Dec 06, 2021
रहस्य

निकिता राजे चिटणीस भाग 22

Read Later
निकिता राजे चिटणीस भाग 22

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

                                     पात्र  रचना

 

 1. अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक
 2. नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा
 3. निकीता चटणीस           नितीन ची बायको
 4. शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई
 5. रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा
 6. पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी
 7. मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र
 8. अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  
 9. चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण
 10. विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण
 11. दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र
 12. वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र
 13. कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  
 14. रघुवीर                  अͪवनाश चा ड्रायव्हर
 15. पंडित                   नितीन चा ड्रायव्हर
 16. वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
 17. अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
 18. साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
 19. पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
 20. बबन                   चपराशी
 21. चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
 22. वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
 23. चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ
 24. विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको
 25. निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा
 26. शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
 27. पाटील                  पोलिस इंस्पेक्टर
 28. परब                   सब इंस्पेक्टर
 29. गवळी                  कॉन्स्टेबल
 30. मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

 

 

                                   भाग  22

भाग २१    वरून  पुढे  वाचा .........

                              इंस्पेक्टर मळेकर

गवळी, बबन च्या बोलण्यातून तुम्हाला काही कळलं का ?

हो साहेब बबन ने विषाच पार्सल शशिकलाबाईंना आणून दिलं.

नाही गवळी एवढच नाहीये. राधाबाईंने विष मागवलं ते जीव देण्यासाठी. मग मामा आलेत आणि सगळं ठीक झालं आणि विषाच काही कारणच उरलं नाही. आणि त्या वेळेला बबन चा जन्म पण व्हायचा होता. शशिकलाताईंनी मामाशी संबंध ठेवला होता. कदाचित हे प्लॅनिंग त्यांच्या मनात कित्येक वर्षांपासून घोळत असावं. मग बबन मोठा झाल्यावर संधि साधून त्यांनी मामाकडून विष मागवलं. कदाचित त्यासाठी भरपूर पैसे पण मोजले असतील. गवळी तुम्ही म्हणता की मामा या जगात नाहीये तेंव्हा हा सर्व व्यवहार त्यांच्या मुला बरोबरच झाला असण्याची शक्यता आहे. आपल्याला या मुलाला ताब्यात घ्यायला लागेल.

म्हणजे तुमच्या अंदाजानुसार खून १०० टक्के शशिकलाबाईंनीच केला.

Correct गवळी correct.

मग आता ? बस्तर पोलिसांना काळवायचं ?

ते तर कळवुच  पण त्या आंगोदर काही गोष्टींची लिंक जुळवणं आवश्यक आहे ते काम आधी करावं लागणार आहे. शशिकलाबाइ अत्यंत हुशार आहेत त्यांच्याकडे जातांना आपल्याला पूर्ण तयारिनीशी जावं लागणार आहे. त्याशिवाय त्या बधणार नाहीत.

म्हणजे ?

म्हणजे अस की आपण धुळ्याला जाऊन बबन च्या वडलांशी बोलायला पाहिजे.

ह्या सर्व प्रकरणात त्यांचा सक्रिय सहभाग असलाच पाहिजे अस मला वाटतंय. शशिकलाबाईनी मामाशी सरळ संपर्क ठेवला असेल अस मला वाटत नाही. मधे  साटोरे असलेच पाहिजेत. तुम्ही अस करा चोरघाड्यांना फोन लावा आणि साटोऱ्ऱ्यांचा पत्ता घ्या. त्यांना माहीत असेल.

साहेब मिळाला पत्ता. साधारण आठ तास लागतील धुळ्याला पोचायला.

ठीक. उद्या आठ वाजताच निघू. तयारीला लागा.

दळवी कोणाला तरी फोन लावत होते.

हेलो साटोरे साहेब आहेत का ?

..

एक मोठी ऑर्डर द्यायची आहे उद्या आपण आहात का ?

....

दुपारी पांच वाजे पर्यन्त

..

ओके ठरलं तर मग उद्या पांच वाजता आम्ही येतो, ड्रॉइंग वगैरे घेऊन येतो.

साहेब मला अस वाटलं की जर ते पुण्याला आले असले तर आपली खेप फुकट जाईल म्हणून आपलं विचारून घेतलं.

वा दळवी, बर तुमच्या लक्षात आलं. गुड.

दुसऱ्या दिवशी साडे चार ला मळेकर आणि दळवी धुळ्याला पोहोचले. बरोबर पांच वाजता साटोरे वर्कशॉप मध्ये पोचले. साटोरे समोर आले पण पोलिसांना पाहून जरा दचकलेच. बबनला पकडल्यानंतर तसं त्यांच्या लक्षात आलच होतं की पोलिस त्यांच्याकडे पण येऊ शकतात म्हणून. वरकरणी हसून त्यांनी मळेकरांचं स्वागत केलं.

