नवी स्वप्न नवी आशा

आली नवी पहाट

नववर्षाच्या उंबरठ्यावर  आली नवी पहाट,
विसरुनी सारी दुःख करू आयुष्याची नवी सुरुवात,
करुनी साऱ्या दूर निराशा, 
बघू नवी स्वप्न नवी आशा,
निरोप तुला देताना हे जुन्या वर्षा,
दाठूनी आला कंठ मावळल्या मनातील आशा,
उगवलाय नवीन दिवस नववर्षाचा,
नवीन स्वप्नांचा आणि नव्या नव्या आशांचा...
पुन्हा उठू नव्याने, देऊत नव्याने लढा,
घेतला आहे मनी ध्यास उचलला आहे हाच विडा,
ना डगमगणार ना हरणार सोडविणार आयुष्याचा तिढा,
असेच जाउत पुढे  नववर्षाच्या उंबरठ्यावर आली नवी पहाट.........