताखाली ट्रेनी असतात त्यांना एक्स्ट्रा incentive पण मिळतो. ही जमेची बाजू.

पण ह्या वेळेची गोष्ट जरा वेगळी आहे. टीम चांगली आहे. अजिबात त्रास नाही. चट चट शिकताहेत. कामात पण चुका नाहीत. काही समजलं नाही तरी आमच्या कडे येत नाहीत. त्यांची टीम लीडर आहे मिस राजे म्हणून तिच्याच कडे जातात. ती तर कामं अशी करते की १० वर्षांचा अनुभव घेऊन आली आहे अस वाटावं. काल ती माझ्याकडे आली vat टॅक्स च अॅन्युअल रिटर्न घेऊन. तिच्या हातात पाच वर्षांचे रिटर्न्स होते. मला वाटलं की ती रिटर्न समजून घ्यायला आली असेल. मी तिला म्हंटलं की आत्ता मी कामात आहे आपण चार वाजता बसू. मी तुला सगळं सांगेन.

बरोबर चार वाजता ती आली.

हं हातात रिटर्न्स दिसताहेत काय अडचण आहे. सांग.

नाही अडचण काहीच नाही. काही सांगायच होत. आणि एक परवानगी हवी होती.

अस ? काय सांगायच होत. आणि परवानगी कसली हवी होती ? लवकर घरी जायच आहे ?

नाही नाही. मला पाच वर्षांपूर्वीचे रिटर्न्स हवे होते संजय म्हणाला की तुमची परवानगी घ्यावी लागेल म्हणून.

तुला पाच वर्षांपूर्वीचे रिटर्न्स कशाला हवेत, स्टडी करायला एवढे पुरेसे आहेत की.

मला लेटेस्ट रिटर्न मध्ये एक चूक आढळली. म्हणून मी मागे मागे जात जात पाच वर्षांचे रिटर्न्स स्टडी केलेत. सर्वांमध्ये कॅलक्युलेशन चा समान धागा दिसला जो की चूक आहे. त्यामुळे आपण जास्ती टॅक्स भरला आहे म्हणून मला अजून मागे जायच आहे.

अग तुझ्या कॅलक्युलेशन मध्ये काही चूक असेल. कारण घोडे पेडणेकरांकडून अशी चूक होणार नाही ते शहरातले प्रथितयश चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. परत मी आणि वाघूळकर सरांनीही चेक केल आहे. तू पुनः एकदा बघ नाही कळल तर मी तुला समजावून सांगेन. ठीक आहे ?

नाही सर मला खात्री आहे की मी चूक करत नाहीये. प्रश्न साडे तीन कोटींचा आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही माझ म्हणणं पूर्ण ऐकून घ्याव. आपण साडे तीन कोटी जास्ती भरले आहेत आणि ते आता आपल्याला वापस मिळवावे लागतील.

तिनी आकडा सांगितल्यावर जरा हाबकलोच. बर, मुलगी उथळ वाटत नव्हती चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मग ठरवल की काय सांगतेय ते बघू.

ओके, लेटेस्ट रिटर्न घे आणि मला नीट सारं स्पष्ट करून सांग. तुझे सर्व calculations दाखव. त्यांचे वर्किंग पेपर्स आपल्याकडे नाहीत त्यामुळे क्रॉस चेक करण्यासाठी त्यांनाच बोलवाव लागेल. पण आत्ता मीच बघतो.  ती एकेक सांगत होती आणि मी चकित होत होतो. एक ट्रेनी मुलगी एवढं ज्ञान इतक्या कमी वेळात आत्मसात करते ही गोष्ट काही केल्या गळी उतरत नव्हती. पण तिने जी calculations करून दाखवली त्यावरून ती जे म्हणते आहे ते बरोबरच आहे हे सिद्ध होत होतं माझच डोक फिरायची वेळ आली होती. आम्ही काय चेकिंग केल त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मी संजय ला तिला हव ते दे म्हणून सांगितल. आणि तिला म्हंटलं की तुला हवं ते चेक कर आपण उद्या चार वाजता पुनः बसू. चालेल ?

चालेल.

मी विचार करत होतो ही टीम चार महिनीयपूर्वी वाटवे मॅडम कडे येऊन गेली असली पाहिजे. त्यांनाच विचाराव. त्यांना फोन केला कॉन्फ्रेंस रूम मध्ये येता का जरा बोलायच होत. त्यांनी विचारलं, का हो अस काय आहे की फोन वर बोलता येणार नाही. मी सांगितल, तुम्ही या मग सांगतो. त्यांनी  माझ्या आवाजाचा सुर ओळखला  आणि हो म्हणाल्या.

मी लगेचच पोचलो आणि त्याही पाठोपाठ आल्याच.

काही तरी सिरियस दिसतंय. बोला.

मी त्यांना काय झालंय त्यांची आधी पूर्ण कल्पना दिली.

