Feb 24, 2024
रहस्य

निकीता राजे चिटणीस भाग 20

Read Later
निकीता राजे चिटणीस भाग 20

                                  पात्र  रचना

 

 1. अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक
 2. नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा
 3. निकीता चटणीस           नितीन ची बायको
 4. शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई
 5. रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा
 6. पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी
 7. मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र
 8. अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  
 9. चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण
 10. विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण
 11. दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र
 12. वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र
 13. कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  
 14. रघुवीर                  अͪवनाश चा ड्रायव्हर
 15. पंडित                   नितीन चा ड्रायव्हर
 16. वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
 17. अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
 18. साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
 19. पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
 20. बबन                   चपराशी
 21. चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
 22. वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
 23. चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ
 24. विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको
 25. निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा
 26. शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
 27. पाटील                  पोलिस इंस्पेक्टर
 28. परब                   सब इंस्पेक्टर
 29. गवळी                  कॉन्स्टेबल
 30. मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

 

                                      भाग  20

भाग १९   वरून  पुढे  वाचा .........

                                इंस्पेक्टर मळेकर

कॉलेज मधून बाहेर पडल्यावर मी परतीची वाट पकडली, पण विचार डोक्यात घोळत असल्याने, लक्षात आलं की निकिताचे मामा औरंगाबादलाच राहतात,  त्यांच्याशी बोलणं झालच नव्हतं. मग काही माहिती मिळते का ते बघाव म्हणून  निकीता च्या मामा च्या घराकडे मोर्चा वळवला. मामा मामी घरीच होते. मी त्यांना आपली ओळख दिली आणि सांगितलं की जुनी फाइल ओपन झाली आहे आणि पुन्हा तपास चालू झाला आहे. नितीन आणि अविनाशच्या खुनात निकिता चा किती सहभाग आहे हे शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर निकिता कायम संशयाच्या घेऱ्यात राहील. मामांनी मग थोडा विचार केला आणि सहकार्य करायचं कबूल केलं.

मग आता मला सांगा की कार्तिक आणि निकीताचे संबंध कसे होते ?

ते दोघं एकाच कॉलेज मध्ये होते आणि चांगले मित्र होते.

बस एवढंच ? अजून काही नाही ? आम्ही तर ऐकलं आहे की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून.

मामा थोडे घोटाळले पण मग म्हणाले की

होय. खरं आहे. तुमचं म्हणण.

अग अस असतांना तुम्ही त्यांच्या लग्नाला नकार का दिला. तुम्हाला त्यांची जवळीक मान्य नव्हती का ?

नाही हे खरं नाहीये. आम्हालाही त्यांची मैत्री किती पुढे गेली आहे ते  दिसत होतं. म्हणून आम्ही एक दिवस सरळच तिला विचारलं. मामांच्या नजरेसमोर त्या दिवशीचा प्रसंग तरळला.

........

काय ग निकिता, तुझ्या आणि कार्तिक बद्दल ऐकतो आहे ते खरं आहे ?

तुम्ही काय ऐकलं आहे ते मला माहीत नाही. पण कार्तिक मला आवडतो हे खरं आहे. आणि मामा तो खूप चांगला मुलगा आहे हे तुम्हाला पण माहीत आहे. नेहमी तुम्हीच त्यांची किती तारीफ करता.

हो बाळा बरोबर आहे. पण लग्न म्हणजे आयुष्य भराचा प्रश्न असतो. त्यामुळे आपल्याला त्यांची सर्व माहिती असणं आवश्यक आहे अस मला वाटतं. कोण आहे, कसा आहे, घर घराणं कसं आहे हे सगळं बघाव  लागणार आहेच न.

मामा आम्ही अजून या विषयावर बोललो नाहीये. मला तो आवडतो पण त्याच माझ्याविषयी काय मत आहे हे मला माहीत नाही. पण अंदाज आहे.

ठीक आहे मग मी वेळ पाहून त्यांच्याशी बोलतो. मुलगा चांगला आहे यात वादच नाहीये. पण चौकशी केलेली बरी अस मला वाटतं. मागाहून वाईट वाटायला नको.

......

मग काय झालं बोलला का तुम्ही कार्तिकशी, मळेकरांनी विचारलं.

हो. आधी इकडून तिकडून चौकशी केली आणि समाधानकारक वाटल्यावर कार्तिकशी तो एकटा असतांना बोललो.

का एकटा असतांना का ? निकिता असतांना का नाही ?

मला अस वाटलं की कदाचित मी विचारलेले काही प्रश्न निकिताला आवडले नसते म्हणून.

ओके मग ?

निकिता ने काहीच सांगितलं नव्हतं पण मी बोलावलं आहे म्हंटल्यांवर कार्तिक ला

मी काय बोलणार यांचा अंदाज आलाच होता. मी त्याला सरळच विचारलं.

कार्तिक लग्नाबद्दल काय विचार आहे ?

मामा, बरं झालं तुम्ही हा विषय काढला ते. मला निकिताशी बोलायला जमलं नसतं. आता मी तुमच्याशी मोकळे पणाने बोलू शकतो.

