न संपणारे प्रेम.

शॉर्ट स्टोरी ऑफ लव्ह


वसुधा तिच्या यंग वुमेन्स ग्रुपला भेटायला निघाली होती,आज तिला जरा उशीरच झाला होता.वेळेचं बंधन ती नेहमीच पाळत होती पण आजकाल वयोमानानुसार कामे आटपत नसे.वसुधाल दोन मुली होत्या,दोघींचीही लग्ने झाली होती,आपापल्या संसारात सुखी होत्या दोघीही.एक जरा लांब दिली होती पण दुसरीला त्याच शहरात दिले होते वसुधाने.


पण लग्नानंतर संसारात रमल्यामुळे फारसे येणे जाणे होत नसे तिचेही.पण वसुधाल कोणावरही अवलंबून राहणे आवडत नसे.नवऱ्याच्या मागे सुद्धा कधीच त्या कोणावर अवलंबून राहिल्या नव्हत्या.दोन्ही मुलींची लग्ने त्यांनी एकटीने पार पाडली होती.


आता त्या त्यांच्या घरी एकट्याच राहत होत्या,वेळ जाण्यासाठी आपले छंद जोपासायचे त्यांनी ठरवले होते,आतापर्यंत जे करायचे राहून गेलं आहे ते त्यांना करायचेहोते.समाजसेवा,मैत्रिणींसोबत मनमोकळ्या गप्पा,छान गाणी,परसबाग,निसर्गावर प्रेम असे अनेक गोष्टींचा समावेश त्यामध्ये होता.वसुधा पोहचली तेंव्हा तिच्या मैत्रिणी तिच्या येण्याची वाट पहात होत्या.काय ग आज का उशीर झाला तुला?? तिच्या मैत्रिणीने विचारले आणि गप्पा सुरू झाल्या.तिच्या मैत्रिणीने तिच्यावर खुप मनापासून प्रेम तर होतेच,शिवाय तिच बद्दल आदर आणि काळजी होती सगळ्यांना.


वसुधाल गुडघेदुखीच त्रास होत होता त्यामुळे नेहमी डॉक्टरकडे जावे लागत होते,ती आज दवाखान्यात जाणार होती,तिची मुलगी येणार होती पण अचानक घरी पाहुणे आल्यामुळे तिचे येणे रद्द झाले होते,म्हणून वसुधा एकटीच गेली होती,तपासून झाल्यावर नेहमीप्रमाणे डॉक्टर सोबत छान गप्पा मारुन ती निघाली होती,दवाखान्यात तिला कोणीतरी पाठमोरी व्यक्ती उभी दिसली अतिशय ओळखीची वाटली,ती व्यक्ती पाठमोरी असूनही तिला ती ओळखीची वाटत होती याचं तिलाही जरा आश्चर्यच वाटलं पण असेल कोणीतरी असा विचार करून निघाली ती, थोडे पुढे गेल्यावर "वसू" अशी हाक तिच्या कानावर पडली आणि क्षणात डोळे भरून आले तिचे, हा आवाज आणि हाक दिलेली व्यक्ती कोण आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही,पण मागे वळून बघण्याची हिम्मत तिला करता येत नव्हती.पुन्हा हाक आली "वसू".तिने डोळ्यातील पाणी पुसत मागे पाहिले आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तब्बल २५-३० वर्षांनंतर पहात होती ती प्रभातल.काय बोलावे,कसे बोलावे काहीच सुचत नव्हते दोघांनाही,एकमेकांकडे बघत राहिले ते काहीच न बोलता,कितीतरी वेळ असाच निघून गेला,डोळे भरून पहात होते,डोळ्यांनी बोलत होते दोघे फक्त आसवे गळत होती डोळ्यातून,शब्दांची गरजच उरली नव्हती.बऱ्याच वेळाने प्रभात म्हणाला कशी आहेस वसू ? वसुधा म्हणाली ठिक आहे.


प्रभातने खूप आग्रह केला त्यामुळे वसुधा त्याला भेटायला तयार झाली.दोघे भेटले पण बोलायचं काय? सुरुवात कुठून करावी काही समजत नव्हते दोघांना.खरतर दोघांच्याही मनात खूप प्रश्न होते,खूप बोलायचे होते,मन मोकळे करायचे होते पण बोलत मात्र कोणीच नव्हते.प्रभात म्हणाला किती वर्षांनी आणि किती अपघाताने भेटलो आपण हो ना?? वसुधा म्हणाली खरंच अशी आपली भेट होईल हे स्वप्नातही नव्हते माझ्या.तुला भेटून खूप छान वाटलं मला वसू.खूप वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण झाली माझी.मनातून वाटत होते मला तुझी भेट व्हावी,निवांत बोलता यावे,मनात राहून गेलं ते सगळं सांगून टाकावे. बरं झालं आपण भेटलो.वसुधा म्हणाली हो खरं आहे.


