Feb 28, 2024
रहस्य

निकिता राजे चिटणीस भाग ४

Read Later
निकिता राजे चिटणीस भाग ४

भाग 3 वरुन  पुढे वाचा ........

                                           निकिता चिटणीस

ऑपरेशन होऊन जवळ जवळ वर्ष  दीड वर्ष उलटलय. आता सगळ रुटीन सेट झालेलं आहे. सकाळी उठून बाबांचा आणि नितीनचा चहा नाश्ता करायचा. ते दोघ ऑफिस ला गेले की मग आम्हा दोघींचं आरामात सुरू व्हायच. चहा नाश्ता करून आईंच आंघोळ पूजा पोथी होई पर्यन्त एक वाजलेला असायचा. मग जेवण, थोडी डुलकी, दुपारचा  चहा की संध्याकाळ व्हायची. मग आम्ही थोड पाय मोकळे करून यायचो. की मग जेवणाची गडबड. सगळी कांम राधा बाईच करायच्या. राधाबाईंना मूल बाळ काहीच नव्हत नवरा बऱ्याच वर्षांपूर्वी परागंदा झालेला. वीस वर्षांपूर्वी  त्या आमच्या घरी आल्या आणि घरच्याच होऊन गेल्या. अतिशय सुस्वभावी आणि कामाला वाघ. कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा पार्टी असू द्या त्यांच्यावर सोपवून आम्ही निरधास्त असायचो. त्यांना कधी थकलेल पाहिल नाही. आम्ही पण त्यांना मानानेच वागवायचो. दुपारी आई, मी आणि त्या बरोबरच जेवायचो. एकाच टेबलावर. बंगल्याच्या मागे त्यांच्यासाठी एक खोली टॉयलेट बाथरूम सकट बांधून दिली होती. त्या तिथे राहायच्या. मात्र नितीनला आणि बाबांना सकाळचा चहा आणि नाश्ता माझ्याच हातचा लागायचा.

आयुष्य तस सुखात चालल होत. कशाचीही कमतरता नव्हती. खर्चावर बंधन नव्हती. खर सांगायच तर कुठेही बोट ठेवायला जागा नव्हती. पण तरीही कुठेतरी बोच होती. काहीतरी हरवल होत. something is missing in the life. कळत नव्हत पण जाणवत होत. नितीन चिटणीस ची मी branded बायको होती. काय करांव ह्याच विचारात बरेच दिवस गेलेत. मग एक दिवस एक जाहिरात वाचण्यात आली. एक कुठल्याशा शाळेत vecancy होती आणि अर्ज मागवले होते. त्या दिवशी रात्री जेवणाच्या टेबल वर मी हा विषय काढला. मला वाटल होत की लगेच होकार मिळेल. पण तस झाल नाही. नितीननि एक भाषणच दिल. प्रबोधन म्हणा किंवा विश्लेषण म्हणा हव तर. म्हणाला

तुला नोकरी करायची आहे ती कशाकरता, एक म्हणजे पैशांसाठी, दोन, time pass म्हणून, की काहीतरी अस करायच आहे की ज्यांनी तुला तुझ्या स्वत्वाची जाणीव होईल.

मी confused . अं ?

म्हणजे अस बघ तुला जर ही नोकरी मिळाली तर तुझ् त्यात मन रमायला हव म्हणजे त्यात तुझे मन पूर्णपणे गुंतायला हव. नाही तर त्या पदाला तू न्याय देऊ शकणार नाही. तर आधी तू ठरव की तुला कशासाठी जॉब करायचा आहे. पैशा साठी, टाइम पास म्हणून का identity साठी ते तू विचार करून ठरव. ह्या विषयावर आपण उद्या बोलू सविस्तर. In the mean time  तुला काय अर्ज करायचा तो कर.

झाल. निर्णय काहीच नाही आणि विचारांचा भुंगा मात्र मागे लागला. शेवटी उद्या उत्तर द्यायच म्हणजे काहीतरी confidently सांगण आवश्यक होऊन बसल होत. शेवटी ठरवल की बघू उद्याच उद्या. ऑफिस ला जायच्या आधी बाबा म्हणालेच काय झाला का विचार करून, ठरल का काही ? मी नुसतीच नकारार्थी मान हलवली पण मी मान हलवायच्या आधीच ते घराबाहेर पडले होते. बहुधा त्यांना प्रश्न नुसताच माझ्या वर फेकायचा होता. मी service परतवू शकणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. Ace Service. मग दुपारी जेवण झाल्यावर आईंनीच विषयाला वाचा फोडली.