बोल मोकळे पणाने बोल.

मामा मला निकिता खूप आवडते.  पण तिच्याशी लग्न करून तिला आयुष्यभर संकटात ढकलणं मला मंजूर नाही. म्हणून मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. आता मात्र मामा गोंधळून गेले.  म्हणाले जरा स्पष्ट करशील ?

मामा मला रिसर्च करायचा आहे. आणि दैवयोगानी ती संधि चालून आली आहे. मला अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली आहे.

मग ? ही तर चांगली गोष्ट आहे. तरी तू नाही म्हणतोय ? निकिता तुला साजेशी नाही अस वाटतंय का ?

नाही मामा जिथे काम करायचं आहे तिथे काम करण्याचे ठराविक तास नाहीयेत. मी जवळ जवळ लॅब मध्येच गुंतून पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे निरनिराळ्या  रोगांवरच्या vaccine वर संशोधन चालतं आणि यात फार धोका असतो. जरा कुठे चूक झाली तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असतो हा एखादेवेळी जिवावर पण बेतू शकतो. म्हणून मी लग्नच  करायचं नाही अस ठरवलं आहे. हे निकिताला सांगणं अवघड आहे.  तुम्हीच समजावून सांगा. पण मी आत्ता जे सांगितलं ते सांगू नका. कारण ती तरीही तयार होईल. तुम्ही सांगा की तुमच्या मापदंडात मी बसंत नाही म्हणून.

अशी सगळी कथा आहे. म्हणून कार्तिकशी तिचं लग्न झालं नाही. निकिताला हे काहीच माहीत नाही.

नितीनशी कसं जुळवलं ?

निकिता इथल्याच एका कंपनीत इंटरव्ह्यु द्यायला गेली होती. तिथे नितीन ने तिला पाहिलं. तिची सगळी चौकशी करून त्यांनीच मागणी घातली. कार्तिक चा चॅप्टर संपला होता. स्थळही चांगलं होतं. निकिताही सावरली होती. नितीनला कार्तिकची सगळी माहिती सांगितली. त्यांची काहीच हरकत नव्हती. मग काय, लग्न झालं.

ठीक आहे. तुम्ही दिलेल्या माहिती मुळे निकिता ला तिचा यात काही हात नाही हे सिद्ध करण्यात काही अडचण येणार नाही. चालतो मी.

चारच दिवसांनी प्रिन्सिपल चा फोन आला की रेकॉर्डस तयार आहेत. पोस्टाने पाठवू का ? पत्ता सांगा. मी त्यांना म्हंटलं की माणूस पाठवतो त्याला द्या. आमच्या एका शिपायाला पाठवून रेकॉर्डस मागवून घेतले. आणि फॉरेन्सिक लॅब ला पाठवून दिले.

चार दिवसांनी फॉरेन्सिक लॅब मधून रीपोर्ट आला की ज्या केमिकल्स ची  लिस्ट पाठवली होती त्यातून अविनाश चा मृत्यू ज्यामुळे झाला त्या प्रकारचे विष बनवणं शक्य नाही. म्हणजे कार्तिक आणि निकिता संशयाच्या लिस्ट मधून बाहेर निघाले. आता गवळींची वाट. ते काय माहिती आणतात त्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

आठवड्याने  गवळी आलेत. त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता.

बोला गवळी काय बातमी आणलीत.

साहेब, तिथे गेल्यावर मामाला शोधण्यात बराच वेळ गेला. ते लोक गाव सोडून दुसरीकडे गेले होते. ती माहिती मिळवून मग तिकडे गेलो. मामा तर आता या जगात नाहीये पण त्याचा मुलगा भेटला. प्रथम दोन तीन दिवस काही बोलायलाच तयार नव्हता. पण मी त्याला सांगितलं की राधाबाईंच्या मुलाला अविनाशराव मृत्यू पावल्यामुळे बरीच इस्टेट मिळणार आहे. म्हणून त्याचा शोध घ्यायला मी आलो आहे. तेंव्हा तो बोलायला तयार झाला. तो म्हणाला की राधाबाईंच्या बाळंतपणाच्या वेळी कराडहून एक जोडप आलं होत. त्यांच्या बरोबरच ती रायगड गेली. मुलगा झाल्यावर त्यांच्या बरोबरच कराडला निघून गेली. पण आता तो कुठे आहे हे त्याला माहीत नव्हत. मग त्याला घेऊन मी दारू प्यायला गेलो. दोन पेग पोटात गेल्यावर बोलायला लागला. राधाबाईंनी मामाकडे जालीम विषाची मागणी केली होती. मामांनी ते गोळा करून ठेवलं होतं. पण राधाबाईंना जरूर पडली नाही. मग केंव्हातरी बऱ्याच वर्षांनी पुण्याहून कोणीतरी आलं आणि ते घेऊन गेलं. मी त्याला बबन चा आपल्या फायलीतला जुना फोटो दाखवला, आणि त्यानी तो ओळखला.

My god, केवढं जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं. पण बबन अस का करेल ? गवळी, तुम्हाला जर कोणी विषाची बाटली आणायला सांगितली तर तुम्ही आणाल ?