बोला साहेब काय करू शकतो मी तुमच्यासाठी ?

विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या.

तुम्ही बबन ची पूर्ण जबाबदारी घ्यावी म्हणून अविनाश तुम्हाला पैसे देत होते ?

हो साहेब.

वर्कशॉप टाकायला पण त्यांनीच दिलेत ?

हो साहेब.

बबनला नोकरी देऊन सुद्धा वेगळे पैसे देत होते ?

हो साहेब.

का ?

मी म्हंटलं होतं की आता जरूर नाही, पण ते म्हणाले असू दे.

तुमचे राधाबाईंच्या मामाशी कसे संबंध होते ?

..

हे बघा, तुमच्या समाजातल्या स्थानाला धक्का न लावता आम्ही विचारतो आहोत. खरी खरी उत्तरं द्या नाही तर बेड्या घालून ठाण्यावर घेऊन जाऊ. मग काय होईल त्याचा विचार करा. एकदा तिथे गेल्यावर कसलीही दया माया नसते.

शशिकला बाईंनी सांगितलं होतं की अधून मधून त्यांच्या संपर्कात रहा.

त्याच्यासाठी तुम्ही बस्तर मध्ये जात होता ?

हो

कशा साठी ? संपर्क तर पत्रा द्वारे सुद्धा ठेवता आला असता. मग ?

लिखित मध्ये काही नको अस मॅडम म्हणायच्या, म्हणून.

नुसतं एवढंच कारण आहे ?

पैसे पण द्यायचे असायचे.

किती  आणि केंव्हा ?

दहा हजार रुपये सहा महिन्यातून एकदा.

म्हणजे तुम्ही दर सहा महिन्यांनी बस्तरला जात होता.

हो साहेब.

या कामाबद्दल मॅडम तुम्हाला किती पैसे द्यायच्या ?

जाण्या येण्याचा खर्च आणि वरून वीस हजार.

किती वर्ष हा उद्योग चालू आहे. ?

दहा बारा वर्षांपूर्वी मॅडमनी त्यांच्याशी एक रकमी पैसे देऊन फायनल करून टाकलं त्या नंतर बस्तरला जाणं बंद झालं.

किती पैसे दिले ?

ते माहीत नाही साहेब. ते द्यायला बबन गेला होता.

म्हणजे बबनला हा सगळा प्रकार माहीत होता ?

नाही साहेब, मॅडमनी त्याला काय सांगून पाठवलं ते मला माहीत नाही. बबन सांगायला तयार नाही. मॅडमनीच सांगितलं मला की आता बस्तरला जायची जरूर नाही म्हणून.

त्यांनी बस्तरहुन मॅडमसाठी काय आणलं.

साहेब, तो पैसे द्यायला गेला होता काही आणायला नाही. निदान मला तरी माहीत नाही.

जेंव्हा फायनल झालं तेंव्हा मामा होते ?

नाही साहेब ते त्याच्याही बरेच आधी वारले होते. त्यांचा मुलगाच मला भेटायचा.

आता कुठे आहे तो ?

साहेब आता बारा वर्ष झालीत. मी ही कधी चौकशी केली नाही त्यामुळे त्याचा आताचा ठाव ठिकाणा मला माहीत नाही.

आणखी काय माहीती आहे तुम्हाला ?

सगळं सांगून झालं साहेब. आम्ही नोकर माणसं मालक जस सांगतील तसं वागणार, पण साहेब मी आणि माझ्या पोराने काही गुन्हा केला नाहीये साहेब.

ठीक आहे जरूर पडली तर पुन्हा येऊ.

पुण्याला यायला पहाटेचे चार वाजले.

दुसऱ्या दिवशी मळेकर फाइल चालत होते आणि सगळा गोषवारा लिहीत होते. त्यांचं लिहिणं झाल्यावर गवळी म्हणाले –

साहेब, आता पुढचं पाउल काय ?

गवळी आता आपल्याला सगळी माहिती मिळाली आहे. शशिकलाबाईच गुन्हेगार आहेत हे पक्क झालं आहे. पण मला सांगा गवळी, आपल्या जवळ ठोस प्रूफ काय आहे ?

तसं म्हंटलं तर काहीच नाही. पण आपण बबन आणि त्यांच्या वडिलांकडून लिखित स्टेटमेंट घेतले तर त्याचा उपयोग होऊ शकेल.

