निधी अमित मेढेकर : चतुरस्र स्री व्यक्तिमत्व

ईरा : वाचकांचा खजिना

निधी अमित मेढेकर : चतुरस्र स्री व्यक्तिमत्व 

स्री देते प्रेरणा 
उमेदीने विचारांने 
सन्मान स्रीत्वाचा 
करुया आदराने 
                     ✍️....

         स्रीयांचे बदलते वैचारिक स्वरुप फार प्रेरणादायक  वाटत आहे.स्रीयांचा मानसिक सक्षमीकरण आजच्या धावत्या युगात मोलाचे ठरत आहे. कठिण परिस्थिती स्रीयांनी हाताळताना आपण केवळ सोशिक नाही तर मनानेही सशक्त आहे याची प्रचिती वारंवार दिली आहे.समाजाची अवहेलना झेलून स्री शिक्षणाची कवाडे जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी उघडून स्रीयांना विचारांचा प्रशस्त मार्ग खुला केला आणि स्री  शिक्षित झाली. ज्ञानाने समृद्ध झाली , मनाने प्रबळ झाली , विचारांना चालना मिळाली आणि तेथून पुढे तिने सर्व क्षेत्रात गरुड भरारी घेतली.आज अनेक क्षेत्रात तिचे विचार समाजउपयोगी ठरत आहेत.आपल्या कक्षा रुंदावताना धाडसी निर्णय घेऊन त्यांनी आपली छाप पाडली आहे.सर्व क्षेत्रात अनेक बदल झाले.माध्यमांचा प्रभाव वाढू लागला या बदललेल्या व्यापक गोष्टींचा स्रीयांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने ध्यास घेतला व स्रीयांनी वेगवेगळ्या माध्यमांतून विचार व्यक्त करण्यास प्रारंभ केला.लेखनकलेच्या माध्यमांतून विविधतेने लेखन करताना समाजाची स्थित्यंतरे रेखाटताना स्रीसुलभ मनाने सुंदर प्रकटीकरण केले.आपण पाहतोच आहोत ईरासारख्या व्यासपीठाची निर्मिती  आदरणीय संजना मॕडम यांनी करुन स्रीयांना मुक्त व्यासपीठ दिले आहे.तिथं सर्वांगसुंदर लेखन करतांना लेखिका मनसोक्त व्यक्त होत आहेत.स्रीयांच्यातही प्रेरणादायक शक्ती दडलेली आहे हे विविध यशस्वी कृत्यातून त्यांनी दर्शविले आहे.

   अशाच विविध गोष्टीतून आपले आगळेवेगळे  नैपुण्य दाखविणारे आदरणीय स्री व्यक्तिमत्व म्हणजे निधी अमित मेढेकर ...!! प्रेमळ स्वभाव , नेहमी प्रभावशाली  सकारात्मक विचार , हजरजबाबीपणा , विविध भाषेवर प्रभुत्व , मार्गदर्शन करण्यासाठी सतत उत्साही असणाऱ्या निधी मॕडम कायम हसतमुख असतात.अमितसर लेखनाच्या माध्यमांतून ईराशी जोडले गेले.त्यांच्या अनेक कथेमधून प्रेरणांचा झरा वाहता राहिला.वाचकांना नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.लेखक अनेक कठिण प्रसंगाना तोंड देत लिहीत असतो याची जाण अमितसर यांना होती.यासाठी ईराच्या लेखकांसाठी कायतरी केले पाहिजे याची धगधग त्यांच्या मनात सलत होती यातूनच त्यांनी " ईराज व्हाईस वुईथ निधी " ही व्यक्त होण्याची संकल्पना निर्माण केली.याची सुत्रे निधी मॕडम यांनी सांभाळताना सर्व लेखकांना व्यक्त होण्याची संधी दिली.अत्यंत नियोजनबद्ध हा कार्यक्रम राबविताना लेखकांना बोलण्यास प्रोत्साहीत केले.गोड आवाज , स्पष्ट उच्चार ,उत्तम निवेदशैली यामुळे हा कार्यक्रम हवाहवासा वाटतो.यामध्ये  लेखकांच्या आवडीनिवडी , त्यांच्या लेखनाच्या विविध पैलूवर चर्चा व भाष्य केल्यामुळे वाचकांना लेखकांची सखोल माहिती मिळत आहे.अत्यंत खेळीमेळीने लेखकांशी संवाद साधल्यामुळे  हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे.यापुढेही त्या लेखकांशी हितगुज साधून ईराला व लेखकांना नवी प्रेरणा देतील.

   प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्री असते.अमितसरांना तोलामोलाची साथ देताना निधी मॕडम यांनी कधीच कुचराई केली नाही.सकारात्मक विचारांना नेहमी आपलेसे करुन  अमितसरांचे विविध उपक्रम यशस्वी केले आहेत.कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सर्व क्षेत्रात आपले विचार सकस बनविले आहेत.निधी मॕडम यांच्या या कार्याचे निश्चितच कौतुक वाटते.संपुर्ण  ईरा कुटुंबाला याचा सार्थ अभिमान आहे.ईराच्या लेखकांना नेहमीच प्रेरणा देणाऱ्या निधी मॕडम यांच्या कार्याविषयी आज लिहण्याचा योग आला.विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस ....!! त्यानिमित्ताने त्यांना शब्दांनी तरी कृतार्थ करावे  या उद्देशाने केलेला हा शब्दप्रपंच..!! निरामय आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा ..! ईराच्या लेखकांना , वाचकांना त्यांचा  प्रेरणादायक सहवास सतत लाभावा  हिच मनोकामना ....!!

               ©®नामदेवपाटील