नवी सुरुवात भाग ५

She will live peacefully life after her incident.

       कुशल गेल्याची बातमी पूर्ण हॉस्पिटलला हादरून सोडली होती. वॉर्डातील सगळे पेशंट दुःखात  होते. पेशंटच नवे तर नर्स , डॉक्टर ही दुःखात होते. त्याच्या काळात तो सर्वांशी अगदी चांगला वागत होता. ते आठवून सगळेच दुःखात होते. सुमन आणि तिची आईही दुःखात होते. या थोड्या दिवसात कुशल त्यांच्यात खूप रमला होता. सुमनला नवी आयुष्याची ओळख कुशलने करून दिली होती. बाकी सगळ्या पेशंटना होईल ते मदत तो करत होता.

     सुमनला खूप दुःख झालं होतं. ती रडत होती. तिची आई तिला शांत करत होती, पण तिचीही हालत तशीच होती. आताच सुमन एका दुःखातून बाहेर आली होती. आता परत ती दुःखात जाईल ही भीती तिच्या आईला वाटत होती.

     काहीवेळाने डॉक्टरांनी कुशलला बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू केले. तो अनाथ होता. पण अंत्ययात्रा निघावी अशी प्रत्येक पेशंटची ईच्छा होती. पण डॉक्टरांना आता हा निर्णय घ्यायचा होता.

      कुशलची अंतयात्रा न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्याला महानगरपालिकेच्या अधीन करावं असा निर्णय घेण्यात आला . त्यांचा हा निर्णय पेशंटला धरून घेतलेला होता. कारण खुपशे पेशंट चालण्याच्या स्थितीत नव्हते. जर कुणाला काही झालं तर हॉस्पिटलची जबाबदारी होईल , म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

    हे ऐकून सर्वांना वाईट वाटलं. पण निदान हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन जाऊ पर्यंत पेशंट पाहू शकणार होते.

    काहीवेळाने कुशलला बाहेर आणण्यात आलं. सगळे पेशंट त्याच्या भोवती जमा झाले. त्या सर्वांना रडू कोसळलं. त्यात सुमन आणि तिची आई ही होते. सगळे दुःखात होते.

    थोडावेळ कुशलला त्यांच्या समोर ठेवण्यात आलं. पण जास्त वेळ ही प्रेत तिथे ठेवू शकत नसल्याने डॉक्टरांनी लगेच कुशलला हलवले. महानगरपालिकाची गाडी प्रेत घेण्यासाठी आलेली होती. त्यांच्या गाडीत प्रेत चढविण्यात आलं. पेशंट हॉस्पिटलच्या दारात आलेले होते. गाडी निघाली आणि काहीवेळाने पेशंटही परत आत गेले.

    सुमन आणि तिची आई तिथेच त्यांच्या बेडजवळ आले. दोघेही दुःखी होते . कुशलच्या बेडजवळ नर्स सर्व काही स्वच्छ करत होती. तिथे तिला एक डायरी सापडली. ती उचलताच त्या खाली एक कागद असल्याचं तिला दिसलं. त्या कागदावर ' सुमन ' असं लिहिलेलं होतं. नर्सला कळून चुकलं की हे कागद सुमनसाठी होती. नर्स सुमनच्या बेडजवळ गेली आणि तिला म्हणाली.

नर्स -" सुमन. ही चिट्टी तुझ्यासाठी आहे वाटतं. "

सुमन -" कोण दिलं ?"

नर्स -" कुशलच्या बेडजवळ होती. तोच लिहिला असावा."

सुमनने वेळ न घालवता ती चिट्टी वाचायला घेतली.