बापरे साडे तीन करोंड आणि कोणाच्याच लक्षात आल नाही ? आश्चर्यच आहे. अशी चूक झाली तरी कशी ?

ही cumulative चूक आहे गेल्या पांच वर्षातली. आमच्याकडून झालेली ही मोठी चूक आहेच ती आता आम्ही सुधारूच. रिफंड मागावा लागेल ते ही सर्व करूच. पण मला तुमच्याशी बोलायच होत ते कारण वेगळच आहे.

आत्ता तुम्ही जे सांगितल त्यापेक्षा वेगळ अस काही आहे  की ज्याच्या करता  तुम्ही मला इथे बोलावलत ? आता मात्र कमाल झाली. 

अहो कमालच आहे. ज्या मुलीनी हे शोधून काढलं ती केवळ B.Sc. आहे आणि तिचा कॉमर्स शी काही संबंध नाही. तरी तीन महिन्यांचा साधा कोर्स करून ही मुलगी एका लिडिंग C.A. नी केलेल्या रिटर्न्स मधली चूक शोधून काढते. वर आणि हे रिटर्न्स आमच्या डोळ्यांखालून पण गेले होते. म्हणजे तिच्या हुषारीची प्रशंसा करायची का आम्हीच आम्हाला दोष द्यायचा हेच कळेनास झालंय.

ह्या मूलीचं नाव राजे आहे का ?

हो पण तुम्हाला कसं कळलं ?

मग वाटवे बाईंनी सगळा इतिहास उलगडला. सगळं सांगितल्यावर म्हणाल्या की तीच ट्रेनिंग संपल्यावर आम्ही, मी आणि अंजिकर तिने  तयार केलेले सर्व रिपोर्टस घेऊन बसलो आणि तिच काम बघून थक्कच झालो. तिने फॅक्टरी मधल्या ५० % लोकांशी संवाद साधला होता आणि माहितीची व्यअस्थित वर्गवारी केली होती आणि निष्कर्ष सुद्धा काढला होता. आम्ही फक्त संकलनाच काम केलं. जवळ जवळ २ दिवस सरांशी मीटिंग केली. त्यानंतर सर म्हणाले की गुड वर्क. नितीन सर म्हणाले की मॅडम तुम्ही तिला ऑफर लेटरच द्या. अशी हुशार मुलगी आपल्याकडे पाहिजे. पण अविनाश सरांच म्हणणं थोड वेगळं दिसल ते म्हणाले की एकदम तिला कंपनी मध्ये घेण्या पेक्षा तिला कन्सलटंट म्हणून बोलावून घ्या. आणि तिलाच हे प्रोजेक्ट करायला सांगा. एखादा अभ्यास करण वेगळ आणि जबाबदारी घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करण  वेगळ. तिने जर हे यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवल तर मग ऑफर द्या. त्या परिस्थितीत आपल्याला एक समर्थ एक्झिक्युटिव मिळेल. तिच्या कडून खर्चाचा अंदाज घ्या. खर्च आपण करू आणि तिची प्रोफेशनल फी पण देवू. पण अगोदर खर्चाचा अंदाज घ्या. आपल्याला हे प्रोजेक्ट झेपतय  की नाही हे पण बघाव लागेल.

My god इतकं सगळं झालं ?

हो आणि सुरवातीला तुम्हाला जे प्रश्न पडले ते मला सुद्धा पडले होते. माझा सुद्धा विश्वास बसंत नव्हता. मला वेगळाच संशय येत होता. मला अस वाटत होत की कोणी तरी तिला फूल ट्रेनिंग देऊन आपल्याकडे पाठवल आहे आपल्याकडची माहिती चोरण्यासाठी. पण लवकरच माझ्या लक्षात आल की अस काही नाहीये पोरगी प्रामाणिक आहे. आणि आता तुमच्याकडून ऐकल्यावर तर तीच फक्त कौतुकच वाटतं.

मीटिंग संपली. आता पुढची स्टेप म्हणजे वाघूळकर सरांना भेटाव लागेल आणि त्यांना सांगाव लागेल. उद्याच. दुसऱ्या दिवशी दुपारी मिस राज्यांना विचारल की

आणखी काही सापडल का ?

नाही सर बाकी सर्व चेक केल ठीकच आहे.

मग मी आता वाघूळकर सरांना भेटून सर्व सांगतो. सांगू ना ? की पुनः एकदा बघायच आहे.

नाही सर आता काही बघायच शिल्लक नाहीये.

ठीक आहे. तो पर्यन्त चार वाजले होते. वाघूळकर सरां कडे गेलो. तसे सर हसतमुख आहेत. चिडचिड नसते. पण आताची परिस्थितीच वेगळी होती. त्यामुळे कशी reaction असेल याचा अंदाज येत नव्हता. जरा भीत भीतच आत गेलो.

या चोरघडे बरे वेळेवर आलात आत्ताच चहा मागवला आहे. बसा.