काय ग केलास का काही विचार, आलीस का कुठल्या निष्कर्षाप्रत.

नाही. हेच समजत नाहीये की मला नेमक काय हवंय ते. आणि त्यामुळे काय करायच ते ठरवण अवघड जातंय .

मी करू का थोडी मदत ? म्हणजे ठरवायच तूच आहेस मी फक्त प्रश्नांचा विस्तार करते म्हणजे तुला सोपं पडेल.

चालेल सांगा.

अस बघ माणूस डिग्री घेतल्यावर नोकरी शोधतो बरोबर ?

हो बरोबर.

आता अस काय असत की त्याला नोकरीची जरूर असते ? तर त्याला स्वयंपूर्ण व्हायच असत. वडिलांच्या अंगावर असलेलं ओझं थोड हलक करायच असत. स्वत:च्या संसाराची पायाभरणी करायची असते. आणि ह्या सगळ्याला पैसा लागतो. तू  ह्याच्यात कुठे बसते ?

कुठेच नाही.

आता दुसरं काही बायका किंवा मुली नोकरी करतात. का ? तर नवऱ्याच्या पगारात भागत नाही किंवा महिन्यांची तोंडमिळवणी करता करता आकस्मिक खर्चा साठी पैसाच उरत नाही म्हणून. पुन्हा मुलांच शिक्षण आहे तीही आजकाल खर्चाची बाब असते. आणखीही संसारात इतर बरेच न टाळता येण्या सारखे खर्च असतात, त्याच्यासाठी बायका नोकरी करतात. खर म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. बायकांना घरातली सर्व कामे आटपून ऑफिस ला जावं लागत. आल्यावर पुनः घर काम आहेच. झोप सुद्धा मनाप्रमाणे मिळत नाही. सुटीच्या दिवशी आठवड्या ची कामे वाट पहातच असतात. पण ही तारेवरची कसरत त्यांना करावीच लागते. इलाजच नसतो. मुली नोकरी करतात ते लग्नापर्यन्त बाबांना हातभार लागावा आणि स्वत:च्या लग्नासाठी थोडीफार तरतूद करता यावी म्हणून किंवा लग्नानंतर जरूर असल्यास नोकरी हाताशी असावी म्हणून. आता तू ह्याच्यात कुठे बसते ?

कुठेच नाही. म्हणजे पैशांसाठी मला नोकरी करायची काहीच आवश्यकता नाही. एक्स्ट्रा पैशांची काहीच गरज नाहीये. माझे असे खर्च आहेतच किती की ज्याच्यासाठी धडपड करावी. छे, पैशांसाठी नाही. मग टाइम पास साठी ?

ओके. ते ही बघू. निव्वळ टाइम पास करायचा म्हणून नोकरी करायची. पण मला अस सांग की तुझ्या टाइम पास साठी, म्हणजे अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी एखाद्या गरजू मुलीची जागा हिरावून घेण, तिला वंचित ठेवण म्हणजे तिच्या सांसारातल्या साध्या साध्या अडचणींना सामोरं जाण्याच बळ काढून घेतल्या सारख होणार नाही का ? हे नैतिकतेला सोडून होईल अस तुला वाटत नाही का ? किंवा एखाद्याची नोकरी सुटली असेल आणि त्याचा संसार उघड्यावर पडला असेल, ह्या नोकरीमुळे त्याला त्याचा संसार सावरायची जी संधि मिळेल त्या पासून त्याला वंचित ठेवणार का ? ह्या नोकरीमुळे कोणी श्रीमंत नक्कीच होणार नाही. पण त्यांच्या अडचणींवरचा उतारा खात्रीने असेल.

पण आई जिथे इंटरव्ह्यु घेतील तिथे सगळ्यांना समसमान संधि असणार आहे. मग मी कोणाची संधि हिरावून घेईन अस कस ? स्पर्धे मध्ये कोणीतरी एक जिंकणार आणि बाकी हारणार हे तर होतच . मग ह्याच्यात अन्याय कुठे होतोय. मला काहीतरी करून मोठ व्हायच आहे. समाजात आपलं अस स्थान असाव अस वाटतंय. त्याच हे पाहिल पाऊल आहे अस समजून पुढे जायच आहे.