प्रभात म्हणाला वसू सांग बरं मला इतक्या वर्षात काय केलंस तू?तुझ आयुष्य कसं जगलीस ? काय काय घडलं तुझ्या आयुष्यात? किती मुलं आहेत तुला? माझी आठवण येत होती की नाही तुला? तुझा नवरा कसा आहे ?सांग मला सगळं.वसुधा म्हणाली हो हो किती प्रश्न विचारतील एकदम,तू मलाच प्रश्न विचारतील की तुझ्या बद्दल सांगशील?? पण प्रभातल आधी वसुधाक्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे होते.


पण वसुधाल तिच्या आयुष्याबद्दल फार काही बोलायचे नव्हते,कारण सगळ्या आठवणी तिला त्रास देणाऱ्या होत्या आणि प्रभात पासून ती प्रयत्न करूनही काहीच लपवू शकणार नव्हती.वसुधा आणि प्रभात एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते,अगदी कॉलेज पासून,पण घरच्यांच्या विरोधामुळे ते स्वप्न स्वप्नच राहिले होते आणि नाईलाजाने तिच्या मनाविरुद्ध संसार करावा लागला होता तिला.तिचा जोडीदार कमावता होता,कर्तबगार होता,पण त्यांची मने,विचार कधीच जुळून आले नव्हते.तिचा संसार म्हणजे तिने केलेली तडजोड होती.त्यात दोन मुलींसोबत तिचा नवरा अर्ध्या वाटेत तिला सोडून गेला होता,त्यामुळे उरलेली सगळी जबाबदारी तिला एकटीलाच पार पाडावी लागली होती, सततची प्रभातची येणारी आठवण तिला टाळता येत नव्हती आणि कोणाला सांगताही.त्यामुळे प्रभात ल तिला काही सांगायचे नव्हते आणि भेटायचे नव्हते.पण नजरेतून प्रभातने बऱ्याच गोष्टी वाचल्या होत्या. वसुधाक्या बोलण्याने त्याची खात्री पटली की ती फारशी मनापासून संसारात रमु शकली नाही.तिने अनुभवलेले एकटेपण खूप त्रास देऊन गेलं प्रभातल.दीर्घ श्वास घेऊन बोलायची थांबली वसुधा.प्रभातने तिचा हात थोपटत शांत करण्याचा प्रयत्न केला,तिच्या डोळ्यातून वाहणार पाणी हातावर झेलत राहिला तो.


त्यांच्या भेटी वारंवार होत होत्या,गप्पा रंगत होत्या,वसुधा ्चा एकटेपणा कमी होत होता पण आता हे नाते तिला जपावे की नाही हे समजत नव्हते.पुन्हा नवी सुरुवात,नव्याने मैत्री पण फक्त मैत्री राहील का ? की नाते आणखी कुठले नवे रूप घेईल,ते कसे असेल,समाजमान्य असेल का तिच्या मुलींना समजेल का प्रभात क्या मनात काय असेल असे खूप प्रश्न तिला पडत होते प्रभात त्याच्या आयुष्याबद्दल फार काही बोलत नव्हता. वसुधा ची उत्सुकता काही कमी होत नव्हती.तिने ठरवले होते आज त्याला बोलायला भाग पाडायचे.


भेटल्यावर वसुधाने विषय काढला,नेहमीप्रमाणे त्याने यावर नको बोलूया असे उत्तर दिले तशी वसुधा जायला निघाली त्याने हात पकडून थांबवले पण तिने स्पष्ट सांगितले तू सांगणार असशील तरच थांबेन नाहीतर इथून पुढे नको भेटूया.प्रभातच नाईलाज झाला इतक्या वर्षांनंतर झालेली वसुधाची भेट त्याला अशा पद्धतीने संपवायची नव्हती,तसही आजवर त्याने वासुधाची कोणतीच इच्छा डावलली नव्हती,आणि शकणार ही नव्हता.तो म्हणाला तुझ लग्न झाल हे समजल मला आणि हताश झालो मी,खरतर काहीतरी चमत्कार होईल आणि आपण पुन्हा एकत्र येऊ असे वाटत होते मला पण तुझ्या लग्नाच्या बातमीने ती अशा मावळली आणि मी शहर सोडले.उगाच भटकलो,फिरत राहिलो,आई बाबा कडे गेलो की लग्नाची कटकट मागे लागायची म्हणून तिथे जाणे टाळत होतो.मी तुझ्याशिवाय कुठल्याच मुलीचा बायको म्हणून विचारही करू शकलो नाही,घरच्यांच्या आग्रहाखातर केले असते तरी त्या मुलीवर अन्याय झाला असता म्हणून लग्नच केले नाही.पोटपुरते कमावले आणि आई बाबांना सांभाळत राहिलो.त्यांच्या जाण्याने एकटा पडलो आणि पुन्हा भटकंती करत करत अचानक तुझी भेट झाली.


