निकिता राजे चिटणीस भाग 15

निकिता सारखी साधी आणि सरळ मुलगी आयुष्यातल्या अवघड प्रसंगांना कशी सामोरी जाते त्यांची कथा.

                                      पात्र  रचना

अविनाश ͬचटणीस                            चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस                     अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस                                    नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस             नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे          निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे          निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                 मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर                    निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी               निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                 निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                      नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                 चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर               चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

पांडे सर                    चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                  चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

चिंतामण चिटणीस            अविनाश चिटणीसांचा भाऊ

विमल                      चिंतामण चिटणीसांची  बायको

निखिल                           चिंतामण चिटणीसांचा मुलगा

शशांक दामले                चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

पाटील                      पोलिस इंस्पेक्टर

परब                       सब इंस्पेक्टर

गवळी                      कॉन्स्टेबल

मळेकर                     पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

                                                   भाग १५

भाग १४ वरून  पुढे वाचा ....

                                              शशिकला चिटणीस

निकितानि क्वार्टरस् बांधण्याची इच्छा बोलून दाखवली आणि मी चकीतच झाले. साधारण पणे हातात आलेला पैसा इतक्या प्रमाणात कोणीच असा लोकांच्यासाठी  सोडत नसतो. आणि ही म्हणते की आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणखी जमवून काय करायच. कमाल आहे. निकिताच हे रूप बघून मला अचंबित व्हायला झाल. तीच कौतुकच वाटल. मग मी ठरवल की उद्या वाघूळकरांशी मीटिंग करायची आणि कंपनी ची आर्थिक स्थिति नीट समजून घ्यायची. या बाबत त्यांच्याशी चर्चा करायची आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा. परत आमचे सेविंग्स काय काय आहेत ते पण बघण आवश्यक होत. या आर्थिक बाबींकडे कडे मी आजपर्यंत कधीच लक्ष दिल नव्हत. निकिताला तर काहीच कल्पना नव्हती. सगळ वाघूळकरच सांभाळायचे. ते ही बघाव लागेल.

सकाळची महत्वाची कामे आटोपल्यावर मी वाघूळकरांना बोलावल.

वाघूळकर आमची पर्सनल सेविंग्स ची काय पोजिशन आहे ?

वाघूळकर गोंधळले त्यांना हा प्रश्नच अपेक्षित नव्हता.

आणि कंपनी मध्ये आमची, डोंगरे आणि मेहतांची काय भागीदारी आहे यांचे संपूर्ण डिटेल्स हवे आहेत. आणि जी जी संबंधित कागद पत्रे आहेत ती पण आणा. लगेच.

मॅडम आज अस काय घडल की ही सगळी माहिती हवी आहे ? आज पर्यन्त तुम्ही कधी विचारल नव्हत.

जे घडल नाही ते आज घडणार आहे. म्हणून सांगते की ही माहिती ताबडतोब द्या. बाकी सगळी काम बाजूला सारा. किती वेळ लागेल ?

ओके मॅडम. अर्धा तास. चालेल ?

ठीक आहे या तुम्ही.

तासांभराने वाघूळकर आले. तो पर्यन्त मी बाकीची कामे हातावेगळी केली.

आधी सेविंग्स बद्दल सांगतो. अविनाश सरांची अकाऊंट सर्व तुमच्या नावे ट्रान्सफर केली आहेत. सर्व मिळून तुमच्या कडे ९८ म्हणजे जवळ जवळ १०० करोंड आहेत. नितीन सरांची खाती तुमच्याच सांगण्यावरून निकिताच्या नावे केली आहेत. त्या खात्यांमध्ये एकूण ५५ कोटी आहेत. भागीदारी बद्दल बोलायच म्हणजे अविनाश सरांचा हिस्सा अर्धा अर्धा तुमच्या आणि नितीन सरांच्या मध्ये विभागला गेला होता. त्यामुळे फायनल फिगर अशी आहे. तुम्ही ४५ टक्के, निकिता ४० टक्के, राधाबाई ५ टक्के आणि डोंगरे आणि मेहता प्रत्येकी ५ टक्के.

म्हणजे कंपनी बाबत आम्ही जो निर्णय करू त्यात डोंगरे आणि मेहताना हस्तक्षेप करता येणार नाही. आणि आमच्या जवळ आमचे असे १५० कोटी आहेत. ते आम्ही कसेही खर्च करू शकतो. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही. बरोबर ?

बरोबर. पण मॅडम मला समजत नाही की हे आत्ताच अस काय झाल ? नेमक काय चालल आहे तुमच्या मनात, कंपनी विकायच ठरवता आहात ?

वाघूळकरांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ अजूनही लपत नव्हता. उलटा वाढलाच होता.

बाकी सध्या कंपनीची स्थिति काय आहे, ते मला माहितीच आहे. ठीक आहे. तुम्ही ४ वाजता या. मी मीटिंग बोलावते आहे. तुम्ही, शशांक, निकिता आणि मी. जरा वेगळाच विषय सविस्तर चर्चेला घ्यायचा आहे. कदाचित हा कंपनीसाठी turning point असू पण शकतो. आणि चिंता करू नका तुम्हाला वाटत तसं काहीही माझ्या मनात नाही आहे. या मग ४ वाजता.

चार वाजता सगळे जमले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.

एका नवीन विषयावर डिसकस करण्यासाठी आज मीटिंग बोलावली आहे. जी काही चर्चा होईल ती सध्या तरी फक्त आप;या चौघा मध्येच राहायला पाहिजे, हे आवश्यक आहे. प्रथम माझ्या मनात काय आहे ते मी आधी  सांगते

निकिताच्या  अस मनात आहे की आपण सर्व स्टाफ, वर्कर सर्वांना फ्री क्वार्टरस् बांधून द्यावेत. मलाही ही योजना आवडली. याला खर्च खूप येणार  हे तर स्पष्टच आहे. पण जर निकिताची ही इच्छा आहे तेंव्हा त्यावर सर्वंकष चर्चा व्हायला हवी अस मला वाटत. आता तुमची मतं यावर काय आहेत हे मला जाणून घ्यायच आहे.

वाघूळकरच बोलले “अच्छा म्हणजे याकरता तुम्ही मला सकाळी बोलाऊन financial पोजिशन ची माहिती घेतलीत ओह आता माझ्या लक्षात आल. “

आलं ना मग आता बोला.

मॅडम मी यातला तज्ञ नाही. सर्व स्कीम तयार झाल्यावर त्यांची financial viability चेक करता येईल पण ते नंतर, आत्ता कस शक्य आहे ?

दामले तुम्हाला काय वाटत ?

मॅडम मी मेकॅनिकल इंजीनियर, यातल मला पण फारस कळत नाही. पण माहिती नक्कीच करून घेता येईल. थोडा वेळ लागेल पण माहिती मिळेल. आत्ताच्या घडीला मला काय वाटत ते सांगू का ?

शशांक, अरे सांग न. त्यांच्या साठीच तर हा मिटिंगचा प्रपंच केला आहे.  हातच काही न राखता बोल.

आपण म्हणता की सर्व लोकांसाठी घर बांधायची, तर ती कशी हे आधी ठरवाव लागेल. म्हणजे सर्वांना सारखीच घरं देता येणार नाहीत. आधी लोकांचे गट तयार करावे लागतील आणि त्या प्रमाणे  १ BHK, २ BHK, ३ BHK अश्या पद्धतीने अलॉटमेंट करांव लागेल. आणि त्या संख्ये प्रमाणे घरं बांधावी लागतील. प्लस सर्वांचा एरिया ठरवावा लागेल बाल्कनी, टेरेस, ड्राय बाल्कनी, रूम चा एरिया वगैरे या सर्वांचा विचार करावा लागेल आणि प्रत्येक गटाचा वेगळा विचार करावा लागेल. या साठी १०० घरांसाठी किती जमीन घ्यावी लागेल हे ठरवाव लागेल. या सर्वा साठी आपल्याला एखादा चांगला आर्किटेक्ट हायर करावा लागेल.

तू म्हणतोस ते बरोबर आहे पटतय मला. वाघूळकर तुम्हाला काय वाटतंय ?

बरोबरच दिसतंय. आत्ता या वेळेस मी अजून काही प्रकाश टाकू शकेन अस मला वाटत नाही.

निकिता ? तुझच प्रोजेक्ट आहे हे. तू सांग.

मला अस वाटत की शशांक म्हणतोय ते बरोबर आहे. ही सर्व calculations झाल्या शिवाय आपल्याला प्रोजेक्ट ला किती गुंतवणूक करावी लागणार आहे ते कळणार नाही. आणि त्याचा अंदाज आल्या शिवाय काहीच करता येणार नाही. तेंव्हा प्रथम आर्किटेक्ट ला हायर करून सुरवात करावी. वाघूळकर साहेब तुम्हाला काय वाटतंय ?

बरोबरच आहे. आणि मला अस वाटत की शशांक इंजीनियर आहे त्यामुळे तो ही जबाबदारी चांगल्या रीतीने हॅंडल करू शकेल. त्यालाच कळेल की कोणत्या आर्किटेक्ट ला घ्यायच ते.

शशांक, आपले नवीन AGM देशमुख कसे आहेत ? एक वर्ष झाल न त्यांना ते सांभाळू शकतील का ? तुला जर ह्या प्रोजेक्ट मुळे फॅक्टरी कडे लक्ष द्यायला वेळ कमी मिळाला तर ते सांभाळू शकतील न ?

मॅडम चिंताच नको. एक्स्पर्ट आणि अनुभवी आहेत ते कामा मध्ये. मला पूर्ण खात्री आहे. we can certainly rely on him. अगदी १०० टक्के. 

ठीक तर मग तू आणि निकिता मिळून उद्या पासूनच सुरवात करा. आर्किटेक्ट शोधा, त्यांना सर्व कल्पना समजावून सांगा, त्यांची काय फी आहे ते बघा, सगळ्यांची प्रोफाइल, अनुभव, फी, कामाला किती वेळ घेणार हे सर्व गोळा करा आणि मग आपण बसून फायनल करू.

ही जास्तीची जबाबदारी तुझ्या वर टाकते आहे जमेल ना ? कारण कितीही झाले तरी फॅक्टरी कडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही.

जमेल मॅडम. no problem. पण मॅडम, देशमुखांना जरा कल्पना द्यावी लागेल. नाही तर त्यांना वाटायच की मी सोडून चाललो म्हणून.

जेवढी आवश्यक तेवढीच द्या आणि सांगा की हे confidential आहे म्हणून. ही बातमी आत्ताच पसरायला नको. कारण हे प्रोजेक्ट जर डब्यात घालायची वेळ आली तर अडचणी यायल्या नको. योग्य वेळ आल्यावरच declare करू.

                                               निकिता

दुसऱ्या दिवसांपासून आमच्या कामाला सुरवात केली. बॉस अर्थातच शशांक.

काय करायच, कुठून सुरवात करायची ? मी विचारल.

सर्वात आधी देशमुखांना बोलावून नीट कल्पना देवू. मग आपण बसू.

देशमुखांना बोलावून सर्व कल्पना दिली. ते आ वासून पहातच राहिले.

अशी योजना आहे ?

नाही, करायची इच्छा आहे निकीताची, पण सर्व बाबी तपासून पाहिल्या शिवाय निर्णय नाही घेता येणार. आर्थिक बाबी पण बघाव्या लागतील. जर सर्व गणितात बसंत असेल तर हे प्रोजेक्ट नक्की. पण आत्ता मौन बाळगण जरुरिच आहे. नाही तर प्रॉब्लेम्स उभे राहतील. तेंव्हा secrecy पाळा अगदी १०० टक्के.

हो साहेब आणि फॅक्टरी ची काळजी करू नका ते माझ्याकडे लागल. तुमची उणीव भासू देणार नाही.

Good. माझी हीच अपेक्षा होती. बर आता कामाला लागू आम्ही ?

निकिता आता yello pages वरुन पुण्याच्या सर्व architects ची लिस्ट बनव मी मुंबई बघतो.

दिवस भर खपून दोन्ही लिस्ट तयार झाल्या. आता काय ? आपल्याला shortlisting  कराव लागेल.

बरोबर पण आता ते काम आपण उद्या करू. तू बरीच दामलेली दिसतेस.

रात्री नेहेमी प्रमाणे आईंना दिवस भरायचा प्रोग्रेस सांगितला. आता उद्या बसून यातले ५-६ निवडू आणि त्यांना फोन करून वेळ घेऊ आणि त्यांच्याशी बोलू. मग बघू. पण आई मला यातला अनुभव काहीच नाहीये तेंव्हा जस शशांक म्हणतोय तसंच मी करतेय.

ठीकच आहे. शशांक हुशार आहे तो जे काही करेल ते विचार पूर्वकच करेल. तू त्यांच्या बरोबर काम करशील तर तू सुद्धा लवकरच एक्स्पर्ट होशील. मला खात्री आहे.

दुसऱ्या दिवशी तासभर मी शॉर्ट लिस्टिंग चा प्रयत्न करत होते पण काहीच जमेना. मला या विषयातली काहीच माहिती नसल्याने काही कळत नव्हत. शेवटी शशांकच्या केबिन मध्ये गेले. तो फोन वर बोलत होता. मला बसायची खूण केली. बोलण चालूच. १५-२० मिनिटे तशीच गेली. मग म्हणाला

सकाळपासून मी माझ्या सिविल इंजीनियर मित्रांना फोन करून चांगला आर्किटेक्ट कोण याबद्दल चौकशी करतोय. तीन नावांबद्दल सर्वांनी खात्री दिली आहे की ते आपल्या मनात जे आहे ते साकार करतील म्हणून. आता त्यांच्याशी बोलून मीटिंग च्या वेळा ठरवून घेऊ. तिघांशीही बोलण झाल्यावर मग शशी मॅडम ला सांगू.

म्हणजे आपण काल दिवसभर जे केल ते वाया गेल.

असच काही म्हणता येणार नाही. ते आपल्या रेकॉर्ड वर राहील. जर या तिघाबद्दल काही फायनल झाल नाही तर आपल्याला ती लिस्ट रेफर करावीच लागेल. आणि दुसर म्हणजे सुरवात करण्यासाठी काही तरी पाऊल उचलाव लागतच ना.

मग शशांक ने तिन्ही लोकांना फोन करून त्यांच्याशी मीटिंग ठरवली. ते

सगळेच त्यांच्या मित्रांना ओळखत होते त्यामुळे लगेच तयार झाले. आज एक मीटिंग, उद्या सकाळी दुसरी आणि संध्याकाळी तिसरी अशी वेळ ठरवून शहरातल्या ऑफिस मध्येच यायला सांगितल.

चला निकिता बाई आज जेवण घरी. तिथूनच दुपारी ऑफिस. मग मीटिंग.

मला अस वाटत शशांक की नाहीतरी मीटिंग ऑफिस मध्येच होणार आहे तर आईंना पण involve करूया. म्हणजे तेवढाच shortcut वेळेची बचत.

You are right निकिता. आत्ताच फोन करून मॅडमना विचारतो की वेळ आहे का आणि असेल तर मीटिंग ला येता येईल का म्हणून.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com    

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

🎭 Series Post

View all