पात्र रचना
- अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
- नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
- निकीता चटणीस नितीन ची बायको
- शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
- रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
- पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
- मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
- अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
- चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
- विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
- दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
- वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
- कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
- रघुवीर अͪवनाश चा ड्रायव्हर
- पंडित नितीन चा ड्रायव्हर
- वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
- अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
- साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
- पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
- बबन चपराशी
- चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
- वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
- चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
- विमल चिंतामण चिटणीसांची बायको
- निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
- शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
- पाटील पोलिस इंस्पेक्टर
- परब सब इंस्पेक्टर
- गवळी कॉन्स्टेबल
- मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
भाग १९
भाग १८ वरून पुढे वाचा .........
इंस्पेक्टर मळेकर
नको असलेल्या बातम्या नेहमी संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळेसच का येतात हे एक कोडच आहे. तसंच त्या दिवशी पण झाल. एका माणसाचा रस्त्यावरच मृत्यू झाला होता. आम्ही लगेच घटनास्थळी. आमचा एक शिपाई तिथे गर्दीला कंट्रोल करत होता. आम्हाला पाहून त्यांनी गर्दीला हटवायला सुरवात केली. मयत माणूस कचरा वेचणारा दिसत होता. त्यांच्या जवळ पडलेल्या पोत्यांवरून ते कळत होत. तपासतांना अस दिसल की त्यांच्या शर्टाच्या खिशात injection ची syringe होती आणि सुई छातीत घुसली होती. आता काय समजायच अपघात की हत्या. शेवटी आकामिक मृत्यू म्हणून नोंद करायला सांगितल आणि बॉडी पोस्ट माऱ्टेमला पाठवून दिली. सहकाऱ्यांना सांगितल की आजू बाजूला आणि इतर कचरे वेचणाऱ्यांना हा फोटो दाखवा आणि बघा यांची ओळख पटते का.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यन्त मयताची ओळख पटली होती. तो कचरा वेचणाराच होता आणि त्यांच्या झोपडीत त्यांची लहान मुलगी, जेमतेम ७ , ८ वर्षांची असेल ती एकटीच होती. आईचा पत्ताच नव्हता. तिला बाल सुधार गृहात पोचवल. आणि झोपडीची कसून झडती घ्यायला सांगितली. काही धागा दोरा मिळाला बघा.
६ दिवसांनी रीपोर्ट आला. मृत्यूच कारण विषबाधा अस दिल होत पण ती हत्या नव्हती. सिरींज खिशात घेऊन चालला असतांना बहुधा ठेच लागून पडला असावा आणि छातीत सुई घुसली. असा रीपोर्ट मिळाला. आता प्रश्न उभा राहिला की इंजेक्शन का गोळा केल या माणसांनी, ते विषारी आहे हे त्याला माहीत असण्याची शक्यताच नव्हती. कदाचित मुलीला खेळण्यासाठी घेऊन जात असेल. विचारांती मला हेच कारण पटल.
दुसऱ्या दिवशी गवळीच माझ्याकडे आले. म्हणाले साहेब १० वर्षांपूर्वी अशीच चिटणीस डबल मर्डर केस झाली होती. दोन तीन वर्षं तपास चालू होता पण त्याचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे फाइल क्लोज केली आहे. मी म्हंटलं की कोणाची केस होती ती, त्या केस ची फाइल काढा.
फाइल वाचून झाल्यावर थोडा विचार केल्यावर मी गावळींना म्हंटलं की कचरा डेपो मध्ये कचरा कुठून कुठून येतो ह्याची विचारपुस करा. आणि मला ताबडतोब रीपोर्ट द्या. त्या दिवशी सुद्धा हा कचरा कुठून आला होता ते बघा. निघा आत्ताच. दुपारी गवळी आले.
साहेब डेपोवर कचरा ४ ठिकाणांवरुन येतो. ही एरिया ची नाव.
गवळी यातल्याच एका एरिया मध्ये चिटणीसांच घर येत. बरोबर ?
होय साहेब. मग आता पुढची अॅक्शन काय ? चिटणीस बाईंना भेटायच ?
नाही नाही ते सगळ पाटील साहेब करून चुकले आहेत. चिटणीस पिता पुत्रांना मारून कोणाचा फायदा होणार होता हे बघाव लागेल. निकितावर रिसर्च होऊन गेला आहे. आणि हातात काही लागल नाहीये. तरी सुद्धा शशिकलाबाई, राधाबाई आणि निकिता यांच्या बद्दल जितकी मिळेल तितकी माहिती शोधून काढावी लागेल. गवळी याच कामाला लागा तुम्ही. पूर्वेतीहास खणून काढा. कदाचित काही धागे दोरे मिळतील.
ठीक आहे साहेब.
