Dec 06, 2021
रहस्य

निकीता राजे चिटणीस भाग 17

Read Later
निकीता राजे चिटणीस भाग 17

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

पात्र  रचना

 

अविनाश ͬचटणीस                              चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस               अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस              नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस              नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे           निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे           निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                 मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                 निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर              निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी               निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                 निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                       नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                  चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

पांडे सर                     चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                  चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

चिंतामण चिटणीस            अविनाश चिटणीसांचा भाऊ

विमल                      चिंतामण चिटणीसांची  बायको

निखिल                     चिंतामण चिटणीसांचा मुलगा

शशांक दामले                चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

पाटील                      पोलिस इंस्पेक्टर

परब                       सब इंस्पेक्टर

गवळी                      कॉन्स्टेबल

मळेकर                     पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

 

 

                                                      भाग  १७

भाग १६  वरून  पुढे  वाचा .........

                                                 शशांक दामले

देशमुख गेल्यावर मी निकीता ला म्हंटलं

माझ्यामुळे तू दुखावल्या गेलीस याच मला फार वाईट वाटतंय I am sorry for that. पण खात्री बाळग की माझ्या मनात तुला दुखवण्याचा मुळीच हेतु नव्हता. मी आपल गंमतीने तस म्हंटल. तुझ्या सारख्या सुस्वभावी मुलीला दुखवाव अस मला वाटेलच कस.

तू गंमतीने म्हंटल पण माझ्या मनाला फार लागल ते. promise me की अस

कधीही बोलणार नाहीस म्हणून.

I promise.

ओके मग आता काय करायच ? दोघांना फोन कर केंव्हा मीटिंग करताहेत.

हॅलो सारंग, शशांक बोलतोय. देसाइं बोलले असतीलच आमच्या प्रोजेक्ट बद्दल.

......

ओके मग केंव्हा येतो आहेस एक preliminery मीटिंग करू. आज ?

......

ओके.

निकीता सारंग एक, तासाभरात येतोय. चालेल ?

चालेल. पण आता आपल्या बाजूनी तयारी  करावी लागणार आहे. मला जरा brief कर म्हणजे त्यांच्या समोर माझी फजिती व्हायला नको. आणि त्यांच्यासमोर सारख सारखं मला विचारू नकोस. तूच बघ. मी तुझी assistant आहे मालकीण नाही हे लक्षात ठेव. निकिताने आपली बाजू क्लियर केली.

त्यानंतर तिला brief करण्यात वेळ निघून गेला. तिला पण कॉन्फिडंस आलेला दिसला. म्हणाली ओके आता मी तयारीत आहे. येऊ दे त्याला.

May i come in ?

अरे सारंग ये ये बस. निकिता हा सारंग, बिल्डर . आणि सारंग ही निकिता. आम्ही दोघ हे प्रोजेक्ट पाहतो आहोत.

Hi निकिता.

तुला देसाईनी काय माहिती दिली हे सांगशील तर बर पडेल.

मी तासभर वेळ मागून घेतला तो त्यांच्याच साठी. आत्ता पर्यन्त त्यांच्याबरोबरच बोलत होतो. त्यांनी मला पूर्ण स्कीम सांगितली आहे.

नंतर सर्व गोष्टी आधी ठरल्या प्रमाणे ध्यानात ठेऊन त्यावर सविस्तर

समाधानकारक चर्चा झाली. सारंग ला कॉंट्रॅक्ट द्यायच जवळ जवळ ठरलच, निकिता कडे पाहिल तिनि पण मान डोलावली

आता तुझ्या अंदाजा प्रमाणे overall प्रोजेक्ट कॉस्ट काय येईल ?

तुमच्या फॅक्टरी च्या मागे एक 5 एकर जमीन विकाऊ आहे. अर्थात ही 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अजूनही ती मोकळी आहे का बघाव लागेल. मी एकाला सांगून ठेवल आहे चौकशी करायला. ती जर मिळाली तर 5 करोंड जमिनी मध्ये जातील. आणि मग जमीन आपलीच असल्याने कन्स्ट्रकशन कॉस्ट ही कमी येईल. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 कोटी + 5 कोटी जमीन म्हणजे 35 कोटी च्या आसपास जाईल.

