स्वागत नव्या वर्षाचे..

Welcome Of New Year
संपले वर्ष दोन हजार एकवीस
सुरू झाले वर्ष दोन हजार बावीस

दिवसामागून दिवस सरले
दरवर्षाप्रमाणे हे ही वर्ष गेले

आठवणीत राहून जाते प्रत्येक वर्ष
देवूनी कधी दुःख तर कधी हर्ष

दरवर्षी चं स्वप्न पाहतो,संकल्प ही करतो
आणि ते पूर्ण होण्याची आशा बाळगतो

कास धरूनी इच्छा, आकाक्षांच्या पूर्णत्वाची
आनंदाने वाट पाहतो नववर्षाची

गेलेले वर्ष बनते आठवणींचा भूतकाळ
येणारे वर्ष असते अपेक्षांचा भविष्यकाळ

नेहमीप्रमाणे वर्ष येते आणि संपते
हे कालचक्र अविरत सुरु राहते

संपलेले वर्ष खुप काही देवून जाते
पुढील वर्षासाठी जगण्याची उम्मेद देते

गतवर्षातील दुःखांनी मन हैराण होते
नववर्षातील आशा,संकल्पांनी मनात चैतन्य येते

देवूनी निरोप गतवर्षाला स्वागत करतो नववर्षाचे
स्वप्न उराशी बाळगून आनंदी जीवन जगण्याचे