दोन हप्त्या नंतर गवळी आले.
काय गवळी बराच वेळ घेतला.
साहेब बराच काळ मागे जाऊन माहिती काढायची होती म्हणून वेळ लागला. पण बरीच माहिती गोळा झाली आहे.
बर. मग सांगा सविस्तर आता.
साहेब कारखाना शशिकलाबाईंच्या वडिलांचा. त्यांच्या कडे चिटणीस कामाला होते. तिथेच त्यांच लग्न झाल. करखानीसांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीची पूर्ण मालकी शशिकलाबाईंचीच होती. त्यांनीच नंतर अर्धे शेअर्स चिटणीसांच्या नावे केलेत. त्यानंतर चिटणीसच सर्व कारभार पाहत होते. शशिकलाबाईंनी कधी ढवळाढवळ केली नाही. ती थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. ते गेल्यावर नितीनची अवस्था फार वाईट होती म्हणून त्या आणि निकिता दोघी कारभारात लक्ष घालू लागल्या. नितीन पुन्हा जॉइन झाल्यावर त्या पुन्हा दूर झाल्या. नितीनच्या मृत्यूच्या नंतर दोघी पुन्हा कंपनीत आल्या. मग निकिता आणि त्यांचा मॅनेजर शशांक दामले यांच लग्न झाल आणि त्यांनी आपल्या शेअर पैकी ४० टक्के त्याला लग्नाची भेट म्हणून दिले. आता दामलेच सर्व कारभार पाहतात. आणि आता त्या आणि राधाबाई दोघी भारत भ्रमण यात्रेला गेल्या आहेत. आत्ता दोघीही पुण्यात नाहीत.
अच्छा. राधाबाई विषयी काय माहिती मिळाली ?
राधाबाई त्यांच्या आई बरोबर कऱ्हाड ला राहत होती. त्यांची आई एका कपड्यांच्या दुकानात काम करायची. राधाबाई कॉलेज शिकली. B.A. झाली आणि एका ऑफिस मध्ये लागली. राधाबाई ची आई संध्याकाळी कॉलेज च्या पोरांसाठी छोटेखानी खानावळ चालवायची. चिटणीस तिथे जेवायला जायचे. दिसायला नाकी डोळी नीटस राधाबाई आणि स्मार्ट चिटणीस यांच लवकरच सूत जमल. त्यांच्या लग्नाच्या आणा भाका पण झाल्या होत्या. राधाबाईंना चिटणीसांपासून दिवस पण गेले होते. डिग्री घेतल्यावर चिटणीस पुण्याला आले आणि शशिकलाबाईंशी लग्न करून मोकळे झाले.
राधाबाईंच्या मुलाच काय झाल ते मात्र कळल नाही. कारण तिच्या आईनी तिला आपल्या भावाकडे बस्तर मधे पाठवून दिल. राधाबाईंनि बाळाला जन्म दिला की अबॉरशन ते कळल नाही. राधाबाईंची आई आदिवासी, दूर छत्तीसगड मध्ये जगदलपुर जवळ त्यांच गणगोत होत. नाग सापाशी खेळणारी त्यांची जमात आहे. त्यांच्यामध्ये लग्न न करता वर्ष दोन वर्ष बरोबर राहून मग पटल तर लग्न करतात. त्यांनी आपल्या भावाला बोलावून घेतल. तो भाऊ आणि चिटणीसांमद्धे काय ठरल हे कळू शकल नाही पण तेंव्हा पासून राधाबाई त्यांच्याकडे राहायला आल्यात. त्यांच्या जमातीत कोणालाच आक्षेप नव्हता. शशिकलाबाईंनी त्यांना अगदी बहिणीचा दर्जा दिला. पण त्या चिटणीसांची बायको कधीच बनू शकल्या नाहीत. त्या स्वयंपाकीण म्हणूनच वावरल्या.
निकिता विषयी काही भर पडली नाही . फक्त एकच की दामल्यांचे वडील माजी पोलिस commissioner अनंत दामले आहेत. पण दामले आणि चिटणीसांची ओळख नितीनच्या लग्नानंतर झाली.
गवळी, जरा चौकशी करा की चिटणीसांच्या घरून काही जुना पुराणा कचरा त्या दिवशी फेकल्या गेला होता का ? 2-3 तासांनंतर गवळी आले.
साहेब चिटणीसांच घर renovation ला काढल आहे. त्यामुळे जून पान निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावली असेल. त्या दिवशी बरच रद्दी सामान आणि कचरा फेकला होता.
