निकोलस कोपरनिकस आणि सूर्यकेंद्रित विश्वसिद्धांत

It Is Article About Polish Astronomer Nicholas Copernicus

           अरिस्टोटल आणि टॉलेमी यांच्या सिद्धांतानुसार , पृथ्वी हा विश्वाचा मध्य असून सर्व विश्व पृथ्वीभोवती फिरतो या समजुतीचा प्रभाव पंधराशे वर्ष मानवी विचारांवर होता. ख्रिश्चन धर्माने ही या समजुतीला मान्यता दिली होती,  मात्र निकोलस कोपर्निकस यांनी हा सिद्धांत खोटा आहे. हे सूर्यकेंद्रित विश्व सिद्धांत मांडून सिद्ध करून दाखवले . त्याच्या या सिद्धांतामुळे खगोलशास्त्राविषयी चे अनेक समज-गैरसमज मोकळे झाले आणि खगोल विज्ञानाला वेगळी दिशा मिळाली.

         हा शोध लागला त्यावेळेस कोपर्निकस चे वय निव्वळ सोळा वर्षांचे होते कोपर्निकस चा जन्म 19 फेब्रुवारी 1473 रोजी पोलंडमधील  टोरून या गावी झाला. कोपर्निकस चे काका पोलांडमधील बिषप पदावर धर्मगुरू असल्यामुळे , त्याचे शिक्षण धर्म परंपरा विषयक कायदे व वैद्यकशास्त्रा कडे वळले. काकांच्या सहकार्याने त्याला युरोपातून महत्त्वाच्या विद्यापीठातून शिक्षणाची संधी मिळाली . वयाच्या चोविसाव्या वर्षी निकोलस चर्चचा सेवक बनला आणि इथेच त्याची खगोलशास्त्राशी गाठ पडली.

           शिक्षण सुरू असतानाच कोपर्निकसने प्राचीन ग्रीक वांङमयाचा अभ्यास केला होता.  टॉलेमीच्या विश्व सिद्धांतात त्याला बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. कोपर्निकसच्या \"सूर्यकेंद्रित सिद्धांतानुसार\" सूर्य विश्वाच्या मध्यभागी आहे . या सूर्याभोवती इतर ग्रह मोठमोठ्या वर्तुळाकार कक्षेत फिरतात. एखादा ग्रह सूर्यापासून जितका दूर तितका त्याला सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ जास्त,  त्यामुळे बुध , शनि यासारख्या ग्रहांचा प्रदक्षिणेचा काळ हा वेगवेगळा आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करते तर सूर्याभोवती एका वर्षात प्रदक्षिणा पूर्ण करते.

             कोपर्निकसच्या मते तारे हे सूर्याप्रमाणे ज्वलंत असून पृथ्वीपासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे ते थोडे मंद वाटतात . पण जवळ असते तर तेही अधिक तेजस्वी दिसले असते. सुरुवातीला पृथ्वी केंद्रित विश्व मानणाऱ्या टॉलेमी आणि अरिस्टोटल यांच्या सिद्धांताच्या विरोधात आपले विचार मांडणे हे महापाप आहे असे कोपर्निकस ला वाटत होते. परंतु आपले विचार जास्त कलात्मक आणि समजायला सोपे आहेत असंही त्याचं मत होतं.

              या संदर्भात त्याने एक पुस्तिका तयार करून ती आपल्या मित्रांमध्ये आणि विद्वानांमध्ये वाटली , त्यामुळे त्याच्या विचारांची माहिती युरोपभर पसरली आणि त्याचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता युरोपात निर्माण झाली. ख्रिश्चन धर्मातून त्याच्याविरुद्ध टीकेचा सूर उमटला . त्याचे हे विचार ताबडतोब प्रसिद्ध व्हावे असे हे र्हेटिकस नावाच्या प्राध्यापकाला वाटले आणि कोपर्निकस च लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालं , पण पुस्तक प्रसिद्ध व्हायच्या आतच कोपर्निकस ला अर्धांगवायूचा झटका आला आणि 24 मे  1543 रोजी त्याचं निधन झालं. त्याच्या या ग्रंथामुळे बरेच वादळ उठले.  त्यावर बंदीही घालण्यात आली मात्र शेवटी जगाने कोपर्निकसच्या या सिद्धांताला मान्यता दिली.

       




माहिती आणि फोटो- साभार गुगल

🎭 Series Post

View all