कबूल आहे. ही स्पर्धा आहे हे मान्य. पण जरा विचार कर शैक्षणिक समानता जरी असली तरी आर्थिक असमानता पण भरपूर आहे. तुला मोठ व्हायच आहे मग पाहिल पाऊल सुद्धा दमदार टाक न. माणसाची स्वप्न मोठी असावीतच पण ती साकार करण्यासाठी विचार पण खुजे असू नयेत. सुरवात जरी छोटी असली तरी दमदार असावी. जसा नदीचा उगम हा छोटाच असतो पण तो कोणी थांबवू शकत नाही. तशीच आपली सुरवात असावी. छोटी असली तरी त्यात भविष्यातला भव्यतेचा आविष्कार जाणवला पाहिजे. आपल्या ध्येया बद्दल आपल्या मनात जराही किंतु परंतु असू नये. पहा, Think over it.

आई, प्रश्नांची किती छान उकल करून दाखवली तुम्ही. आता माझ्या मनातली सर्व कोळीष्टीक दूर झाली. आता माझ्या विचारांना खरी दिशा मिळाली. आई तुम्ही खर तर प्राध्यापकच व्हायला हवं होत.

अग मी होतेच प्राध्यापक. गणिताची प्राध्यापक होते मी. ह्यांचा बिझनेस उत्तम चालायला लागला मग सोडून दिली. खर सांगायच तर मला रिसर्च मध्ये जास्ती interest होता. मग मी पीएचडी ला enroll केल आणि माझा प्रबंध मागच्याच वर्षी submit केलाय. अजून व्हायव्हा व्हायचा आहे. तारीख येण्याची वाट आहे. बघू काय ते.

My god इंजीनियर सासरे, MBA नवरा, आणि सासू पीएचडी. आणि मी कोण साधी B.sc. अस नाही चालणार. ह्या घरात शोभून दिसायच असेल तर मला माझा स्तर वाढवावाच लागेल. ओके. done.

तथास्तु आई म्हणाल्या.

त्या दिवशी कंपनी मध्ये बऱ्याच महत्वाच्या घडामोडी झाल्या होत्या. त्या बद्दलच नितीन आणि बाबा बोलत होते. आईंना तर समजत होत, पण मी अनभिज्ञ होते. मी प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळ बोलण चालू होत आई अधून मधून काही विचारत पण होत्या. माझ्या एवढच लक्षात आल की कुठल तरी नवीन काम मिळाल होत. फायनल शिक्का मोर्तब झाल होत. आणि त्यामुळे येत्या वर्षात लाखों रुपयांचा फायदा होणार होता. आई ज्या पद्धतीने शंका विचारत होत्या त्यावरून त्या बऱ्याच updated असाव्यात असा अंदाज आला. अर्थात ऐकून ऐकून हळू हळू मला पण सगळ कळायला लागेलच . पण त्याच्या मुळे माझ्या नोकरीचा विषय काही निघाला नाही. मला तर बाई सुटल्यांसारखच झाल. सगळ आवरून बेडरूम मध्ये आले तेंव्हा नितीन गाढ झोपला होता. दिवसभरात बरीच दग दग झाली असेल. थकला असेल असा विचार करून त्याला डिस्टर्ब न करता मी पण आडवी झाले. अंथरुणावर पडले होते पण डोळ्यांवर एवढीशी सुद्धा झोप नव्हती. डोक्यात विचार चालूच होते. शेवटी खिडकीशी जाऊन उभी राहिले.

खिडकीतून बाहेर बघत होते. नजर समोर होती पण काही बघत नव्हते. तितक्यात एक तारा तुटला आणि कार्तिकची आठवण झाली. अंगभर एक शिरशिरी येऊन गेली. कार्तिक ! मन केंव्हाच भूतकाळात पोचल होत. कॉलेज मधल्या रम्य आठवणींमध्ये मन केंव्हा गुंतून गेल कळलंच नाही. एकेक प्रसंग मनाच्या पटलावरून सरकत होता.