आणि त्याच्यातच injection पण असू शकेल. म्हणजे अस बघा गवळी, रीपोर्ट मधे एक गोष्ट अशी आहे की जी आताच्या संदर्भावरून वेगळाच इशारा करते. हे पहा यात लिहिल आहे की ग्लुकोमिटर ची सुई दोनदा टोचल्या गेली. हे त्या वेळेस नॉर्मल वाटल असेल पण कालच्या घटने वरुन असा निष्कर्ष निघू शकतो की दुसरी सुई injection ची पण असू शकते.
म्हणजे साहेब तुमचा असा अंदाज आहे की कोणीतरी विषाचं injection दिलं चिटणीसांना ?
हो. आणि हे राधाबाई, शशिकलाबाई आणि निकिता यांच्या शिवाय इतर कोणाला शक्य नव्हत. किंवा आपण असंही म्हणू शकतो की यांनाच फक्त शक्य होत. कारण घरात हेच तिघं होते.
पण साहेब त्या वेळेला आम्ही जो काही तपास केला आणि त्याच नोटिंग पण फायलीमद्धे आहे. शशिकला आणि अविनाश चा संसार अत्यंत सुरळीत चालू होता. कुठेही वाद विवाद किंवा भांडणं झाल्याच कोणीही सांगितल नाही. शेजारच्या पाजारच्या सर्व लोकांची अगदी कसून चौकशी केली आहे साहेब. राधाबाई विषयी सुद्धा सर्वांच अतिशय चांगलं मत होतं. निकिता बद्दल तर सगळ्यांना कौतुकच होत साहेब. हे सर्व फाइल मध्ये आहे साहेब. मग हे लोक का अविनाश चा खून करतील ? त्यांचा काय फायदा असणार आहे ?
हेच तर शोधून काढायच आहे गवळी. एक शक्यता अशी असू शकते की डोक्यावर एक सवत जन्मभर आणून बसवली म्हणून शशिकलाबाई अविनाशला मारायला उद्युक्त झाल्या. त्यांनी कुठूनतरी जालीम विश मिळवलं आणि कार्यभाग साधला. निकिताशी संगनमत करून कार्तिक कडून ते मिळवलं असण्याची संभावना पण नाकारता येत नाही. त्यासाठी कॉलेजला भेट द्यायला हवी.
आणि दुसरी शक्यता म्हणजे राधाबाईंना आयुष्यभर फक्त मोलकर्णीचा दर्जा मिळाला त्या पत्नी कधीच बनू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पण motive आहेच. त्यांनाही बस्तर मधून विष मागवणं सहज शक्य होत. आदिवासी लोकच ते. तसेही हे लोक निरनिराळ्या labs ना supply करतच असतील. कदाचित ही एक मोठी साखळी पण असू शकेल. त्यांच्यापैकीच कोणीतरी, एक sample राधाबाईंना आणून दिलं असेल. अर्थात हे सगळे अंदाज आहेत. प्रॉब्लेम हा आहे की १०-१२ वर्षांपूर्वी हे सगळ घडून गेलं आहे. गवळी त्यावेळी बस्तर मध्ये तुम्ही स्वत: गेला नव्हता. आता तुम्ही जा. त्या मामाचा शोध घ्या. तो नसेल तर त्याचा मुलगा किंवा कोणी जातवाला असेल तर बघा विषाच्या हस्तांतरणा बद्दल काही डिटेल्स मिळतात का ? आणि मी उद्या औरंगाबादला जातो.
साहेब, तुम्ही म्हणता तसं जर झालं असेल म्हणजे राधाबाईंना विष हस्तगत करण्यात जर यश मिळालं असेल, तर त्यांनी विष आणायचं आणि शशिकलाबाईंनी इंजेक्शन द्यायच असा प्लॅन पण असू शकेल. त्या दोघींचं आपसातलं सूत पाहता हे पण शक्य असू शकतं. तुम्हाला काय वाटत ?
Exactly. मलाही तसंच वाटतंय. त्यामूळे तुम्ही ताबडतोब उद्याच निघा.
ठीक आहे साहेब उद्याच निघतो. पण तुम्ही औरंगाबादला कशाला ? ती सगळी चौकशी त्या वेळेस मीच केली होती.
तुम्ही निकीताच्या मित्र, मैत्रीणिंचि चौकशी केलीत. उद्या मी कॉलेज च्या लॅब मध्ये जाणार आहे. लॅब मध्ये असलेल्या मटेरियल च्या बद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जावून या मग सविस्तर बोलू.
पण साहेब हे झालं अविनाश च्या मृत्यू बद्दल. नितीन च्या बद्दल काय ? त्याला मारण्यासाठी काय कारण असाव ?
हा एक तिढा आहेच. आपल्याकडे असलेल्या माहितीवरून त्याच्या वाइटावर कोणी असण्याची शक्यता दिसत नाहीये. पण काहीतरी कारण असलच पाहिजे. गवळी, त्या बबनला पुन्हा एकदा खेचला पाहिजे. तुम्ही बस्तर वरुन आला की त्याच्या मागे लागा त्याचाही इतिहास खणून काढा. नितीन च्या वेळेस तो एकटाच तिथे होता. त्याचे काय connections आहेत ते बघायला हवेत.