मी आणि निकितानि एकमेकांकडे पाहिल. देसाइंनि जो आकडा सांगितला  होता त्यांच्या 50 टक्के ही कॉस्ट होती.

पण सारंग, याच्यात आम्हाला कुठेही कमी प्रतीच सामान वापरायच नाहीये. अगदी लोखंड, सीमेंट, वाळू विटा पासून सर्व प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, टाइलस् वगैरे  आणखी काय काय असेल ते सर्व high class असल पाहिजे. गुणवत्ते मधे वन मायनस

नको. हे लक्षात घे. आणि मगच फायनल estimate दे.

या सर्वांचे detailed breakup सह estimate तुम्हाला मिळेल मग ती फिगर फायनल असेल. मुळात मी स्वत:च quality conscious असल्याने क्वालिटी बाबत तुम्ही चिंताच करू नका.

शशी मॅडम ला फोन केला त्यांना केंव्हा वेळ आहे तर म्हणाल्या उद्या दुपारी 12 वाजता हरकत नाही. सारंग पण हो म्हणाला. ओके मग उद्या 12 वाजता आपण ऑफिस मध्ये भेटू. बाय.

त्या नंतर मी उद्याच्या मीटिंग मध्ये काय होईल यांचा विचार करत होतो. शशी

मॅडम चे काय प्रश्न असू शकतात ह्या विचारात गढून गेलो होतो. आणि खरं तर आता निकीताशी बोलायच धाडस पण होत नव्हत. गप्प राहण हेच श्रेयस्कर.

शशांक, हॅलोss, शशांक मी तुझ्याशी बोलतेय.

अं काय ?

कसल्या गहन विचारात गढून गेला होतास ?

नाही काही नाही असच.

असंच म्हणजे ?

म्हणजे काही नाही असच.

माझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही अस वाटत ?

My god तस नाही अगदी खरंच नाही.

मग कस आहे ?

बापरे या मुलीला थातुर मातुर उत्तर देण कठीण आहे. काय उत्तर द्यावं, जावू दे खरं काय ते सांगून टाकू. उगाच गैरसमज नको. तसंही खोट बोलण आपल्याला काही जमत नाही.

अरे बोल ना काहीतरी.

निकिता खरं सांगायच तर ..

खरं तेच सांग. उगाच इकडच तीकडच बोलूच  नकोस.

खरं सांगायच तर मला फार अवघडल्या सारखं होतय. मी आजाणते पणे  का

असेना तुला त्रास होईल अस बोललो.

ते जाऊ दे. तो विचार मनातून काढून टाक. Relax. बर मला सांग इतकी वर्ष

अमेरिकेत होतास, सगळे तीकडचीच मुलगी शोधून ग्रीन कार्डची सोय करतात. तू कोणाशी सूत जमवल नाही हे कस ?

मी अमेरिकेत गेलो पण ते शिकायला. पण मला अमेरिका नाही आवडली. तिकडची संस्कृति वेगळीच आहे. माझ्या पचनी नाही पडली. म्हणून वापस आलो. अचानक चंदन इंजीनीरिंग मध्ये selection झाल. आणि कामाला सुरवात केल्यावर वाटल हीच जागा आपली. आता इथून हलायच नाही. मला इथल मन मोकळ वातावरण एकदम भावल.  इथे खूप छान वाटतंय.

मग आता ?

आता काय ?

अरे आता इथे settle झाला आहेस मग लग्नाचा विचार केंव्हा करणार ?

तसे तर आई बाबा पण मागे लागले आहेत. पण अजून माझ ठरत नाहीये.

काय कारण ? सगळ तर ठीक आहे मग ?

काय सांगू तुला, काय कारण आहे ते. माझ मलाच काळात नाहीये.

मी तुला एक सांगू ?

काय ?

मी एक course केला आणि इथेच ट्रेनी म्हणून काम केल ती सगळी कहाणी तुला माहितीच आहे. होय ना ?

हो मला नंतर कळल. आणि आश्चर्य पण वाटल.