' हॅलो सुमन ,

                 मी तुझा शेजारी बोलतोय. म्हणजे तुझ्या शेजारच्या बेडवरील कुशल बोलतोय. ही चिट्टी तू वाचत आहेस . म्हणजे या जगातून मी गेलोय. दुःखी होऊ नकोस. तू आताच त्यातून बाहेर पडलीस आणि पुन्हा त्या दुःखाच्या नदीत उडी मारू नकोस. मी अनाथ आहे , म्हणजे आता तू होतो असं म्हणू शकतेस. तेंव्हा मला आयुष्य खूप कठीण वाटायचं. पण जेंव्हा मी इतरांशी हसरा चेहरा ठेवून , त्यांची विचारपूस करून , त्यांनाही हसवून जगलो ना , तेंव्हा मला कळाल की आयुष्य नेमक काय असतं.

            आयुष्य एकट्याने जगायचं असतं, हे खरं आहे. पण इतरांसोबत आणि इतरांसाठी जगायचं असतं. मग बघ आयुष्य किती सुंदर होते. जी गोष्ट तुझ्यासोबत घडलीय ना , त्याला आता विसरून जा. आता नव्याने सुरुवात कर. आईची काळजी घे. नवीन मित्र मैत्रिणी बनव. म्हणून जुन्या मित्र - मित्रिनीनां विसरू नकोस. तुला प्रेम करणारे खूपजण आहेत ,  त्यांना प्रेम कर.

        बरं ओंकार बद्दल काय ठरवलीस? तो चांगला आहे. मी का म्हणतोय असं? कारण तो तुला त्याची भावना समोर सांगू शकला नाही. तू जर त्याला बोलायचं सोडलीस, तरी त्याला वाईट वाटणार नाही . तो सदा तुझी मदत करण्यासाठी तयार असेल.

      आणि हा मला पण विसरू नकोस. आपला खूप कमी दिवसाचा सहवास आहे. पण ते दिवस खूप चांगले  गेले. आईची काळजी घे. मी सदा तुझ्या विचारात असेन हे विसरू नकोस.

                                                    तुझा मित्र
                                                     कुशल '

        हे वाचून झाल्यावर सुमनच्या डोळ्यातून अश्रू गालावरून खाली आले. नव्या आयुष्यात ती कुशलची खूप आठवण काढणार होती. तिच्या विचारात आता कुशल उतरला होता. ती चिट्टी सदा स्वतः जवळ ठेवणार होती.

       बघता बघता तो दिवस संपला आणि सकाळची कोवळी ऊन त्या वॉर्डात पसरली होती. तीच कोवळी ऊन तिच्या नव्या आयुष्यात पसरणारी होती.
   
       डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुमन आणि तिची आई सर्व काही आवरू लागले.

आई -" चल.. झालं का सगळं घेऊन?"

सुमन -" हो..."

आई -" मी टॅक्सी बोलवली आहे. चल पटकन ."

सुमन -" हो."

      असं म्हणत तिची आई पुढे झाली. सुमन ही तिची बॅग घेऊन जात होती. पण ती एकदा मागे पाहिली. तिची बेड आणि कुशलच्या बेडला शेवटची पाहू लागली. त्या एका क्षणात तिला कित्येक दिवस आठवू लागले. काही क्षण तिथेच थांबून ती मागे फिरली आणि जाऊ लागली.

     काहीवेळाने टॅक्सी घरासमोर उभी झाली. दोघेही सामनासहित खाली उतरले. कित्येक दिवसांनी सुमन तिच्या घराला पाहत होती. काही क्षण ती त्या घरात घालवलेले क्षण आठवली. आईचा हाक ऐकल्यावर ती आत गेली.
  
       आत जाताच सुमन घर आवरायला घेतली. ती आणि तिची आई काहीवेळातच घर आवरले. सुमन आजच कॉलेजला जायचं असं ठरवली होती. हे कळताच तिची आईने विरोध केला. पण थोडं विनवणी केल्यावर तिची आई जाण्यास परवानगी दिली.

       सुमन अंघोळी आटपून तयार झाली. या नवीन दिवसाची सुरुवात तिला चांगलं करायचं होतं. तिची आईही तयार झाली आणि नाश्तासाठी किचनमध्ये गेली.तेवढ्यात सुमन तिच्या आईला किचनमधून बाहेर काढत म्हणाली.