साहेब मला बस्तर मध्ये थोडा वेळ लागेल. जायच्या आधी सोमनाथला या कामगिरीवर लावून जातो. मी आल्यावर त्याला जॉइन होईन.
चालेल.
दोन दिवस औरंगाबादला जायला जमलच नाही. पण तिसऱ्या दिवशी सकाळीच निघालो. आधी principal ला भेटून मग लॅब मध्ये जायचं असा विचार होता. पण त्यांनीच लॅब इन्चार्ज ला बोलावून घेतलं. म्हणाले विचारा काय माहिती पाहिजे ती. हे तुम्हाला सर्व सांगतील. मग मीच म्हंटलं की आम्ही लॅब मध्येच जाऊन बोलतो मला लॅब पण बघता येईल. त्यांची परवानगी घेऊन आम्ही लॅब मध्ये गेलो. जरा निरीक्षण केल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या.
वा: लॅब तर छानच आहे की. १०-१२ वर्षांपूर्वी अशीच होती का ?
नाही साहेब, बराच बदल झाला आहे. arrangement सगळी बदलली आहे. आधी जरा छोटी होती पण ५ वर्षांपूर्वी हॉल मोठा केला, स्टोर मोठा केलं. गॅस ची पाइप लाइन करून घेतली. असच जवळ जवळ सगळंच बदललं.
रसायन शास्त्राचे सगळेच lecturers इथे येतात का ?
नाही साहेब, फक्त मोठे साहेब आणि जे प्रॅक्टिकल्स घेतात तेच येतात. बाकीचे professors जर काही काम असलच तर येतात.
मग इथे प्रमुख म्हणून कोण काम बघत ?
मीच बघतो इथलं सर्व. मी आणि माझे दोन असिस्टेंट मिळून सांभाळतो.
म्हणजे काय काय बघता ? कामाची व्याप्ती काय आहे ते सांगाल का ?
माझ्याकडे दोन लॅब attendant आहेत. जेंव्हा प्रॅक्टिकल्स सुरू असतात तेंव्हा आम्ही तिघं मुलांवर लक्ष ठेवतो. कोणी चुकत असेल तर correct करतो. काय काय केमिकल्स खर्च झाले त्यांची नोंद करतो. आणि रीप्लेस करतो. बाकी स्टोअर ची काम असतात ती करतो.
खर्च झालेल्या केमिकल्स ची प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर नोंद करता का ?
नाही साधारण आम्हाला कल्पना असते बाटल्या कधी रिकाम्या होतील त्याची. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही अॅक्शन घेतो.
मग यांची नोंद कशी ठेवता ? म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर रजिस्टर भरता का ?
नाही स्टोअर मधलं केमिकल संपलं की आम्ही इश्यू दाखवतो, आणि संपायच्या आधीच नवीन मागवतो आणि तशी नोंद करतो.
मधल्या काळात जर काही कारणाने एखाद केमिकल नेहमी पेक्षा लवकर संपलं तर कशी नोंद करता ? म्हणजे एखादी बाटली पडली, फुटली, रसायन वाया गेल तर काय करता ?
नाही थोडं फार वाया गेल तर त्यांची काही खास अशी नोंद नसते.
म्हणजे समजा कोणी छोटी बाटली आणून रोज वेगवेगळे रसायनं चमचा चमचा नेले तर तुमच्या लक्षात येणार नाही. आणि नोंदही होणार नाही.
हो काही काही पोरांना घरी काही करायची हौस असते त्यामुळे अस अधून मधून घडतं. पण ती पोरं पकडल्या जातात. आणि त्यांना दंडही होतो.
हे पोरांबद्दल सांगता आहात. जर कोणी lecturer अस करत असेल तर तो पण पकडल्या जातो आणि दंड ही होतो ? अगदी १०० टक्के पकडल्या जातात ?
साहेब सर लोक अस का करतील ? पण अस ठाम पणे काही सांगता येणार नाही. पण आमच बारीक लक्ष असतं.
ओके. तुम्ही चांगली माहिती दिलीत. अहो आम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणून विचाराव लागतं. धन्यवाद.
प्रिन्सिपल च्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना थॅंक्स दिलेत. आणि कार्तिक जो पर्यन्त नोकरीला होता त्या संपूर्ण काळातले स्टोअर्स चे रेकॉर्ड कॉपी करून आठवड्या भरात पाठवायला सांगितले. आता रेकॉर्ड आल्यावर त्यांची छाननी करून ठरवता येईल की कार्तिकचा संबंध किती आहे ते.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.