वसुधा भाऊक झाली काय बोलावे कळेना तिला.खरतर नियतीने,विधात्याने दोघांना तोडून खूप थट्टा केली होती त्यांची.कोणीच सुखी राहू शकले नव्हते.वसुधा म्हणाली आता आपली भेट घडवून विधात्याला काय सुचवायचे असेल प्रभात.प्रभात म्हणाला काही असेल वसू पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला भेटत राहणार अगदी तू ही मला अडवू शकणार नाहीस.


त्या दोघांना भेटताना एकदा वादुधाच्या मुलीने पाहिले,वसुधा घरी आली तेंव्हा तिची मुलगी तिचीच वाट पहात उभी होती. दोघी चहा घेत होत्या,तिच्या मुलीच्या मनात असंख्य प्रश्न होते,तिने शांतपणे सांगितले आई मी आता तुला एका गृहस्थ सोबत पाहिले कोण होते ते? वसुधा ल त्यांच्या नात्याबद्दल काहीच लपवायचे नव्हते,तसे काही कारणही नव्हते आणि गरजही.तिने सर्व काही तिच्या मुलीला सांगितले आणि मुलींशी सगळे शांतपणे ऐकुन घेतले.काहीच न बोलता ती तिथून निघून गेली.पण वसुधा मोकळी झाली होती.


काही दिवसांनंतर वसुधा क्या दोन्ही मुली जावई घरी आले,मुली म्हणाल्या आई बस जरा इथे आम्हाला बोलायचे आहे.वसुधा ल समजेना काय झालं आहे ते.मुली म्हणाल्या आई तुझ्या आणि प्रभात काकांच्या नात्याबद्दल आम्हाला सगळ्यांना समजले आहे आणि आम्ही तुमचे लग्न लावून देण्याचे ठरवले आहे.वसुधा आश्चर्य चकित झाली,आपल्या मुली असा काही विचार करतील हे स्वप्नातही नव्हते त्यांच्या.


मुली म्हणाल्या हे बघ आई आम्हा दोघींची लग्नं झाली आहेत आम्ही आमच्या संसारात आहोत. आमचं सर्वांचं तुझ्यावर लक्ष आहे आणि प्रेमही.पण आम्ही सतत तुझ्या सोबत राहू शकत नाही,तू ही आमच्याकडे येऊन राहणार नाही.कितीही नाही म्हणाल तरी सोबत ही लागतेच.तुझा एकटेपणा कळतो आम्हाला,तेंव्हा तु काहीही आढेवेढे न घेता पटकन हो म्हण म्हणजे आमची काळजी मिटेल.


वसुधा म्हणाली प्रभात क्या मनात असे काहीही नसेल आणि माझ्याही मनात असा विचार आला नाही.तुम्ही काय बोलत आहात.मी तयार आहे लग्नाला असा आवाज आला दारातून तिने पाहिले तर तो प्रभात होता.सगळ्यांनी छान लग्न सोहळा पार पडला आणि बघता बघता नवीन आयुष्याची सुरुवात झाली दोघांच्या.


प्रभात म्हणाला वसू आपले असे लग्न होईल असा विचार आला नव्हता कधी माझ्या मनात.अचानक आपली भेट झाली आणि बघता बघता लग्न झाले आपले.पण आपली मैत्री मात्र मी कधीच तोडू शकलो नसतो,तुला भेटल्याशिवाय राहू शकलो नसतो.आपल्या मुलींनी आपल्याला पाहिले आणि आपल्याला कायमचे घट्ट बांधून टाकले.खूप छान वाटतंय मला वसू.आज मझ प्रेम पूर्ण झालं.मी कधीच तुझ्या शरीरावर प्रेम केल नव्हते,ती अभिलाषा,वासना आज मनातही नाही,मझ प्रेम त्याच्या खूप पलीकडे गेले आहे तुझ्या आत्म्याला,मनाला भिडले आहे.आज हवा आहे फक्त तुझा सहवास बाकी काहीच नाही.दोघेही रडत एकमेकांच्या मिठीत विसावले अगदी कायमचे.