5.नववर्षाच्या उंबरठ्यावर

नववर्षाच्या उंबरठ्यावर

नव वर्षाच्या उंबरठयावर

हास्य, समाधान नांदो

सर्वांच्या चेहर्‍यावर

\"शरीर हीच संपत्ती\" म्हणून

भर द्यावा व्यायामावर

व्यायामाने नियंत्रण होईल

कित्येक आजारांवर 

व्यायामासह भर असावा

ताज्या अन्नपदार्थावर 

जीवनसत्व आणि खनिजं मिळतील

पाले भाज्या आणि फळांच्या आहारावर

उपाय होईल मग

ऍनिमिया च्या समस्येवर 

फ्रीज मधलं अन्न टाळले तरच

प्रतिरोध करता येईल कॅन्सरवर

पोट बिघडतंच

उघड्यावरचं अन्न खाल्ल्यावर

आपणच अवश्य उपाय करावा

उघड्या सांडपाण्यावर

तुम्हीच सांगा किती बरं भार द्यायचा ?

त्या चिमुकल्या गप्पी माशांवर..