अर्थातच नाही. एक अजून साहेब, बबन हाच राधाबाईंचा मुलगा असावा असा मला दाट संशय आहे. कराडला जायला पाहिजे. कोण जोडप होतं ते शोधून काढायला पाहिजे. आणि  साहेब, बबन जर राधाबाईंचा मुलगा असेल तर त्याचा नितीनच्या मृत्यू मध्ये हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तोच फक्त तिथे होता. पण motive काय असू शकतो ? त्याचा काय फायदा असू शकतो ?

गवळी तुम्ही म्हणता तो ही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. पण सध्या दोघीही  भारत भ्रमणाला गेल्या आहेत. त्यांना  आल्यावर बोलावून घेऊ. पोलिस interrogation मध्ये खरं काय ते बाहेर येईलच. पण सध्या तुम्ही कराडला जा. बबनची सगळी कुंडली आपल्याला पाहिजे. या संगळ्यांमद्धे तोच कच्चा दुवा आहे. तोच माहिती देवू शकेल. त्याला बोलतं करायला पाहिजे.

चार दिवसांनी गवळी आले. या दोन दिवसांत मी पुनः पुन्हा सर्व फाईल वाचत होतो. पुढची दिशा ठरवण्याचा प्रयत्न करत होतो.

साहेब, सर्व माहिती मिळाली. सोमनाथने पण काम चोख केलंय. साटोरे नावाचं जोडप होत. त्यांनीच मुलाला वाढवलं. सगळीकडे बबन हा त्यांचाच मुलगा आहे अशी नोंद आहे. राधाबाईंचं नाव कुठेच नाहीये. हे  साटोरे  पती पत्नी  फार पूर्वी अविनाशच्या कंपनीत काम करायचे. राधाबाईंसाठी जेंव्हा त्यांना जगदलपूरला पाठवलं त्यांच्या आधी थोडे दिवस त्यांना राजीनामा द्यायला लावला. कारण अस दाखवलं की त्यांच्या गावी धुळ्याला त्यांना workshop टाकायचं होतं. ते काही दिवस धुळ्याला राहिले पण होते. नंतर रायगड ला बाळंतपण उरकल्यावर ते काही दिवस कराडला होते. आणि मग धुळ्याला जावून वर्कशॉप टाकलं. बबन मोठा झाल्यावर अविनाश ने त्याला बोलावून आपल्या कडे ठेवून घेतला. इतरांच्या प्रमाणेच त्याला पगार मिळायचा पण अविनाश त्याला दरमहा ३० हजार कॅश मध्ये द्यायचे. हा व्यवहार ऑफिस मध्ये फक्त दोघांनाच माहीत होता. एक चोरघडे आणि दूसरा, बबन चा फास्ट फ्रेंड एक दूसरा चपराशी आहे तो. हे पैसे साटोरे कुटुंबाने केलेल्या उपकाराची परतफेड होती. बबन लागायच्या आधी साटोरे स्वत: येऊन पैसे घेऊन जायचा. हे राधाबाई आणि शशिकलाबाई दोघींना माहीत असाव कदाचित. पण नक्की काय ते कळलं नाही. आणखी एक गोष्ट कळली साहेब. राधाबाईंच्या जवळ कंपनी चे ५ टक्के शेअर्स आहेत.

म्हणजे गवळी आपल्याकडे जी पक्की माहिती आहे ती अशी.

१. राधाबाईंनि विषाची बाटली मागवली आणि ती त्यांना मिळाली.       

२.  अविनाश चा मृत्यू विषाच इंजेक्शन दिल्यामुळे झाला.               

३. बबन ने बस्तर ला जावून विषाची बाटली आणली.                          

  ४. बबन राधाबाईंचा मुलगा आहे. आणि हे अविनाशला माहीत होतं

ज्यांच्या बद्दल खात्री नाही त्या गोष्टी अश्या

१. अविनाश ला इंजेक्शन कोणी दिलं, आणि काय कारण होतं. ?

२. नितीनला कोणी मारलं, कसं मारलं, आणि काय हेतु होता  ?

साहेब या प्रश्नांची उत्तरं आपल्याला interrogation मध्येच मिळू शकतील. त्यांना

ताबडतोब बोलावून घायचं का ?

नाही गवळी त्यांना आता बोलावलं तर त्या यायला थोडा वेळ घेतील आणि त्यांना तयारीला वेळ मिळेल. त्यांना बेसावधच घेरायला पाहिजे. त्यांना कळू न देता ते कधी वापस येताहेत त्यांची माहिती काढा. त्यांच्या आणि दामल्यांच्या घरावर लक्ष ठेवा. मग बघू.

संध्याकाळी गवळी आले आणि म्हणाले की

साहेब, ट्रॅवल कंपनी मध्ये चौकशी केली त्यांचा टूर परवा संध्याकाळी संपतोय.

म्हणजे १३ तारखेला. अस करा १४ ला सकाळी आधी राधाबाईंना बोलावून घ्या. शशिकलाबाईंना नंतर बघू.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired

//