सुमन -" आज मी नाश्ता तयार करीन. "

आई -" का ?"

सुमन -" कारण आज माझ्यासाठी हे नवीन दिवस आहे. मला पूर्णपणे जगू देत."

आई -" ठीक आहे."

      काहीवेळात सुमन नाश्ता घेऊन टेबलावर आली आणि दोघेही नाश्ता करण्यासाठी बसले. तिची आई कॉलेजमध्ये जास्त काही करू नकोस असा सल्ला देत होती. सुमन ही ऐकत होती.

    सुमन आता निघण्यासाठी तयार झाली. तेवढ्यात तिची आई तिला थांबवली.

सुमन -" काय झालं आई?"

आई -" हे घे दही साखर खाऊन जा. नवीन सुरुवात करत आहेस. चांगलं होऊ देत."

     सुमनने दही साखर खाल्ली आणि आईची पाया पडली. तिची आई आज खूप खुश होती.   

       सुमन काहीवेळाने कॉलेज समोर उभी होती. वेळ न घालवता कॉलेजमध्ये गेली. सगळे तिला पाहून चकित होते. सुमन सर्वांना स्मित करत ' Hi ' म्हणत होती. सर्वांना हे अनेपक्षित होतं. तिच्या मित्रमैत्रिणी खूप खुश झाले होते. ते सगळे तिला वर्गात घेऊन गेले . सगळे तिला पाहून खुश झाले होते. सगळे तिची विचारपूस करू लागले. पण तिथे बसलेला ओंकार तिला पाहत स्मित करत होता. सुमन ही त्याला पाहून स्मित केली. ओंकार पहिल्या बाकावर एकटाच बसला होता.

      पहिली लेक्चर संपल्यावर सुमन उठली आणि ओंकारच्या जवळ जाऊन बसली.

सुमन -" हाय..."

ओंकार -" हाय.."

तो नजर न मिळवताच म्हणाला.

सुमन -" हे लेक्चर बंक मारायचं का?"

ओंकार हे ऐकून आश्चर्याने तिच्याकडे पाहिला.

ओंकार -" काय??"

सुमन -" हो रे... चल.."

     तिने ओंकारचा हात पकडली आणि बाहेर घेऊन जाऊ लागली. हे सगळं वर्गातले पाहत होते. तोही त्याचा बॅग सावरत तिच्या मागे जाऊ लागला.

      ते दोघे कॅन्टीनला गेले. दोघेजण कॉफी मागवली होती. कॉफी पीत सुमन म्हणाली.

सुमन -" ओंकार ... तुझा तो चिट्टी मी वाचले. खूप छान लिहिला होतास. "

हे ऐकताच ओंकार खाली पाहू लागला.

सुमन -" अरे असं लाजू नकोस. तुझी भावना तू मला आधी सांगायला हवी होतीस. जाऊदेत . आपण आता नव्याने सुरुवात करुयात. "

ओंकार -" म्हणजे?"

सुमन -" तू मला डेट वर घेऊन जाशील ना?"

     हे ऐकताच ओंकार खुशीने लाजला. सुमन हे पाहून हसली.

ओंकार -" हो नक्की. पण हा बदल कसा काय?"

सुमन -" हा बदल एकामुळेच झाला आहे. आता मला फक्त मनोसोक्त जगायचं आहे."

     हे म्हणताच ओंकार तिच्या हातावर हात ठेवला. हे अनुभवताच सुमन ही त्याच्या हातावर हात ठेवली.

सुमन -" तू आहे ना सोबत?"

ओंकार - " हो.."

      सुमनला आता जगण्याची नवी उमेद भेटली होती. तिच्या त्या नवी आयुष्याची सुरुवात झालेली होती. तिला आता जगण्यासाठी कारणही भेटलं होतं. आयुष्याची नवी सुरुवात करायला आता सुमन तयार होती.

*******************************

समाप्त

ऋषिकेश मठपती.

   

🎭 Series Post

View all