......

कॉलेज मध्ये आमचा एक ग्रुप होता सहा जणांचा. मी, विशाखा, चित्रा, दिनेश, वसंत आणि कार्तिक. H B group म्हणून प्रसिद्ध होता. H B म्हणजे handsome आणि beautiful. आम्ही तिघी कॉलेज मध्ये सौंदर्याचा लॅंडमार्क होतो. आणि दिनेश, वसंत आणि कार्तिक मध्ये कोण जास्त handsome हे ठरवण अवघडच होत. आमच्या पैकी कोणीही अभ्यासात कधी कुचराई केली नाही. प्रत्येकाचा first class ठरलेला. कार्तिक आणि चित्रा तर आमच्या दृष्टीने ultimate होते. आम्हाला senior होते, केमिस्ट्रि मधे M. Sc. करत होते. बाकी आम्ही चौघे B.sc. ला होतो. कॉलेजमधल्या मुला मुलींनी आपापल्या मताने आमच्या जोड्या पण लावल्या होत्या. पण तस आमच्या मधे काहीच नव्हत. आधी कार्तिक आणि चित्रा आमच्या ग्रुप मध्ये नव्हते. पण एक दिवस विषाखाला केमिस्ट्रि मध्ये अडचण आली. मला पण confusion होतच. मग कोणाला तरी विचारून बघाव असा ठरवल. चित्रा खूप हुशार आहे अस ऐकून होतो. तिला गाठायच ठरवल. एक दिवस ती कॅंटीन मध्ये एकटीच बसलेली दिसली. विशाखा म्हणाली ए चल, ती एकटीच आहे आत्ताच जाऊन विचारू.

आम्ही भीत भीतच समोर गेलो. ए ती धड बोलेल न, की झिडकारून टाकेल ? हुशार माणसांचा भरवसा देता येत नाही. हुशार माणसं moody असतात अस ऐकलंय. काय करायच ? मी म्हंटलं. मी जाम घाबरले होते.

मी विशाखा आणि ही निकिता. आम्ही B.sc. फायनलला आहोत. विषाखानी चुळबुळत म्हंटलं.

बर मग ?

आम्हाला जरा आमच confusion दूर करायच होत. केमिस्ट्रि मध्ये. Rate Law आणि Third Order Reaction बद्दल.

मग तुमच्या प्रोफेसरांना स्टाफ रूम मधे भेटा न. ते क्लियर करतील तुमच कन्फ्युजन. प्रोफेसर कोण आहेत ?

हुबळीकर सर.

मग बरोबरच आहे. मला आत्ता वेळ नाहीये आपण संध्याकाळी पाच वाजता भेटूया का ?

चालेल. कुठे भेटायच ?

तुम्ही नेहमी सायकल स्टँड जवळच्या कट्ट्यावर असतां न, तिथेच भेटू. फक्त यावेळी गॉसिप च्या ऐवजी अभ्यासाच बोलू, ...काय ? आणि ती हसत हसत निघून पण गेली.

आम्ही speechless. काय छान हसते ग.

हो आणि हसतांना तिचं  सौन्दर्य पण किती खुलून येत. beautiful. कोणीही हिच्या प्रेमात पडेल. साडे चार वाजता आमचे सर्व periods संपले. आणि आम्ही चौघे कट्ट्यावर. आमची रोजचीच प्रथा होती ही. कॉलेज संपल्यावर कॅंटीन मधून चहा आणायचा आणि कट्ट्यावर बसून थोड्या गप्पा टप्पा थोडी चकल्लस करायची आणि मग पाच वाजे पर्यन्त घराच्या वाटेला लागायच. रोजचाच शिरस्ता होता. हां आमचा एक नियम होता की कोणत्याही शिक्षकांची थट्टा मस्करी करायची नाही. ते कसेही शिकवत असले तरी शिक्षक म्हणून आदरणीयच आहेत यावर आमच सर्वांचच एकमत होत आणि हा नियम सर्वच पाळत होते अगदी काटाक्षानी. आणि म्हणूनच आमचा ग्रुप वेगळाच होता. आज मात्र विशाखा आणि मी केवळ चित्रा बद्दलच बोलत होतो. आणि विषय होता तीच हसणं  आणि हसल्यावर ती किती लोभस दिसते हा. शेवटी दिनेश म्हणाला सुद्धा.