आत्ता सगळ्यांनी off the record माहिती दिली आहे. पण स्टेटमेंट घेतो म्हंटल तर त्यांचा वकील मध्ये येईल. आणि समजा दिलंही तरी कोर्टात ते फिरू शकतात. दबावाखाली लिहून घेतलं अस म्हणू शकतात.

साहेब दोघांनाही माफीचा साक्षीदार बनवलं तर ?

हा एक मार्ग आहे. प्रयत्न करून बघू. पण या सगळ्या गोष्टिनी फक्त सिद्ध होतं की शशिकलाबाईंनी बस्तर वरुन पार्सल मागवलं. त्यात  विष होतं हे कसं सिद्ध करणार. परत राधाबाईंचा भाऊ जर म्हणाला की बहिणीला गिफ्ट पाठवली होती. तर आपण काय करणार ? सगळ्यात महत्वाच हे आहे की शशिकलाबाईंनी खून केला आहे अस आपण म्हणतो. पण कसा ? त्याबद्दल तर आपण अजून अंधारातच आहोत. सगळा आधीचा तपास निकिताच्या भोवतीच फिरत होता पण तिचा यात हात नाहीये हे सिद्ध झालं आहे. कार्तिकचाही काही संबंध आहे अस दिसत नाहीये.  शशिकलाबाईंना केंव्हा संधि मिळाली ते ही कळत नाहीये. वरतून नितीनचा खून झाला तेंव्हा तिघीही पुण्याच्या बाहेर होत्या. ऑफिस मध्ये असल्याने बबन सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता. त्याचाही यात काही हात दिसत नाहीये.

मग आता ?

जर शशिकलाबाईंनी कबुलीजबाब दिला तर बाकीचे सुद्धा जे आपल्याला सांगितलं तेच कोर्टात सांगतील. आणि मगच त्यांना शिक्षा होऊ शकेल. मी आज SP साहेबांना update देतो. मग ते जस म्हणतील त्याप्रमाणे करू.

संध्याकाळी मळेकर आल्यावर गवळींनी विचारलं

काय झालं साहेब ? काय म्हणाले मोठे साहेब ?

ते म्हणाले की कायद्या पेक्षा कोणीही मोठं नाही. सर्वांना कायदा समान आहे. सर्व

सबूत गोळा करा आणि सावधगिरीने पावलं उचला. केस पक्की करून मगच charge sheet दाखल करा. डिपार्टमेंट वर ठपका येता कामा नये.

म्हणजे काय ?

म्हणजे आधी ठोस सबूत गोळा करा. केस पक्की करा. मगच काय ते करा.

पण आपल्याजवळ तर काहीच नाही मग ?

मग काय, आधी ठोस सबूत गोळा करा. केस पक्की करा. मगच काय ते करा.

साहेब, माफीचा साक्षीदार मिळवणं हा एकच मार्ग आहे. आपण आधी त्याचाच प्रयत्न करायचा का ?

तेच करावं लागेल. पण गवळी जरा विचार करा की बबन काय किंवा साटोरे काय, ह्या दोघांनाही शशिकलाबाईनबद्दल कुठलाही राग नाहीये. उलट, त्यांच्या जगण्याचा तोच एक आधार आहे. आधीच चिटणीस कुटुंबानि जे उपकार करून ठेवले आहेत, त्यांच्या ओझ्या खाली ते दबून गेले आहेत. आणि अजूनही शशिकलाबाई त्यांना आयुष्याभरासाठी काहीतरी वचन देण्याची शक्यता आहे. बबन राधाबाईंचा मुलगा आहे हे कळल्यावर तर बबन आपलं ऐकण्यासाठी तयारच होणार नाही. त्याला राधाबाईंचे पांच टक्के शेअर्स मिळतील. कदाचित शशिकलाबाई अजूनही काही शेअर्स त्याला देतील. साटोऱ्यानां पण देतील. गवळी त्यांच्याकडे पैसा आहे आणि मुख्य म्हणजे हे सर्व लोक त्यांच्याशी भावनात्मक रीतीने जोडल्या गेले आहेत. त्यामुळे हे काम जमेल असं वाटत नाही. शशिकलाबाई हुशार आहेत.

कदाचित गेल्या दोन दिवसांत त्यांनी ही सगळी सूत्र हलवली देखील असतील.

साहेब तुम्ही म्हणता आहात ते अगदी खरं आहे. सर्व आपल्याला माहीत असून, सर्व उलगडा झाला असूनही आपल्या जवळ पुरावा म्हणता येईल अस आपल्या हातात काहीच नाहीये. फार अवघड वळणावर येऊन पोचलो आहोत आपण या प्रकरणात. मग आता काय करणार आहोत आपण ?

काही नाही, शशिकलाबाईंचं काय म्हणण आहे ते बघू. चला. उद्या चिटणीस वाडा.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired