Jan 22, 2021
Poem

निशा

Read Later
निशा

निशा काजळाची मला साद देते
गवाक्षात आली चंद्राची सवारी
नभाच्या महाली सभा तारकांची
कशी सांग येऊ फुले रातराणी

फुले रातराणी बगिच्यात माझ्या
कशी सांग येऊ मि सोडून तीला
नको तारकांची मला राजशाही
सुखी आज आहे मि माझ्या निवासी

गंधाने मंतरला मनाचा निवारा
कुठे साठवू भेट सुवासी फुलांची
नभाच्या महाली सभा तारकांची
कशी सांग येऊ फुले रातराणी

------सौ.गीता गजानन गरुड.