दोन सुंदर मुली तिसऱ्या मुलीच्या सौंदर्या ची, तिच्या स्मितहास्याची तारीफ करतात आणि ती सुद्धा प्रामाणिकपणे हे जरा आश्चर्यच आहे. मुलींनो हे प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध आहे असा तुम्हाला वाटत नाही का ?

ए चल रे तू अजून तिला भेटला नाहीये म्हणून अस बोलतोयस. आत्ता ती येईलच मग मी बघते तुझ्याकडे. बघ आलीच ती.

Hi everybody.

Hi. मी आधी ओळख करून देते. मी विशाखा, ही निकिता, दुपारी ही माझ्या बरोबर होती. हा दिनेश आणि हा वसंत. आम्ही सर्वच B.sc. फायनलला आहोत. आणि मी वीचारलेल्या टॉपिक वर सर्वांचच कन्फ्युजन आहे. आणि ही चित्रा देशमुख, हीला कोण ओळखत नाही ? कॉलेज मधली top scholar आहे. आणि अर्थात  सर्वानुमते कॉलेज क्वीन.

Welcome to our group Chitra. सगळे एक सुरात.

हं काय प्रॉब्लेम आहे तुमचा ? Let us go straight to the point. संध्याकाळची वेळ आहे आणि वाया घालवायला माझ्या जवळ वेळ नाहीये. तेंव्हा shoot.

मघाशी सांगितल्या प्रमाणे आम्हाला. Rate Law आणि Third Order Reaction समजवून घ्यायच आहे. खूप कठीण आहे समजायला. प्लीज.

म्हणजे तुम्हाला Rate of Reaction आणि Order of reaction समजलेलं  नाही. Correct ?

हो.

ओके. तुम्हाला क्रिकेट मध्ये interest आहे का ?

अरे, हे काय विचारण झाल ? हिंदुस्थानात अस कोणी आहे का की ज्याला क्रिकेट मध्ये interest नाहीये. पण क्रिकेट चा आणि केमिस्ट्रि चा काय संबंध ? तुम्ही चेष्टा करताय न  इति दिनेश

नाही नाही, मी चेष्टा करत नाहीये. honestly. आणि अहो जाहो ची जरूर नाही. ओके ? आता अस बघा क्रिकेट मध्ये run rate कसा काढतात ? total runs भागिले number of overs बरोबर ?

हो.

आता हे फारच ढोबळ calculation झाल. म्हणजे वर वर पाहिल तर फक्त batsman आणि bowler ह्या दोघांचाच विचार केला आहे. म्हणजे batsman नी किती runs काढले आणि bowlers  नी किती overs टाकले एवढच विचारात घेतल्या गेल आहे. आता पहा हवामान जर दमट असेल तर त्याचा बॉल वर आणि बॅट वर परिणाम होतो. ओलसर बॉल ला ओलसर बॅट नी टोलवल्यावर चेंडू जास्ती दूर जाणार नाही. म्हणजे runs कमी. जर outfield ओलसर असेल तरीही चेंडूची गती तेवढी राहणार नाही. runs कमी. जर फास्ट bowler असेल तर action is to reaction प्रमाणे चेंडू हलक्या ने टोलवून सुद्धा सीमापार जातो. तसंच spinner असेल तर हेच करायला जास्त जोर लागतो. पर्यायाने बॅट्समन थकतो. धावांची गती मंदावते. जर विरुद्ध टीम च्या कॅप्टननी उत्तम फिल्डिंग लावली असेल तरीही runs कमी निघतात. अर्थात मॅच बघतांना हे सगळ आपल्या लक्षात येतच. पण runrate काढतांना हे सर्व बघितल्या जात नाही. म्हणून हे फार ढोबळ आहे अस मी म्हणते. विज्ञान हे ढोबळमानांवर चालत नाही. सगळ्या conditions पारखून त्यावरूनच निष्कर्ष काढायचा असतो. कळतय ना मी काय म्हणतेय ते.

हो. हो.  