थोड इकडच्या तिकडच्या गप्पा आणि चहा घेऊन झाल्यावर मग सर म्हणाले

हं बोला चोरघडे काय नवीन ? तुम्ही काही तरी सांगायला आला होतात.  बोला.

सर मॅटर थोड सिरियस आहे. vat टॅक्स रिटर्न्स च्या संदर्भात आहे.

रिटर्न्स फाइल झालेत. टॅक्स भरून झाला. आता काय त्याच ?

सर गेल्या पांच वर्षात आपण जवळ जवळ साडे तीन करोंड जास्त टॅक्स भरला आहे.

काय ? चोरघडे तुम्ही काय बोलता आहात हे कळतय ना ?

हो सर.

Are you serious ?

Yes sir

सर पाच मिनिटे शांत बसून होते. बहुधा धक्क्यातून स्वत:ला सावरायचा प्रयत्न करत होते.

हा काय प्रकार आहे ? तुम्हाला अस म्हणायच आहे की गेल्या पांच वर्षात आपण करोडो रुपये टॅक्स जास्ती भरला ?

होय सर. फार मोठी चूक झालेली आहे. सर्व डिटेल्स मी बरोबर आणले आहेत. तुम्ही डोळ्यांखालून घातले तर बर होईल. त्या नंतर तास दीड तास पुनः पुन्हा चेकिंग, क्रॉस चेकिंग वगैरे चाललं होत. सर्व झाल्यावर सरांनी माझ्याकडे बघितलं  चेहरा अतिशय गंभीर होता. गंभीर कसला विदीर्ण होता. चेहऱ्यावरची रया पार गेली होती. मला काय बोलाव ते कळत नव्हत. सरांची अशी अवस्था माझ्या कधी पाहण्यात नव्हती. मला वाईट वाटलं पण काय करणार,परिस्थितीच तशी होती.

चोरघडे हे फार गंभीर प्रकरण आहे. घोडे पेडणेकरांकडून चूक झाली आहे पण ती बाहेरची पार्टी आहे. आपण काय करत होतो या प्रश्नाला तुमच्या जवळ उत्तर आहे ? कंपनी च्या हिताची जपणूक करणे ही तुमची प्राथमिक  जबाबदारी आहे आणि तुम्ही त्यात अपयशी ठरलात अस जर कोणी म्हणालं तर त्यावर तुमच्याकडे उत्तर आहे ?

मी काहीच बोललो नाही. बोलण्या सारखं काही नव्हतच. बराच वेळ तसंच गेला. नी:शब्द शांतता काय असते ते आज कळल. बबन आला चहा आणि बिस्किट घेऊन. आतलं वतावारण बघून तो ही बावचळला त्याच्या सुद्धा असे वाघूळकर सर पाहण्यात नव्हते. त्यानी हातांनीच काय झालं अस विचारलं मी पण त्याला काही नाही अस हात हलवून सांगितलं आणि जा अशी खूण केली.

चहा घ्या साहेब जरा बर वाटेल आणि पुढची रूपरेषा ठरवता येईल. आपली चूक तर मान्य करावीच लागेल पण डॅमेज कंट्रोल पण आवश्यक आहे. पेडणेकरांशी आपण बोललो तर काही मार्ग निघेल. मी आपला ताण कमी करण्याच्या उद्देशानी बोललो. बाकी मार्ग एकच होता. रिफंड साठी प्रोसेस सुरू करणे.

हं

चहा घेऊन जरा मन शांत झाल्यावर सरांनी पेडणेकरांना फोन लावला.

पेडणेकर इथे जरा घोळ झाला आहे. आपल्याला मीटिंग करावी लागेल. उद्या सकाळी येता ?

.. .. .. .. 

Vat रिटर्न्स मध्ये चूक झाली आहे. आपण बराच जास्ती टॅक्स भरलेला आहे अस लक्षात आलंय.

.. .. .. ..

गेल्या पांच वर्षात

.. .. .. ..

साडे तीन करोंड

.. .. .. ..

म्हणजे अजून आठ दिवस काहीच होऊ शकत नाही ?

.. .. .. ..

ठीक आहे.

हुशः कठीण आहे.

काय झालं सर ?

पेडणेकर म्हणतात की काळजीच काही कारण नाही. जे काही असेल ते पाहून घेऊ. पण टॅक्स ची कामे पिंगळे बघतात. आणि ते आउट ऑफ इंडिया आहेत. आठ दिवसांनी येतील, तेंव्हा मीटिंग करू.

मग आता ?

ते थांबा म्हणाले तरी आपण, आठ दिवस थांबू शकत नाही. उद्याच अविनाश सरांच्या कानावर घालायला हव. तेंव्हा चोरघडे be prepared to face the situation. उद्या न जेवताच या. नाश्ता, जेवण सर्व इथेच सरांच्या केबिन मधे होणार आहे. काय ताट वाढून ठेवलं आहे ते उद्याच कळेल. तेंव्हा तयारीत रहा.

मी नुसतीच मान हलवली. मीटिंग संपली.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]      

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired