निकिता राजे चिटणीस भाग १६

निकिता सारखी साधी आणि सरळ मुलगी आयुष्यातल्या अवघड प्रसंगांना कशी सामोरी जाते त्यांची कथा.

                                                   पात्र  रचना

अविनाश ͬचटणीस                              चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस               अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस              नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस              नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे           निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे           निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                 मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                 निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर              निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी               निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                 निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                       नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                  चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

पांडे सर                     चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                  चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

चिंतामण चिटणीस            अविनाश चिटणीसांचा भाऊ

विमल                      चिंतामण चिटणीसांची  बायको

निखिल                     चिंतामण चिटणीसांचा मुलगा

शशांक दामले                चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

पाटील                      पोलिस इंस्पेक्टर

परब                       सब इंस्पेक्टर

गवळी                      कॉन्स्टेबल

मळेकर                     पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

                                                   भाग  १६

भाग १५ वरून  पुढे  वाचा .........

                                                  निकिता

शशांक नी तिघा आर्किटेक्ट ची नावे फायनल करून ऑफिस मध्येच मीटिंग ठरवली होती. एक आज संध्याकाळी, एक उद्या सकाळी आणि एक उद्या संध्याकाळी. आम्ही आईंना पण बोलावलं होतं. त्या पण होत्याच.

त्या दिवशीची मीटिंग काही खास झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळचीही मनासारखी झाली नाही. संध्याकाळच्या मीटिंग मध्ये मात्र बरंच काही ठरल.

या देसाई या तुमचीच वाट पहाट होतो. आई म्हणाल्या.

थोडा उशीर झाला यायला कारण एक पार्टी येऊन बसली होती, ती जाई पर्यन्त निघता आल नाही. सॉरी.

इट्स ओके. मला वाटत की वेळ न घालवता आपण लगेच सुरवात करूया. प्रथम आमचे शशांक दामले तुम्हाला आमच्या मनात काय आहे ते सांगतील मग त्यानंतर तुम्हीच बोलायच आहे.

शशांक ने नंतर त्यांना आमची आयडिया सविस्तर सांगितली. बोला आता. तुम्ही म्हणता त्यावरून अस दिसतंय की जवळ जवळ १०० घर बांधायची आहेत. आता आपल्याला गट पाडावे लागतील. unskilled आणि semiskilled लोकांची strength किती आहे ? एक ढोबळ अंदाज सांगा.

Unskilled आणि semiskilled लोक साधारण ३५ धरून चला. skilled २०, junior

superviser आणि junior स्टाफ २०, senior स्टाफ आणि सीनियर superviser 15. शशांक नी बराचसा बरोबर अंदाज दिला.

तुमची ऐसपैस घरांची कल्पना तुम्ही मला सांगितली. तुमच्या कल्पने प्रमाणे हजार, दोन हजार आणि तीन हजार फुटांची घर तुम्हाला बांधायची आहेत. मला यात थोडा बदल करावासा वाटतो आहे. सुचवू का ?

हो हो जरूर सुचवा. अहो तुमच्या सूचना ऐकण्यासाठीच तर जमलो आहोत.

ओके. unskilled साठी ६०० फुटांच १ BHK, आणि semiskilled ६०० फुटांचच १ BHK + एक बाल्कनी. यांच्या लेवल ला ही घर म्हणजे महाल आहेत. आणि बाल्कनी मुळे दोन्ही गटांमधला फरक आपोआपच दिसेल. आणि जगराहाटी प्रमाणे खालचे लोक वरच्या गटात येण्या साठी भरपूर मेहनत करतील. ते कंपनीच्या फायद्याचच असेल. skilled labour साठी ९०० फूटांच २ BHK आणि जूनियर superviser आणि staff लोकांसाठी ९५० फुट + बाल्कनी. सीनियर गटांसाठी १५०० फूटाच ३ BHK. बाकी हाय लेवल ची लोक फॅक्टरी च्या जवळ कदाचित राहणार नाहीत तेंव्हा त्यांच्यासाठी लोन facility द्या आणि हवं तिथे त्यांच्या आवडीनुसार घर घेऊ द्या. सोसायटी मध्ये पार्क, ग्राउंड, लहान मुलांची खेळण्याची व्यवस्था, पार्किंग, रास्ते वगैरे जमेस धरता या साठी  आपल्याला ५ एकर जमीन घ्यावी लागणार आहे ढोबळ अंदाजाने ५० ते ५५ कोटी खर्च येईल. कशी वाटते ही योजना ?

तुमची सूचना आहे म्हणजे विचार करावाच लागणार. कारण तुमचे अनुभवांचे बोल आहेत. - आई.

अस नाही पण आपण ज्या स्तरातल्या लोकांबद्दल बोलतो आहे, त्यांच्यासाठी एवढी घर म्हणजे स्वप्न पूर्ती आहे. जर आवाक्यापेक्षा जास्त दिल तर ते भविष्यात अडचणीच ठरू शकत.

ठीक आहे आम्ही यावर विचार करतो आणि तुम्हाला कळवतो की पुढची मीटिंग केंव्हा करायची ते.

त्यानंतर आमच्या मध्ये तास दीडतास चर्चा झाली. आणि देसाईंच्या सुचने वर एकमत झाल. आई म्हणाल्या, शशांक देसाइंना विचार आणि मीटिंग ठरव. उद्या वाघूळकरांना अपडेट दे. आणि पुढच्या मिटिंगला त्यांना पण बरोबर घ्या.

रात्री मी आईंना म्हंटल

आई तुम्ही एकदमच माझी कल्पना उचलून धरली. मला तर वाटल होत की तुम्ही साफ धुडकावून लावाल

अग ज्या व्यक्तीने पैशाचा मोह धरायचा तीच सामाजिक ऋण फेडण्याचा विचार करते आहे म्हंटल्यांवर माझा काहीच प्रश्न नव्हता. मलाही ही योजना आवडली. आपले assets वाढतील त्यामुळे नुकसांन होण्याचा काही चान्स नव्हता.

त्या दिवशी पाटील साहेबांनी जे आरोप केले, इतकी भीती वाटत होती की तुम्ही मला घराबाहेरच काढाल. फाशीचा दोरच दिसायला लागला होता.

मी पण घाबरले होते पण ते तुझ्यावरच्या अविश्वासामुळे नव्हे तर त्यांच्या फायद्या साठी हे लोक वडाची साल पिंपळाला लावण्यात पटाईत असतात म्हणून. अगदी वेळेवर दामल्यांनी सूत्र हातात घेतली म्हणून वाचलो आपण. देवच आला धावून त्यांच्या रूपाने असच म्हणायच.

                                                       शशांक दामले

दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग मध्ये आराखड्याला जवळ जवळ सर्वच गोष्टींना देसाइंनी सुचविल्या प्रमाणे अंतिम रूप दिल्या गेल. देसाईची फी पण ठरली. त्यांना advance  पण दिला. म्हणजे आता ते सगळे blue prints तयार करून आणतील. आमच काम  म्हणजे जमीन बघायची आणि खरेदीची प्रक्रिया सुरू करायची.

सगळ आटोपल्यावर शशी मॅडम नी विषय काढला की एवढ्या साऱ्या इमारती बांधणार आहोत तर आपलीच construction company काढली तर कसं होईल. खर्चात बरीच बचत होईल. आणि वरुन माला मध्ये भेसळ किंवा कमी प्रतीचा वापरण्यावर पायबंद बसेल. देसाई तुम्हाला काय वाटत.

हे मला नवीनच होत. निकिता कडे पाहिल पण तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसल नाही म्हणजे तिला माहीत असाव. मालकांच डोक वेगळाच विचार करत. म्हणूनच ते मालक असतात. हे मला कधीच सुचल नसत. मी आपला कुठला बिल्डर गाठायचा याचाच विचार करत होतो. असो. देसाई काय म्हणतात ते तर बघू. असा विचार करून गप्प बसलो.

मॅडम तुम्हाला बिल्डर बनायच आहे का ? की काही वेगळा विचार आहे. की हे प्रोजेक्ट झाल्यावर कंपनी गुंडाळून टाकायची आहे ? काय आहे मनात. ?

शशी मॅडम च्या मनात जी आयडिया होती ती त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, नाही आम्हाला बिल्डर बनायच नाहीये. पुण्यात आधीच एवध्या संख्येत  बिल्डर असतांना me too कंपनी काढायचा मुळीच विचार नाहीये. पण हे काम आम्हाला अनुभव देईल आणि त्या अनुभवांवर roads, bridges, आणि तत्सम कामं घेता येतील. मी एका मोठ्या कंपनी चा विचार करते आहे. त्या साठी machinery आणि equipments ला किती गुंतवणूक करावी लागेल हे विचारायच होत. तुमच

ते फील्ड आहे की नाही हे माहीत नाहीये पण माहिती असेल तर सांगा एवढच.

मॅडम माझ्या मनातला खरा विचार सांगू की तुमचा पैसा आहे तुम्ही मुखत्यार आहात, कसा गुंतवायचा हे तुम्ही ठरवणार म्हणून तुम्हाला बर वाटाव अस बोलू ?

काय देसाई इतक्या मिटिंगा झाल्यावर सुद्धा अस बोलताय. काय ते खरं खरं सांगा. आपली मतं अगदी निर्भीड पणे मांडा .

मॅडम इमारती बांधण्याचा अनुभव, हा रोड, bridges वगैरे च्या कामाला उपयोगीचा नाही. ते फील्डच वेगळ आहे. दुसर म्हणजे ही मोठ मोठी काम सरकारच्या अखत्यारीत येतात. आता सरकारी काम करण्यासाठी वेगळंच temperament लागत. आतापर्यन्त तुमच्याशी जे काही बोलण झाल त्यावरून माझा अंदाज असा आहे की ते temperament ना तुमच्या कडे आहे, ना निकिता मॅडम कडे ना दामल्यांच्या कडे आहे. तुम्ही उच्च गुणवत्तेकडे लक्ष्य देणारी लोक आहात. आणि गुणवत्ता उच्च ठेवायची असेल तर lowest price मध्ये काम होऊ शकत नाही. lowest price आणि उच्च गुणवत्ता अस काम म्हणजे उच्च नुकसान. परत याच्यात राजकीय हितसंबंध असतात. अब्जावधी रुपये गुंतले असल्याने त्यात muscle power चा पण शिरकाव होऊ शकतो. हे सगळ जर तुम्ही सांभाळू शकत असाल तर आणि तरच यात उडी घ्या.

मग काय करायच ?  -शशी मॅडम

दोन गोष्टी करू शकता. एक म्हणजे बिल्डर बनायच. आणि आताच्या ट्रेंड प्रमाणे townships उभारायच्या. आणि दूसर म्हणजे, हे प्रोजेक्ट एखाद्या बिल्डर देऊन आपल काम काढून घ्यायच. हिशोब संपला.

थोडा वेळ कोणीच काही बोलल नाही. शशी मॅडम नि बबनला चहा आणायला सांगितलं. म्हणाल्या थोडा विचार करू आणि चहा पिता पिता बोलू.

काय दामले साहेब तुम्हाला काय वाटत ? तुमच काय मत आहे.

शशी मॅडम जेंव्हा दामले साहेब अस म्हणतात तेंव्हा इतक गोंधळायला होत की जे बोलायच असत ते विसरूनच जातो. आत्ता सुद्धा तसंच झाल. मी गप्पच. तेव्हडयात देसाईच बोलले.

आणि मॅडम काय वाट्टेल ते करून टेंडर घ्यायच आणि कसाही करून आपला प्रॉफिट त्यातून काढायचाच अश्या पद्धतीने काम करायच. मग कामाची गुणवत्ता कशीही असली तरी चालत. आता या रीतीने जेंव्हा काम होत तेंव्हा ते फक्त आणि फक्त पैसा मिळवण्यासाठी होत. पण इथे तर मी उलटच बघतोय. तुमच्या लोकांना चांगल्या आणि मोठ्या घरात आनंदात राहायला मिळाव म्हणून स्वत:ची पुंजी तुम्ही लुटवता आहात. दुसरयाला लुटून आपल घर भरणे हा आजचा दस्तूर आहे. तुम्ही तर प्रवाहाच्या उलट दिशेने जाण पसंत केल आहे. नाही, मॅडम हा तुमचा प्रांत नाही. दामले तुम्हाला काय वाटत ?

शशांक अरे बोल ना. कसला विचार करतो आहेस ?

विचार करण्यासाठी देसाईनी काही ठेवलंच नाहीये. अचूक विश्लेषण केल आहे त्यांनी. आपण या नवीन कंपनी चा विचार सोडून द्यावा या त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. बाकी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. you are the boss.

निकिता आणि वाघूळकरांना पण असच वाटत होत. त्यांनी पण माना डोलावल्या.

शशी मॅडम ला पण ते पटल. त्या म्हणाल्या की तू निकिता आणि देसाई तिघ मिळून ठरवा बिल्डर कोण ते मग आपण बसू. मीटिंग संपली.

दुसऱ्या दिवशी मी आणि निकिता बिल्डर कोण असावा याबद्दल रिसर्च करत होतो. त्यांच्या profiles बघता बघता लक्षात आले की या profiles मध्ये जाहिरातबाजीच जास्ती आहे. मग निकीताला म्हंटल की

देसाइंनी दोन नाव सुचवली आहेत. त्यांनी त्यांच्या बरोबर काही कामेही  केली आहेत. दोघंही प्रामाणिक आहेत आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारे आहेत. दोघेही छोटे बिल्डर आहेत. पण reliable आहेत. त्यांना बोलाउन मीटिंग करूया का ?

चांगली आयडिया आहे. तू ओळखतोस का ?

हो म्हणजे माझे कॉलेज चे मित्रच आहेत. मी चांगल ओळखतो त्यांना. 

अरे मग हे आधीच नाही का सांगायचस, देसाइन्चा reference देऊन का सांगतो आहेस ?

अग म्हणजे अस नको वाटायला की मी माझेच मित्र भरतो आहे म्हणून.

Now you are sounding weird.  अरे तुझ्यावर, माझा माझ्यावर जेवढा आहे त्यापेक्षा जास्त विश्वास आहे. तुझ्या मनात आमच्या आणि कंपनी विषयी वेडे वाकडे विचार येणारच नाहीत यांची मला 100 टक्के खात्री आहे. मी तुझ्याशी मैत्रिणी सारखी वागते आणि तूला अस बोलवत तरी कस ?

तू माझी assistant म्हणून काम करते आहेस हे तुझ् मोठे पण आहे. पण किती झाल तरी तू मालकीण आहेस या कंपनी ची.

शशांक अस काय घडल आज, की तू असा बोलतो आहेस. माझ्या तोंडून काही अधिक उण निघून गेल का ? तस असेल तर I am sorry. अगदी मनापासून.

निकिता चा आवाज कापरा झाला होता आणि डोळ्यात पाणी तरळत होत. मलाच फार वाईट वाटल मी फार विचित्र वागलो का ? चुकलच जरा. जरा नाही फार फार. मला वाटलच नव्हत ती एवढी sensitive मुलगी असेल म्हणून. आता situation सांभाळावीच लागणार आहे.

अरे आमची झाशीची राणी रडवेली झाली ? निकिता इतकी संकट तुझ्यावर कोसळून सुद्धा कधी तुझा breakdown झाल्याच ऐकिवात नाही मग आजच का अस डोळ्यात पाणी ? खूपच seriously घेतलस माझ बोलण.

आता तिचा कंट्रोल सुटला आणि ती रडायलाच लागली. मला कळेच ना की या परिस्थिति मी काय करायच ते. how to handle this situation ? हे कुठल्याच कॉलेज मध्ये शिकवत नाहीत. तिला शांत करण गरजेच होत. मी उठलो तिच्याजवळ गेलो आणि तिच्या डोक्यावरून हलका हलका हात फिरवला. निकिता calm down. मी अपराधी आहे तुझा, मी क्षमा मागतो तुझी, पण रडू नकोस. आपण ऑफिस मध्ये आहोत. कोणी इतक्यात आल आणि तुला अश्या अवस्थेत पाहिल तर गहजब उडेल. शांत हो. मी तिच्या जवळ उभा होतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो तिला शांत करण्यासाठी.

ती रडायची थांबली वर मान करून माझ्याकडे पाहिल आणि मला बिलगली. प्लीज शशांक पुन्हा अस काही बोलू नको. मला hurt करू नको. नाही करणार ना ?

आता काय करायच the situation was totally unexpected. नाही बोलणार. मी लगेच म्हंटल. पण तू शांत हो. ती शांत झाली होती पण सोडायला तयार नव्हती. एक वेगळ्याच अनुभूति ची जाणीव होत होती. तीच सान्निध्य एकदम सुखावून गेल. पण आता ती भानावर आली होती. न बोलताच वॉश रूम मध्ये गेली. मी तसंच उभा होतो माझ्या साठी निकिता अजूनही माझ्या जवळच होती. आणि तेवढ्यात दारावर टकटक झाली.

कम इन मी म्हंटल. देशमुख आले. बसा मी म्हंटल.

आपले दोन equipments बदलायला झाले आहेत, मी बोललो होतो. ते आता पार बसले. आता काय करायच ? आपण ऑर्डर प्लेस केलेली आहे. पण यायला अजून 2 दिवस लागतील माझ पार्टी शी बोलण झाल. मी त्यांना म्हंटलं की लगेच पाठवा पण ते शक्य नाही अस म्हणाले.

निकिता बाहेर आली एकदम फ्रेश दिसत होती. 10 मिनिटांपूर्वी जे काही घडल त्याचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती पण बसली.

निकिता मध्येच म्हणाली की ही मशीनस् market मध्ये readyly available नसतात का ?

नाही मार्केट मध्ये जे असतात त्यांच्यात बरेच बदल करावे लागतात म्हणून डायरेक्ट manufacturer कडूनच घ्यावी लागतात.

ठीक आहे हे दोन दिवस वाया गेलेत पण हे कसे भरून काढता येतील याच प्लॅनिंग करा आणि ते तडीस न्या. म्हणजे delivery date चुकायला नको. हव तर त्या मशीन operators ना सुट्टी द्या आणि सांगा की हे काम त्यांना भरून काढायच आहे म्हणून.

ते सगळ ठरवून झाल आहे. तुमच्या कानावर घालायला आलो.

ओके.

साहेब प्रोजेक्टच कुठवर आल ? टेबलावरच्या कागदांकडे बघत त्यांनी  विचारल.

तेच काम चालू आहे. सगळ फायनल झाल की सांगूच सगळ्यांना, आत्ता मात्र ही गोष्ट तुमच्या जवळच ठेवा. ठीक आहे कामाला लागा.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

🎭 Series Post

View all