कुठलीही रासायनिक क्रिया ही फक्त त्या दोन पदार्थांच्या गुणधर्मावर आधारित नसते, तर ती  conditions under which the reaction takes place need to be observed. आता temp. आणि pressure कायम ठेऊन जी रिएक्शन होते ती पदार्थांच्या  concentrations वर अवलंबून असते. म्हणजे सोल्यूशन मध्ये पदार्थांची मात्रा किती आहे यावर. हा झाला law of mass action. आता जर catalytic agent वापरला तर equilibrium कडे जाण्याची गती वाढेल. म्हणजेच rate ऑफ reaction वाढेल. आता reaction rate काढायचा म्हणजे formula वापरायचा. that’all. आता निरनिराळ्या conditions मध्ये रेट कसा असेल ते फॉर्म्युला वापरुन काढण फार कठीण नाहीये. साध उदाहरण देते. आपण खाण्याचा सोडा पाण्यात घातला तर किती वेळात फसफसेल ते बघा मग गरम पाण्यात सोडा घाला आणि बघा आणि मग गरम पाण्यात लिंबू पिळून थोड मीठ घालून सोडा घाला आणि बघा. आता क्रिया आहे सोडा फसफसण्याची. पाणी गरम म्हणजे temp. Condition बदलली. लिंबू आणि मीठ म्हणजे catalytic agent मिसळले  catalytic agent क्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण रेट वाढवतो. I hope you understand now. काही शंका असतील तर विचारा.

तिच विषयावर असलेल प्रभुत्व वाखाण्याजोग होत. समजावून सांगण्याची हातोटी अप्रतिम होती. कुणीच काही बोललं नाही. नुसत्याच माना हलवल्या.

ओके देन. आता उशीर बराच झालेला आहे तेंव्हा order of reaction वर उद्या याच वेळी बोलू. पण माझी एक सूचना आहे. वाचून या म्हणजे समजायला सोप होईल. बाय. good night.

त्या दिवशी न बोलताच नुसत good night म्हणून आम्ही घरची वाट धरली. त्या नंतर ती आम्हाला तीन चार दिवस zero order, first, second, third order शिकवत होती. आमच्या ideas एकदम क्लियर झाल्या. ह्या दिवसांत ती आमच्या मध्ये मिसळूनच गेली आणि आमच्या ग्रुपची मेंबर झाली. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस कार्तिक तिला शोधत आला.

अग चित्रा इथे आहेस होय तू. किती शोधल तुला.

काय रे काय झाल ?

आपण conference मध्ये पेपर वाचणार आहोत ना, त्याच्या बद्दल सरांना आपल्याशी चर्चा करायची आहे.

बापरे, आता फार उशीर झाला आहे रे. आता चर्चेला बसलो तर घरी जायला खूपच उशीर होईल. किमान दोन तास  तरी जातील.

No worries. मी तस सरांना सांगितल. तर सर म्हणाले की उद्या कॉलेजला लवकर या. आपण बसू. ठीक आहे ?

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चित्रा आणि कार्तिक दोघंही आले. दोघांचेही चेहरे प्रफुल्लित दिसत होते. म्हणाली की काल तुमची ओळख करून द्यायल्या विसरली म्हणून आज मुद्दाम कार्तिकला पण बरोबर आणल. हा कार्तिक साने आम्ही दोघंही एकाच बॅच मधे आहोत. आणि पेपर पण दोघ मिळून वाचणार आहोत. कार्तिक, ही विशाखा, ही निकिता, हा दिनेश,आणि हा वसंत. हे सर्व B.sc. फायनलला आहेत. मग आम्ही चहा पिता पिता बोलत होतो. म्हणजे चित्रा आणि कार्तिकच बोलत होते त्यांच्या पेपर बद्दल. आणि आम्ही ऐकत होतो. त्या दिवशी कार्तिक ला पाहिल त्याच्या बरोबर बोलले आणि माझी मी राहिलेच नाही. त्याचा सहवास हवा हवासा वाटायला लागला. मग मीच त्याला म्हणाले की welcome to our group. सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यानी पाहिल पण मग संगळ्यांनीच त्याला वेल्कम केल.

नितीनला जाग आली.निकीता ला खिडकी पाशी उभी असलेली पाहून त्यांनी विचारलं, काय ग झोप येत नाही का ? नाही, खिडकीपाशी उभी आहेस म्हणून विचारतोय.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired

//