त्या वेळेला मी नोकरी करायचा विचार करत होते तेंव्हा नितीननि मला विचारल की काशाकरता म्हणजे पैशा करता, टाइम पास करता की identity करता. मी जाम confused होते. तेंव्हा आईंनी मला विचारल की मी मदत करू का निर्णय घेण्यासाठी,  आणि मग आमची प्रश्नोत्तर सुरू झाली आणि मग निर्णय घेऊन मी ही सगळी काम केलीत.

त्याचा इथे काय संबंध ?

तेच तर. तू आत्ता म्हणालास की तुलाच कळत नाहीये, मग मी तुला मदत करते कारण शोधायला.

तुझी गोष्ट वेगळी माझी वेगळी.

असू दे. पण मी विचारते आणि तू उत्तर दे. सुटका नाही.

ही जबरदस्ती आहे अस नाही तुला वाटत ?

अरे मी एवढ्या प्रेमाने विचारते आहे आणि तू केवढे आढे  वेढे घेतोयस. पण सांग ना. काय प्रॉब्लेम आहे. आपण सोल्यूशन काढू त्यावर.

अग मी मित्रांचे संसार बघतो आहे सुरवातीला बर असत. पण नंतर हट्टीपणा  सुरू होतो. मला झेपणार नाही हे. म्हणून मी ठरवल की लग्नच  नाही करायच.

हे तुझे मित्र इथले की अमेरिकेतले ? म्हणजे ज्यांनी अमेरिकेत संसार थाटले त्यांच्या बद्दल बोलतो आहेस का तू ?

हो. पण त्यानी काय फरक पडतो ? इथे काय किंवा तिथे काय ?

पडतो. वातावरणाचा, संस्कृतीचा आणि देशाचा फरक पडतो. तिथे स्वकेन्द्रित लोक आहेत इथे आधी दुसऱ्याचा विचार करणारी माणसे आहेत. काही अपवाद सोडून दे पण बहुतांश असेच आहेत.

तुझी गोष्ट वेगळी आहे तू सगळ्यांचा विचार करते आहेस पण म्हणून सगळेच तसे असत नाहीत.

ओके म्हणजे माझ्यासारखा विचार करणारी मुलगी मिळाली तर तू लग्नाचा विचार करशील. बरोबर न ?

अं ? हे बघ तू मला trap करते आहेस. माझ मत बदलणार नाहीये. कारण अशी माणस लाखा मध्ये एक असतात. अशी मला कुठून मिळणार ? आणि मिळाली तरी स्वभाव कसा कळणार ?

माझा स्वभाव कळतो आहे ?

तुला काय म्हणायच आहे ?

जावू दे. आपण नंतर बोलू या विषयावर. संध्याकाळ झाली आहे तेंव्हा Let us call it a day. भेटू उद्या ऑफिस मधे. बाय.

निकिता गेली. संभाषण अर्धवटच सोडून गेली. काय म्हणायच होत तिला ? तिच्या शेवटच्या वाक्याचा काय अर्थ काढायचा ? मला जो वाटतोय तोच असेल का ? की ती सहजच ओघा ओघात बोलून गेली असेल ? मग दुपारी जे घडल त्याचा काय अर्थ लावायचा ? विचार कर करून डोक फिरायची वेळ आली. मग सर्व पॅक अप करून घरी जायला निघालो.

घरी गेलो तर आईने विचारल काय रे काय झाल ? फॅक्टरी मधे काही प्रॉब्लेम झाला का ?

घ्या, आता आईला काय सांगणार ? नाही, आज इतक काम होत, मिटिंगा होत्या म्हणून थकवा दिसत असेल चेहऱ्यावर. फ्रेश होऊन येतो मग चहा घेईन.

चहाच्या वेळी आइने लग्नाचा विषय काढला. आजकाल आईचा हा आवडता सब्जेक्ट होता. हो म्हण रे बाबा म्हणजे नाव नोंदवता येईल. अरे बघता बघता वर्ष निघून जात. वेळेवर सर्व गोष्टी झाल्या की बर असत.

आता आईला काय सांगू की तिच्या मुलाला एक मुलगी आवडली आहे पण तिचा विचार काय आहे हे कळल नाही म्हणून. मी काहीच बोललो नाही. नुसताच हसलो. आई हताश. काय करणार.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired