निकाल

लागलेला निकाल हा कागदावरच राहायला हवा. त्यांच्यावर मानसिक ओझं नको.

            निकाल

परिक्षेपूर्वी......
बारावीच्या परीक्षेसाठी सुट्ट्या दिलेल्या आहेत. 'सोनी सोनी अखियोवाली' सोनी जोहर. अलिया जोहरची मातोश्री. आलिया बारावीची 'स्टुडन्ट ऑफ द इअर.'  अभ्यास नि तिचा 'छत्तीसचा आकडा'.
 तरीही सोनीच्या 'आँखोका तारा'.  त्यामुळे अपेक्षा खूप.
सोनी - आलीया यावेळी 90 टक्केपेक्षा जास्त मार्क आलेच पाहिजेत.
आलिया- मम्मा मुझसे ये ना हो पायेगा.
सोनी - ते मला काही माहीत नाही. त्या बाजूच्या प्रियांकाने बघ. मागच्या वर्षी 95 टक्के घेऊन अमेरिकेला अभ्यासाला गेली. ती सिंगाची दीपिका. काही येत का तिला पण तरीही तिने बरीच मजल मारली. आणि तुम्ही दोघी बहिणी. काय दिवे लावणार कुणास ठाऊक? तू तरी आपल्या घराच नाव रीतीकसारख रोशन कर.
आलिया - मला नाही जमणार एवढे मार्क कवर करायला. मला इंग्लिश  विषय नाही जमत.
सोनी - विषय बरा जमत नाही इंग्लिश दारू बरी जमते. जमवाव लागेल. नाहीतर त्या कामवाल्या बाईने कस आपल्या पोरीचं सोनमंच पैसेवाल्या म्हाताऱ्याशी लग्न लावून दिल तस मीही लावून देईन.
आलिया - नाही नाही मी करेल अभ्यास.

आलिया टेन्शन घेऊन अंगणात बसलीये.
कंगना - Hey energy bomb, what are you doing? Why are you looking so dull? काय झालं?
आलिया - मी काही एनर्जी बॉम्ब नाही.
कंगना - बर झाल लवकर लक्षात आलं. तुझे पप्पा तुला म्हणतात म्हणून मीही म्हणते. काय झालं सांगशील?
आलिया - मम्मा म्हणते मला बारावीमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त मार्क पाहिजेत म्हणून. नाहीतर ती सोनामसारखा पैसेवाल्या म्हाताऱ्याशी लग्न लावून देईल. 
कंगना - अच्छा अस होय. पण ती बरोबर बोलतेय.
आलिया - हे काय ? तू पण अस बोलते. 
कंगना - ओके हे चुकीचे तर आहे. बर चल तुझ्या मम्माशी बोलू आपण समजावून सांगू. 
आलिया - नको ती एकणारच नाही.
कंगना - ठीक आहे पप्पाशी बोलू. इमोशनली ब्लॅकमेल करू.
आलिया - कस?
कंगना - बाबा मे 'तेरी मल्लिका 
            तुकडा हु तेरे दिलका
            मम्मीको जरा समजा देना...

       महेशच्या केबिनमध्ये
महेश - हे बेबी व्हाट्स अप? व्हाय आर यू कमिंग हीअर?
कंगना - काका हिच्या आयुष्यात खिलजी आलाय म्हणून ही जौहर करायचं म्हणते.
महेश - ओह माय गॉड. व्हाय आर यु स्पिकिंग लाईक धीस?
आलीया - मम्मा म्हणते की 90 पेक्षा जास्त टक्के आले पाहिजेत. आणि मला ते जमणार नाही.
महेश - ओके. हा पॉईंट आहे. ठीक आहे बेटा मी मम्मीशी बोलतो.
कंगना - काका नक्की प्रयत्न करा. पोरींचा आय क्यू माहीत आहे ना?.

परीक्षेनंतर
आलिया कंगनाच्या घरी निकालाची प्रत घेऊन.
 - हे दि. आर यु नो माय रिजलट. मी पास झालेय.
कंगना - काय? कस शक्य आहे?
आलिया - काय दि तुपण.
कंगना - अरे यार अभिनंदन. पार्टी तो बनती है. लेट्स गो. मम्माला सांगूंया.
आलिया - नको मी अशी काठावर पास झालीये आणि  तीला 90 टक्के पाहिजे होते. ती मला फासावर लटकवेल.
कंगना - चल मग. शुभकार्याला उशीर कशाला?
आलिया - कशाला मीच घेतेना फाशी? मेल्यावर मग माझ्या आत्माला शांत करत बसा.
कंगना - अग पण ही न्यूज सांगाव लागेलचना.
आलिया - तेच. आधी पप्पाला सांगू मग पप्पा मम्माला
सांगतील.
कंगना - ठीक आहे. चल मेरी मणिकर्णिका.

 महेशच्या केबिनमध्ये.
महेश - हे माय बेबी डॉल. व्हाट्स अप? 
आलिया - पप्पा मी पास झालीये.
महेश - काय ? खर की काय?
कंगना - म्हणजे तुम्हालाही विश्वास बसत नाही तर. तरीही पोरीला पुढं पुढं करता.
महेश - इट्स गुड न्यूज. मम्माला सांगितलंस?
आलिया - नो.
     सोनी पधारते.
सोनी - काय लागला निकाल?
आलिया - हो पास झाले.
सोनी - किती टक्के?
आलिया - ४५%
सोनी - कुठं तोंड काळ करतेय की तुला एवढे कमी टक्के पडलेत. मी काय तोंड दाखवू सोसायटीत?
कंगना - काकू नशीब समजा पोर पास झाली तुम्हाला तोंड दाखवायला.
महेश - आणि जर आलिया नापास ही झाली असती तरी काही फरक पडला नसता. मी असताना तिला टेंशन घेण्याची गरज नाहीये. तसाही आपला फॅमिली बिजनेस आहेच. आपल्या घरातल्या स्टोर्या पिक्चरमार्फत लोकांपर्यंत पोचवण्याचा. तोच तीही करेल. रिलॅक्स.
सोनी - ठीक आहे. 

              ....
सर्व वयातील मुलामुलींनो, वरील प्रसंग हलक्याफुलक्या विनोदाने यासाठी सांगतेय की ह्याच ताऱ्यांचा पगडा आपल्यावर आहे म्हणून. आपले पोर ह्यांच्या  पोरापेक्षा नक्कीच चांगले आहेत. नालायक नाहीत. तर लागलेला निकाल हा फक्त कागदावरच राहायला पाहिजे. त्यांच्यावर मानसिक ओझं व्हायला नको. अजून खूप चांगले निकाल बघायचे बाकी आहेत आपल्या पोरांचे. म्हणून मुलांना फुलू द्या, चुरगाळू नका. एवढंच सांगण्याचा उद्देश. बाकी काय लिहिणे. 
समजदार आहात.


 सुषमा चवळे - कानेटकर